Telegram Web Link
Forwarded from TARGET MPSC (MH)
📚 *History Special (16/10/2018)*📚
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*●◆लॉर्ड एल्गिन 2 (1894-1899)◆●*
-------------------------------------------------------------

◆ लॉर्ड लॅन्सडाऊन नंतर व्हॉइसरॉय म्हणून लॉर्ड एल्गिन २ आला.

◆ याच्या कारकिर्दीत 1896 ला भीषण दुष्काळ पडला होता.

◆ 1896-97 मध्ये दुष्काळग्रस्तांसाठी व्हॉइसरॉय एल्गिनने हॉंगकॉंगकडून मुंबई बंदरात अन्नधान्य आणले.

◆ या अन्नधान्यासोबत ब्यूबॉनिक नावाचा भयंकर प्लेग भारतात आणला.
https://www.tg-me.com/targetmpscmh
-------------------------------------------------------------
*●◆लॉर्ड कर्झन (1899-1905)◆●*

◆ लॉर्ड कर्झन हा 1899 मध्ये व्हॉईसरॉय म्हणून भारतात आला. कर्झन भारताला आशियाचा राजकीय आधारस्तंभ समजत असे.

◆ व्हॉइसरॉयपदी येण्यापूर्वी तो भारतात चार वेळा आला होता.

◆ 1899-1900 दरम्यान भारतात दुष्काळाबरोबर एन्फ्लूएंझा व मलेरियाची साथ पसरली होती.

◆ या दुष्काळाची व्याप्ती महाराष्ट्र व गुजरातमध्ये होती.

◆ दुष्काळ निवारणार्थ व्हॉइसरॉय कर्झनने 1901 मध्ये लॉर्ड मॅक्डोनल समिती नेमली.

◆ 1899 साली कर्झनने भारतीय चलन कायदा संमत करून भारतासाठी सुवर्ण प्रमाण स्वीकारले.

◆ 1901 साली वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करून टोळीवाल्यांचा बंदोबस्त केला.

◆ कर्झनने पोलिस खात्यातील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार आदी गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी 1902 मध्ये ॲन्ड्रू फेझर समिती नेमली.

◆ कर्झनने 1905 ला पोलीस खात्याची पुनर्रचना केली.

टीप:- उर्वरित भाग उद्याच्या लेखात दिला जाईल.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  01/11/2021  ■
                        वार :-  सोमवार 
         
          ■    दिनविशेष : 01 नोव्हेंबर     ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

● १६८३: छत्रपती संभाजी राजे यांच्या फौजेने फोंडा येथे अद्वितीय पराक्रम करून पोर्तुगिजांचा पराभव केला.

● १७५५: भूकंप आणि सुनामीमुळे पोर्तुगालमधील लिस्बन शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर सुमारे ६०,००० ते ९०,००० लोक ठार झाले.

● १८७०: अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.
● १८४५: मुंबईत आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आद्य ग्रँट मेडिकल कॉलेज या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रारंभ झाला.

● १८४८: महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.

● १९२५: गोविंदराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रांत वऱ्हाडातील स्वराज्य पक्षाच्या तिन्ही प्रांतिक समित्यांची एक अनौपचारिक संयुक्त बैठक झाली.

● १९२८: हिंदुस्थान सरकारने आपल्याला हवे तसे बदल विधेयकात करून त्याचे कायद्यात रुपांतर केले आणि नवी महसूल संहिता वऱ्हाडात लागू करण्यात आली.

● १९४५: ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

● १९५६: भारतामध्ये भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली.

● १९५६: आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नुल ही त्याची राजधानी होती.

● १९५६: दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.
● १९५६: केरळ राज्य स्थापना दिन.

● १९५६: कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.

● १९६६: पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा राज्यात विभागणी झाली.

● १९६८: मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिकाच्या फिल्म रेटिंग सिस्टीमची अधिकृतपणे सुरवात झाली.

● १९७३: मैसूर राज्याचे नाव बदलुन ते कर्नाटक असे करण्यात आले.

● १९७३: लखदीप, मिनिकॉय, अग्निदीव बेटांचे नांव लक्षद्वीप असे ठेवण्यात आले.

● १९८२: अमेरिकेत मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली.

● १९९४: मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

● १९९९: कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

● २०००: सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

● २००५: योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                 ■   जन्म/वाढदिवस   ■


● १८८८: चित्रकार, नेपथ्यकार, रंगभूमिविषयक ग्रंथांचे लेखक पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचा जन्म.

● १८९३: शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर १९५६ – कोलकता, पश्चिम बंगाल)

● १९१८: विनोदी अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट २००१)

● १९२६: संगीत दिग्दर्शक कवी रेडिओ वरील सुगम संगीत विभाग प्रमुख, शब्द प्रधान गायकी चे लेखक यशवंत देव यांचा पेण येथे जन्म.

● १९३२: कवी अरुण बाळकृष्ण कोलटकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.

● १९४०: भारताचे ३५वे सरन्यायाधीश रमेश चंद्र लाहोटी यांचा जन्म.

● १९४५: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)
● १९६०: अॅपल इन्कचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांचा जन्म.

● १९६३: भारतीय उद्योजीका नीता अंबानी यांचा जन्म.
● १९७३: अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा जन्म.

● १९७४: क्रिकेटपटू वी. वी. एस. लक्ष्मण यांचा जन्म.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■


● १८७३: बंगाली नाटककार दीनबंधू मित्र यांचे निधन.
● १९५०: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक बितीभूषण बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १८९४)

● १९८८: ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे पुणे येथे निधन.

● १९९१: संगीतकार व संगीत संयोजक अरुण पौडवाल यांचे निधन.

● १९९३: ठुमरी, दादरा व गझल गायिका नैनोदेवी यांचे निधन.

● १९९४: शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन.

● १९९६: श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष ज्युनिअस जयवर्धने यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९०६)

● २००५: लेखिका योगिनी जोगळेकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९२५)
● २००७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक एस. अली रझा यांचे निधन.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (01/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 *INS तुशील”: भारतीय नौदलातील सातवी युद्धनौका*

◆ भारतीय नौदलातील सातव्या युद्धनौकेचे (विनाशिका) 28 ऑक्टोबर 2021 रोजी यांतर शिपयार्ड (कॅलिनीनग्राड, रशिया) येथे जलावतरण करण्यात आले.

◆ या युद्धनौकेचे 'तुशील' असे नाव ठेवण्यात आले आहे. “तुशील” हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ ‘संरक्षक ढाल’ असा होतो.

◆ भारत आणि रशिया यांच्यात झालेल्या करारानुसार “प्रोजेक्ट 1135.6” प्रकारच्या दोन युद्धनौकाची बांधणी रशियात तर दोन युद्धनौकाची बांधणी भारतात होणार आहे.

◆ भारतात गोवा शिपयार्ड लिमिटेड ही कंपनी नौकाची बांधणी करणार.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

★ युद्धनौकांची वैशिष्ठ्ये..

◆ युद्धाच्या तीनही प्रकारात – जल, थल आणि भूमी - यासाठी भारताच्या विशेष गरजा लक्षात घेऊन या युद्धनौकांची बांधणी होत आहे. या नौका स्वतंत्रपणे तसेच नौसेनेच्या कृतीदलाचा भाग म्हणून देखील वापरल्या जाऊ शकतात.

◆ भारत आणि रशियाच्या अत्याधुनिक शस्त्र आणि संवेदकांचा शक्तिशाली मिलाप यामुळे या युद्धनौका समुद्राच्या किनाऱ्यावर तसेच खोल समुद्रात वापरता येतील.

◆ या नौकांमध्ये "विनाशिका तंत्रज्ञान" असल्याने त्या रडारच्या टप्प्यात येत नाहीत तसेच त्यांचा पाण्याखाली होणारा आवाज देखील कमी होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰 Polity Special (01/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 राज्यशास्त्र - केशवानंद भारती खटला

◆ केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्मक कायदेशीर स्पष्टीकरण याविषयी संघर्ष झाला.

◆ घटनेची चौकट आणि संसदेचे कायदे करण्याचे अधिकार या विषयातली मतभिन्नता हे या संघर्षाचे प्रमुख कारण होते.

◆ राज्यघटना ही सरकारी समाज सुधारणेच्या धोरणातील मोठा अडथळा आहे, असे चित्र सरकारतर्फे रंगवले गेले.

◆ संसदेचे कायदे करण्याचे अधिकार अमर्याद आहेत, का राज्यघटनेचा त्यावर अंकुश आहे?

◆ या विषयावर शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार (१९५२) सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार (१९५२) आणि गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार (१९६७) हे महत्त्वाचे खटले लढले गेले.

◆ गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की घटनेतील मूलभूत अधिकारांना (Fundamental Rights) बाधा येणारा कुठलाही कायदा किंवा घटनादुरुस्ती करावयाचा अधिकार संसदेला नाही.

◆ या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये केरळ जमीन सुधारणा कायद्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान दिले गेले.

◆ या खटल्यासाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले गेले. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे खंडपीठ होते. या खंडपीठाने ८०० पानी निकालपत्रात* महत्त्वपूर्ण निर्णय दिला, की, ' संसदेला घटनेच्या गाभ्याला धक्का लावता येणार नाही'.

◆ संसदेला घटनादुरुस्ती करावयाचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या अधिकारात संसद घटनेचे मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा, की घटनादुरुस्ती अधिकारामध्ये घटनेचे मूळ स्वरूप बदलणे अंतर्भूत नाही.

◆ सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचे संरक्षक आणि विश्‍लेषक असल्यामुळे घटनादुरुस्ती किंवा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूपाला बाधक आहे किंवा नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वत-कडे ठेवला. म्हणजेच राज्यघटनेचा काही भाग भविष्यकाळातल्या सर्व संसद सदस्यांना बंधनकारक आहे असं स्पष्ट केलं.

◆ या बंधनकारक भागाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयानं नंतर इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७५), मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार (१९८०), आय. आर. कोहेली विरुद्ध तमिळनाडू सरकार (२००७) या खटल्यांमध्ये राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूप संकल्पनेवर शिक्कामोर्तब केलं.

◆ केशवानंद भारती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आपले राज्यघटनेच्या विश्‍लेषणाचे अंतिम अधिकार अबाधित ठेवून देशामध्ये लोकशाहीला धोका पोचणार नाही याची जनतेला खात्री दिली. म्हणूनच या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Forwarded from TARGET MPSC (MH)
📚 *History Special (17/10/2018)*📚
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*◆●लॉर्ड कर्झन (1899-1905)●◆*
-------------------------------------------------------------

कालच्या लेखातील उर्वरित भाग.👇

◆ कर्झनने १९०२ साली सर रॅली यांच्या
अध्यक्षेतेखाली युनिव्हर्सिटी कमिशन
नियुक्त केले व या कमिशनच्या
शिफारशीनुसार १९०४ साली हिंदी
विद्यापीठाचा कायदा केला.

◆ तत्पूर्वी त्याने १९०१ मध्ये
संस्थानिकांच्या राजपुत्रांकरिता
Imperial Codet Core ची स्थापना
केली.

◆ 1901 मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया
हीचा मृत्यू झाला.

◆ कर्झनने पुराणवस्तू संशोधन खाते
स्थापन केले त्यासाठी त्याने प्राचीन
स्मारक कायदा संमत करून घेतला.
https://www.tg-me.com/targetmpscmh
◆ सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता
वाढवण्यासाठी एक नियमावली तयार
करून कर्झनने राजकारणात
कार्यक्षमता या बाबीला महत्त्व दिले.

◆ कर्झनने भारतात आल्यावर १२ खाती
नेमून विविध समित्या नेमल्या. त्यामुळे
त्याच्या कारकिर्दीला समिती प्रशासन
म्हणतात.

◆ त्याच्या कारकीर्दीतील त्याची घोडचूक
म्हणजे 7 जुलै 1905 रोजी केलेली
बंगालची फाळणी ही होय.

◆ तिचा मुख्य उद्देश प्रशासकीय
कारणापेक्षा हिंदू-मुस्लिम फूट पाडणे हा
होता. ज्याचे अत्यंत दूरगामी परिणाम
दिसले.

◆ कर्झन हा खरेतर लष्कर सरसेनापती
होता, परंतु फाळणी प्रकरणामुळे तो
बराच वादग्रस्त ठरला.

*●कर्झनच्या शेतीविषयक सुधारणा●*

◆ 1900 मध्ये पंजाबमध्ये जमिनीच्या
हस्तांतरणाचा कायदा अमलात
आणला. ज्याने शेतकऱ्यांव्यतिरिक्त
इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली.

◆ 1901 मध्ये त्याने शेतकी खात्याची
स्थापना केली. तसेच कृषी
महानिरीक्षकाची नेमणूक केली.

◆ बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी
संशोधन केंद्राची स्थापना केली.

◆ 1904 मध्ये कर्झनने सावकारांच्या
पाशातून शेतकऱ्यांना मुक्ती मिळवून
देण्यासाठी सहकारी पतपेढी कायदा
केला.

◆ कर्झनने ताजमहालचे सौंदर्य
वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले
होते.

◆ कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी
टाटा विज्ञानसंस्थेची स्थापना केली.

◆ ब्रिटीश साम्राज्याचे वैभव
दर्शविण्यासाठी कलकत्ता येथे राणी
व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ Victoria
Memorial Hall ची स्थापना केली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  12/11/2021  ■
                        वार :-  शुक्रवार 
         
          ■    दिनविशेष : 12 नोव्हेंबर     ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

◆ २००३ : ’शांघाय ट्रान्सरॅपिड’ या प्रवासी रेल्वेने ५०१ किमी/तास या वेगाने जाण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

◆२००० : १२ नोव्हेंबर हा दिवस ’राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९४७ मधे याच दिवशी महात्मा गांधी यांचे दिल्ली आकाशवाणीवरुन भाषण प्रसारित झाले होते.

◆ २००० : भारताची वूमन ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रम्हण्यम हिने तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे झालेल्या ३४ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमधे वैयक्तिक रौप्यपदक मिळवले.

◆ १९९८ : परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी ‘पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन’ (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले. १५ सप्टेंबर २००२ पासून या योजनेच्या अंमलबजावणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली.

◆ १९५६ : मोरोक्को, सुदान आणि ट्युनिशियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

◆ १९३० : पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

◆ १९२७ : सोविएत कम्युनिस्ट पक्षातुन लिऑन ट्रॉटस्कीची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जोसेफ स्टॅलिनच्या हातात सर्व सत्ता गेली.

◆ १९१८ : ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.

◆ १९०५ : नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला.
https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

◆ १९४० : अमजद खान – हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक (मृत्यू: २७ जुलै १९९२ – मुंबई)

◆ १९०४ : श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू (मृत्यू: १ एप्रिल १९८९)

◆ १८९६ : डॉ. सलीम अली – जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक (मृत्यू: २७ जुलै १९८७)

◆ १८८० : पांडुरंग महादेव तथा ’सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६७)

◆ १८१७ : बहाउल्ला – बहाई पंथाचे संस्थापक (मृत्यू: २९ मे १८९२ – आक्रा, इस्त्राएल)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

◆ २००५ : प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ (जन्म: २१ जानेवारी १९२४)

◆ १९९७ : वेदाचार्य विनायकभट्ट घैसास गुरुजी – वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी (जन्म: ? ? ????)

◆ १९६९ : इस्कंदर मिर्झा – पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती (जन्म: १३ नोव्हेंबर १८९८)

◆ १९५९ : सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म: १८ ऑगस्ट १८८६)

◆ १९५९ : केशवराव मारुतराव जेधे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक. केशवराव व बाबूराव याबंधूंचा सत्यशोधक चळवळीकडे ओढा होता. त्यांनी ’मजूर’ हे वृत्तपत्र काढले. (जन्म: ९ मे १८८६)

◆ १९४६ : पण्डित मदन मोहन मालवीय – बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक (जन्म: २५ डिसेंबर १८६१)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (12/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य

◆ पंतप्रधान मोदी यांची ‘सीओपी-२६’ परिषदेत ग्वाही

◆ भारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथील संयुक्त राष्ट्रांच्या ‘सीओपी-२६’ या जागतिक हवामान परिषदेत सोमवारी दिली.

◆ भारत आपली गैर-जीवाश्म ऊर्जा क्षमता ५०० गिगावॅटपर्यंत वाढवेल आणि २०३० पर्यंत अक्षय ऊर्जेद्वारे आपली ५० टक्के ऊर्जेची गरज पूर्ण करेल, असा विश्वास मोदी यांनी जागतिक नेत्यांना आश्वस्त करताना व्यक्त केला. 

◆ पुढील पिढीला जागरूक करण्यासाठी हवामान बदलाबाबतच्या धोरणांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याची गरजही मोदी यांनी व्यक्त केली.

◆ ‘सीओपी-२६’ परिषदेत सहभागी जागतिक नेत्यांपुढे पंतप्रधान मोदी यांनी भाषण केले. ते म्हणाले, आपल्याला परिस्थितीनुसार बदल हा विकास धोरणांचा आणि योजनांचा मुख्य भाग बनवावा लागेल.

◆ भारतात, नल से जल, क्लीन इंडिया मिशन आणि उज्ज्वला योजनांनी नागरिकांना फायदा झालाच, परंतु त्यांचे जीवनमानही उंचावले.

◆ हवामान बदलाच्या संकटाला तोंड देताना केवळ त्या संकटाचे निराकरणच नव्हे तर त्याचे रुपांतर करण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन मोदी यांनी केले.

◆ मोदी यांच्या आधी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी भाषण केले. त्यांनी विकसनशील देशांना स्वच्छ ऊर्जानिर्मितीसाठी मदत करण्याची ग्वाही दिली.

◆ ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी परिषदेते उद्घाटन केले आणि त्यांनी पृथ्वीच्या सद्यस्थितीची तुलना बॉण्डपटाच्या कथेशी केली.

◆ पृथ्वी विध्वंसाच्या उंबरठ्यावर असताना बॉम्ब निकामी करण्याचा प्रयत्न जेम्स बॉण्ड करतो, तशी आपली अवस्था असल्याचे ते म्हणाले.

◆ दरम्यान, भारतातील सर्व हरित प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून अतिरिक्त ७५० दशलक्ष पौंडांची मदत मिळावी यासाठी ब्रिटन ‘हरित हमी’ (ग्रीन गॅरेंटी) देईल, अशी घोषणा ‘सीओपी-२६’ परिषदेत करण्यात आली.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ ब्रिटनच्या हरित हमीमुळे भारतातील स्वच्छ ऊर्जा, वाहतूक आणि नागरी विकास क्षेत्रात स्वच्छ पायाभूत सुविधांना चालना मिळेल, असे सांगण्यात आले. ब्रिटनच्या हरित औद्योगिक क्रांतीचा जगभर प्रसार व्हावा.

◆ स्वच्छ तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमधील पदलाची गती अविश्वसनीय आहे, परंतु आपल्या पृथ्वी वाचवण्याच्या शर्यतीत एकही देश मागे पडू नये, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (12/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची ग्रुप कॅप्टन पदावर बढती!

◆ भारतीय वायुसेनेचे दिग्गज पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ग्रुप कॅप्टन या पदावर बढती देण्यात आली आहे. अभिनंदन वर्धमान यांना आयएएफकडून ग्रुप कॅप्टन पदावर बढती देण्यात आली आहे आणि ते लवकरच त्याची नवीन रँक सांभाळतील, असे सूत्रांनी एएनआयला सांगितले.

◆ ग्रुप कॅप्टन हा भारतीय सैन्यात कर्नलच्या बरोबरीचा असतो. अभिनंदन हे श्रीनगर स्थित ५१ स्क्वॉड्रनचा भाग होते.

◆ भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी फायटर विमानांना पळवून लावताना २७ फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात भारतीय हवाईदल आणि पाकिस्तानी हवाई दलाच्या विमाने समोरासमोर आली.

◆ यावेळी अभिनंदन यांनी मिग २१ बायसन विमानातून पाकिस्तानच्या एफ १६ फायटर विमानावर वर आर- ७३ मिसाइल डागले.

◆ या झटापटीमध्ये पाकिस्तानी विमानांनी डागलेले अॅमराम मिसाइल वर्धमान यांच्या मिग २१ बायसन विमानाला धडकले.
त्यानंतर अभिनंदन यांचे मिग-२१ पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यामुळे अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले.

◆ भारताने चहूबाजूंनी पाकिस्तानवर राजनैतिक दबाव आणल्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानने अभिनंदन यांना भारताकडे सोपवले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (12/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 व्यक्तिवेध : अ‍ॅलन डेव्हिडसन

◆ अष्टपैलू क्रिकेटपटू अ‍ॅलन डेव्हिडसनचा १९५० आणि १९६०च्या दशकात दबदबा होता. सहा फूट उंची, ऑस्ट्रेलियाच्या माऱ्याला प्रारंभ करणारी डावखुरी वेगवान गोलंदाजी, मधल्या फळीत फटकेबाजी करण्याची क्षमता असलेली डावखुरी फलंदाजी ही डेव्हिडसन यांची वैशिष्ट्ये.

◆ जशी त्यांची गोलंदाजीची शैली खास होती, तसाच त्यांचा वेग आणि लेट स्विंगही लक्षवेधी होता. याशिवाय नजीकच्या क्षेत्ररक्षणाच्या चापल्यामुळे ‘द क्लॉ’ हे टोपणनाव त्यांना प्राप्त झाले होते.

◆ डेव्हिडसन यांनी ४४ कसोटी सामन्यांत फलंदाज १,३२८ धावा केल्या, तसेच १८६ बळी त्यांच्या खात्यावर होते. परंतु २०.५३ धावांची त्यांची सरासरीसुद्धा आश्चर्यकारक होती.

◆ एका कसोटीत १०० धावा आणि १० बळी घेण्याची किमया साधणारे ते पहिले क्रिकेटपटू. मधल्या फळीतील फलंदाज म्हणून नऊ शतकेही त्यांच्या खात्यावर होती. त्यांच्या अष्टपैलुत्वाचा कर्णधार रिची बेनॉ यांना अभिमान वाटायचा.

◆ डेव्हिडसन यांचा जन्म न्यू साऊथ वेल्समधील सेंट्रल कोस्ट परिसरातील लिसारो येथे झाला. कुटुंबाच्या क्रिकेटप्रेमामुळे त्यांनाही या क्रिकेट आवडू लागले.

◆ गॉसफोर्ड हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना १९व्या वर्षी बँकेत नोकरी मिळाली. मग नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट संघाचे ते प्रतिनिधित्व करू लागले. लवकरच त्यांनी न्यू साऊथ वेल्स संघात स्थान मिळवले.

◆ शेफिल्ड शिल्डच्या तीन सामन्यांत प्रतिनिधित्व केल्यानंतर १९५०मध्ये वयाच्या २०व्या वर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या रिझर्व्ह संघात त्यांची निवड झाली.

◆ वायरारापा संघाविरुद्ध डावात १० बळी आणि नाबाद १५७ धावांची खेळी त्यांनी साकारली. १९५२ मध्ये डेव्हिडसन यांना इंग्लंडमधील लीग क्रिकेटचे तीन प्रस्ताव चालून आले. परंतु राष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांनी ते फेटाळले.

◆ अखेरीस १९५३ मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी डेव्हिडसन यांची ऑस्ट्रेलिया संघात निवड झाली. पण मिलर-लिंडवॉल हे ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याची धुरासुद्धा सांभाळत होते. १९५६ मध्ये किथ मिलरच्या निवृत्तीनंतर १९५७-५८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून नवा चेंडू हाताळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ तिथून डेव्हिडसन यांच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. १९६२ मध्ये विस्डेनने निवडलेल्या वर्षातील पाच सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये डेव्हिडसन यांचा समावेश होता.

◆ १९६४ मध्ये ‘मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर’ आणि १९६४ मध्ये ‘मेंबर ऑफ दी ऑर्र्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हे बहुमान त्यांना मिळाले. याशिवाय १९८८ मध्ये स्पोर्ट्स ऑस्ट्रेलिया हॉल ऑफ फेम, २००४ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम, २०११ मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेम तसेच २००० मध्ये ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स मेडल त्यांना प्रदान करण्यात आले.

◆ वयाच्या ९२व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या डेव्हिडसन यांच्या कर्तृत्वाचे क्रिकेटविश्वाला अप्रूप वाटते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰 MPSC Mantra (12/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा – आर्थिक आणि सामाजिक भूगोल

◆ राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेच्या सामान्य अध्ययनातील प्राकृतिक आणि संकल्पनात्मक भूगोलाच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये आर्थिक आणि सामाजिक भूगोलाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

◆ आर्थिक भूगोल

पूर्व परीक्षेमध्ये अर्थव्यवस्था हा घटक वगळण्यात आला असला तरी आर्थिक भूगोलावरील प्रश्न विचारले जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे या भागाचा व्यवस्थित अभ्यास आवश्यक आहे.

आर्थिक भूगोल हा बहुतांश तथ्यात्मक घटक आहे. यामध्ये आकडेवारी/ टक्केवारी आणि क्रमवारी याबाबतची माहिती अद्ययावत करून घेणे आवश्यक आहे. यासाठी आर्थिक पाहणी अहवालामधून महत्त्वाची पिके, खनिजे, उद्योग यांची देशातील सर्वाधिक उत्पादन, उत्पन्न व निर्यातीमधील वाटा असणारी राज्ये व यातील कोणत्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या तीन क्रमांकावर आहे याची माहिती अद्ययावत करुन घ्यायला हवी.

महाराष्ट्रातील महत्त्वाची खनिजे, पिके व उद्योगांच्या उत्पादनाबाबत पहिल्या तीन जिल्ह्यांची माहिती करून घेतल्यास फायदेशीर ठरेल.

खनिजे व ऊर्जा स्रेत, महत्त्वाचे पायाभूत उद्योग, महत्त्वाची धरणे प्रकल्प आणि महत्त्वाची पर्यटन स्थळे यांचा कोष्टक मांडून अभ्यास करायचा आहे. या कोष्टकामध्ये समाविष्ट करायचे मुद्दे पुढीलप्रमाणे: स्थान, वैशिष्टय़े, आर्थिक महत्त्व, असल्यास वर्गीकरण, असल्यास पर्यावरणीय मुद्दे, संबंधित समस्या, कारण, उपाय, असल्यास संबंधित चालू घडामोडी.

महाराष्ट्रातील खनिजांचे उत्पादन होणारी क्षेत्रे, त्यांची भूशास्त्रीय रचना, उत्पादनाचे प्रमाण व गुणवत्ता, खाणींचे प्रकार या बाबी समजून घ्याव्यात. या दृष्टीने भारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार महत्त्वाचे असल्याने त्यांचा पुढील मुद्यांच्या अनुषंगाने अभ्यास करायला हवा: खडकांचा प्रकार, निर्मिती, कोठे आढळतो, भौगोलिक व वैज्ञानिक वैशिष्टये, रचना, आर्थिक महत्त्व,
महाराष्ट्रातील महत्त्वाची वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, जैवविविधता क्षेत्रे यांचा भौगोलिक व पर्यावरणीय वैशिष्टय़े व महत्त्व या दृष्टीने अभ्यास करावा. वनांचे आर्थिक महत्त्व समजून घ्यावे. भारतातील प्रसिद्ध वने, उद्याने व सद्यस्थितीत चर्चेत असलेली स्थळे याची माहिती करून घ्यावी. संदर्भ साहित्यातील संबंधित सगळे कोष्टक पाठ करणे आवश्यक नाही.
धार्मिक, वैद्यकीय, सांस्कृतिक पर्यटन, eco tourism,, राखीव उद्याने इ. संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. या वर्गीकरणांमध्ये येणारी महाराष्ट्रातील ठिकाणे व त्यांची वैशिष्टय़े माहीत असायला हवीत.

◆ सामाजिक भूगोल

यामध्ये राजकीय, मानवी आणि लोकसंख्या भूगोल हे उपघटक विचारात घ्यायचे आहेत.

◆ राजकीय भूगोल

प्रशासकीय विभागातील जिल्हे, त्यांची मुख्यालये व त्यांची वैशिष्टय़े, जिल्ह्यांची कालानुक्रमे निर्मिती, महत्त्वाची शहरे, आर्थिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे यांची कोष्टक मांडून टिपणे काढावीत. यामध्ये पर्यटनस्थळे (tourists spots), सान्निध्यात असल्यास नदी/ धरण/ पर्वतशिखर, औद्योगिक उत्पादने, वैशिष्टय़पूर्ण पारंपरिक उत्पादने/ हस्तोद्योग, ऐतिहासिक वारसा स्थळे/ इमारती, ठिकाणाशी संबंधित ऐतिहासिक व चर्चेतील व्यक्तिमत्त्वे यातील जे मुद्दे लागू होतील त्यांचा समावेश करून टिप्पणे काढावीत.

राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिल्ह्यांच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी /डोंगर नैसर्गिक भूरूप आणि राज्याचा राजकीय नकाशाही व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.

◆ लोकसंख्या भूगोल

भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता, नागरीकरण, लिंगगुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता या मुद्दय़ाच्या आधारे आढावा घ्यावा. जन्मदर, मृत्युदर, बाल लिंगगुणोत्तर, माता मृत्युदर, अर्भक मृत्युदर, बाल मृत्युदर यांची माहिती असायला हवी.

यामध्ये सन २००१ व २०११ च्या जनगणनेची तुलना, वरील मुद्दा सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण असलेली तीन राज्ये, तुलनेने सर्वात जास्त व सर्वात कमी वाढ झालेली राज्ये व सर्व बाबतीत महाराष्ट्राचे दोन्ही वर्षांमधील स्थान तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण व वाढीचे जिल्हे अशा मुद्यांच्या कोष्टकामध्ये नोट्स काढणे फायदेशीर ठरेल.

वसाहतींचे प्रकार या मुद्यावर फारसे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता नसली तरी वसाहतीचे प्रकार, आकार, स्वरूप, ठिकाण व आर्थिक महत्त्व या मुद्यांचा आढावा घेणे फायदेशीर ठरेल. मानवी स्थलांतर हा मुद्दाही VIMP यादीत ठेवायची आवश्यकता नाही. तरीही घटक विषयांची व्याप्ती पाहता यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. स्थलांतराची कारणे, स्वरूप, समस्या, परिणाम व उपाय इ. दृष्टीने अभ्यास आवश्यक आहे.
या बाबतीत आकडेवारीह्ण हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातील स्थलांतराची आकडेवारी (म्हणजे टक्केवारी) आर्थिक पाहणी अहवालामधून अद्ययावत करून घ्यायला हवी. यामध्ये स्थलांतरातील सामाजिक घटकांचे उतरत्या क्रमाने प्रमाण, कारणांची उतरत्या क्रमाने टक्केवारी, कोणत्या ठिकाणाहून स्थलांतर होत आहे त्यांच्या टक्केवारीचा उतरता क्रम ही आकडेवारी महत्त्वाची आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Forwarded from TARGET MPSC (MH)
📚 *History Special (18/10/2018)*📚
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*●◆लॉर्ड मिंटो-II (1905-1910)◆●*

◆ कर्झननंतरचा भारताचा झालेला
व्हॉइसरॉय म्हणजे लॉर्ड मिंटो दुसरा.

◆ याने 1907 साली चीनशी असलेला
अफूचा व्यापार बंद केला.

◆ मुस्लिमांना मिंटोने चिथावणी दिली,
स्वतंत्र मतदारसंघाचे सिमला येथे
1906 मध्ये वचन दिले.

◆ 1909 मध्ये इंडिया कौन्सिल ॲक्ट
ज्याला मोर्ले-मिंटो सुधारणा म्हणतात
हा कायदा पास केला.
--------------------------------------------------------------

●◆लॉर्ड हार्डिंग्ज (1910-1916)◆●

◆ भारतातील सर्वात लोकप्रिय व्हॉइसरॉय
म्हणून हार्डिंग्जला ओळखतात.
https://www.tg-me.com/targetmpscmh
◆ व्हॉइसरॉय हार्डिंग्जने जॉर्ज पंचमच्या
स्वागतार्थ दिल्लीत 12 डिसेंबर 1911
रोजी दिल्ली येथे दरबार भरवला.

◆ त्यावेळी जॉर्ज पंचम याने बंगालची
फाळणी रद्द केली.

◆ 23 डिसेंबर 1912 रोजी त्याने
राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला
हलवली. त्या शाही मिरवणूकीत
हार्डिंग्ज बॉम्ब हल्ल्यात जखमी झाला.

◆ या हल्ल्याचा रासबिहारी बोस यांच्यावर
खटला भरला. तो दिल्ली खटला म्हणून
ओळखला जातो.

◆ डिसेंबर 1914 मध्ये पहिले महायुद्ध
सुरू झाले त्यास भारतीयानी बिनशर्त
पाठिंबा दर्शविला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  13/02/2021  ■
                        वार :-  शनिवार 
         
          ■    दिनविशेष : 13 नोव्हेंबर     ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

◆ १९९४ : स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.

◆ १९७० : बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे ५,००,००० लोक मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती.

◆ १९१३ : रविंद्रनाथ टागोर यांच्या ’गीतांजली’ला नोबेल पारितोषिक
https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

◆ १९६७ : जूही चावला – अभिनेत्री

◆ १९१७ : वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ (मृत्यू: १ मार्च १९८९)

◆ १९१७ : गजानन माधव मुक्तिबोध – हिन्दी कवी, लेखक, टीकाकार व संपादक (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६४)

◆ १८९८ : इस्कंदर मिर्झा – पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९६९)

◆ १८७३ : बॅ. मुकुंद रामराव जयकर – कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (मृत्यू: १० मार्च १९५९)

◆ १८५५ : गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार, स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी, फ्रेन्च व संस्कृत नाटकांची भाषांतरे इ. अनेक प्रकार त्यांनी हाताळले होते. (मृत्यू: १४ जून १९१६)

◆ १८५० : आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी (मृत्यू: ३ डिसेंबर १८९४)

◆ १७८० : महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक (मृत्यू: २७ जून १८३९)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

◆ २००२ : ऋषिकेश साहा – नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते (जन्म: ? ? १९२५)

◆ २००१ : अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी – ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्‍या लेखिका. ’दुर्दैवाशी दोन हात’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला १९७५ मधे राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. (जन्म: १५ ऑगस्ट १९१७)

◆ १९५६ : इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार (जन्म: १ नोव्हेंबर १८९३ – मेखलीगंज, कुच बिहार, पश्चिम बंगाल))

◆ १७४० : कृष्णदयार्णव – प्राचीन मराठी कवी. त्यांचा ’हरिवरदा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. (जन्म: ? ? १६७४)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
2024/12/25 02:59:21
Back to Top
HTML Embed Code: