Telegram Web Link
🔰🔰चालू घडामोडी (13/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 मध्य रेल्वेच्या स्थापनेला ७० वर्षे पूर्ण

◆ नागपूर : मध्य रेल्वेच्या स्थापनेला ७० गौरवशाली वर्षे पूर्ण झाली असून शुक्रवारपासून ७१ व्या वर्षाला प्रारंभ झाला आहे.

◆ आशियातील (आणि भारतातील) पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणेदरम्यान धावली. जसजशी वर्षे उलटली, तसतशी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचा विस्तार होत गेला.

◆ १९०० मध्ये जीआयपी रेल्वे कंपनीमध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीचे विलीनीकरण झाल्यानंतर, तिची सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्येला कानपूर आणि अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूरपासून दक्षिण-पूर्वेला रायपूरपर्यंत वाढवण्यात आली. अशाप्रकारे, बॉम्बेद्वारे भारताच्या जवळजवळ सर्व भागांशी संपर्क साधला गेला. 

◆ ५ नोव्हेंबर १९५१ रोजी निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली.

◆ सध्या मध्य रेल्वेवर मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे असे पाच विभाग आहेत. मध्य रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,१५१ मार्ग किमीवर पसरलेले असून एकूण ४७१ स्थानके आहेत. 

◆ पहिली शताब्दी एक्सप्रेस, पहिली जन शताब्दी एक्सप्रेस, पहिली तेजस एक्सप्रेस आणि गेल्यावर्षी पहिली किसान रेल्वेबाबत मध्य रेल्वे विकासात सतत आघाडीवर आहे. 

◆ मुंबईची उपनगरीय सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. मध्य रेल्वेने उपनगरीय नेटवर्कमध्ये सातत्याने वाढ केली असून आज चार मार्गिका आहेत.

◆ ३ डब्यांपासून सुरू झालेल्या उपनगरीय सेवा हळूहळू ९ डब्यांच्या, १२ डब्यांच्या आणि १५ डब्यांच्या काही सेवांपर्यंत वाढल्या आहेत. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ दहशतवादी हल्ल्याचा सामना केला
मध्य रेल्वेनेही अनेक संकटांचा सामना करून ती मजबूत झाली आहे.

◆ मुसळधार पाऊस असो, २६ नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला असो किंवा करोनाचे गंभीर आव्हान असो, समर्पित कर्मचाऱ्यांनी या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (13/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय गौरव ; आदित्य ठाकरे यांच्याकडून पुरस्काराचा स्वीकार

◆ मुंबई : पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेने दखल घेतली असून स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या परिषदेत महाराष्ट्राला ‘इन्स्पायरिंग रिजनल लिडरशिप’ (प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व) पुरस्कार मिळाला आहे.

◆ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

◆ महाराष्ट्राला ‘अंडर २ कोईलेशन फॉर क्लायमेट अ‍ॅक्शन’कडून हा पुरस्कार मिळाला आहे. स्कॉटलंडमध्ये ‘अंडर २ कोईलेशन फॉर क्लायमेट अ‍ॅक्शन’तर्फे तीनपैकी एक पुरस्कार जिंकणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे.

◆ शाश्वत भविष्यासाठी जगभरात क्लायमेट ग्रुप स्थानिक शासकीय संस्थांसह कार्यरत आहेत आणि त्यांच्यासह विविध उपाययोजनांवर आम्ही काम करणार आहोत.

◆ महाराष्ट्राच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाल्याचे समाधान असल्याचेही पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी नमूद केले आहे. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ हवामान बदलाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी दृष्टिकोन असणारे नेते आहेत. त्यांनी आम्हाला चांगल्या आणि हरित भविष्याची स्वप्ने पाहण्याची संधी दिली आहे.

◆ पर्यावरण जपण्यासाठी आम्ही माझी वसुंधरा म्हणजेच ‘माय प्लॅनेट’ ही चळवळ सुरू केली आहे. त्याचबरोबर आम्ही पंचमहाभूतांवरही लक्ष केंद्रित करत आहोत.

◆ राज्य सरकार पारंपरिक ऊर्जेऐवजी स्वच्छ ऊर्जेचा विचार करीत आहे. नुकतेच एका महामार्गावर सौरऊर्जा निर्मितीची यंत्रणा बसवण्यात आली असून २५० मेगावॅट ऊर्जा निर्माण करणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (13/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 क्षी जिनिपग यांना तिसऱ्यांदा मुदतवाढीची शक्यता

◆ बीजिंग : चिनी कम्युनिस्ट पक्षाचे चायनाचे (सीपीसी) शेकडो पदाधिकारी चार दिवसांच्या पक्ष अधिवेशनासाठी सोमवारी जमले असून त्यात या शंभर वर्षांहून जुन्या पक्षाकडून काही महत्त्वाचे व ऐतिहासिक ठराव मंजूर केले जाण्याची शक्यता आहे.

◆ यात क्षी जिनिपग यांची तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे.
पक्षाच्या केंद्रीय समितीची सहावी वार्षिक बैठक होत असून त्यासाठी ४०० पूर्ण व अर्धवेळ सदस्य उपस्थित आहेत.

◆ सीपीसीचे सरचिटणीस जिनिपग यांनी राजकीय विभागाच्या वतीने एक अहवाल सादर केला असून त्यात शंभर वर्षांत पक्षाने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. जिनिपग हे ६८ वर्षांचे असून ते पक्षाचे सरचिटणीस आहेत.

◆ केंद्रीय लष्करी आयोगाचेही ते अध्यक्ष आहेत. पुढील वर्षी त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीच्या दोन मुदती पूर्ण होत आहेत. एक मुदत पाच वर्षांची असते. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ राजकीयदृष्टय़ा आताची बैठक ही जिनिपग यांच्यासाठी महत्त्वाची असून त्यांनी अध्यक्षपदाची नऊ वर्षे पूर्ण केली आहेत. माओ झेडाँग यांच्यानंतर ते पक्षाचे सर्वात शक्तिशाली नेते ठरले आहेत.

◆ आता त्यांना अध्यक्षपदाची पाच वर्षांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. २०१८ मध्ये एक घटनादुरुस्ती करण्यात आली असून त्यात अध्यक्षपदासाठी दोन कार्यकाल म्हणजे दहा वर्षांचे बंधन काढून टाकण्यात आले आहे.

◆ २०१६ मध्ये ते पक्षाचे सर्वात मुख्य नेते ठरले होते. माओ यांच्यानंतर त्यांना हा मान मिळाला होता.

◆ पुढील वर्षी सीपीसी काँग्रेसचे आयोजन करण्यात येत असून त्यात नवीन नेतृत्वाची निवड केली जाण्याची शक्यता आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (13/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 ‘मुंबई कर्नाटक’चे केले नामांतर, कर्नाटक सरकारचा निर्णय

◆ स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात संस्थानांचा भाग वगळता प्रशासकीय सोईकरता, कारभाराकरता इंग्रजांनी प्रातांची निर्मिती केली होती.

◆ यामध्ये बॉम्बे, बंगाल, मद्रास, पंजाब असे विविध प्रांत होते.

◆ स्वातंत्र्य मिळाल्यावर १९५६ नंतर भाषेवर आधारीत विविध राज्यांची निर्मिती देशामध्ये झाली.

◆ कन्नड भाषिकांसाठी म्हैसुर राज्याची निर्मिती झाली, १९७३ ला या राज्याचे नामकरण कर्नाटक असं झालं.

◆ बेळगाव, कारवार, धारवाड आणि विजापूर हे भाग स्वातंत्र्यापूर्वी मुंबई प्रांतात होते.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ कर्नाटक राज्याची निर्मिती झाल्यानंतरही आजही या भागाची ओळख ही ‘मुंबई कर्नाटक’ म्हणून कायम होती.

◆ यामुळेच ही ओळख पुसण्याकरता कर्नाटक सरकारने मुंबई कर्नाटक भागाचे नामांतर ‘कित्तुर कर्नाटक’ असं केलं आहे.

◆ नामांतर करण्याबाबतची प्रशायकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कर्नाटक सरकारने ही घोषणा आज केली. याआधी ‘हैद्राबाद कर्नाटक’ प्रांताचे नामाकरण ‘कल्याणा कर्नाटक’ असं करण्यात आलं होतं.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Forwarded from TARGET MPSC (MH)
📚 *History Special (20/10/2018)*📚
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*●◆लॉर्ड चेम्सफोर्ड (1916-1921)◆●*
------------------------------------------------------------

◆ लॉर्ड चेम्सफोर्ड हा भारतात येण्यापूर्वी
ऑस्ट्रेलियात गव्हर्नर जनरलपदी कार्य
करत होता.

◆ त्याच्याच कालखंडात (1919) चा
मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा/
भारत अधिनियम कायदा संमत झाला.

◆ 1919 मध्ये पंजाब प्रांतात रौलट
कायदा (काळा कायदा) लागू केला.

◆ 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला
बाग हत्याकांड झाले. (जनरल डायरने
केला, व त्यास जबाबदार होता
पंजाबचा शासक मायकेल ओडवायर).
यावेळी भगतसिंगचे वय अवघे 13 वर्षे
होते.

◆ याच्याच काळात 1920-21 मध्ये
खिलाफत चळवळ व असहकार सुरू
झाल्या.


*●◆लॉर्ड रीडिंग (1921-1926)◆●*
-------------------------------------------------------------

◆ लॉर्ड रिडिंग यहुदी होता. परंतु स्वगुणाने
इंग्लंडचे मुख्य न्यायाधीश व भारताचा
व्हाइसरॉय म्हणून नेमणूक झाली.
https://www.tg-me.com/targetmpscmh
◆ याच्या कारकीर्दीत कॉंग्रेसमध्ये फेरवादी
व नाफेरवादी गट पडले.

◆ स्वराज्य पक्षाची स्थापना झाली.

◆ रीडिंगच्या काळात दुहेरी प्रशासन
व्यवस्था व मुडीमन समितीचा अहवाल
सादर झाला.


*◆●लॉर्ड आर्यविन (१९२६-१९३१)●◆*
-------------------------------------------------------------

◆ आर्यविन काळातच सायमन कमिशन
(१९२८) भारतात आले. डिसेंबर
१९२९ च्या लाहोर अधिवेशनात
काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी
केली व सविनय कायदेभंग चळवळ
(१९३०) चालू केली.

◆ २६ जानेवारी, १९३० हा दिवस
स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळला गेला.

◆ आर्यविन काळातच सायमन कमिशनचा
रिपोर्ट जाहीर झाला व गोलमेज परिषद
भरवली गेली.

◆ (तीनही परिषदा लंडन येथे भरल्या
गेल्या, त्यापैकी आंबेडकर तिनही
परिषदास उपस्थित होते, तर गांधीजी
केवळ दुसऱ्या परिषदेस उपस्थित होते.

◆ ५ मार्च, १९३१ रोजी गांधी-आयर्विन
करार झाला. गांधी गोलमेज परिषदेस
गेले. सविनय कायदेभंग चळवळ
स्थगित केली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
हेतू:- हसत खेळत अभ्यास..
आपल्याकडील Jokes, Study Material @sudhirt_007 वर पाठवा.
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■ दिनांक :- 14/11/2021 ■
वार :- रविवार

■ दिनविशेष :- 14 नोव्हेंबर ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■ विशेष दिवस/दिन ■

● जागतिक मधुमेह दिन ●
● 14 नोव्हें- राष्ट्रीय बालदिन ●
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


■ ठळक घटना/घडामोडी ■

◆ १९२२ : बी.बी.सी.चे रेडियो प्रसारण सुरू झाले.

◆ १९४० : दुसरे महायुद्ध – इंग्लंडच्या कोव्हेंट्री शहरावर लुफ्तवाफेने तुफान बॉम्बफेक करून शहर जवळजवळ नष्ट केले.

◆ १९४१ : दुसरे महायुद्ध – जर्मनीच्या पाणबुडीने युनायटेड किंग्डमची एच.एम.एस. आर्क रॉयल ही विमावाहू नौका बुडवली.

◆ १९६९ : अपोलो १२चे प्रक्षेपण.

◆ २००२ : आर्जेन्टिनाने जागतिक बँकेचे ८०.५ कोटी अमेरिकन डॉलरचे देणे परत करण्यास असमर्थता दर्शवली.

◆ २०१३ : सचिन तेंडुलकर याची क्रिकेट निवृत्ती.
https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■ जन्म/वाढदिवस ■

◆ १६५० : विल्यम दुसरा, इंग्लंडचा राजा.

◆ १८८९ : जवाहरलाल नेहरू, प्रथम भारतीय पंतप्रधान

◆ १९२४ : रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका.

◆ १९३५ : हुसेन, जॉर्डनचा राजा.

◆ १९४२ : इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.

◆ १९४७ : सिंधुताई सपकाळ, सामाजिक कार्यकर्त्या.

◆ १९४८ : चार्ल्स, वेल्सचा राजकुमार.

◆ १९७१ : ऍडम गिलक्रिस्ट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

◆ १९७४ : ह्रषिकेश कानिटकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.

◆ १९७६ : हेमांग बदाणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■ मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन ■
 

◆ १९०८ : गुआंग्क्सु, चीनी सम्राट.

◆ १९१४ : वेंगायिल कुन्हीरामन नयनार, मल्याळम लेखक, पत्रकार.

◆ १९१५ : बूकर टी. वॉशिंग्टन, अमेरिकन संशोधक, शिक्षणतज्ञ, लेखक.

◆ १९७७ : ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भारतीय तत्त्वज्ञानी.

◆ १९७७ : नारायण हरी आपटे, मराठी लेखक, मराठी चित्रपटांचे पटकथाकार.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📚 #Polity Special (14/11/2018)*📚
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

●◆महालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती◆●

●महालेखापाल/महालेखापरिक्षक●

◆ केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार
यांचे हिशोब तपासण्यासाठी उद्देशाने
भारतीय घटना कलम 148 ते 151
नुसार महालेखा परीक्षकाचे पद निर्माण
केलेले आहे.

◆ या महालेखापालाचे पद देखील
महत्वाचे व जबाबदारीचे पद असते.

◆ 1. नेमणूक
महालेखापरीक्षकाची नेमणूक देशाचे
राष्ट्रपती करतात.

◆ महालेखापरीक्षकाला आपले पदग्रहण
करण्यापूर्वी राष्ट्रपतीसमोर विशिष्ट
स्वरुपात शपथ घ्यावी लागत असते.

◆ राष्ट्रपतीच्या मते अनुभवी व तज्ञ
व्यक्तीचीच नेमणूक महालेखापालासाठी
केली जाते.

◆ 2. कार्यकाल
भारतीय राज्यघटनेत महालेखापालाचा
तसा कार्यकाल ठरवून दिलेला नाही.
परंतु त्याचे निवृत्ती वय 65 वर्षे ठरवून
दिलेले आहे. याचाच अर्थ असा की,
महालेखापाल वयाच्या 65 व्या
वर्षापर्यंत आपल्या अधिकारपदावर
कार्य करू शकते असे असले तरी
महालेखापाल मुदतपूर्व आपल्या पदाचा
राजीनामा देऊ शकतो.
https://www.tg-me.com/targetmpscmh
याशिवाय त्याने घटनेचा भंग केला
असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले
असेल तरच त्याच्यावर संसदेमध्ये
महाभियोगाचा खटला चालवून राष्ट्रपती
त्याला पदच्युत करू शकतात.

◆ 3. वेतन व भत्ते
महालेखापालाला दरमहा रुपये
90,000/- वेतन प्राप्त होते. याशिवाय
त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा
सर्व सुविधांनी युक्त त्याला निवासस्थान
मोफत दिले जाते.

◆ शासकीय कामासाठी देशीविदेशी प्रवास
त्याला मोफत असतो.

◆ एकदा निश्चित झालेले त्यांचे वेतन
कोणीही कपात करू शकत नाही. परंतु
आणीबाणी लागू केली तर मात्र त्याच्या
वेतनात कपात केली जाते.

◆ महालेखापालाचे वेतन हे देशाच्या
संचित निधीतून (यावर संसदेत मतदान
घेतले जात नाही) दिले जाते.

◆ निवृत्त झाल्यांनंतर निवृत्तीवेतन प्राप्त
करण्याचा अधिकार आहे.

◆ 4. अधिकार व कार्ये

◆ 1. केंद्र सरकारच्या व घटक राज्य
सरकारच्या जमाखर्चाचे हिशेब
तपासणे.
◆ 2. केंद्र सरकारच्या व घटक राज्य
सरकारच्या लेखा पुस्तकाच्या नोंदी
कशा ठेवाव्यात हे ठरविणे.
◆ 3. शासनामार्फत खर्च होणार्या रकमा
नियमानुसार खर्च होत आहे किंवा नाही
हे पाहणे.
◆ 4. घटक राज्य सरकारच्या लेखा
संबंधीचा अहवाल घटक राज्याच्या
राज्यपालाला पाठविणे.
◆ 5. शासनाच्या वेगवेगळ्या महामंडळांचे
हिशोब तपासणे.
◆ 6. राष्ट्रपतीचे आर्थिक बाबीसंबंधी
माहिती मागविल्यास ती पुरविणे.
◆ 7. एखदया खात्याचा अनाठायी अथवा
जास्तीचा खर्च झाला असेल तर तो
वसूल करणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (14/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 महाराष्ट्राच्या संकल्पला ‘ग्रँडमास्टर’चा किताब

◆ चेन्नई : महाराष्ट्राचा बुद्धिबळपटू संकल्प गुप्ता भारताचा ७१वा ‘ग्रँडमास्टर’ ठरला आहे.

◆ सर्बिया येथे झालेल्या स्पर्धेत ६.५ गुणांसह दुसरे स्थान पटकावत त्याने ‘ग्रँडमास्टर’ किताबासाठी आवश्यक निकष साध्य केले.

◆ १८ वर्षीय संकल्पने २४ दिवसांत सलग तीन स्पर्धा खेळत ‘ग्रँडमास्टर’ ठरण्यासाठी तीन निकष पूर्ण केले. या तिन्ही स्पर्धात त्याने कामगिरीचे २५९९ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवले.

◆ तसेच सर्बिया येथे झालेल्या स्पर्धेदरम्यान त्याने २५०० एलो गुणांचा टप्पा गाठला. ‘ग्रँडमास्टर’चा किताब पटकावण्यासाठी खेळाडूने २५०० एलो गुण आणि तीन निकष (नॉर्म) पूर्ण करणे गरजेचे असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 सर्वाधिक कुपोषित मुले महाराष्ट्रात ; बिहार, गुजरातमधील स्थितीही चिंताजनक

◆ नवी दिल्ली : देशातील ३३ लाख मुले ही कुपोषित असून त्यातील निम्मी मुले अती कुपोषित गटात असून त्यांचे प्रमाण महाराष्ट्र, बिहार, गुजरात या राज्यांत अधिक आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्रालयाने माहिती अधिकाराअंतर्गत उत्तरात दिली आहे.

◆ देशातील सर्वाधिक कुपोषित मुले महाराष्ट्रात असून ही संख्या ६.१६ लाख आहे. त्यात मध्यम  कुपोषित मुले १.५७ लाख, तर जास्त कुपोषित मुलांची संख्या ४.७५ लाख आहे.

◆ दुसऱ्या क्रमांकावर बिहार असून तेथे ४.७५ लाख कुपोषित मुले आहेत. त्यात ३ लाख २३ हजार ७४१ मुले मध्यम कुपोषित तर १ लाख ५२ हजार ०८३ मुले जास्त कुपोषित आहेत.

◆ गुजरातमध्ये कुपोषित मुलांचे प्रमाण ३.२० लाख असून त्यातील १.५५ लाख मध्यम कुपोषित तर १.६५ लाख जास्त कुपोषित आहेत.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ देशात कोविड साथीमुळे आरोग्य व पोषणाचा पेच निर्माण झाला असून महिला व बाल कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे की, १७ लाख ७६ हजार ९०२ मुले खूपच कुपोषित असून १५ लाख ४६ हजार ४२० मुले ही मध्यम कुपोषित आहेत, असे १४ ऑक्टोबर २०२१ च्या आकडेवारीत म्हटले आहे. एकूण ३३ लाख २३ हजार ३२२ मुलांची माहिती ३४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून घेण्यात आली होती.

◆ अंगणवाडय़ांत ८.१९ कोटी मुले असून त्यातील ३३ लाख कुपोषित आहेत. हे प्रमाण एकूण मुलांच्या ४.०४ टक्के आहे. खूपच कुपोषित मुलांचे प्रमाण नोव्हेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ या काळात वाढले असून ते ९ लाख २७ हजार ६०६ ने वाढून आता १७.७६ लाख झाले आहे. पण यात माहिती गोळा करण्याची पद्धत वेगवेगळी होती.

◆ अति कुपोषित मुलांमध्ये सहा महिन्यांपासून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश असून ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून माहिती गोळा करण्यात आली होती.

◆ आताच्या आकडेवारीनुसार अंगणवाडी व्यवस्थेतून सर्व वयोगटातील मुलांच्या पोषणाची माहिती संकलित करण्यात आली आहे.

★ करोना साथ कारणीभूत

◆ चाइल्ड राइटस अँड यू या संघटनेच्या पूजा मारवाह यांच्या मते, या स्थितीस करोनाची साथ प्रामुख्याने कारणीभूत असून सामाजिक व आर्थिक घटक नकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (14/10/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 नौदलाला मिळाली कलवरी वर्गातील चौथी पाणबुडी, अविरत चाचण्यांनंतर माझगांव डॉकयार्डने केली सुपुर्त

◆ नौदलाच्या शस्त्रसंभारात आणखी एका नव्या पाणबुडीची भर पडणार आहे. माझगाव डॉकने आज कलवरी वर्गातील चौथी पाणबुडी ही नौदलाकडे सुपुर्त केली.

◆ याआधी आयएनएस कलवरी, खांदेरी, करंज या पाणबुड्या नौदलाच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.

◆ या चौथ्या पाणबुडीचे ‘आयएनएस वेला’ असं नामकरण केलं जाणार आहे. लवकरच आयएनएस वेला नौदलात दाखल होण्याचा सोहळा नौदलातर्फे पार पडला जाईल.

◆ आयएनएस वेला या पाणबुडीच्या बांधणीला साधारण २०१७ मध्ये सुरुवात झाली, ६ मे २०१९ ला या पाणबुडीचे जलावतरण झाले.

◆ यानंतर सुरुवातीला किनाऱ्याजवळच्या चाचण्या आणि त्यानंतर खोल समुद्रातील चाचण्या घेण्यात आल्या. करोना काळातही या चाचण्यांमध्ये खंड पडला नाही.

◆ सखोल चाचण्यांनंतर, सर्व उपकरणांची तपासणी केल्यानंतरच नौदलाने ही पाणबुडी स्विकारण्याचे मान्य केले.

◆ त्यानुसार पाणबुडीची बांधणी करणाऱ्या माझगाव डॉकतर्फे आज आयएनएस वेला ही नौदलाकडे सुपुर्त करण्यात आली आहे.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ डिझेल इलेक्ट्रिक प्रणालीवर चालणाऱ्या कलवरी वर्गातील पाणबुड्या या जगात उत्कृष्ठ समजल्या जातात. फ्रान्स देशाच्या स्कॉर्पिन पाणबुडीच्या तंत्रज्ञानावर आधारीत कलवरी वर्गीतील पाणबुड्यांची निर्मिती माझगाव डॉकमध्ये सुरु आहे.

◆ फ्रान्स देशासोबत २००५ मध्ये पाणबुड्या बांधण्याबाबत तंत्रज्ञान हस्तांतरणाचा करार झाला होता. कलवरी वर्गातील आणखी दोन पाणबुड्यांची बांधणी युद्धपातळीवर सुरु आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Forwarded from TARGET MPSC (MH)
📚 *History Special (21/10/2018)*📚
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*●◆लॉर्ड विलिंग्डन (१९३१-१९३६)◆●*


◆ व्हाइसरॉय नियुक्तीपूर्वी विलिंग्डन मुंबई
मद्रास प्रांताचा गव्हर्नर होता.

◆ दुसरी गोलमेज परिषद लंडन येथे
विलिंग्डनच्या काळात झाली. १६
ऑगस्ट, १९३२ रोजी ब्रिटिश पंतप्रधान
रॅम्से मॅक्डोनाल्डने श्वेतपत्रिका घोषित
केली. तिलाच जातीय निवाडा
म्हणतात.

◆ गांधीजींचे उपोषण व येवरडा तुरुंगात
२४ सप्टेंबर, १९३२ रोजी महात्मा गांधी
व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात
पुणे करार झाला.

◆ सविनय कायदेभंग चळवळीच्या दुसऱ्या
टप्प्यास तोंड द्यावे लागले. भारत
सरकार अधिनियम, १९३५चा कायदा
पास झाला.

◆ विलिंग्डन त्याच्या दडपशाहीच्या
कृत्यांमुळे भारतीयांचा नावडता
राहिला.
-------------------------------------------------------------

*●◆व्हाइसरॉय लिनलिथगो (१९३६-१९४३)◆●*

◆ स्टॅनलेकडून लिनलिथगोने
व्हाइसरॉयपदाची सूत्रे हाती घेतली.
https://www.tg-me.com/targetmpscmh
◆ लिनलिथगोने भारतीय कृषी राज
आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले
होते.

◆ लिनलिथगो भारतीय घटनात्मक
सुधारणांच्या संयुक्त समितीचा अध्यक्ष
होता. १९३५ च्या कायदा निर्मितीत
लिनलिथगोचा सहभाग होता.

◆ १९३५ च्या कायद्याने केंद्रीय
भागाऐवजी प्रांतीय तरतुदी मान्य करुन
१९३७ मध्ये निवडणुका झाल्या.

◆ काँग्रेसने आठ प्रांतांत सरकार स्थापित
केले. दुसऱ्या महायुद्धात भारतीयांच्या
सहमतीशिवाय युद्धास पाठिंब्याची
व्हाइसरॉयने १९३९ मध्ये घोषणा केली.

◆ सदर घटनेच्या निषेधार्थ प्रांतीय
शासनाने १९३९मध्ये राजीनामे दिले.

◆ सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक
नावाचा पक्ष स्थापन केला.

◆ १९४२च्या चले जाव चळवळीस
दडपशाहीने बंद करण्याचा आटोकाट
प्रयत्न केला.

◆ सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले. १९४२
मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  15/11/2021  ■
                        वार :- सोमवार 
         
          ■    दिनविशेष : 15 नोव्हेंबर     ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

◆ २००० : देशाचे अठ्ठाविसावे राज्य म्हणून झारखंड हे राज्य अस्तित्त्वात आले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून भाजपचे बाबूलाल मरांडी यांनी शपथ घेतली.

◆ १९९९ : रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते ’शिवसनर्थ पुरस्कार’ प्रदान

◆ १९९६ : भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा ’सासाकावा पर्यावरण पुरस्कार’ जाहीर. पर्यावरणाचे रक्षण आणि नियोजन या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.

◆ १९८९ : सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.

◆ १९४५ : व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

◆ १९८६ : सानिया मिर्झा! – लॉन टेनिस खेळाडू

◆ १९४८ : सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक (मृत्यू: ११ जुलै २००३)

◆ १९२९ : शिरीष पै – कवयित्री

◆ १९२७ : उस्ताद युनुस हुसेन खाँ – आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक (मृत्यू: २९ सप्टेंबर १९९१)

◆ १९१७ : दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ ’डी. डी’ – संगीतकार (मृत्यू: १९ सप्टेंबर २००७)

◆ १८९१ : एर्विन रोमेल – जर्मन सेनापती (मृत्यू: १४ आक्टोबर १९४४)

◆ १८८५ : गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते (मृत्यू: २३ जून १९३९ – भावनगर, गुजराथ)

◆ १८७५ : बिरसा मुंडा – (सद्ध्याच्या) झारखंडमधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ९ जून १९००)

◆ १७३८ : विल्यम हर्षेल – जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार. १७३८ मधे त्याने युरेनस ग्रहाचा शोध लावला. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८२२)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

◆ २०१२ : कृष्ण चंद्र पंत – केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष (जन्म: ? ? १९३१)

◆ १९९६ : डॉ. माधवराव सूर्याजी पवार – कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: ? ? ????)

◆ १९८२ : आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भारतरत्‍न – १९८३ मरणोत्तर, १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली. (जन्म: ११ सप्टेंबर १८९५)

◆ १९४९ : नथुराम गोडसे – महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी (जन्म: १९ मे १९१०)

◆ १९४९ : नारायण दत्तात्रय आपटे – महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी (जन्म: ?? ???? १९२५)

◆ १६३० : योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १५७१).
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (15/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 चीन पाकिस्तानला देत आहे अत्याधुनिक युद्धनौका, भारताची डोकेदुखी वाढली

◆ पाकिस्तानचे आणि चीन हे दोन्ही देश भारतावर कुरघोडी करण्याकरता सातत्याने प्रयत्न करत आले आहेत. एकमेकांना मदत करत परस्पर सहकार्यही वाढवत आले आहे. याचाच एक भाग म्हणून गेली अनेक वर्ष चीन पाकिस्तानला लष्करी मदत करत आला आहे.

◆ याआधी JF-17 हे चौथ्या श्रेणीतील लढाऊ विमान विकसित करायला चीनने पाकिस्तानला मदत केली होती. आता तर JF-17 हे पाकिस्तान वायू दलाचा महत्त्वाचे लढाऊ विमान आहे.

◆ असं असतांना चीन युद्धनौकांच्या बाबतीतही पाकिस्तानला मदत करत आहे. चीन अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट Type 054 ही पाकिस्तानला देणार आहे.

◆ एक युद्धनौका तर पुढील काही दिवसांत पाकिस्तानला मिळणार आहे. तर आणखी ३ युद्धनौका चीन पुढील ३ वर्षात पाकिस्तानकडे सुपुर्त करणार आहे.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ Type 054 ही सुमारे ४ हजार टन वजनाची फ्रिगेट- युद्धनौका जगातील अत्याधुनिक युद्धनौकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. रडारवर पटकन शोधता येणार नाही अशी या युद्धनौकेची रचना आहे.

◆ जमिनीवर, हवेत विविध प्रकारची क्षेपणास्त्रे डागण्याची या युद्धनौकेची क्षमता असून पाणबुडीविरोधी कारवाईतही ही युद्धनौका दर्जेदार समजली जाते.

◆ अशा २५ पेक्षा जास्त युद्धनौका या चीनच्या नौदलात याआधीच कार्यरत आहेत. आता पुढील काही वर्षात चीनी बनावटीच्या अशा चार युद्धनौका या पाकिस्तानकडे असतील. यामुळे निश्चितच भारताची डोकेदुखी वाढणार आहे.

◆ युद्धप्रसंग उद्भवल्यास Type 054 युद्धनौका या भारतीय नौदलापुढे मोठं आव्हान निर्माण करु शकतात अशी या युद्धनौकेची क्षमता आणि ताकद आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (15/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 सुदर्शन साहू, सिंधुताई सपकाळ आदींना पद्म पुरस्कार प्रदान

◆ नवी दिल्ली : प्रसिद्ध शिल्पकार सुदर्शन साहू, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्यासह अन्य मान्यवर व्यक्तींना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात मंगळवारी पद्म पुरस्कार प्रदान केले.

◆ मंगळवारी पुरस्कार प्रदान सोहळ्याचा दुसरा टप्पा पार पडला. दिवंगत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

◆ सुदर्शन साहू हे मूळ ओडिशातील असून त्यांना पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले. सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

◆ सुमित्रा महाजन या आठ वेळा खासदार होत्या. त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

◆ भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागरी सेवा विभागात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

◆ आसामचे दिवंगत मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता, तो त्यांच्या पत्नीने स्वीकारला.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ आसामचे सामाजिक कार्यकर्ते लखिमी बारूआ, हरयाणाच्या कुरूक्षेत्र येथील हिंदूी साहित्यिक प्रा. जयभगवान गोयल, राजस्थानचे लोकगायक लखा खान, मुंबईच्या कर्नाटकी संगीत गायिका जयश्री रामनाथ, डेहराडूनचे अस्थिशल्यविशारद भूपेंद्र कुमार सिंह संजय, श्रीनगर येथील हिंदूीचे प्राध्यापक व पत्रकार चमनलाल सप्रू यांचा सन्मानार्थीमध्ये समावेश होता.

◆ राजस्थानातील पाली लेखक अर्जुन सिंह शेखावत, संस्कृत व्याकरण तज्ज्ञ राम यत्न शुक्ला, दिल्लीचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र सिंह शंटी, अ‍ॅथलिट सुधा सिंह, हिंदूी लेखिका मृदुला सिन्हा (मरणोत्तर), पश्चिम बंगालचे सामाजिक कार्यकर्ते गुरू मा कमाली सोरेन, आदिवासी लोकसंस्कृती विद्वान भोपाळ कपील तिवारी यांनाही सन्मानित करण्यात आले.

★ फर्नाडिस, जेटली यांचा गौरव

◆ सोमवारी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान झालेल्यांत माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नाडिस, अरुण जेटली, सुषमा स्वराज, मॉरिशसचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध जगन्नाथ यांचा समावेश आहे. फर्नाडिस यांच्या पत्नी लीला कबीर यांनी पुरस्कार स्वीकारला.

◆ जेटली यांच्या वतीने त्यांच्या पत्नी संगीता जेटली यांनी पुरस्कार स्वीकारला, सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज यांनी पुरस्कार स्वीकारला.

◆ इतर मानकऱ्यात माजी संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर (मरणोत्तर), मिहद्र समूहाचे अध्यक्ष आनंद मिहद्र, सुंदरम क्लेटन समूहाचे वेणू श्रीनिवासन, नागालँडचे माजी मुख्यमंत्री एस.सी जमीर यांना पद्मभूषणने गौरवण्यात आले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (10/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन २०२१: जाणून घ्या थीम, इतिहास आणि महत्त्व

◆ विज्ञानाला अधिक समाजाभिमुख करण्यासाठी 'जागतिक विज्ञान दिवस सामान्य माणसाला वैज्ञानिक शोधांबद्दल जागृत करते.

◆ सामान्यांना वैज्ञानिक शोधांची माहिती मिळावी त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात कसा करता येईल याबद्दल अधिक माहिती या दिवशी दिली जाते.

◆ शाश्वत विकास आणि पृथ्वीवरील सजीवसृष्टी अधिक समजून घेण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातो. या दिवशी जगभरात विविध चर्चासत्रे, परिषद, प्रदर्शने, अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

◆ २००२ पासून दरवर्षी, १० नोव्हेंबर रोजी शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन साजरा केला जातो. हा दिवस समाजाची जडणघडण अबाधित ठेवण्यासाठी आणि भरभराटीसाठी विज्ञानाच्या महत्त्वाला समर्पित केला आहे.

◆ COVID-19 साथीच्या रोगाने जगाला अशा गोष्टींची जाणीव करून दिली ज्या मानवजातीच्या अस्तित्वासाठी खरोखर महत्त्वाच्या आहेत. यात समाजाच्या चांगल्या कार्यासाठी एकमेकांना मदत करण्याचे महत्त्व लोकांना कळले.

◆ त्याचे महत्त्व प्रस्थापित करणारा आणखी एक पैलू म्हणजे विज्ञान. समाजात विज्ञानाच्या अस्तित्वाविषयी अनभिज्ञ असणे जवळजवळ अशक्य असले तरी, आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व साथीच्या रोगात पुन्हा टवटवीत झाले. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

★ जागतिक शांतता आणि विकास विज्ञान दिन नेमका कसा अस्तित्वात आला, त्याचे महत्त्व आणि थीम जाणून घेऊयात
शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन: इतिहास

◆ १९९९ मध्ये बुडापेस्टमध्ये विज्ञान विषयावरील जागतिक परिषदेत सुरू करण्यात आली होती. दरम्यान या परिषदेने मानसिकतेची बीजे पेरली, बांधिलकीची संकल्पना दृढ करणारी संघटना अधिक विज्ञान, त्याचे उपयोग आणि त्याची कारणे याविषयी समाजात सकारात्मकता निर्माण केली.

◆ मानवतावादी आणि भौतिकवादी ध्येये साध्य करण्यासाठी वैज्ञानिक ज्ञानाचा वापर प्रसिद्धीच्या झोतात आणला गेला.
जागतिक विज्ञान दिन २००१ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) जाहीर केले आणि २००२ मध्ये प्रथमच ते साजरे केले.

◆ विज्ञानाला समाजाशी अधिक जवळून जोडण्याद्वारे, जागतिक विज्ञान दिन नागरिकांना विज्ञानातील घडामोडींविषयी माहिती पुरविली पाहिजे हे सुनिश्चित केले. त्यात सर्व प्रकारच्या संस्था आणि व्यवसायातील सहभागींचा समावेश करण्यात आला.

★ शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन: महत्त्व

◆ विज्ञानाला अधिक समाजाभिमुख करण्यासाठी ‘जागतिक विज्ञान दिवस सामान्य माणसाला वैज्ञानिक शोधांबद्दल जागृत करते. सामान्यांना वैज्ञानिक शोधांची माहिती मिळावी त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात कसा करता येईल याबद्दल अधिक माहिती या दिवशी दिली जाते.

◆ शाश्वत विकास आणि पृथ्वीवरील सजीवसृष्टी अधिक समजून घेण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातो. या दिवशी जगभरात विविध चर्चासत्रे, परिषद, प्रदर्शने, अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

◆ विज्ञानाचा शांतता आणि विकासाबद्दलचा जनमानसातील दृष्टिकोन अधिक प्रगल्भ करणे.विविध देशांमध्ये वैज्ञानिक संशिधानाची देवाणघेवाण करणे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान समित्यांची अथवा व्यासपीठांची स्थापना करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे. येणाऱ्या समस्यांकडे वैज्ञानिक जगताचे लक्ष वेधने.

★ शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन: थीम

◆ आपल्या सर्वांना माहित आहे की, हवामान-बदल हा पृथ्वीवरील आपल्या अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका आहे, म्हणून या वर्षी (२०२१) शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिनाची थीम “’हवामानासाठी सज्ज समुदाय तयार करणे,” ही आहे, ज्याचा उद्देश एक मार्ग शोधणे आहे. विज्ञान वापरून ही समस्या सोडवा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Forwarded from TARGET MPSC (MH)
📚 *History Special (22/10/2018)*📚
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*●◆लॉर्ड वेव्हेल (१९४३-१९४७)◆●*

◆ ऑक्टोबर, १९४३ मध्ये लॉर्ड वेव्हेलने
व्हाइसरॉय पदाची सूत्रे घेतली.

◆ वेव्हेलच्या काळात द्वितीय महायुद्ध
समाप्त झाले. वेव्हेलने राजकीय
पेचप्रसंग सोडविण्यासाठी जून १९४५
मध्ये सर्वपक्षीय बैठक सिमला येथे
बोलवली.

◆ इंग्लंडच्या मजूर पक्षाने भारतात १९४६
मध्ये कॅबिनेट मिशन पाठविले.

◆ कॅबिनेट मिशनच्या शिफारशीने
निवडणुका होऊन २ सप्टेंबर, १९४६
रोजी नेहरूंचे हंगामी सरकार स्थापन
झाले.

◆ भारतात घटना समितीच्या बैठकांस
सुरुवात झाली.

◆ आझाद हिंदी सेनेच्या सनिकांच्या
फाशीच्या शिक्षा जनमताच्या दबावामुळे
व्हाइसरॉय वेव्हेलला रद्द कराव्या
लागल्या.
https://www.tg-me.com/targetmpscmh
◆ पंतप्रधान अॅटलीने भारताच्या
स्वातंत्र्याची घोषणा केली. भारतीय
घटनात्मक पेचप्रसंग सोडविण्याच्या
वादात वेव्हेलला राजीनामा द्यावा
लागला.

*●◆व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन◆●*


◆ (मार्च १९४७ ते ऑगस्ट १९४७- जून
१९४८) :

◆ मार्च १९४७ मध्ये व्हाइसरॉय म्हणून
भारतात आले. मे १९४७ मध्ये ब्रिटन
संसदेशी चर्चा करण्यास लंडनला गेले.
२ जून, १९४७ रोजी भारताच्या
स्वातंत्र्याची घोषणा केली.

◆ ३ जून, १९४७ रोजी भारताच्या
स्वातंत्र्याची तारीख जाहीर केली.

◆ १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र
झाला.

◆ स्वतंत्र भारताचा तिरंगा प्रथम
व्हाइसरॉय माऊंटबॅटनच्या हस्ते
फडकविण्यात आला.

◆ स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल
व इंग्रज सरकारचे शेवटचे व्हाइसरॉय
लॉर्ड माऊंटबॅटन ठरले.

◆ माऊंटबॅटन जून, १९४८ पर्यंत स्वतंत्र
भारताचे गव्हर्नर जनरल होते.

*◆●गव्हर्नर जनरल राजगोपालाचारी●◆*

◆ (जून, १८४८ ते जानेवारी, १९५०) :
स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर
जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी होते.

◆ स्वतंत्र भारताची घटना २६ जानेवारी
१९५० पासून अंमलात आली.
(समाप्त)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
2024/12/25 15:07:35
Back to Top
HTML Embed Code: