Telegram Web Link
🔰🔰चालू घडामोडी (29/10/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 RBI Appointment : रिझर्व्ह बँकेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची फेरनियुक्ती

◆ केंद्रातील मोदी सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाबाबत मोठा निर्णय घेतलाय.

◆ शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने शक्तीकांत दास यांच्या फेरनियुक्तीला मंजुरी दिलीय.

◆ त्यामुळे शक्तीकांत दास पुढील आणखी ३ वर्षे आरबीआयचे गव्हर्नर म्हणून काम करतील.

◆ त्यांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०२१ रोजी संपत होता. मात्र, त्याआधीच केंद्र सरकारने त्यांच्या फेरनियुक्तीचा निर्णय घेतला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (29/10/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 व्यक्तिवेध : एस. एन. सुब्बाराव

◆ पाकिस्तान्यांना धूळ चारून जिंकलेल्या बांगलादेश युद्धाची चर्चा व काहीशी झिंगसुद्धा त्यानंतरच्या सुमारे वर्षभरात कायम राहिलेली असतानाच, १९७२ सालच्या डॉ. आंबेडकर जयंतीला चंबळच्या खोऱ्यातील ४५० डाकूंनी महात्मा गांधी यांच्या तसबिरीपुढे शस्त्रत्याग केला!

◆ कबूल की, १९५५ सालच्या दिलीपकुमारच्या ‘आझाद’पासून ते ‘मदर इंडिया’ (१९५७), ‘जिस देश मे गंगा बहती है’ (१९६०), ‘मुझे जीने दो’ (१९६३) अशा कित्येक हिंदी सिनेमांनी ‘डाकू चांगलेही असू शकतात- त्यांचे हृदयपरिवर्तन घडू शकते’ हेच दाखवले होते; पण खऱ्याखुऱ्या डाकूंचे हे मनपरिवर्तन- आणि पर्यायाने व्यवसायात बदलसुद्धा- घडवण्यामागे १९५४ सालापासून एस. एन. सुब्बाराव यांनी केलेले प्रयत्न होते.

◆ १९७० सालापासून तर राजस्थान, उत्तर प्रदेश ते मध्य प्रदेश या राज्यांतले अख्खे चंबळ खोरे कधी उंटावरून तर कधी पायी फिरून सुब्बाराव यांनी पिंजून काढले होते. पुढे एकंदर ६५७ डाकू तीन राज्यांतून शरण आले.

◆ या एस. एन. (सेलम नंजुन्दैया) सुब्बाराव यांचे निधन २७ ऑक्टोबर रोजी, वयाच्या ९२ व्या वर्षी जयपूरमधील रुग्णालयात झाले.

◆ मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यात जौरा येथे म. गांधी सेवा आश्रमाची स्थापना १९७० मध्ये सुब्बाराव यांनी केली, त्याआधी वयाच्या १३ व्या वर्षीच १९४२ च्या आंदोलनात त्यांनी उडी घेतली होती.

◆ धारवाडचे गांधीवादी व ‘काँग्रेस सेवा दला’चे संस्थापक डॉ. एन. एस. हर्डीकर यांचे मार्गदर्शन मूळचे बंगलोरच्या सुब्बारावना मिळाल्याने तरुणपणीच ते विधायक कार्याकडे वळले.

◆ १९४८ पासून आधी काँग्रेस सेवा दलातर्फे, तर पुढे ‘गांधी पीस फाउंडेशन’, ‘नॅशनल यूथ प्रोजेक्ट’ आदी संस्थांतून ते कार्यरत राहिले.

◆ १९६५ मध्ये, गांधी जन्मशताब्दीच्या चार वर्षे आधी, देशभर फिरणाऱ्या ‘गांधीदर्शन रेल’ची कल्पना त्यांनी मांडली. मग जन्मशताब्दी वर्षांत (१९६९) दोन रेल्वे गाडय़ा- एक ब्रॉडगेज तर दुसरी मीटरगेज मार्गावर- तत्कालीन दृक् -श्राव्य माध्यमांनिशी सज्ज होऊन देशभर फिरल्या! या प्रकल्पाचे संचालकपद सुब्बाराव यांना मिळाले.

◆ दिल्ली सोडून दूरच्या मुरैना जिल्ह्यात ते पहिल्यांदा आले होते १९५४ मध्येच, पण तरुणांसाठी श्रमदान आणि रोजगाराभिमुख शिक्षणाची शिबिरे घ्यावीत, डाकूंकडे स्थानिक तरुणांनी आकर्षित होऊ नये असे पाहावे, या प्रकारचे ते काम होते. तेव्हाही डाकूंच्या पुनर्वसनाची कल्पना होतीच, पण वेग आला १९७० नंतर.

◆ पुढे श्रमदानावर लक्ष केंद्रित करून सुब्बाराव यांनी या भागात रस्तेही केले! साने गुरुजी पुरस्कार (२००१), जमनालाल बजाज पुरस्कार (२००६) यांनी उत्तरायुष्यात त्यांचा गौरव झाला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰 Polity Special (29/10/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 ■◆■ आर्थिक आणीबाणी ■◆■

◆ संविधानाच्या कलम ३६० अनुसार राष्ट्रपतींची अशी खात्री झाली की, भारताचे किंवा भारताच्या एखाद्या भागाचे आर्थिक स्थैर्य धोक्यात आहे, तर आर्थिक आणीबाणी राष्ट्रपती जाहिर करु शकतात

१) आर्थिक आणीबाणीची घोषणा केल्यापासून २ महिन्याच्या आत संसदेने मान्यता देणे आवश्यक आहे असे न झाल्यस घोषणा देणे रद्द होते

२) आर्थिक आणीबाणीची घोषणा केलेल्या कालावधीत जर लोकसभा विसर्जित असेल तर राज्यसभेची मान्यता घेणे आवश्यक असते.

■ आर्थिक आणीबाणीचे परिणाम:–

१. केंद्र व राज्य सरकारांना आर्थिक बाबतीत राष्ट्रपती योग्य ते आदेश देतात.

२. राज्य सरकारांना आपली आर्थिक विधेयके राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवावी लागतात. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

३. कोणत्याही अधिका-याचे किंवा पदाधिका-यांचे वेतन वा भत्ते कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस आहे. आर्थिक वर्षातील महसूल – उत्पन्नाच्या वाटणीमध्ये राष्ट्रपती सुधारणा करु शकतात (आत्तापर्यत भारतात एकदाही आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आली नाही.)

यात भारताचा सर्व प्रकारच्या महसूलातून मिळालेले उत्पन्न कर्ज व सार्वजनिक उद्योगांचा नफा सरकार ने दिलेल्या कर्जाची आलेली परत फेड इतर उत्पन्नाचा समावेश होतो.

सरकारचा पुर्ण खर्च एकत्रित व संचित निधीतुन केला जातो.
भारताच्या एकत्रित व संचित निधी खर्चासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता असते.

■ संसदेच्या संमतीची आवश्यकता नसलेले खर्च:–

१. राष्ट्रपतीचे वेतन, भत्ते व राष्ट्रपतींच्या कार्यालयावरील खर्च

२. सर्वोच्च न्यायालयच्या न्यायाधीशांचे वेतन व भत्ते.

३. CAG चे वेतन, भत्ते व निवृत्ती वेतन.

४. न्यायालयाच्या निर्णया प्रमाणे द्याव्या लागणा-या रकमा

५. घटना/संसद यांनी मान्य केलेल्या खर्चाच्या बाबी
वरील सर्व बाबी वरील खर्चावर संसदेत चर्चा होते पण मतदान होत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
हेतू:- हसत खेळत अभ्यास..
आपल्याकडील Jokes, Study Material @sudhirt_007 वर पाठवा.
Forwarded from TARGET MPSC (MH)
📚 *History Special (14/10/2018)*📚
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*◆●व्हॉइसरॉय लॉर्ड रिपन 1880 ते 1884●◆*
-------------------------------------------------------------

◆ भारताचा उदारमतवादी व्हाईसरॉय
म्हणून प्रसिद्ध.

◆ इ.स.1832 च्या इंग्लंडमधील
Factory Act प्रमाणे 1881 मध्ये
लाॅर्ड रिपन याने भारतात पहिला कंपनी
कायदा पास केला.

◆ यानुसार कामगारांची वयोमर्यादा
वाढवियात आली. कामाचे तास 09
करण्यात आले. 07 वर्षांखालील लहान
मुलांना कामावर घेण्यास बंदी
घालण्यात आली. (पहिले कामगार नेते
नारायण मेघाजी लोखंडे).

◆ 1882 मध्ये लाॅर्ड लिटन याने केलेला
वृत्तपत्राचा कायदा हा लाॅर्ड रिपन याने
रद्द केला. (व्हर्नाक्युलर प्रे ॲक्ट:-
लिटनने वृत्तपत्राची मुस्कटदाबी केली
होती कारण त्याच्यावर ऐन दुष्काळात
दिल्ली दरबार भरविण्यात आल्याने
टीका झाली होती.)

◆ तसेच 1882 मध्ये लाॅर्ड रिपन याने
शैक्षणिक सुधारण
साठी हंटर कमिशन नेमले.

◆ हंटर समितीच्या शिफारशी स्विकारून
1882 मध्ये लाॅर्ड रिपन याने लाहोर येथे
पंजाब व अलाहाबाद विद्यापीठाची
स्थापन केली.
https://www.tg-me.com/targetmpscmh
◆ 19 मे 1882 रोजी लाॅर्ड रिपन याने
स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला
त्याने जिल्हा व तालुका लोकल बोर्ड
स्थापना केली व त्याठिकाणी
लोकप्रतिनिधी नेमले म्हणूनच त्याला
स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे
म्हणतात.

◆ भारतातील पहिली दशवार्षिक
जनगणना 1881 मध्ये त्याच्याच
कारकीर्दीत झाली.

◆ 1883 मध्ये लाॅर्ड रिपन याने युरोपीयन
आरोपींचे खटले चालविण्याचा भारतीय
न्यायाधीशांना अधिकार देणारे इल्बर्ट
बिल हे विधेयक पारित केले. यावेळीस
कोर्टनी इल्बर्ट हे कायदामंत्री होते.

◆ 1884 मध्ये भारताची दुसरी जनगणना
घेण्यात आली.

◆ लाॅर्ड रिपन याने 1884 मध्ये कलकत्ता
न्यायालयातील मुख्य न्यायाधीश
सुट्टीवर गेले असताना सर रमेशचंद्र
यांची मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक
केली. ते पहिले हिंदी न्यायाधीश होते.

◆ रिपन याने बनारस येथे क्विन्स कॉलेज
स्थापना केली.

◆ 1884 मध्ये लॉर्ड रिपनने आपल्या
व्हॉइसरॉय पदाचा राजीनामा दिला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  30/10/2021  ■
                        वार :-  शनिवार 
         
          ■    दिनविशेष : 30 ऑक्टोबर     ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

◆ २०१३ : सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला. हरयाणाविरुद्ध झालेल्या या सामन्यात सचिनने विजयी फटका मारला.

◆ १९९५ : कॅनडातील क्‍वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.

◆ १९७३ : इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.

◆ १९६६ : शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.

◆ १९४५ : भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.

◆ १९२८ : लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यातच पुढे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा अंत झाला.

◆ १९२० : सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.
https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

◆ १९६० : डिएगो मॅराडोना – अर्जेंटिनाचा फूटबॉलपटू

◆ १९४९ : प्रमोद महाजन – केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार (मृत्यू: ३ मे २००६)

◆ १९०९ : डॉ. होमी जहांगीर भाभा – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ जानेवारी १९६६)

◆ १८८७ : सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि ’संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील (मृत्यू: १० सप्टेंबर १९२३)

◆ १७३५ : जॉन अ‍ॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ४ जुलै १८२६)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

◆ २०११ : अरविंद मफतलाल – उद्योगपती (जन्म: २७ आक्टोबर १९२३)

◆ १९९८ : विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक (जन्म: १३ ऑगस्ट १९०६)

◆ १९९६ : प्रभाकर नारायण ऊर्फ ’भाऊ’ पाध्ये – लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते (जन्म: २९ नोव्हेंबर १९२६)

◆ १९९४ : सरदार स्वर्ण सिंग – केन्द्रीय मंत्री (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)

◆ १९९० : व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (जन्म: १८ नोव्हेंबर १९०१)

◆ १९९० : विनोद मेहरा – अभिनेता (जन्म: १३ फेब्रुवारी १९४५)

◆ १९७४ : बेगम अख्तर – गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. (जन्म: ७ आक्टोबर १९१४)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (30/10/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल सुरेश प्रभू, आर.व्ही. शाही यांचा गौरव

◆ मुंबई : देशातील ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून त्यावर आपला ठसा उमटवल्याबद्दल देशाचे माजी ऊर्जामंत्री सुरेश प्रभू आणि देशाचे माजी ऊर्जा सचिव आर. व्ही. शाही यांचा गौरव ‘पॉवरलाइन’ या नियतकालिकाने शुक्रवारी केला.

◆ ऊर्जा क्षेत्रातील घडामोडींना वाहिलेल्या ‘पॉवरलाइन’ने मागील २५ वर्षांच्या ऊर्जाशील प्रमुख घडामोडी आणि या क्षेत्रावर ठसा उमटवणारे कोण याबाबत देशभरातील या क्षेत्राशी संलग्न १०० तज्ज्ञांची मते मागवली.

◆ या १०० जणांमध्ये वीजनिर्मिती, वीज पारेषण, वीजवितरण, नियामक क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता.

◆ माजी ऊर्जामंत्री सुरेश प्रभू आणि आर. व्ही. शाही हे दोघे ३४ टक्के मते मिळवून पहिल्या क्रमांकावर राहिले.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ केंद्रीय विद्युत कायदा २००३ तयार करून तो देशात लागू करत ऊर्जा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यात प्रभू यांनी दिलेले योगदान हे उल्लेखनीय होते असे सर्वेक्षणात तज्ज्ञांनी म्हटले आहे.

◆ गेल्या २५ वर्षांतील ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठे यश कोणते या प्रश्नावर केंद्रीय वीज कायदा २००३ ची अंमलबजावणी असे उत्तर बहुसंख्य तज्ज्ञांनी दिले.

◆ त्याचबरोबर अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राचा विकास, नियामक प्रणालीत सुधारणा, खासगी क्षेत्राचा वीज व्यवसायात वाढलेला सहभाग हे तीन गेल्या २५ वर्षांतील महत्त्वाचे तीन बदल होते, असे मत सर्वेक्षणात सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (30/10/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 व्यक्तिवेध : मार्टिन जे. शेर्विन

◆ दुसरे महायुद्ध संपुष्टात आणण्याचा एकमेव उपाय म्हणून जपानच्या हिरोशिमा आणि नागासकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आल्याचा सार्वत्रिक समज आहे. त्यास अनेकांनी छेद दिला.

◆ त्यापैकी एक प्रतिभावंत म्हणजे मार्टिन जे. शेर्विन. त्यांचे नुकतेच निधन झाले.
मार्टिन हे अण्वस्त्रप्रसार संशोधक आणि आण्विक इतिहासकार. अणुऊर्जा, अण्वस्त्रप्रसार आणि त्याचा अमेरिकेसह जगाच्या इतिहासावरील परिणाम हा त्यांचा आवडता विषय.

◆ डार्टमाऊथ महाविद्यालयातून त्यांनी इतिहासात पदवी संपादन केली. मात्र त्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता तो औषधनिर्माणशास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी. पण, आण्विक जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

◆ महाविद्यालयीन जीवनातच सुटीच्या कालावधीत त्यांनी युरेनियम खाणीत काम केले आणि त्यांचे कुतूहल आणखी वाढले. चार वर्षे नौदलात काम केल्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून १९७१ मध्ये इतिहासात (अण्वस्त्रसंबंधित विषय घेऊन) पीएच.डी. केली.

◆ या संशोधनाचा आधार असलेले मार्टिन यांचे ‘अ वर्ल्ड डिस्ट्रॉइड : हिरोशिमा अ‍ॅन्ड इट्स लीगसी’ हे पुस्तक गाजले. जपानवर अणुबॉम्ब टाकण्याबाबतच्या सार्वत्रिक समजास त्यांनी छेद दिला.

◆ अणुबॉम्बचा वापर केला नसता तरी जपानने शरणागती पत्करली असती आणि तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष हॅरी ट्रमन यांना ही बाब माहीत असूनसुद्धा अणुबॉम्बचा वापर झाला, असे त्यांचे म्हणणे होते.

◆ मार्टिन हे सर्वाधिक चर्चेत आले ते ‘अमेरिकन प्रोमेथस : द ट्रायम्फ अ‍ॅन्ड ट्रॅजेडी ऑफ जे. रॉबर्ट ओपनहायमर’ या चरित्र-पुस्तकाच्या प्रकाशनानंतर.

◆ काइ बर्ड या सहलेखकासह मार्टिन यांनी लिहिलेले हे पुस्तक; त्यास पुलित्झर पुरस्कार मिळाला. ‘‘या पुस्तकावर काम सुरू केले तेव्हा मार्टिन यांनी आपल्याकडे खूप मोठे संशोधन असले तरी त्यात उणिवा आहेत, असे सांगितले होते.

◆ मात्र, मी ते सर्व संशोधन पाहिले तेव्हा त्यात कुठेही उणिवा आढळल्या नाहीत’’, असे बर्ड सांगतात. या पुस्तकासाठी मार्टिन यांनी सुमारे दोन दशके संशोधन केले. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ या पुस्तकास पुलित्झर पुरस्कारासह नॅशनल बुक क्रिटिक्स अवॉर्ड, युनियन बुक अवॉर्ड आदी अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. त्यांचे आधीचे पुस्तक ‘अ वर्ल्ड डिस्ट्रॉइड’ हेसुद्धा नॅशनल (अमेरिकेपुरते) बुक अवॉर्ड आणि पुलित्झरसाठी नामांकन यादीत होते.

◆ गेल्या वर्षी त्यांनी ‘गॅम्बलिंग विथ आर्मगेडॉन’ हे पुस्तक प्रकाशित केले. शीतयुद्ध काळात अमेरिका व तत्कालीन सोव्हिएत रशिया कसे अणुयुद्धाच्या उंबरठय़ावर होते, याचा पट त्यांनी त्यात उलगडला आहे.

◆ आण्विक विध्वंसाचा धोका अद्याप कायम असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्याचा प्रत्यय वारंवार येत असताना अण्वस्त्रकाळाचा हा भाष्यकार हरपला आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (30/10/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 लिएंडर पेसचं राजकारणात पदार्पण ; तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

◆ प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस याने राजकारणात पदार्पण केले आहे. क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी केल्यानंतर आता तो राजकीय क्षेत्रात दाखल झाला आहे.

◆ आपल्या या नव्या इनिंगसाठी त्याने तृणमूल काँग्रेसची निवड केली आहे.

◆ गोव्यामध्ये आज तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत लिएंडर पेसने टीएमसीमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांनी त्याचे पक्षात स्वागत केले.

◆ “ आपणास सांगण्यास आनंद होत आहे की लिएंडर पेसने टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. मी अतिशय आनंद आहे. तो माझा लहान भाऊ आहे. मी जेव्हा युवा मंत्री होते, तेव्हा तो अतिशय तरूण होता. तेव्हापासून मी त्याला ओळखते.” असं ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितलं.

◆ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. येत्या काळात गोव्यात विधानसभा निवडणुका होणार असून ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यात निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Forwarded from Quality ButtonSCAM
🎯स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अग्रहास अनुसरून आम्ही या चॅनल ची निर्मिती केली आहे...🌐
👇👇👇👇👇👇👇👇
आयुष्याच्या वाटेवर चालताना
अनेक सोन्याचे तुकडे
आपलं मन वळवतील,
आपल्या ध्येय पासून दूर नेतील,
पण जर आपण याकडे
लक्ष न देता,
खंबीरपणे उभं राहिलो 💪
तर भविष्यात नक्की आपल्याला
यशाचा खजिना मिळेल...🔥
हि लिंक फक्त काही मिनिटांसाठी आहे तुमच्या चॅनलवर फास्ट जॉईन...👇👇
🛑 Job Update..

=========================
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत विविध पदांच्या २५७ जागा
https://t.co/H45YLhyvI9?amp=1
=========================
नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या १०३ जागा
https://t.co/7dXXJof35m?amp=1
=========================
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सरकारच्या विविध पदांच्या ३५ जागा
https://t.co/FmAufv522W?amp=1
=========================
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीत विविध पदांच्या एकूण १७ जागा
https://t.co/84y9338SQf?amp=1
=========================
रत्नागिरी येथील महापारेषणच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ६ जागा
https://t.co/uS2foxdF2p?amp=1
=========================
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा
https://t.co/GilFNYnVYs?amp=1
=========================
कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Forwarded from TARGET MPSC (MH)
📚 *History Special (15/10/2018)*📚
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*●◆लॉर्ड डफरिन (1884-1888)◆●*
-------------------------------------------------------------

◆ रिपनच्य मुदतपूर्व राजीनाम्यामुळे
डफरिनची व्हॉइसरॉयपदी नियुक्ती
झाली.

◆ डफरिनच्या काळात उत्तर ब्रम्हदेश
जिंकून संपूर्ण ब्रम्हदेश (1886)
इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आणला.

◆ मुलकी सेवेत भारतीयांना समाविष्ट केले
जावे म्हणून व्हॉइसरॉय डफरिनने
चॉर्ल्स ॲचिसन समिती नेमली.

◆ चॉर्ल्स ॲचिसनच्या अध्यक्षेतेखाली
लोकसेवा आयोगची स्थापना झाली.
1887 मध्ये ॲचिसनने लोकसेवा
आयोगाच्या शिफारशी सादर केल्या.

◆ डफरिनच्या काळात सर ॲलन ह्यूम
(निवृत्त IAS) यांनी इंडियन नॅशनल
कॉंग्रेस स्थापण्यास पुढाकार घेतला.

◆ डिसेंबर 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय
कॉंग्रेसची स्थापना मुंबईत तेजपाल
संस्कृत महाविद्यालयात झाली.
https://www.tg-me.com/targetmpscmh
◆ लॉर्ड डफरिनने इंपोरिअल सर्व्हिस
क्रॉप्सची स्थापना केली.
____________________________________

*●◆लॉर्ड लॅन्सडाऊन (1888-1894)◆●*

◆ याने भारतीयांना शासनात सहभाग
मिळावा म्हणून भारतीय विधीमंडळ
कायदा (Indian council act
1892) पास केला.

◆ याच्याच कालखंडात सर ड्युरॅन्ड यांनी
पूर्व व दक्षिण अफगाणिस्तानची
सीमारेषा निश्चित केली. हिला ड्युरँड
रेषा म्हणतात.

◆ 1891 साली कामकरी महिला व
बालकांच्या संरक्षणासाठी दुसरा फॅक्टरी
ॲक्ट मंजूर केला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  31/10/2021  ■
                        वार :-  रविवार 
         
          ■    दिनविशेष : 31 ऑक्टोबर     ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

◆ १९८४ : पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या

◆ १९८४ : भारताचे ६ वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.

◆ १९६६ : दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना

◆ १९४१ : ’माऊंट रशमोअर’ या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.

◆ १९२० : नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.

◆ १८८० : धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्‍भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या ’संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

◆ १८७६ : भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार

◆ १८६४ : नेवाडा हे अमेरिकेचे ३६ वे राज्य बनले.
https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

◆ १९४६ : रामनाथ पारकर – क्रिकेटपटू (मृत्यू: ११ ऑगस्ट १९९९)

◆ १८९५ : सी. के. नायडू – क्रिकेटपटू (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९६७)

◆ १८७५ : सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न (मरणोत्तर – १९९१) (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)

◆ १३९१ : एडवर्ड – पोर्तुगालचा राजा (मृत्यू: ९ सप्टेंबर १४३८)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

◆ २००९ : सुमती गुप्ते – मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री.

◆ २००५ : अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ’कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला. ’रसीदी टिकट’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: ३१ ऑगस्ट १९१९)

◆ १९८६ : आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका (जन्म: ३ जून १८९२)

◆ १९८४ : भारताच्या ३ र्‍या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१७)

◆ १९७५ : सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक (जन्म: १ आक्टोबर १९०६)

◆ १८८३ : मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४ – तनकारा, मोर्वी, राजकोट, गुजरात)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (31/10/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 युरोपीय नेत्यांशी पंतप्रधानांची चर्चा

◆ भारत व युरोपीय समुदाय यांच्यातील २०२० मधला व्यापार ६५.३० अब्ज युरोचा होता.

◆ रोम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इटलीत आगमन झाले असून जी २० देशांच्या शिखर बैठकीच्या निमित्ताने त्यांनी  युरोपीय मंडळाचे अध्यक्ष चार्लस मिशेल, युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन देर लेयन यांच्याशी संयुक्त चर्चा केली.

◆ लोक पातळीवरील संपर्क वाढवणे तसेच आर्थिक परिस्थिती सुधारणे, त्याचबरोबर पृथ्वीवरील पर्यावरण व्यवस्थित ठेवण्याबाबत त्यांनी चर्चा केली.

◆ पंतप्रधान मोदी यांची जी २० बैठकीच्या निमित्ताने ही पहिलीच चर्चा होती.

◆ जी २०  देशांच्या बैठकीत शाश्वत विकास, हवामान बदल, शाश्वत बदल, कोविड १९ साथीमुळे झालेल्या नुकसानातून पुन्हा आर्थिक परिस्थिती सुधारण्याकडे वाटचाल करणे या मुद्दय़ांवर  चर्चा होणार आहे.

◆ पंतप्रधान कार्यालयाच्या ट्वीट  संदेशात म्हटले आहे, की रोम येथे पंतप्रधान मोदी यांच्या अधिकृत गाठीभेटी सुरू झाल्या असून त्यांनी युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा व युरोपियन मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा केली. २०२० मध्ये भारत हा युरोपीय समुदायाचा दहावा मोठा व्यापारी  भागीदार होता.

◆ युरोपीय समुदायाशी एकूण व्यापारापैकी १.८ टक्के व्यापार भारताचा आहे. भारत व युरोपीय समुदाय यांच्यातील २०२० मधला व्यापार ६५.३० अब्ज युरोचा होता.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (31/10/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 G20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी रोमला रवाना; १२ वर्षांनी भारतीय पंतप्रधानांचा पहिलाच दौरा

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच G20 शिखर परिषदेसाठी रोमला पोहोचणार आहेत.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच G20 शिखर परिषदेसाठी रोमला पोहोचणार आहेत. जवळपास १२ वर्षांनी भारतीय पंतप्रधान रोमला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी आज सकाळी रोमला पोहोचतील.

◆ “नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचा इटलीची राजधानी रोमचा हा पहिलाच दौरा आहे, असं इटलीतील भारताच्या राजदूत नीना मल्होत्रा यांनी सांगितलं.

◆ रोमला पोहोचल्यानंतर काही तासांनी, मोदी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गांधी पुतळ्याला भेट देतील आणि नंतर साडेपाच वाजता इटालियन पंतप्रधान मारियो द्राघी यांची भेट घेणार आहेत.

◆ G20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या इटली भेटीपूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “ते रोममध्ये या महामारीत जागतिक आर्थिक आरोग्य सुधारण्यावर चर्चा करतील.

◆ मोदी २९-३१ ऑक्टोबर दरम्यान रोम आणि व्हॅटिकन सिटीला भेट देणार आहेत आणि नंतर यूकेला जाणार आहेत. ब्रिटनमधील ग्लासगो येथे पंतप्रधान मोदी कार्बन स्पेसच्या न्याय्य वितरणासह हवामान बदलाच्या मुद्द्यांवर सर्वसमावेशकपणे लक्ष देण्याची गरज यावर बोलतील.”

◆ “रोममध्ये, मी १६व्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहीन. तिथे मी इतर G20 नेत्यांसोबत जागतिक आर्थिक आणि आरोग्य पूर्ती, शाश्वत विकास आणि हवामान बदल यांवर चर्चा करेन,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (07/10/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

◆ पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सीमेवरील तिढा रेंगाळलेला असतानाच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी होण्यास महत्त्व आहे.

◆ नवी दिल्ली : पाच हजार किलोमीटपर्यंतच्या टप्प्यातील लक्ष्ये अचूक टिपण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-५’ या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची भारताने बुधवारी यशस्वी चाचणी केली.

◆ यामुळे देशाच्या लष्करी सामर्थ्यांत मोठी भर पडली आहे.

◆ ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून सायंकाळी ७.५० च्या सुमारास ही चाचणी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

◆ ‘अग्नी-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही किमान विश्वासार्ह प्रतिबंधाच्या भारतच्या धोरणाला अनुसरून असून, त्यामुळे ‘नो फर्स्ट यूज’बाबत असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे,’ असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

◆ पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सीमेवरील तिढा रेंगाळलेला असतानाच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी होण्यास महत्त्व आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
2024/12/25 14:58:34
Back to Top
HTML Embed Code: