Telegram Web Link
🔰चालू घडामोडी (10/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 एअर इंडिया टाटांकडे

◆ ६८ वर्षांनी एक वर्तुळ पूर्ण, १८ हजार कोटींची बोलीसातत्याने तोट्यात असलेली आणि कर्जाच्या ओझ्याने वाकलेली ‘एअर इंडिया’ ही हवाई वाहतूक कंपनी अखेर ‘टाटा सन्स’ने १८ हजार कोटी रुपयांना खरेदी केली.

◆ विविध कारणांमुळे कर्जजर्जर झालेली ही कंपनी खरीदण्यासाठी देशातून आणि परदेशातूनही फारशा कंपन्या उत्सुक नव्हत्या.

◆ ‘एअर इंडिया’ कंपनी टाटांनीच सुरू केली होती. त्यांनी ती सरकारला विकली होती, पण आता ६८ वर्षांनी एक वर्तुळ पूर्ण होऊन कंपनी पुन्हा ‘टाटा सन्स’कडे आली आहे.

◆ ‘टाटा सन्स’ने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावल्याचे शुक्रवारी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने जाहीर केले.

◆ ‘एअर इंडिया’च्या सर्व मालमत्ता आणि कंपनीवर असलेल्या सुमारे १५ हजार ३०० कोटींच्या कर्जासह ‘टाटा सन्स’ने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली.

◆ उर्वरित २,७०० कोटी रुपये टाटा सरकारला रोख स्वरूपात देणार असल्याची माहिती गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांता पांड्ये यांनी दिली.

◆ ‘टाटा सन्स’ व्यतिरिक्त ‘स्पाइस जेट’चे अध्यक्ष अजय सिंह यांची दुसरी व्यक्तिगत बोली होती.

◆ प्रक्रियेनुसार चार महिन्यानंतर ही कंपनी ‘टाटा सन्स’कडे हस्तांतरित होईल. पहिल्या वर्षी सर्व कर्मचाऱ्यांना कायम ठेवले जाईल आणि दुसऱ्या वर्षापासून स्वेच्छानिवृत्ती योजना सुरू होईल.

◆ आताच्या व्यवहारामुळे ‘महाराजा’ची (एअर इंडिया) शान आता पुन्हा वाढणार आहे.

◆ टाटा समूहाचा सध्या ‘एअर एशिया’ आणि ‘विस्तारा’ या कंपन्यांत मोठा वाटा आहे. आता ही तिसरी कंपनी त्यांच्याकडे आली आहे.

◆ मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत अनेक उत्पादने तयार करणाऱ्या टाटा समूहाची ही एक दिमाखदार कामगिरी मानली जाते. एअर इंडियाला कर्जबाजारीपणातून बाहेर काढण्याचे आव्हान आता त्यांच्यापुढे आहे.

◆ एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया जुलै २०१७ मध्ये सुरू झाली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सात कंपन्यांनी सरकारकडे ही कंपनी खरेदी करण्याबाबत प्रयत्न केले होते, असे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन खात्याने म्हटले आहे.

◆ खात्याचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी सांगितले की, टाटा सन्सच्या एसपीव्हीने एअर इंडिया कंपनी खरेदी केली आहे.

◆ टाटा सन्सने १८ हजार कोटींची बोली लावली असून त्यातील १५,३०० कोटी रुपये कर्जात जाणार आहेत आणि उर्वरित रक्कम सरकारला रोख स्वरूपात दिली जाणार आहे.

◆ डिसेंबरमध्ये नियोजन केल्याप्रमाणे ‘टाटा सन्स’ने या व्यवहारात जास्त बोली लावली होती.

◆ गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, व्यापारमंत्री पीयूष गोयल आणि नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी एअर इंडियाच्या व्यवहारास ४ ऑक्टोबरला मंजुरी दिली होती.

◆ ‘इंडियन एअरलाइन्स’मध्ये २००७ मध्ये विलीनीकरणानंतर ‘एअर इंडिया’चा तोटा वाढला होता. आता ‘टाटा सन्स’ला देशांतर्गत ४४०० आणि आंतरराष्ट्रीय १८०० उड्डाणांचे व पार्किंग जागांचे नियंत्रण मिळणार आहे.

◆ परदेशात पार्किंगचे ९०० स्लॉट मिळणार आहेत. मालवाहतूक आणि विमानतळांवरील इतर सेवांत टाटा समूहाला १०० टक्के तसेच ५० टक्के वाटा मिळणार आहे.

★ मालकीचा प्रवास

◆ ’जहाँगीर रतनजी दादाभॉय म्हणजे जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये ‘टाटा एअरलाइन्स’ या विमान कंपनीची
स्थापना केली.

◆ ’१७ ऑक्टोबर १९३२ रोजी कराचीहून मुंबईला या कंपनीच्या विमानाचे पहिले उड्डाण झाले.

◆ या विमानाचे वैमानिक होते, जे. आर. डी. टाटा! जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ ’१९४६मध्ये ‘टाटा सन्स’ने त्याचे विभाजन करून १९४८ मध्ये एअर इंडिया आणि युरोपातील उड्डाणांसाठी एअर इंडिया इंटरनॅशनल अशा दोन कंपन्या स्थापन केल्या.

◆ ’ही खासगी-सरकारी भागीदारीतील पहिली विमान कंपनी होती. त्यात टाटांचा वाटा २५ टक्के होता तर सरकारचा वाटा ४९ टक्के होता, उर्वरित वाटा नागरिकांचा होता.

◆ १९५३ मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

◆ ’करोना साथीमुळे जानेवारी २०२० मध्ये एअर इंडियाच्या विक्री प्रक्रियेस विलंब होत होता. या वर्षी पुन्हा एप्रिलमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली. टाटा समूहाने डिसेंबर २०२० मध्येच ही कंपनी खरेदी करण्याचा इरादा व्यक्त केला होता. आता तो पूर्ण झाला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
प्र.1983 खालील विधाने विचारात घ्या.

अ. जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये ‘टाटा एअरलाइन्स’ या विमान कंपनीची
स्थापना केली होती.

ब. या कंपनीच्या विमानाचे पहिले उड्डाण १७ ऑक्टोबर १९३२ रोजी कराचीहून मुंबईला झाले होते.

क. या विमानाचे वैमानिक होते, जे. आर. डी. टाटा हेच होते.

पर्याय.
🛑 A. विधान अ योग्य, ब व क अयोग्य.
⚫️ B. विधान अ व ब योग्य, क अयोग्य.
🔵 C. विधान ब व क योग्य, अ अयोग्य.
🔘 D. सर्व विधाने अयोग्य नाहीत.
Join @TargetMpscMh
🔰चालू घडामोडी (10/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 व्यक्तिवेध : अब्दुलरझाक गुर्ना #Noble_prize #vyaktivishesh

◆ ‘टांझानियात जन्मलेले’ अशी यंदा साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवणारे लेखक अब्दुलरझाक गुर्ना यांची ओळख करून दिली जाते आहे खरी, पण ते जेव्हा जन्मले, त्या १९४८ साली ‘टांझानिया’ नावाचा देश जगाच्या नकाशावर होताच कुठे?

◆ हा देश जन्मला १९६४ साली, तेव्हाच्या ‘टांगान्यिका’ आणि ‘झांझिबार’ यांचे एकत्रीकरण झाले तेव्हा!

◆ त्याआधी झांझिबारमध्ये जनउद्रेक झाला होता आणि टांझानिया-निर्मितीनंतर तर अरब वंशीय आफ्रिकनांना परागंदा व्हावेसेच वाटू लागले होते, त्यांपैकी एक म्हणजे तेव्हा तरुण असलेले अब्दुलरझाक गुर्ना.

◆ तेव्हा ते लेखकबिखक नव्हते, पण इंग्रजीत शिकले होते आणि इंग्लंडमध्ये, कँटरबरी परगण्यातील केन्ट विद्यापीठात त्यांना प्रवेश मिळाला होता.

◆ याच विद्यापीठात पुढे ते शिकवू लागले आणि ब्रिटिश नागरिक झाले. इंग्रजीतच लिहू लागले.

◆ लघुकथा व कादंबऱ्या मिळून दहा पुस्तके त्यांच्या नावावर आहेतच, शिवाय समीक्षापर लेखनही त्यांनी केले आहे.

◆ ‘वसाहतोत्तर साहित्य’ हा अभ्यासविषय असल्याने सलमान रश्दी यांच्या साहित्य-संकलनाचे कामही त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठासाठी केले.

◆ सध्या ते केन्ट विद्यापीठातच सुप्रतिष्ठ प्राध्यापक आहेत.

◆ नोबेल समितीने त्यांना पारितोषिक जाहीर करताना, ‘निर्वासितांचे विश्व साहित्यात आणून खंड आणि संस्कृती यांच्यातील फरक दाखवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणारे, वसाहतोत्तर काळाचे प्रश्न अदम्यपणे मांडणारे’ अशा शब्दांत त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला आहे. 

◆ वसाहतोत्तर जाणिवांचे दर्शन व्यक्तिगत, भावनिक आंदोलनांतून घडवण्याची शैली त्यांच्या आधीच्या कादंबऱ्यांतून दिसते.

◆ यापैकी ‘मेमरी ऑफ डिपार्चर’चा अभ्यास अनेकांनी केला आहे. यातील नायक बऱ्याच वर्षांच्या खंडाने मायदेशी परततो, तेव्हा त्याचे वडील त्याच्या आईला सोडून गेले म्हणून आईने दुसरे लग्न केले आहे.

◆ नायक आता मध्यमवयीन, पण आईने त्याच्यासाठी तरुण मुलगी वधू म्हणून ठरवली आहे- आईला वाटते की आपला मुलगा अद्याप कुवारच असेल! या अशा प्रसंगांच्या गुंफणीतून झांझिबार-टांगान्यिका विलीनीकरणाचे वास्तव, त्यातील अनैसर्गिकता आणि म्हणून झालेली तगमग, याचे सूचक दर्शन गुर्ना घडवतात.

◆ आफ्रिकन, अरब नायकांच्या या कादंबऱ्यांना मोठा वाचकवर्ग मिळाला नाही, परंतु समीक्षकांनी आणि अभ्यासकांनी त्या नावाजल्या.

◆ अर्थात, ‘पॅराडाइज’ ही त्यांची कादंबरी ‘बुकर पुरस्कारा’च्या लघुयादीत आल्यामुळे अधिक लोकांपर्यंत पोहोचली.

◆ झांझिबारच्या बहुसांस्कृतिकतेचे संस्कार आपल्यावर झाल्याचे गुर्ना यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.

◆ भारतीय, अरब, आफ्रिकी अशा अनेकपरींच्या लोकांचा वावर या बंदर-बेटावर असे. एकारलेली संस्कृती हे पाश्चात्त्य देशांचे वैशिष्ट्य, असेही त्यांच्या कादंबऱ्या दाखवून देतात.

◆ सांस्कृतिक खुलेपणा आणि बंदिस्तपणा यांचे ठोकताळे देश-वंशागणिक बांधता येत नाहीत, आधुनिक/ वसाहतोत्तर काळात या धारणा व्यक्तीशी निगडित असतात, मात्र भोवतालामुळे त्यांचा कोंडमारा होऊ शकतो, हे सूत्र त्यांच्या लिखाणातून दिसले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (10/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमणियन यांचा राजीनामा

◆ नवी दिल्ली : केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमणियन यांनी शुक्रवारी राजीनामा दिला.

◆ त्यांच्या कार्यकालाची तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.

◆ मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून मी तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला असून आता पुन्हा एकदा अध्यापनाच्या क्षेत्रात जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

◆ सरकारने त्यांचा उत्तराधिकारी जाहीर केलेला नाही.

◆ सुब्रमणियन यांनी ७ डिसेंबर २०१८ रोजी पदभार घेतला होता.

◆ त्याआधी अरविंद सुब्रमणियन या पदावरून पायउतार झाले होते. त्यांच्यानंतर के. व्ही. सुब्रमणियन यांची निवड करण्यात आली होती.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
प्र. 1984 खालील विधाने विचारात घ्या.

अ. केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमणियन यांनी शुक्रवारी राजीनामा दिला.

ब. त्यांच्या कार्यकालाची पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.

क. के.व्ही. सुब्रमणियन यांनी ७ डिसेंबर २०१८ रोजी पदभार घेतला होता.

पर्याय.
🛑 A. विधान अ, ब, क योग्य.
⚫️ B. विधान ब व क योग्य, अ अयोग्य.
🔵 C. विधान अ व क योग्य, ब अयोग्य.
🔘 D. विधान अ व ब योग्य, क अयोग्य.
Join @TargetMpscMh
🔰चालू घडामोडी (10/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 निर्भिड, निष्पक्ष पत्रकारांना शांततेचे नोबेल

◆ मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव यांचा गौरव

◆ फिलिपाईन्समधील पत्रकार मारिया रेसा आणि रशियातील पत्रकार दिमित्री मुरातोव यांना २०२१चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

◆ अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्यासाठी त्यांना गौरवण्यात आले आहे.

◆ नॉर्वेच्या नोबेल समितीचे बेरिट रेस अँडरसन यांनी शुक्रवारी या मानकऱ्यांची घोषणा केली.

◆ त्यांनी म्हटले आहे, ‘‘की मुक्त, स्वतंत्र, तथ्याधिष्ठित पत्रकारितेच्या रक्षणासाठी या दोघांनी सत्तेचा गैरवापर, खोटारडेपणा, युद्धखोरीजन्य प्रचार याविरोधात लढा दिला.

◆ अभिव्यक्ती आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य, देशांमधील बंधुभाव, नि:शस्त्रीकरण याशिवाय चांगल्या जगाची निर्मिती होऊ शकत नाही.’’

★ रेसा यांनी २०१२ मध्ये रॅपलर हे वृत्तसंकेतस्थळ स्थापन केले असून अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्या वादग्रस्त राजवटीविरोधात, अमली पदार्थांच्या घातक वापराविरोधात मोठा लढा दिला आहे.

◆ समाजमाध्यमे कशा खोट्या बातम्या पसरवतात, विरोधकांचा छळ कसा होतो, सार्वजनिक पातळीवरील चर्चेला भलतीच दिशा दिली जाते यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.

★ मुरातोव हे रशियातील नोव्हाया गॅझेटा या वृत्तपत्राचे संस्थापक असून १९९३ मध्ये त्यांनी ते स्थापन केले.

◆ नोव्हाया गॅझेटा हे निष्पक्ष वृत्तपत्र असून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर नेहमीच टीका केली आहे. वृत्तपत्राच्या तथ्याधिष्ठित व व्यावसायिक पत्रकारितेमुळे रशियन समाजाच्या उजेडात न आलेल्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला गेला आहे.

◆ पुरस्कार जाहीर करताना पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे, की दिमित्री मुराटोव यांनी त्यांच्या आदर्शानुसार काम केले. ते अतिशय बुद्धिमान व धाडसी आहेत यात शंका नाही. त्यांच्याविषयी एवढे सांगणे पुरेसे आहे. त्यांचे या पुरस्कारासाठी आम्ही अभिनंदन करीत आहोत.

★ शांततेचा नोबेल पुरस्कार १.१४ दशलक्ष डॉलर्सचा असून स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या इच्छेनुसार काही रक्कम या पुरस्कारासाठी ठेवली होती, त्यातून हे पुरस्कार देण्यात येतात. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

■ एकाधिकारशाहीला आव्हान

◆ रेसा यांनी फिलिपाइन्समधील एकाधिकारशाही विरोधात रॅपलर या डिजिटल माध्यम कंपनीच्या मार्फत लढा दिला. ड्युटेर्ट यांच्या वादग्रस्त राजवटीविरोधात त्यांनी आवाज उठवला. अमली पदार्थांविरोधात मते मांडली. त्या देशात अमली पदार्थाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्याविरोधात त्यांनी लढा दिला.

★ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा

◆ दिमित्री मुराटोव यांनी रशियात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. १९९३ मध्ये त्यांनी नोव्हाजा गॅझेटा हे वृत्तपत्र स्थापन केले. २४ वर्षे ते त्याचे संपादक होते.

◆ त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करून तथ्याधारित पत्रकारिता केली. भ्रष्टाचार, राजकीय हिंसाचार, बेकायदेशीर अटका, निवडणूक गैरप्र्रकार, रशियन लष्कराने वापरलेले जल्पकांचे काफिले यांच्यावर त्यांनी टीका केली.

◆ त्यांच्या वृत्तपत्रातील सहा जण चेचेन्यातील युद्धावर प्रकाश टाकल्याने मारले गेले होते, त्यात अ‍ॅना पोलिटस्काया यांचा समावेश होता. धमक्या येऊनही त्यांनी स्वतंत्र धोरण चालूच ठेवले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
प्र.1985 2021 च्या शांततेच्या नोबेल पुरस्कार बाबतीत खालील पैकी सत्य विधान/ने ओळखा.

अ. मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव यांना २०२१चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ब. दिमित्री मुरातोव यांनी फिलिपीन्स मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला.

क. मारिया रेसा यांनी १९९३ मध्ये नोव्हाजा गॅझेटा हे वृत्तपत्र स्थापन केले होते.
पर्याय.
🛑 A. विधान अ व ब सत्य, क असत्य.
⚫️ B. विधान अ, ब, क सत्य.
🔵 C. विधान ब व क असत्य, अ सत्य.
🔘 D. विधान अ सत्य, ब व क असत्य.
Join @TargetMpscMh
🔰चालू घडामोडी (10/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 एस जयशंकर आज ‘या’ तीन देशांच्या दौऱ्यासाठी होणार रवाना

◆ केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे आजपासून तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार असणार आहेत.

◆ रविवार १० ऑक्टोबर ते बुधवार १३ ऑक्टोबर दरम्यान एस जयशंकर हे अनुक्रमे किर्गिस्तान, कझाकिस्तान आणि आर्मेनिया या देशांना भेट देतील.

◆ जयशंकर यांच्या या दौऱ्यामार्फत भारताच्या तिन्ही देशांशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांतील प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. त्याचसोबत, या देशांतील विकासासंदर्भात चर्चा करण्याची आणि मतं मांडण्याची संधी मिळेल, असं केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (एमईए) आपल्या निवेदनात नमूद केलं आहे.

★ 'या' देशाचा पहिलाच दौरा

◆ केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एस जयशंकर यांच्या या दौऱ्याची तपशीलवार माहिती दिली आहे. जयशंकर हे रविवारीच किर्गिस्तानला पोहचतील.

◆ भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांचा या देशाचा हा पहिलाच दौरा असेल. यावेळी ते किर्गिझ समकक्ष रशियन कझाकबेव आणि देशाचे राष्ट्रपती सादिर जपारोव यांची भेट घेतील.

◆ यावेळी भारत-किर्गिस्तान या दोन्ही देशांदरम्यान काही सामंजस्य करार देखील होण्याची शक्यता आहे.

◆ एस जयशंकर सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी कझाकिस्तानला रवाना होतील. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ तिथे ते कॉन्फरन्स ऑफ इंटरॅक्शन अँड कॉन्फिडन्स बिल्डिंग मेझर्स इन एशियाच्या (सीआयसीए) ६ व्या मंत्रीस्तरीय बैठकीला उपस्थित राहतील.

◆ ज्यांचं अध्यक्षस्थान सध्या कझाकिस्तानकडे आहे. तर, एस जयशंकर यावेळी कझाकचे परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान मुख्तार तिलेउबर्डी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

★ स्वतंत्र आर्मेनियाला पहिलीच भेट

◆ पुढे आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यावर म्हणजेच १२ ऑक्टोबर रोजी एस जयशंकर आर्मेनियाला रवाना होतील.

◆ परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितल्यानुसार, भारतीय परराष्ट्र मंत्र्याची स्वतंत्र आर्मेनियाला ही आत्तापर्यंतची पहिलीच भेट असेल.

◆ यावेळी, जयशंकर हे आपले आर्मेनियन समकक्ष अरारत मिर्झोयान यांची भेट घेतील. तसेच पंतप्रधान निकोल पशियन्यान यांच्याशी देखील ते संवाद साधतील.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  11/10/2021  ■
                        वार :-  सोमवार 
         
          ■    दिनविशेष : 11 ऑक्टोबर     ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

◆ २००१ : ’पोलरॉईड कार्पोरेशन’ने दिवाळखोरी जाहीर केली.

◆ २००१ : सर विद्याधर सूरजप्रकाश तथा व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. सुमारे १० लाख डॉलर रकमेचे हे बक्षीस आहे.

◆ १८५२ : ’युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी’ ची स्थापना झाली. हे ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने विद्यापीठ आहे.
https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

◆ १९५१ : मुकूल आनंद – तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक

◆ १९४६ : विजय भटकर – संगणकतज्ञ ? ’सी. डॅक’ या प्रगत संगणकीय विकसन केन्द्राचे संस्थापक. ८ ग्रंथांचे लेखन-संपादन व सुमारे ७५ शोधनिबंध यांमुळे त्यांनी संगणकीय विज्ञान क्षेत्रात मोलाची भर घातली आहे?

◆ १९४३ : कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू (मृत्यू: ११ आक्टोबर १९९६)

◆ १९४२ : अमिताभ बच्‍चन – चित्रपट अभिनेता व निर्माता

◆ १९३२ : सुरेश दलाल – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक (मृत्यू: १० ऑगस्ट २०१२)

◆ १९३० : बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ ’बिझी बी’ – पत्रकार व स्तंभलेखक (मृत्यू: ९ एप्रिल २००१)

◆ १९१६ : चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख – समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा सदस्य, डी. लिट. (पुणे विद्यापीठ – १९९७), पद्मविभूषण. त्यांनी रचनात्मक ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी दिली. डोमरी येथील सोनदरा गुरुकुलम, ग्रामोदय विश्वविद्यालय, उदयमिता विद्यापीठ, आयुर्वेद विद्याप्रतिष्ठान, गोमाता संगोपन प्रकल्प अशा विविध संस्थांमार्फत विधायक कार्यक्रमांचे जाळे त्यांनी विकसित केले. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २०१०)

◆ १९१६ : रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर – चित्रपट व नाट्य अभिनेत्री, ब्रम्हचारी चित्रपटातील ’यमुनाजळी खेळू …’ या गाण्यासाठी प्रसिद्ध (मृत्यू: ३ जून १९९७)

◆ १९०२ : ’लोकनायक’ जयप्रकाश नारायण – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान (मृत्यू: ८ आक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार)

◆ १८७६ : चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार. ’प्रवासी’, ’मॉडर्न’, ’रिव्ह्यू’ इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता. (मृत्यू: १७ डिसेंबर १९३८ – कलकत्ता)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

◆ २००२ : दीना पाठक – अभिनेत्री (जन्म: ४ मार्च १९२२)

◆ १९९९ : रमाकांत कवठेकर – ’नागीण’, ’आघात’, ’पंढरीची वारी’ यांसारख्या पारितोषिकप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)

◆ १९९७ : विपुल कांति साहा – आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे सदस्य (जन्म: ? ? ????)

◆ १९९६ : कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू (जन्म: ११ आक्टोबर १९४३)

◆ १९९४ : दिगंबर परशुराम तथा काकासाहेब दांडेकर – उद्योगपती, कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक (जन्म: ? ? ????)

◆ १९६८ : माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ – ईश्वरभक्तीबरोबरच समाजसुधारणेचे विषयही कीर्तनात हाताळल्याने त्यांना ’राष्ट्रसंत’ असे संबोधले जाते. ’ग्रामगीता’ हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. (जन्म: ३० एप्रिल १९०९)

◆ १८८९ : जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक (जन्म: २४ डिसेंबर १८१८)

◆ १९८४ : खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ’खंडू’ रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज (जन्म: २७ जून १९१७)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (11/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 जगातील शंभर अब्ज डॉलर संपत्तीधारकांत मुकेश अंबानी !

◆ मुकेश अंबानी, जेफ बेझॉस, इलन मस्क

◆ आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांचा १०० अब्ज डॉलर संपत्तीचे मालक असलेल्या गटात समावेश झाला आहे, त्यामुळे ते आता जेफ बेझॉस, इलन मस्क यांच्या यादीत जाऊन बसले आहेत.

◆ मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लि.चे अध्यक्ष असून ते आता मोजक्या ११ उद्योगपतींच्या गटात आले आहेत ज्यांची संपत्ती शंभर अब्ज डॉलर आहे.

◆ शुक्रवारी रिलायन्सचा शेअर वधारला. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत भर पडून ती आता १००.६ अब्ज डॉलर झाली आहे. ब्लुमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात त्यांची दखल घेण्यात आली असून त्यांची संपत्ती २३.८ अब्ज डॉलरने वाढली आहे.

◆ तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल उद्योगात त्यांच्या वडिलांचा वारसा त्यांना मिळाला. त्यातून नंतर ते किरकोळ विक्री क्षेत्र, तंत्रज्ञान, इ व्यापार यातही उतरले. 

◆ त्यांनी २०१६ मध्ये दूरसंदेशवहन सेवा सुरू केली असून आता भारतात ती जोमाने सुरू आहे. त्यांनी गेल्या वर्षी किरकोळ विक्री क्षेत्र व तंत्रज्ञान या क्षेत्रात २७ अब्ज डॉलरची उलाढाल केली होती.

◆ फेसबुक, गुगल, केकेआर व सिल्वर लेक कंपन्यांना त्यांनी काही समभाग विकले होते. जूनमध्ये त्यांनी ऊर्जा क्षेत्रात १० अब्ज डॉलरची गुंतवणूक तीन वर्षात करण्याचे जाहीर केले आहे. स्वस्तात हरित हायड्रोजनची निर्मिती करण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला होता.

◆ १९६० मध्ये मुकेश यांचे वडील धीरूभाई अंबानी यांनी येमेन येथे एका गॅस स्टेशनवर काम सुरू केले होते. नंतर त्यांनी पॉलिस्टर उद्योगात मोठे साम्राज्य उभारले. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ २००२ मध्ये धीरूभाई यांचे निधन झाले तेव्हा त्यांनी इच्छापत्र केलेले नव्हते. त्यामुळे मुकेश व अनिल अंबानी यांच्यातील वाद त्यांच्या मातोश्री कोकिलाबेन यांनी मिटवले होते.

◆ त्यात मुकेश यांच्याकडे तेल शुद्धीकरण व पेट्रोरसायनां उद्योगांचा वाटा आला होता. त्यांचे बंधू अनिल यांना ऊर्जा, आर्थिक सेवा, दूरसंचार हे उद्योग मिळाले होते.

◆ अनिल अंबानी एकेकाळी अब्जाधीश होते पण त्यांनी गेल्यावर्षी लंडनच्या न्यायालयात सगळी संपत्ती गमावल्याचे जाहीर केले होते.

★ नवनव्या उद्योगांत आघाडी

◆ मुंबईतील टीसीजी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी चक्री लोकप्रिया यांनी म्हटले आहे की, मुकेश अंबानी हे नवनवीन उद्योग व तंत्रज्ञान यात आघाडीवर आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  12/10/2021  ■
                        वार :-  मंगळवार 
         
          ■    दिनविशेष : 12 ऑक्टोबर     ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

◆ २००२ : दहशतवाद्यांनी इंडोनेशियातील बालीमधे दोन बारमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात २०२ जण ठार तर ३०० जण जखमी झाले.

◆ २००१ : संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्‍नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर

◆ २००० : भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर के. वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. इव्हॅन्जेलिना व्हिलेगास यांना प्रोटिनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल ’सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कार’ जाहीर

◆ १९९८ : तेहतिसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शाहने तिची लढत जिंकून ’इंटरनॅशनल वूमन मास्टर’ हा किताब मिळवला.

◆ १९८८ : जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.

◆ १९८३ : लॉकहीड कॉर्पोरेशनकडून वीस लाख अमेरिकन डॉलरची लाच घेतल्या बद्दल जपानचे पंतप्रधान तनाका काकुऐ यांना चार वर्षांचा कारावास.

◆ १९६८ : मेक्सिकोतील मेक्सिको सिटी येथे १९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

◆ १९६० : संयुक्त राष्ट्रांसमोर भाषण करताना सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांनी आपला मुद्दा ठसवण्यासाठी टेबलावर जोडा आपटला.

◆ १८७१ : भारतात ब्रिटिश सरकारने ’क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट’ या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.

◆ १८५० : अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू

◆ १४९२ : ख्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज येथे पोचला. आपण भारतात पोहोचलो आहोत असा त्याचा समज झाला.
https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

◆ १९४६ : अशोक मांकड – क्रिकेटपटू (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)

◆ १९२२ : शांता शेळके – शब्दांवर मनापासून प्रेम करणार्‍या आणि आपल्या विविध भावभावनांचा अविष्कार अचूकपणे व्यक्त करणार्‍या समर्थ कवयित्री आणि गीतलेखिका. त्यांनी कथा, कादंबरी, कविता, चित्रपटगीते, भावगीते, नाट्यगीते, बालगीते, ललितलेखन व लघुनिबंध इत्यादि प्रकारांत विपुल लेखन केले. कालिदासाचे ’मेघदूत’ आणि अनेक जपानी हायकूंचा त्यांनी अनुवाद केला. ’वडीलधारी माणसे’ हे व्यक्तिचित्रण ’गोंदण’, ’वर्षा’, ’रुपसी’ इ. काव्यसंग्रह, ’रंगरेषा’, ’आनंदाचे झाड’ इ. ललित लेखसंग्रह, ’धूळपाटी’ हे आत्मचरित्र इ. त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांनी ७० ते ७५ चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. (मृत्यू: ६ जून २००२)

◆ १९२१ : जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक झुंजार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग आणि शिकार इ. विविध क्षेत्रांमधे दीर्घकाळ सक्रिय असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष व केसरीचे संपादक (मृत्यू: २३ एप्रिल २००१)

◆ १९१८ : मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम – उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, ’बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ (BCCI) चे अध्यक्ष; उपाध्यक्ष व खजिनदार, तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, चेन्नईचे महापौर (१९५५), चेन्नईतील ’चेपॉक’ स्टेडियमला त्यांचे नाव देण्यात आले आहे. (मृत्यू: १९ जानेवारी २०००)

◆ १९११ : विजय मर्चंट – क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक (मृत्यू: २७ आक्टोबर १९८७)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

◆ १९९६ : रेने लॅकॉस्त – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ’पोलो’ टी शर्टचे जनक (जन्म: २ जुलै १९०४)

◆ १९६७ : डॉ. राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक. १९३२ मधे ’मिठाचा सत्याग्रह’ या विषयावरील प्रबंधाकरता त्यांना बर्लिन विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली. इंग्रजीचे ते उत्तम जाणकार होते . मात्र त्यांना इंग्रजीची गुलामी मान्य नव्हती. इंग्रजी येत असुनही ‘अंग्रेजी हटाओ‘ ही चळवळ त्यांनी चालविली होती. (जन्म: २३ मार्च १९१०)

◆ १९६५ : पॉल हर्मन म्युलर – डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९४८) मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १२ जानेवारी १८९९ – ओल्टेन, स्वित्झर्लंड)

◆ १६०५ : बादशाह अकबर – हिन्दुस्तानचा तिसरा मुघल सम्राट (जन्म: १५ आक्टोबर १५४२)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (12/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 उपग्रह प्रक्षेपणात खासगी क्षेत्राचे पाऊल; वनवेब-इस्रोदरम्यान करार

◆ नवी दिल्ली : भारतात २०२२ पासून उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ची वाणिज्य शाखा ‘न्यूस्पेस इंडिया लिमिटेड’सोबत भारती समूहाची कंपनी ‘वनवेब’ने सोमवारी करार केला.

◆ त्यामुळे भारतीय भूमीवर अवकाशात उपग्रह प्रक्षेपित करणारा पहिला खासगी उपक्रम उदयास आला आहे.

◆ येत्या वर्षांत भारताच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यानाच्या (पीएसएलव्ही) साहाय्याने ‘वनवेब’चे उपग्रह प्रक्षेपित केले जातील आणि त्याद्वारे देशभरात इंटरनेट जोडणी उपलब्ध करून दिले जाणे अपेक्षित आहे.

◆ अंतराळ आणि उपग्रह तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत कंपन्यांनी एकत्र येऊन स्थापित केलेल्या ‘इंडियन स्पेस असोसिएशन (इस्पा)’ या संघटनेच्या स्थापनेच्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दूरचित्रसंवाद माध्यमातून संघटनेच्या स्थापनेनिमित्त हा कार्यक्रम झाला.

◆ पृथ्वी, महासागर आणि अवकाशात ‘ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी’ची पूर्तता करण्यासाठी आम्ही इस्रोच्या मंचाचा वापर करणार आहोत, असे भारती समूहाचे आणि ‘वनवेब’चे अध्यक्ष सुनील भारती मित्तल म्हणाले.

◆ कंपनीने ३२२ उपग्रह अवकाशात सोडले आहेत. न्यूस्पेस इंडिया बरोबरच्या या संयुक्त उपक्रमाचे अनुकरण आंतरराष्ट्रीय ग्राहक करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (12/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 Indian Space Association ( ISpA )-भारतीय अवकाश संघटनेची स्थापना


◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय अवकाश संघटनेची म्हणजेच Indian Space Association ( ISpA ) ची स्थापना केली.

◆ अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील देशाच्या वाढत्या गरज पुर्ण करण्यास ही संघटना मदत करणार आहे.

◆ या संघटनेचे नेतृत्व अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्त्रोकडे असणार आहे.

◆ देशातील वाढता इंटरनेटचा वापर, कृत्रिम उपग्रहांची गरज लक्षात घेता देशातील खाजगी कंपन्यांचा अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात सहभाग वाढवणे गरजेचे आहे.

◆ अवकाश तंत्रज्ञानाच्या नियमाअंतर्गत देशातील खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचे काम या संघटनेनेमार्फत इस्त्रो करणार आहे. 

◆ "भारतातील अवकाश तंत्रज्ञान क्षेत्राला एक नवीन विभाग मिळाला आहे. अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आत्तापर्यंत सरकारचीच मक्तेदारी होती, हे क्षेत्र सरकाकडूनच नियंत्रित केलं जात होतं.

◆ गेल्या काही वर्षात या क्षेत्रात भारताने बरीच प्रगती केली आहे. असं असलं तरी या क्षेत्रातील सरकारची मक्तेदारी आता रहाणार नाही.

◆ आता भारतीयांच्या गुणवत्तेला वाव देण्याची गरज आहे, मग ते क्षेत्र खाजगी का असेना " असं सांगत देशातील अधिकाधिक खाजगी कंपन्यांनी अवकाश तंत्रज्ञान क्षेत्राकडे वळण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. 

◆ भारतीय अवकाश संघटनेमध्ये भारती एअरटेल, लार्सन अन्ड टुब्रो, नेल्को, वन वेब, मॅपइंडिया, वालचंदनगर इंडस्ट्रीज यासारख्या कंपन्या या संस्थापक सदस्य आहेत.

◆ कृत्रिम उपग्रहांचा विविध क्षेत्रातला वापर हा देशात दिवसेंदिवस वाढत आहे.

◆ विशेषतः इंटरनेटसाठी उपग्रहांचा वापर हा जगाच्या तुलनेत कितीतरी कमी असला तरी भविष्यात वाढणार आहे. तसंच इस्त्रो आता चंद्र आणि मंगळ ग्रहांबरोबर विविध मोहिमा हाती घेत आहे. यासाठी देशातील विविध कंपन्याचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लागणार आहे.

◆ या संघटनेच्या मार्फत खाजगी कंपन्यांचा अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील सहभाग वाढवला जाणार आहे. यामुळे देशाच्या अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील गरजा पुर्ण करण्यासाठी बाहेरील देशांवर अवलंबून न रहाता देशातील कंपन्या या गरजा भविष्यात पुर्ण करु शकतील अशी अपेक्षा आहे.

◆ जगामध्ये अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात सध्याची उलाढाल ३६० अब्ज डॉलर्स एवढी असून यामध्ये इस्त्रोचा जेमतेम २ टक्के एवढाच वाटा आहे. असं असलं तरी इस्त्रोची क्षमता लक्षात घेता हा वाटा २०३० पर्यंत ९ टक्के एवढा सहज गाठला जाऊ शकतो, ज्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेलाही होणार आहे. आणि म्हणून हे उद्दीष्टय वेगाने आणि सहजरीत्या गाठण्यासाठी भारतीय अवकाश संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Job Alert

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) मध्ये विविध पदांच्या ४०० जागा
https://t.co/ItrpCNQfCQ?amp=1
=========================
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या ७४ जागा
https://t.co/alubh9eG6l?amp=1
=========================
गोंदिया जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ६१ जागा
https://t.co/dDRMKKmcac?amp=1
=========================
लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकार यांच्या विविध पदांच्या एकूण ५६ जागा
https://t.co/JVcFy662AD?amp=1
=========================
इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा
https://t.co/9zhJOmpGac?amp=1
=========================
पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळामध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा
https://t.co/toxPKACSuY?amp=1
=========================
कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
🔰चालू घडामोडी (12/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 अमेरिकेच्या तिघा अर्थशास्त्रज्ञांना नोबेल ; किमान वेतन, रोजगारनिर्मितीच्या कार्यकारणभावाची मीमांसा पद्धत विकसित 

◆ स्टॉकहोम : अमेरिकेच्या तिघा अर्थशास्त्रज्ञांना २०२१ या वर्षांतील अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. 

◆ कामगार बाजारपेठेवर किमान वेतन, स्थलांतर, शिक्षण यांचा होणारा परिणाम यांच्या अभ्यासासाठी त्यांनी शास्त्रीय पद्धत शोधून काढली आहे. यासंबंधी सर्वसाधारण अभ्यास पद्धतीतून निष्कर्ष काढता येत असले तरी ते फारसे अचूक नसतात, त्यामुळे या तिघांनी शोधून काढलेली वैज्ञानिक पद्धत ही महत्त्वाची आहे.

◆ कॅनडात जन्मलेले डेव्हिड कार्ड हे बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक असून त्यांना पुरस्काराचा निम्मा भाग मिळणार आहे, तर उर्वरित भाग मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूटचे जोशुआ अँग्रीस्ट, स्टॅनफर्ड विद्यापीठाचे जन्माने डच असलेले अर्थशास्त्रज्ञ गिडो इम्बेन्स ( ५८) यांना दिला जाणार आहे.

◆ कार्ड यांनी किमान वेतनातील वाढीचा परिणाम तपासण्यासाठी पूर्व पेनसिल्वेनिया व न्यूजर्सी येथील काही रेस्टॉरंट्सचा अभ्यास केला. ते व त्यांचे दिवंगत संशोधन भागीदार अ‍ॅलन क्रुगर यांनी असे दाखवून दिले, की ताशी किमान वेतनाच्या वाढीने रोजगारनिर्मितीवर काही परिणाम होत नाही.

◆ त्यांनी हा पारंपरिक समज चुकीचा ठरविला की, वेतनात वाढ झाल्याने कमी लोकांना रोजगार दिला जातो.

◆ कार्ड यांच्या संशोधनातून आणखी एक समज चुकीचा ठरला, तो म्हणजे स्थलांतरितांमुळे मूळ कामगारांच्या वेतनावर परिणाम होतो.

◆ त्यांच्या मते स्थलांतरितांमुळे उलट मूळ कामगारांना फायदाच होऊ शकतो. आधी आलेल्या स्थलांतरितांच्या वेतनावर मात्र याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

◆ अँग्रीस्ट व इम्बेन्स यांना पारितोषिकाची निम्मी रक्कम मिळणार असून त्यांनी असे दाखवून दिले, की काही पद्धतींनी अर्थशास्त्रज्ञ कार्यकारणभाव स्पष्ट करू शकतात, पण त्यात कठोरपणे शास्त्रीय पद्धती लागू करता येत नाहीत.

◆ इम्बेन्स म्हणाले, की पुरस्काराची बातमी ऐकून रोमांचित झालो.टार्गेट एमपीएससी एम एच.

★ योगदान काय?

◆ रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटले आहे, की तिघांनी अर्थ विज्ञानात मूर्त स्वरूपाचे काम केले आहे. 

◆ कार्ड यांनी समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे.

◆ अँग्रीस्ट व इम्बेन्स यांनी परिपूर्ण स्रोतांच्या आधारे काही नैसर्गिक प्रयोग केले असल्याचे अर्थविज्ञान समितीचे अध्यक्ष पीटर फ्रेडरिकसन यांनी म्हटले आहे. या सर्वाच्या संशोधनातून काही प्रश्नांच्या कार्यकारणभावाचा उलगडा झाला असून त्यातून समाजाला मोठा फायदा होणार आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  13/10/2021  ■
                        वार :-  बुधवार 
         
          ■    दिनविशेष : 13 ऑक्टोबर     ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

◆ १९७० : फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

◆ १९४६ : फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.

◆ १९४४ : दुसरे महायुद्ध – लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.

◆ १९२९ : पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले. त्यासाठी सत्याग्रह झाला होता.

◆ १९२३ : मुस्तफा केमाल पाशाने तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरुन अंकारा येथे हलवली.

◆ १८८४ : लंडन शहराजवळील ग्रिनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.

◆ ५४ : नीरो १७ व्या वर्षी रोमन सम्राट बनला.
https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

◆ १९४८ : नुसरत फतेह अली खान – पाकिस्तानी सूफी गायक (मृत्यू: १६ ऑगस्ट १९९७)

◆ १९४१ : जॉन स्‍नो – इंग्लिश क्रिकेटपटू

◆ १९२५ : मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान (मृत्यू: ८ एप्रिल २०१३)

◆ १९११ : अशोक कुमार गांगूली ऊर्फ ‘दादामुनी’ – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या (मृत्यू: १० डिसेंबर २००१)

◆ १८७७ : भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते, १९३१ मधे ’गांधी-आयर्विन’ कराराप्रमाणे त्यांनी बार्डोलीच्या शेतकर्‍यांची बाजू मांडली. १९३२ मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्षाचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली होती. (मृत्यू: ६ मे १९४६)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

◆ २००१ : डॉ. जाल मिनोचर मेहता – कुष्ठरोगतज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक, पुणे जिल्हा रेड क्रॉसचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८२), ’सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’ चे संचालक,

◆ १९९५ : डॉ. रामेश्वर शुक्ल तथा ’अंचल’ – हिन्दी साहित्यिक (जन्म: १ मे १९१५ – किशनपूर, फतेहपूर, उत्तर प्रदेश)

◆ १९८७ : आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली. ‘चलती का नाम गाडी‘ सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच ’दूर गगन की छाँव में’ सारखे गंभीर चित्रपटही काढले. (जन्म: ४ ऑगस्ट १९२९)

◆ १९४५ : मिल्टन हर्शे – ’द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक (जन्म: १३ सप्टेंबर १८५७)

◆ १९११ : मार्गारेट नोबल ऊर्फ ‘भगिनी निवेदिता’ – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्या मूळच्या आयरिश होत्या. २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रम्हचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव ‘निवेदिता‘ ठेवले. (जन्म: २८ आक्टोबर १८६७)

◆ १२४० : रझिया सुलतान – भारतातील पहिली महिला राज्यकर्ती ,दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली मुस्लिम महिला(जन्म: ?? १२०५)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
2024/12/29 02:40:51
Back to Top
HTML Embed Code: