Telegram Web Link
🔰चालू घडामोडी (13/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 पहिल्यांदाच सूर्यमालेबाहेरील ग्रहावरुन मिळाले रेडिओ सिग्नल, सूर्यमालेबाहेरील पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याचा मिळाला एक नवा मार्ग

◆ क्वीसलॅड विद्यापीठाचे डॉ बेंजामिन पोप आणि नेदरलॅड इथली 'राष्ट्रीय वेधशाळा' यांनी संयुक्तरित्या संशोधन करत पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याची नवीन पद्धत शोधून काढली आहे.

◆ यामुळे रेडिओ सिग्नलच्या माध्यमातून सूर्यमालेबाहेर ,आपल्या आकाशगंगेत विविध ताऱ्यांच्या भोवती असलेले पृथ्वीसदृश्य ग्रह (exoplanets) शोधण्याचा आणखी एक मार्ग उपलब्ध झाला आहे.

◆ विद्युत चुंबकीय विकिरणातील एक भाग म्हणजे रेडिओ सिग्नल.

◆ आकाशगंगेत कृष्णविवर, अवकाशातील धुलीकण ज्याच्यातून ताऱ्यांची निर्मिती होत असते अशा ठिकाणाहून रेडिओ सिग्नल येत असतात.

◆ त्याचबरोबर रेडिओ सिग्नलचा आणखी स्त्रोत म्हणजे गुरु आणि शनी सारखे जे मोठे ग्रह.

◆ अशा महाकाय ग्रहांभोवती असलेले चुंबकीय क्षेत्र आणि सौर वारे यांमुळे ध्रुवीय प्रकाश (Aurorae) तयार होत रेडिओ सिग्नलची निर्मिती होते.

◆ तेव्हा ग्रहांपासून मिळणाऱ्या रेडिओ सिग्नलच्या प्रकाराबद्दल माहिती होती. असं असतांना काही लाल बटु तारे ( ताऱ्यांचा एक प्रकार, आपल्या सुर्यापेक्षा लहान आकाराचे तारे ) यांच्याकडून रेडिओ सिग्नल मिळत असल्याचं संशोकांच्या लक्षात आलं.

◆ Low Frequency Array ( LOFAR ) या रेडिओ दुर्बिणीच्या माध्यमातून आणखी संशोधन आणि निरिक्षणे केल्यावर संशोधकांच्या लक्षात आलं की हे रेडिओ सिग्नल संबंधित तारे उत्सर्जित करत नसून या ताऱ्या भोवती फिरणारे ग्रह फेकत आहेत.

◆थोडक्यात सूर्यमालेत असलेल्या गुरु - शनि ग्रहांप्रमाणेच हे रेडिओ सिग्नल तयार होत असल्याचं स्पष्ट झालं.

◆ आकाशंगंगेतील एकुण १९ लाल बटु ताऱ्यांचा अभ्यास करण्यात आला. यापैकी चार लाल बटु ताऱ्यांकडून हे रेडिओ सिग्नल येत असल्याचे दिसून आलं.

◆ म्हणजेच या ताऱ्यांभेवती ग्रह तेही पृथ्वीसदृश्य ग्रह ( ज्या ग्रहांवर वातावरण आहे ) असल्याचं 'नेचर' नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनात म्हंटलं आहे.टेलिग्राम चॅनल टार्गेट एमपीएससी एम एच

◆ सूर्यमालेबाहेरील पृथ्वीसदृश्य शोधण्यासाठी अवकाश क्षेत्रातील संस्थांनी विविध क्षमतेच्या खास दुर्बिणी या पृथ्वीबाहेर - अवकाशात पाठवल्या आहेत. उदा. नासाची हबल अवकाश दुर्बिण.

◆ अशा दुर्बिणींद्वारे विविध तरंगलांबीच्या माध्यमातून ताऱ्यांचा अभ्यास करत पृथ्वीसदृश्य ग्रह हे शोधले जात आहेत.

◆ थोडक्यात पृथ्वीवरुन सूर्यमालेबाहेरील पृथ्वीसदृश्य ग्रह शोधणे ही एक अशक्य गोष्ट होती. मात्र आता पृथ्वीवरुनच रेडिओ सिग्नलच्या माध्यमातून पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याचा एक नवीन मार्ग सापडला आहे.

◆ यामुळे भविष्यात आणखी पृथ्वीसदृश्य ग्रह शोधले जात त्याचा अधिकाधिक अभ्यास करणे शक्य होणार आहे. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (13/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 व्यक्तिवेध : जेनी नौरोजी

◆ उन्मुक्त कलाविष्काराला कल्पकतेची आणि अभ्यासाची जोड देत एका वेगळ्याच क्षेत्राची भारतातील आद्य संस्थापक म्हणून नावलौकिक मिळवण्याची किमया जेनी नौरौजी यांना साधली.

◆ भारतीय फॅशन इतिहासात जेनी नौरोजी ही एक आख्यायिका ठरली आहे. फॅशन डिझायनर्स, मॉडेल्स, रॅम्पवॉक या फॅशनविश्वातील प्रचलित आणि वलयांकित संकल्पनांना एकत्र जोडणारी कला म्हणजे फॅशन कोरिओग्राफी.

◆ नृत्य-संगीत-नाटय़ यांची जोड देत पोशाखकारांनी घडवलेले पोशाख लोकांच्या नजरेतून मनात उतरवणाऱ्या जेनी नौरोजी या भारतीय फॅशन जगतात आद्य फॅशन कोरिओग्राफर म्हणून नावाजल्या गेल्या.

◆ त्यांचे नुकतेच निधन झाले, मात्र त्यांनी निर्माण केलेल्या या अभिजात कलादिग्दर्शनाच्या परंपरेने फॅशन उद्योगात अढळ स्थान मिळवले आहे.

◆ फाळणीपूर्व भारतात कराचीत जन्मलेल्या जेनी नौरोजी यांनी लहानपणापासून बॅले नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते.

◆१९५४ साली विवाह झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या एका सामाजिक कार्यक्रमात बॅले नृत्य सादर करताना त्यांना कोणीतरी पाहिले आणि थेट फॅशन शोचे दिग्दर्शन करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. टेलिग्राम टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ तोपर्यंत भारतीय फॅशन जगताला पोशाखकारही (फॅशन डिझायनर)माहिती नव्हते, किंबहुना फॅशन उद्योगाची मुहर्तमेढही इथे झालेली नव्हती.

◆ सुरुवातीच्या काळात मिलमधून आलेले कपडे , साडय़ा लोकांना दाखवण्यापुरते काही स्त्री-पुरुषांच्या अंगावर चढवून सादर केले जात. मॉडेल नावाची संकल्पनाही तेव्हा अस्तित्वात नव्हती. त्यामुळे केवळ फॅशन शोचे दिग्दर्शन नव्हे तर मॉडेल घडवण्याचे श्रेयही जेनी यांच्याकडेच जाते.

◆ साठ -सत्तरच्या दशकांत जेनीच्या दिग्दर्शनाखाली फॅशन शो करणाऱ्या अनेक तरुणी त्यानंतरच्या काळात मॉडेल्स म्हणून नावारूपाला आल्या.
झीनत अमान, शोभा डे या त्यापैकी!

◆ संगीत आणि प्रकाशयोजना यांचे अचूक ज्ञान जेनी यांच्याकडे होते. संगीताचे सूर आणि प्रकाशाचा खेळ साधत निर्माण केलेल्या अवकाशात पोशाखकारांनी घडवलेल्या पोशाखाचे नाटय़ मॉडेल्सच्या मदतीने रंगवण्यात त्यांचा हातखंडा होता.

◆ मॉडेल्स म्हणजे कोणी निर्बुद्ध चेहरे नव्हेत, अंगावर चढवलेल्या पोशाखांतून उभे राहणारे व्यक्तित्व देहबोलीतून प्रकट करण्याचे कसब मॉडेल्सच्या अंगी असले पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता.

◆ अभ्यास आणि कलात्मक दृष्टी या दोहोंचा मेळ साधत स्वत:च जन्माला घातलेल्या कलेचे चालतेबोलते विद्यापीठ म्हणून लौकिक मिळवणाऱ्याही त्या एकमेवाद्वितीय फॅ शन दिग्दर्शक ठरल्या.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (13/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 अनुप चंद्र पांडे नवीन निवडणूक आयुक्त

◆ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनुप चंद्र पांडे यांची भारतीय निवडणूक आयोगाचे (ECI) निवडणूक आयुक्त म्हणून जून २०२१ मध्ये नियुक्ती केली आहे.

◆ त्यांना ६ वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे (जे आधी पूर्ण होईल त्यानुसार) कार्यकाल लाभेल.

◆ मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासोबत पांडे काम करतील.

◆ १२ एप्रिल २०२१ रोजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी तत्कालीन निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यामुळे निवडणूक आयुक्तांचे एक पद रिक्त होते.

★ अनुप चंद्र पांडे:

◆ ते १९८४च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी आहेत.

◆ उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव म्हणून ते २०१९ मध्ये निवृत्त झाले.

◆ पांडे यांनी संरक्षण आणि कामगार व रोजगार मंत्रालयात काम केले होते.

◆ त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरींग मधून बी. टेक आणि नंतर एमबीए पदवी आणि डॉक्टरेट केले.

◆ त्यांनी लिहिलेले पुस्तक : Governance in Ancient India
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔹 Vocabulary

#Misspelt_words

1) Calendar -- A list that shows the days, weeks and months of a particular year.

2) Cemetery -- Burial place.

3) Ceremonial -- Connected with a ceremony.

4) Chancellor -- The head of the government or universities in some countries.

5) Coffee -- The cooked seeds of a tropical tree, made into powder and used for making a drink.
____________________
Join @TargetMpscMh
🔰चालू घडामोडी (13/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन..

◆ सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी विमानतळावरुन, सिंधुदुर्ग-मुंबई दरम्यानच्या पहिल्या विमानाचे उड्डाण आणि चिपी विमानतळाचे उद्घाटन 9 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

◆ ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते आभासी पद्धतीने सिंधुदुर्ग विमानतळावरुन, अलायन्स एअर विमानाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग विमानतळावरुन विमानाला रवाना केले.

◆ ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणजे, टाकावू समजल्या गेलेल्या गोष्टी, साहित्यापासून तयार करण्यात आलेले नवीन, पर्यावरणपूरक विमानतळ होय.

★ सिंधुदुर्ग विमानतळाविषयी...

◆ सिंधुदुर्ग विमानतळ हे एक ग्रीनफिल्ड विमानतळ आहे.

◆ सिंधुदुर्ग हे केंद्रीय सरकारने मंजूर केलेल्या देशातल्या 21 ग्रीनफिल्ड विमानतळांपैकी एक विमानतळ आहे.

◆ सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी-परुळे इथे एकूण 271 हेक्टर्स भूमीवर हे विमानतळ बांधण्यात आले आहे.

◆ केंद्रीय सरकारच्या 'उडान' योजनेच्या अंतर्गत सिंधुदुर्ग विमानतळाला प्रादेशिक दळणवळण योजनेनुसार अधिसूचित केले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
हेतू:- हसत खेळत अभ्यासाचे वातावरण निर्माण करणे.
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  14/10/2021  ■
                        वार :- गुरुवार 
         
          ■    दिनविशेष : 14 ऑक्टोबर     ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

◆ १९९८ : विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर

◆ १९८२ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.

◆ १९८१ : अन्वर साद्त यांच्या हत्येनंतर एक आठवड्यानी उपराष्ट्राध्यक्ष होस्‍नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.

◆ १९५६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.

◆ १९४७ : चार्ल यॅगर या वैमानिकाने X-1 या विमानातून पहिले यशस्वी स्वनातीत (ध्वनीपेक्षा जास्त वेगाने) उड्डाण केले. याआधी मानवरहित उड्डाणे झाली होती.

◆ १९३३ : राष्ट्रसंघातुन (League of Nations) नाझी जर्मनीने अंग काढुन घेतले.

◆ १९२० : ऑक्सफर्ड विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली.

◆ १९१२ : मिलवॉकी, विस्कॉन्सिन येथे निवडणूक प्रचाराचे भाषण करत असताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्ट यांच्यावर जॉन श्रॅन्क या वेडसर इसमाने खूनी हल्ला केला. गोळी लागून रक्तस्राव होत असतानाही रूझवेल्ट यांनी आपले भाषण पूर्ण केले.
https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

◆ १९५५ : उस्ताद शाहिद परवेझ – इटावा घराण्याचे सतारवादक

◆ १९३६ : सुभाष भेंडे – लेखक (मृत्यू: २० डिसेंबर २०१०)

◆ १९३१ : निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक (मृत्यू: २७ जानेवारी १९८६)

◆ १९२७ : रॉजर मूर – जेम्स बाँडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता

◆ १९२४ : वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९७)

◆ १८९० : ड्वाईट आयसेनहॉवर – अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २८ मार्च १९६९)

◆ १८८२ : इमॉन डी व्हॅलेरा – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २९ ऑगस्ट १९७५)

◆ १७८४ : फर्डिनांड (सातवा) – स्पेनचा राजा (मृत्यू: २९ सप्टेंबर १८३३)

◆ १६४३ : बहादूरशाह जफर (पहिला) – मुघल सम्राट (मृत्यू: २७ फेब्रुवारी १७१२)

◆ १५४२ : अकबर – तिसरा मुघल सम्राट (मृत्यू: २७ आक्टोबर १६०५)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

◆ २०१३ : मोहन धारिया – केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते (जन्म: १४ फेब्रुवारी १९२५)

◆ २००४ : दत्तोपंत ठेंगडी – स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक (जन्म: १० नोव्हेंबर १९२०)

◆ १९९९ : ज्यूलिअस न्येरेरे – टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १३ एप्रिल १९२२)

◆ १९९८ : डॉ. भालचंद्र पंढरीनाथ बहिरट – वारकरी संप्रदायाचे अभ्यासक व संशोधक (जन्म: ????)

◆ १९९७ : हेरॉल्ड रॉबिन्स – अमेरिकन कादंबरीकार (जन्म: २१ मे १९१६)

◆ १९९४ : सेतू माधवराव पगडी – इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक, ’गॅझेटियर्स’चे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्त्व. गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलिंवर त्यांनी लिखाण केले. ’जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: २७ ऑगस्ट १९१०)

◆ १९९३ : लालचंद हिराचंद दोशी – वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष, पद्मश्री (१९९२) (जन्म: ? ? १९०४)

◆ १९५३ : रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे – समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र (जन्म: १४ जानेवारी १८८२)

◆ १९४७ : साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा ’तात्यासाहेब’ केळकर – लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी १८९७ पासून ‘केसरी‘ व ‘मराठा‘चे संपादन केले. कायदेमंडळाचे सभासद, दहा नाटके, आठ कादंबर्‍या, दोन कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, आठ चरित्रात्मक ग्रंथ आणि विवेचनात्मक ग्रंथ इ. त्यांची साहित्यसंपदा आहे. (जन्म: २४ ऑगस्ट १८७२)

◆ १९४४ : एर्विन रोमेल – जर्मन सेनापती (जन्म: १५ नोव्हेंबर १८९१)

◆ १९१९ : जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स – जर्मन उद्योगपती (जन्म: ३० जुलै १८५५)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (14/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 गतिशक्ती पायाभूत सुविधा योजनेसाठी १०० लाख कोटींची तरतूद!

★ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

◆ नवी दिल्ली : विविध वाहतूक मार्गानी काही ठिकाणे एकमेकांशी दळणवळणाने जोडण्याची गतिशक्ती योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यान्वित केली असून त्यासाठी १०० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.

◆ मालवाहतूक खर्चात कपात, माल हाताळण्याची क्षमता वाढ, मालवाहतुकीस लागणाऱ्या वेळात कपात ही या योजनेची वैशिष्टय़े असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

◆ मोदी म्हणाले, की पूर्वीच्या काळात करदात्यांचा पैसा निष्काळजी दृष्टिकोनातून वापरला जात होता, त्यामुळे विकास होत नव्हता. विविध विभाग स्वतंत्रपणे काम करीत होते, त्यांचा एकमेकांशी ताळमेळ नव्हता. चांगल्या पायाभूत सुविधांशिवाय विकास होऊ शकत नाही. आता सरकारने सर्वंकष दृष्टिकोनातून विकास करण्याचे ठरवले आहे.

◆ भारतात रसद पुरवठा व मालवाहतुकीसाठी एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १३ टक्के खर्च होतो. गतिशक्ती योजनेमुळे हा खर्च कमी होणार आहे. त्यातून भारतात गुंतवणुकीस चालना मिळेल.

◆ पंतप्रधानांनी म्हटले आहे, की वेग व प्रमाण यात भारताने गेल्या सत्तर वर्षांत कधीच प्रगती केली नव्हती, आमच्या काळात ती झाली आहे. पहिली आंतर राज्य नैसर्गिक वायू वाहिनी १९८७ मध्ये टाकण्यात आली, त्यानंतर २०१४ मध्ये १५ हजार कि.मी गॅस पाइपलाइन टाकण्यात आली.

◆ सध्या १६ हजार किलोमीटरहून जास्त लांबीची पाइपलाईन टाकली जात आहे. आधीच्या सरकारांनी काही केले नाही, आम्ही निम्म्या काळातच मोठे काम केले आहे. भाजप सत्तेवर येण्यापूर्वी २०१४ मध्ये १९०० कि.मीचे रेल्वे मार्ग होते. आमच्या सात वर्षांत ते ९ हजार कि.मी. झाले आहेत. मेट्रोचे मार्ग २०१५ मध्ये २५० कि.मी.चे होते ते आम्ही ७०० कि.मी केले, आता एक हजार कि.मी.पर्यंत जातील.

◆ १.५ लाख पंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडल्या गेल्या आहेत. २०१४ मध्ये केवळ साठ खेडी ऑप्टिकल फायबरने जोडलेली होती. बंदरांवर बोटींना लागणारा काळ ४१ तासावरून २७ तास झाला आहे. आमच्या काळात ४.२५ लाख सर्किट- कि.मी ऊर्जावाहिन्या जोडल्या गेल्या. २०१४ पूर्वी त्या ३ लाख सर्किट कि.मी होत्या. पायाभूत सुविधांची सरकार कार्यक्षमपणे अंमलबजावणी करीत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (14/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 व्यक्तिवेध : रुथी थॉमसन

◆ बालगोपाळांपासून सगळ्यांनाच खिळवून ठेवणारे अ‍ॅनिमेशनपट (सचेतपट) हे आजच्या काळात नावीन्याचा विषय राहिलेले नाहीत.

◆ त्यांची संकल्पना प्रथम प्रत्यक्षात आणली ती वयाच्या १११ व्या वर्षी नुकत्याच निवर्तलेल्या रुथी थॉमसन यांनी.

◆ जगण्यावर प्रेम करणाऱ्या रुथी त्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळेच दीर्घायुषी ठरल्या. इलस्ट्रेटर व स्टोरीबोर्ड टेलर यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्यांनी ४० वर्षे दी वॉल्ट डिस्ने कंपनीत काम केले. त्या काळात डिस्नेचा दरारा होतात.

◆ या कंपनीने केलेल्या अनेक नावीन्यपूर्ण प्रयोगांमध्ये रुथी यांचा सहभाग होता.

◆ १९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दी रेस्क्यूअर्स’चे काम पूर्ण करून १९७५ मध्ये त्या निवृत्त झाल्या. इंटरनॅशनल फोटोग्राफर्स युनियनने निमंत्रित केलेल्या पहिल्या तीन महिलांमध्ये त्यांचा समावेश होता.

◆ दी वॉल्ट डिस्ने कंपनीने त्यांचा डिस्ने लिजंड हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरव केला होता. पोर्टलॅण्डमधील माइने येथे २२ जुलै १९१० रोजी जन्मलेल्या रुथी बोस्टनमध्ये लहानाच्या मोठय़ा झाल्या.

◆ १९१८ मध्ये त्यांचे कुटुंबीय कॅलिफोर्नियात आले. ते ओकलॅण्डमध्ये आले तो काळ पहिल्या महायुद्धाच्या अखेरीचा होता.

◆ स्टुडिओ कर्मचारी म्हणून काम करण्याआधीपासून थॉमसन यांचा डिस्ने कंपनीशी संबंध होता. डिस्ने ब्रदर्सपासून जवळच असलेल्या हॉलीवूडमध्येही वावरण्याची त्यांना संधी मिळाली. नंतर त्यांनी काही काळ काटरून स्टुडिओत काम केले.

◆ वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी सॅन फर्नाडो व्हॅलीत डबरॉक रायडिंग अकादमीत काम सुरू केले. तेथे वॉल्ट डिस्ने पोलो खेळत असत.

◆ त्यांनी थॉमसन यांना शाई व रंगाच्या मदतीने रंगकारी करण्याचे काम दिले. तेथे तयार होणाऱ्या अ‍ॅनिमेशनपटांवर अंतिम हात फिरवून त्यांना सुबक दर्जा प्राप्त करून देण्याचे काम त्या करीत असत.

◆ ‘स्नो व्हाइट अ‍ॅण्ड सेव्हन ड्वार्फ’ (१९३७) हा त्यांचा पूर्ण लांबीचा पहिला अ‍ॅनिमेशनपट. नंतर थॉमसन यांची अ‍ॅनिमेशनपटाची अंतिम तपासणीच्या तसेच दृश्य नियोजनाच्या कामासाठी नियुक्ती झाली. कॅमेरा व इतर अनेक अंगांचे त्यांचे ज्ञान अजोड होते.

◆ डिस्ने फिचर्सच्या ‘पिनोशियो’, ‘फॅण्टासिया’, ‘डम्बो’, ‘स्लीपिंग ब्युटी’, ‘मेरी पॉपिन्स’, ‘दी अ‍ॅरिस्टोकॅटस’, ‘रॉबिन हूड’, ‘अ‍ॅलीस इन वंडरलॅण्ड’, ‘दी जंगल बुक’ या अ‍ॅनिमेशनपटांसाठी त्यांनी काम केले.

◆ मिकी माऊस आणि मी बरोबरच वाढलो, असे त्या गमतीने म्हणत.

◆ अ‍ॅनिमेशनपटात कुठलीही कामे करण्यासाठी लागणारा गमत्या स्वभाव त्यांच्याकडे होता. गेल्या वर्षी त्यांचा ११० वा वाढदिवस झाला. जीवनातील चांगल्या गोष्टींकडे पहा. तुम्ही तुमच्यासाठी जे करता येईल ते करा, हा मूलमंत्र आपल्यासाठी मागे ठेवून त्या गेल्या आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Job Alert...

भारतीय खाद्य महामंडळ यांच्या आस्थापनेवरील वॉचमन पदांच्या ८६० जागा
https://t.co/wtpIUyyJ7W?amp=1
=========================
गोवा पोलिस विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७७३ जागा
https://t.co/opEn22Kq0a?amp=1
=========================
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५७१ जागा
https://t.co/YMVdR8sl1T?amp=1
=========================
भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पदांच्या ९० जागा
https://t.co/m0cQGdHHZs?amp=1
=========================
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सरकारच्या विविध पदांच्या ८० जागा
https://t.co/USS0IKIwjb?amp=1
=========================
मुंबई येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मध्ये विविध पदांच्या २० जागा
https://t.co/KOUmRt6pJM?amp=1
=========================
गोवाच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९ जागा
https://t.co/zXSzVrgyhe?amp=1
=========================
कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
🔰चालू घडामोडी (14/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 भारताला मिळणार आणखी एक विमान सेवा; राकेश झुनझुनवालांच्या ‘आकासा एअरलाईन्स’ला सरकारची NOC

◆ शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या आकासा एअरलाइन्सला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे.

● एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ‘आकासा’ एअर या ब्रँड नावाने काम करेल.

◆ जर सर्व प्रक्रिया योग्यवेळी पार पडल्या तर पुढच्या वर्षी एप्रिल २०२२ मध्ये आकासा एअरलाईन्सची स्वस्त दरातील विमान सेवा सुरु करण्यात येईल असे कंपनीने म्हटले आहे.

◆ अलीकडेच राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.
जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ आता एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड त्याच्या आकासा एअर या ब्रँड नावाने उड्डाण करणार आहे..

◆ त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे असतील, ज्यांनी यापूर्वी जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.

◆ इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष, राकेश झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे हे आकासाचे सह-संस्थापक असतील.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Helping Verbs(साहाय्यकारी क्रियापदे)   

1.Can

होऊ शकते,मारू शकतो,जाऊ शकतो,बोलू शकतो,लिहु शकतो,खाऊ शकतो,तयार करू शकतो,बसू शकतो, आठवण ठेवू शकतो, वाचू शकतो, समजावु शकतो, करू शकतो, सांगू शकतो, बोलावू शकतो,/होऊ शकत नाही.

2.Could

सांगू शकला,होऊ शकले,अभ्यास करू शकला, येऊ शकला,जाऊ शकला,बोलू शकला,लिहु शकला, आठवन शकला, ठेवू शकला, मारू शकला, समजावु शकला, बोलावू शकला, करू शकला, खाऊ शकला /होऊ शकले नाही.

3.Should

झाले पाहिजे,एकायला पाहिजे,करायला पाहिजे, सांगायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, मारायला पाहिजे, शांत बसायला पाहिजे, अनुभव घ्यायला पाहिजे, झोपायला पाहिजे, यायला पाहिजे, बोलायला पाहिजे / नाही पाहिजे.

4.Must

झालेच पाहिजे,एकायलाच पाहिजे,करायलाच पाहिजे, सांगायलाच पाहिजे, अभ्यास करायलाच पाहिजे, मारायलाच पाहिजे, शांत बसायलाच पाहिजे, अनुभव घ्यायलाच पाहिजे, झोपायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे.

5.Would

होईलच,मारेनच,सांगेलच,बोलेनच, करेलच, लिहिलच, अभ्यास करेलच, रडेलच, विचारीनच, बनवेलच, येईलच.

6.May

यायच असेल तर ये, जायच असेल तर जा, कदाचित तो मारेल,कदाचित तो अभ्यास करेल,कदाचित पाऊस येईल, कदाचित शाळेत जाईल / कदाचित परवानगी घेण्यासाठी/देण्यासाठी.

7.Let

होऊ दे,अभ्यास करू दे, मारू दे, करू दे, देऊ दे, घेऊ दे, सांगू दे, विचारू दे, बोलू दे, एकूण घेऊ दे, समजावु दे, येऊ दे, जाऊ दे.

8.Let's

चला जाऊया,चला समजावुया,चला बोलूया,चला खेळूया,चला अभ्यास,चला करूया,चला गाणे गाऊया,चला मारूया,चला लिहुया,चला विचारूया,चला करूया.

9.Have/Has to

कराव लागत,बोलाव लागत, सांगाव लागत,समजावाव लागत,कराव लागत,विचाराव लागत, जाव लागत, काम लागत, कराव लागत, माराव लागत, सोडाव लागत, समजून घ्याव लागत, प्रेम कराव लागत / कराव लागत नाही.

10.Had to

कराव लागल, बोलाव लागल,सांगाव लागल,समजावाव लागल,विचाराव लागल,जाव लागल,काम कराव लागल,माराव लागल, सोडाव लागल,समजून घ्याव लागल,प्रेम कराव लागल/कराव लागल नाही.

11.Did have to

कराव लागत होत,बोलाव लागत होत,सांगाव लागत होत,समजावाव लागत होत,कराव लागत होत,विचाराव लागत होत, जाव लागत होत, काम लागत होत, कराव लागत होत, माराव लागत होत, सोडाव लागत होत, समजून घ्याव लागत होत, प्रेम कराव लागत होत/कराव लागत नाही.

12.will/shall have to

कराव लागेल,बोलाव लागेल, सांगाव लागेल,समजावाव लागेल,कराव लागेल,विचाराव लागेल, जाव लागेल, काम कराव लागेल, माराव लागेल, सोडाव लागेल, समजून घ्याव लागेल, प्रेम कराव लागेल /कराव लागणार नाही.

13.Should have

करायला ह्व होत, झाले पाहिजे होत,एकायला पाहिजे होत,करायला पाहिजे होत, सांगायला पाहिजे होत, अभ्यास करायला पाहिजे होत, मारायला पाहिजे होत, शांत बसायला पाहिजे होत, अनुभव घ्यायला पाहिजे होत, झोपायला पाहिजे होत, यायला पाहिजे होत, बोलायला पाहिजे होत / करायला नको होत.

14.Could have

(केल असत तर असत/ जाल नसत शक्यता होती),सांगू शकला असता, सांगू शकला असता,होऊ शकले असता,अभ्यास करू शकला असता, येऊ शकला असता,जाऊ शकला असता,बोलू शकला असता,लिहु शकला असता, आठवन शकला असता, ठेवू शकला असता, मारू शकला असता, समजावु शकला असता, बोलावू शकला असता, करू शकला असता, खाऊ शकला असता .

15.Must have

(भूतकाळात झालेच असेल) पाऊस आलाच असेल, तो भेटलाच असेल, तो मेलाच असेल, हरवलाच असेल, पास झालाच असेल, त्याने अभ्यास केलाच असेल.

16.Might have

कदाचित झाल असेल,कदाचित आलेला असेल, कदाचित गेलेला असेल, कदाचित मेलेला असेल, कदाचित पास झालेला असेल, कदाचित अभ्यास केलेला असेल,कदाचित समजवले असेल, कदाचित पाऊस पडला असेल .

17.Would have

झालच असत,पाऊस आलाच असता, तो भेटलाच असता,तो मेलाच असता,हरवलाच असता, पास झालाच असता, त्याने अभ्यास केलाच असता.
-----------------------------------------------
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  16/10/2021  ■
                        वार :-  शनिवार 
         
          ■    दिनविशेष : 16 ऑक्टोबर     ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

◆ १९९९ : जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्‌स, स्‍नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्‌स खेळाडूसाठी दिला जाणारा ’फ्रेड डेव्हिस पुरस्कार’ भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.

◆ १९८४ : आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

◆ १९७५ : बांगला देशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.

◆ १९७३ : हेन्‍री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

◆ १९६८ : हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान

◆ १९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.

◆ १९२३ : वॉल्ट डिस्‍ने आणि त्याचा भाऊ रॉय डिस्‍ने यांनी ’द वॉल्ट डिस्‍ने कंपनी’ची स्थापना केली.

◆ १९०५ : भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.

◆ १८६८ : डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क ब्रिटिशांना विकले.

◆ १८४६ : डॉ. जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.

◆ १७९३ : फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्‍नी मेरी अ‍ॅंटोनिएत हिचा ’गिलोटीन’वर वध करण्यात आला.

◆ १७७५ : ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.
https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

◆ १९५९ : अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: ३ जून २०१०)

◆ १९४८ : हेमा मालिनी – अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक

◆ १९०७ : सोपानदेव चौधरी – कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र. ’काव्यकेतकी’, ’अनुपमा’, ’सोपानदेवी’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. (मृत्यू: ४ आक्टोबर १९८२)

◆ १८९६ : सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक (मृत्यू: १८ जून १९७४)

◆ १८९० : अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक, जाहिरातशास्त्रातील तज्ञ. ’मौज’ आणि ’निर्भिड’ ही साप्ताहिके त्यांनी सुरू केली. जातीयता निर्मूलनासाठी त्यांनी सहभोजनाचा (त्या काळातील धाडसी) उपक्रम चालवला. (मृत्यू: ३ सप्टेंबर १९६७)

◆ १८५४ : ऑस्कर वाईल्ड – आयरिश लेखक व नाटककार, ’कलेसाठी कला’ या मताचे कट्टर पुरस्कर्ते. त्यांच्या नाटकांची मराठीतही रुपांतरे होऊन ती रंगभूमीवरही आली आहेत. वि. वा. शिरवाडकरकृत ’दूरचे दिवे’ हे नाटक ’अ‍ॅन आयडियल हजबंड’चे रुपांतर आहे. १९६३ मध्ये त्यांचे साहित्य ’द वर्क्स ऑफ ऑस्कर वाइल्ड’ या नावाने संकलित झाले आहे. (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९००)

◆ १८४१ : इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: २६ आक्टोबर १९०९)

◆ १६७० : बंदा सिंग बहादूर – शिख सेनापती (मृत्यू: ९ जून १७१६)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

◆ २००२ : नागनाथ संतराम तथा ’ना. सं.’ इनामदार – लेखक (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९२३)

◆ १९९७ : दत्ता गोर्ले – मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक (मृत्यू: ? ? ????)

◆ १९८१ : मोशे दायान – इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख (जन्म: २० मे १९१५)

◆ १९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या (जन्म: १ आक्टोबर १८९५)

◆ १९५० : वि. गं. तथा दादासाहेब केतकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म: ? ? ????)

◆ १९४८ : माधव नारायण तथा माधवराव जोशी – नाटककार. जळगाव येथे झालेल्या ३४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष. पालिकांच्या कारभारावरील टीकेमुळे गाजलेले ’म्युनिसिपालिटी’ हे नाटक त्यांनी लिहिले होते. (जन्म: ? ? १८८५)

◆ १९४४ : गुरुनाथ प्रभाकर ओगले – उद्योजक, ’प्रभाकर कंदिल’चे निर्माते, ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक (जन्म: ? ? १८८७)

◆ १९०५ : पंत महाराज बाळेकुन्द्री – आध्यात्मिक गुरू (जन्म: ३ सप्टेंबर १८५५)

◆ १७९३ : मेरी आंत्वानेत – फ्रेन्च सम्राज्ञी (जन्म: २ नोव्हेंबर १७५५)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (16/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 तवांगला जोडणाऱ्या बोगद्याच्या उत्खननाचे काम पुर्ण, जून २०२२ पासून सेला बोगदा वाहतुकीसाठी खुला होणार

◆ तवांगकडे जाणाऱ्या 'सेला पास' च्या ठिकाणी बोगद्याच्या उत्खननाचे काम आज अखेर पुर्ण झाले.

◆ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीहून आभासी कार्यक्रमाद्वारे बोगद्याचे उत्खनन पुर्ण करण्यासाठी, शेवटचा स्फोट होण्यासाठी कळ दाबली.

◆ सेला पासच्या ठिकाणी एक मोठा स्फोट होत सेला बोगद्याच्या उत्खननाचे काम पुर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले.

◆ भुतान आणि तिबेट ( चीन ) च्या सीमेवरील एक मोठे शहर आणि लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण म्हणून तवांगची ओळख आहे.

◆ हिवाळ्यात काही महिने तवांगला रस्त्याने पोहचणे अशक्य असते. विशेषतः तवांगकडे जाणारा 'सेला पास' हा काही महिने बंद असतो.

◆ याच ठिकाणी सीमा सुरक्षा संघटना ( Border Road Organization ) दोन बोगदे बनवण्याचे काम करत आहे.

◆ साधारण १३ हजार ८०० फुट उंचीवर सेला पासच्या ठिकाणी दोन बोगदे बनवले जात आहेत. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ एक बोगदा १७९० मीटर लांबीचा तर दुसरा ४७५ मीटर लांबीचा असून ९८० मीटर लांबीचा आपत्कालीन मार्गही या बोगद्याच्या ठिकाणी बांधला जात आहे.

◆ सेला बोगद्यामुळे तवांगकडे जाणारा रस्ते प्रवास अधिक सुरक्षित होईल, १० किलोमीटरने अंतर कमी होत प्रवासाचा कालावधीही एक तासाने कमी होणार आहे. पण त्यापेक्षा हिवाळ्यातही तवांगशी संपर्क ठेवणे, रस्ते वाहतुक सुरु ठेवणे शक्य होणार आहे.

◆ गेल्या काही वर्षात सीमावर्ती भागात रस्ते वाहतुकीचे जाळे हे मजबूत करण्याचे धोरण अवलंबण्यात आलं आहे, सेला बोगदा हा त्याच कामााचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे.

◆ सेला पासच्या ठिकाणी बोगदा बांधण्याबाबत तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात तरतूद केली होती.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ फेब्रुवारी २०१९ ला या बोगद्याचे भूमिपूजन केले होते, एक एप्रिल २०१९ला प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती.

◆ या कार्यक्रमाच्या निमित्ताने जून २०२२ मध्ये सेला बोगदे हे वाहतुकीसाठी सुरु होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (16/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 दिव्या देशमुख महाराष्ट्राची सर्वात युवा ‘महिला ग्रँडमास्टर’

◆ मुंबई : महाराष्ट्राची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने भारताची २२वी ‘महिला ग्रँडमास्टर’ ठरण्याचा मान पटकावला.

◆ १६ वर्षीय दिव्याने महाराष्ट्राची सर्वात युवा ‘महिला ग्रँडमास्टर’ ठरतानाच आंतरराष्ट्रीय मास्टरचा दुसरा निकषही (नॉर्म) प्राप्त केला आहे.टेलिग्राम टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्याने अप्रतिम कामगिरी केली. तब्बल १९ महिन्यांनंतर प्रत्यक्षात बुद्धिबळाच्या पटावर खेळणाऱ्या दिव्याने (एलो २३०५ गुण) ‘महिला ग्रँडमास्टर’ किताबासाठी आवश्यक सर्व निकष पूर्ण केले.

◆ १० दिवस चाललेल्या स्पर्धेत दिव्याने तिच्यापेक्षा वरचे किताब मिळवलेल्या चार खेळाडूंना बरोबरीत रोखले. तसेच तिने तीन लढती जिंकल्या आणि दोन लढतींत तिला पराभव पत्करावा लागला.

◆ शेवटून दुसऱ्या फेरीत सिंगापूरच्या सिद्धार्थ जगदीशला बरोबरीत रोखल्याने दिव्याचा ‘महिला ग्रँडमास्टर’साठी आवश्यक तिसरा निकष पूर्ण झाला.

◆ ‘महिला ग्रँडमास्टर’चा किताब पटकावण्यासाठी खेळाडूने एलो २३०० गुण आणि तीन निकष पूर्ण करणे गरजेचे असते.

◆ त्याचप्रमाणे, अखेरच्या फेरीत हंगेरीच्या पाप लेव्हेंटेला बरोबरीत रोखत दिव्याने आंतरराष्ट्रीय मास्टरचा दुसरा निकष पूर्ण केला.

◆ हा किताब मिळवण्यासाठी तिला एलो २४०० गुण आणि तीन निकषांचा टप्पा पूर्ण करावा लागेल. दिव्याला या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे १७.७ आंतरराष्ट्रीय गुण मिळाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (16/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 भूक निर्देशांक ठरविण्याची पद्धत अशास्त्रीय ! जागतिक क्रमवारीत भारताचे स्थान खालावल्यानंतर केंद्र सरकारचा दावा

◆ नवी दिल्ली : जागतिक भूक निर्देशांकात भारताचा क्रम कमी करणे धक्कादायक असल्याचे सांगतानाच, या निर्देशांकाच्या क्रमवारीसाठी वापरली जाणारी पद्धत ‘अशास्त्रीय’ असल्याचे मत केंद्र सरकारने शुक्रवारी व्यक्त केले.

◆ २०२१ सालच्या जागतिक भूक निर्देशांकात (ग्लोबल हंगर इंडेक्स) ११६ देशांच्या यादीत भारताची १०१व्या क्रमांकावर घसरण झाली.

◆ २०२० साली भारत ९४व्या क्रमांकावर होता. आता तो या यादीत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ या आपल्या शेजाऱ्यांच्या मागे आहे.

◆ कुपोषित लोकसंख्येच्या प्रमाणाबाबत एफएओच्या अनुमानाच्या आधारे जागतिक भूक निर्देशांक अहवालात भारताचा क्रम खाली येणे ‘धक्कादायक’ आहे.

◆ हा अहवालाचा वस्तुस्थितीशी संबंध नाही. त्यात कार्यपद्धतीच्या गंभीर चुका आहेत, असे या अहवालावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करताना महिला व बाल विकास मंत्रालयाने सांगितले.

◆ ‘एफएओ’ने वापरलेली पद्धत ‘अशास्त्रीय’ असल्याचा दावाही त्यांनी केला.

◆ ‘गॅलप’ने दूरध्वनीद्वारे केलेल्या चार प्रश्नांच्या जनमत चाचणीच्या निकालांवर हे मूल्यांकन करण्यात आले आहे.

◆ दरडोई अन्नधान्याच्या उपलब्धतेवर आधारित कुपोषणाचे मोजमाप करण्याची कोणतीही शास्त्रीय पद्धत नाही. टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ कुपोषणाचे शास्त्रीय मोजमाप करण्यासाठी वजन आणि उंचीच्या मोजमापाची आवश्यकता असते, असेही महिला व बाल विकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

★ सदोष अहवाल

◆ ’जागतिक भूक निर्देशांक प्रकाशित करणाऱ्या कन्सर्न वर्ल्डवाईड आणि वेल्ट हंगरलाईफ यांनी अहवालाच्या प्रसिद्धीपूर्वी आपले काम योग्य पद्धतीने केले नाही, असे महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.  

◆ ’करोना संकटाच्या काळात सरकारने सर्वासाठी अन्नसुरक्षेचे मोठे प्रयत्न केले. त्याचा पडताळा घेणारी आकडेवारीही उपलब्ध आहे, परंतु त्याकडे हा अहवाल पूर्णपणे दुर्लक्ष करतो, याकडे केंद्राने लक्ष वेधले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
2024/12/29 19:59:27
Back to Top
HTML Embed Code: