Telegram Web Link
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*सोन्यासारखं आयुष्य जगायचं असेल तर लोखंडासारखे घाव सोसावेच लागतील.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
_*पराभव हा आयुष्याचा भाग आहे... पण पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंत पणाची निशाणी आहे.*_

*#दैवत:-छत्रपती_शिवाजी_महाराज 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*आयुष्य जगताना आई वडील नावाची भीती कायम असली पाहिजे, ज्या दिवशी आपण आईवडिलांना घाबरणार नाही तिथून पुढे आयुष्याची घसरण चालू होते...*_

*#हर_हर_महादेव 🚩*
_*महाराज तुमचे नाव आमच्या मुखात आहे म्हणून आम्ही आज सुखात आहे.*_

*#दैवत:-छत्रपती_शिवाजी_महाराज 🚩*
_*शत्रूच्या छाताडावर आणि सह्याद्रीच्या कातळावर पाय रोवून उभं ठाकणारं उत्तुंग कर्तृत्व...!!*_

*#दैवत:-छत्रपती_शिवाजी_महाराज 🚩*
_झुकल्या-वाकल्या कित्येक गर्विष्ठ माना या *❝शिवमंदिरी❞*_

*#दैवत:-छत्रपती_शिवाजी_महाराज 🚩*
_*अगदी राजमुद्रेत उल्लेख केल्याप्रमाणे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे शिवरायांचे स्वराज्य वाढत गेले. प्रसंगी शस्त्र उचलुन शिवरायांनी रयतेला तिच्या कल्याणाची, रक्षणाची हमी दिली. रयतेला स्वातंत्र्य दिलं, स्वराज्य दिलं, स्वाभिमान दिला. त्यांनी केलेल्या लोककल्याणकारी कार्यामुळे शिवछत्रपती विश्ववंदनीय ठरले.*_
हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचेही बलिदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी !

त्यांचा पराक्रम, त्यांचा त्याग, त्यांचे शौर्य आणि त्यांचे बलिदान संपूर्ण हिंदुस्थानाला प्रेरणा देणारे आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभू राजांना त्रिवार मानाचा मुजरा!

धर्मवीर
छत्रपती_संभाजी_महाराज
मृत्युंजय अमावस्या........

बरोब्बर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन अमावस्येच्या दिवशी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची औरंग्याने निर्घृण हत्या केली...

या अमावास्येला आपण मृत्युंजय अमावस्या म्हणतो.

चाळीस दिवस सतत मृत्यूच्या छायेत वावरूनही तसूभरही न ढळता हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचे शिरकमल अर्पण करणाऱ्या संभाजी महाराजांनी त्या मृत्यूवरही विजय मिळवला आणि आपला हिंदू धर्म स्वाभिमानाने जपला. म्हणून ही मृत्युंजय अमावस्या..

चालताना साधा काटा रुतला तर आई गं म्हणणारे आपण... कसं सोसलं असेल हो त्या सिहांच्या छाव्याने? अंगावरचे केस उपटले गेले, सालटी काढली गेली, त्यावर मीठ टाकलं गेलं, मिरचीची धुरी देण्यात आली, चाबकांचे फटके मारण्यात आले, हाता पायाची नखे उपटण्यात आली, जीभ छाटली गेली, दोन्ही डोळ्यात तापलेल्या लालबुंद सळया टाकण्यात आल्या.. हात पाय तोडण्यात आले, आणि शेवटी शिर छाटण्यात आले...रोज एक एक छळ. असे किती दिवस?? तब्बल चाळीस दिवस... किती ही सहनशीलता? किती हे धैर्य? किती हे कठोर मनोबल? कुठून आलं हे सर्व? कोणी बळ दिलं इतकं सोसायला? कोणासाठी? कशासाठी सहन केलं?

फक्त आणि फक्त स्वधर्मासाठी...

आपण खूप थाटामाटात हिंदू नववर्षाचे स्वागत करतो. ज्यांनी हिंदू धर्म रक्षिला त्या छत्रपती पिता-पुत्रांचे आपण साधे स्मरणही करत नाही. त्यांनी मुघलांना रोखले नसत तर सर्व हिंदूंचा सुंता करून मुघलांनी मोठे धर्मांतर घडवले असते. मग.... कोणता हिंदू आणि कोणते नववर्ष ?

सर्वच हिंदू बांधव विसरले आहेत असेही नाही.आजही हजारो लाखो हिंदू बांधव संभाजी महाराजांनी ज्या यातना ४० दिवस भोगल्या त्याची थोडी तरी झळ स्वतःला बसावी म्हणून हे ४० दिवस अनवाणी चालतात, अनेक जण एक वेळचे अन्नत्याग करतात, अनेक जण चाळीस दिवस एखादी आवडती वस्तू त्यागतात, एखादा अतिशय आवडता खाद्य पदार्थ त्यागतात, अनेकजण चाळीस दिवस मौन सुद्धा धारण करतात.. जसे जमेल तसे स्वतःच्या देहाला यातना देतात.

दि 8 एप्रिल सोमवार मृत्युंजय_अमावस्या आहे.. आपण सर्वांनी जमेल त्या प्रकारे निदान या एका दिवशी तरी वरील पैकी एक पर्याय स्वीकारावा.. सोमवार दिवसभर शंभू महाराजांच्या बलिदानास आठवावे. त्यांनी सोसलेल्या छळास मनोमन अनुभवावे. त्यांच्या नावाने एक दिवा लावावा. हीच त्यांना खरी सुमनांजली असेल.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.

🚩🚩🚩 जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩
_*त्यांचा पराक्रम, त्यांचा त्याग, त्यांचे शौर्य आणि त्यांचे बलिदान संपूर्ण हिंदुस्थानाला प्रेरणा देणारे आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभू राजांना त्रिवार मानाचा मुजरा!*_

# धर्मवीर
# छत्रपती_संभाजी_महाराज
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*यशाच्या शिखरावर गरुडासारखी भरारी घ्यायची असेल तर, आपल्या स्वप्नरूपी पंखाना मेहनतीचे बळ द्या...*_

*#हर_हर_महादेव 🚩🙏🏻*
_*संघर्ष नाही केला तर जीवनाचा उपयोग काय? संघर्ष करायला सुरुवात करून तर बघा छोटे छोटे विजय मिळवा. छोटे छोटे Target ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्या. तुम्हाला आपला विजय लाख मोलाचा वाटेल. शिवरायांनी जे समाजात स्वराज्य निर्माण करून दाखवलं ते स्वतः च्या जीवनात प्रस्थापित करायचा प्रयत्न करा.*_

*#जय_शिवराय* 🙏🚩
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*कठीण परिस्थिती माणसाला मजबूत बनवते; म्हणूनच तर अडचणीच्या काळात आपल्या मार्गाने ठामपणे चालत रहायचे, यश नक्कीच मिळते.*_

*#हर_हर_महादेव 🙏🏻🚩*
_*छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानवी मूल्य आणि नैतिकतेवर भाष्य करताना इतिहास संशोधक, लेखक डॉ.बाळकृष्ण लिहतात शिवचरित्रात महाराजांच्या चरित्राला गालबोट लागेल असे एकही कृत्य दाखवता येणार नाही. उच्च मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारा असा सेनानी हिंदुस्थानात नव्हे तर यूरोपातही शोधून मिळणे कठीण आहे.*_

*विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो !!*
_*असे स्थान जिथे जीवनात हरलेल्याला झुंजण्याची ताकद मिळते ती म्हणजे माझ्या राजाचे चरण..!!!*_
*_सगळं संपलय असं ज्यावेळी वाटेल तेव्हा जास्त खंबीर व्हा...!!_*

*_पुरंदराच्या तहात तेवीस किल्ले मुघलांना दिल्यामुळे स्वराज्य संपलं अस सगळ्याना वाटलं होतं... महाराज वगळता...!!_*

*#जय_शिवराय 🙏🏻🚩*
_*स्तब्ध झाले मन, निशब्द झाल्या व्यथा, होऊनी लीन तव चरणी जगा सांगेन तुमच्या पराक्रमाच्या गाथा...*_

*#दैवत_श्री_छत्रपती_शिवाजी_महाराज* 🚩
_*सूर्याला शोधावं लागत नाही त्याचा प्रकाशच त्याच्या अस्तित्वाची साक्ष देत असतो...!!*_

*#ऊर्जा_छत्रपती 🙏🏻🚩*
_*सूर्याला शोधावं लागत नाही त्याचा प्रकाशच त्याच्या अस्तित्वाची साक्ष देत असतो...!!*_

*#ऊर्जा_छत्रपती 🙏🏻🚩*
_*मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल. मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल..!*_
2024/09/28 20:50:37
Back to Top
HTML Embed Code: