Telegram Web Link
लोहगड किल्ला इतिहास.....


लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे
आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच
इ.स.पू. २००० वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते.
सातवाहन, चालुक्य, [[, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.
इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक
किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक. इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा
सातवा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये
किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि
भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड-विसापूर हा सर्व परिसरसुद्धा
स्वराज्यात सामील करून घेतला.
इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला
गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला.
पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून
ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी
आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्ऱ्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना
फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे
धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी
किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान
असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ
असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू - नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो
बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले
सर्व द्रव्य नित्सुऱ्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुरे
कैलासवासी झाले व नंतर १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या.
१८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा
जिंकला. ४ मार्च १८१८ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व
प्रथम विसापूर जिंकला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा
करायचा हूकुम सोडला अनिच्छेनेच मराठे मागे फिरले.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
गडावर चढतांना सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते.
१. गणेश दरवाजाः - ह्याच्याच डाव्या उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा
नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची
पाटिलकी देण्यात आली होती. येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.
२. नारायण दरवाजाः- हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला. येथे एक भुयार
आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई.
३. हनुमान दरवाजाः- हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.
४. महादरवाजाः- हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली
आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या
कालावधीत केले. महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी
सदर व लोहारखान्याचे भग्र अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा
चुना बनविण्याची घाणी आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ
काही हौशी दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथऱ्यात बसवली आहे. अशीच एक तोफ
तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे
चालत गेल्यास लक्ष्मी कोठी लागते. या कोठीत राहाण्याची सोय होते. कोठीत अनेक
खोल्या आहेत. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे.
तेथे एक शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हे तळे
अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही
गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे
चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी
केली आहे. हे तळं सोळाकोनी आहे. मोठा तळ्याच्या पुढे विंचूकाटाकडे जातांना
वाड्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. हा
विंचूकाटा म्हणजे पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड
आहे. विंचूकाटयावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते . गडावरून
पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा
म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आहे. गडाच्या आजूबाजूचा परिसर
न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा. गडावरून येतांना भाजे
गावातील भाजे लेणी आवर्जून पहावीत.
जंजिरा........


जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला
समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा
अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही
तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा
शेवटपर्यंत अजेय राहिला.
जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील
जझीरा या शब्दावरून तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक
मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या
कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना
प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे
लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या
तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम
पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी
लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला
जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची
नेमणूक केली.
राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना
पिरमरखानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत,
असे
भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून
दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला.
पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री
सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून
असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला.
पुढे पिरमखानाच्या जागी बुऱ्हाणखानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला
बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या
बुऱ्हाणखानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून
स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष
समजला जातो. जंजिऱ्याचे सिद्दी हे मूळचे अबिसीनियामधील असून, हे दर्यावर्दी शूर,
काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा
जिंकण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी
राजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इ.स.१६१७ ते इ.स 1734
अशी 117 वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला. पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमजी आप्पा
यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला . जंजिऱ्याचे प्रवेशद्वार पूर्भमुख आहे. होडीने
किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर, या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे.
प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुऱ्हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते.


प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुऱ्हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते.
एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला
आहे, असे ते चित्र आहे. बुऱ्हाणखान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, "तुम्ही
हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस
करू नका."
या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी
महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक पाच सहा
किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही
मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही.
जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. असे १९
बुलंद बुरूज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर
जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या
कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर ५९२ तोफा असल्याचा
उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही
पाहायला मिळतात.
किल्ल्याच्या मध्यभागी सुरूलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे.
पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन
मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती.
राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.
जंजिऱ्याच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ
पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हेही येथून दिसतात. ३३० वर्षे अभेद्य आणि
अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*खाण तर अखंड जगात सर्वत्र सापडली पण....*
*माझ्या 🚩_शिवछत्रपती_ 🙇🏻‍♂️ सारखा हिरा फक्त महाराष्ट्रातच सापडला___🧡🚩💫🙇🏻‍♂️🌍♥️*
आजचा जो दिवस आहे ज्यांची विजय गाथा
शाही च्या जागी रक्ताने ने लिहिली गेली होती
जय श्री राम 🙏🏻🙏🏻
🚩🚩...शौर्यदिवस...🚩🚩
*प्रेरणास्थान*

*कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा ”विजय” ठरतो*

*पण*

*अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा "इतिहास" ठरतो*

*🛕जय शिवराय🛕*
*६ डिसेंबर १९९२ आजच्याच दिवशी श्रीराम भक्तांनी अयोध्येत श्रीराम जन्मभुमीवर बाबराने बांधलेली मशिद जमिनदोस्त केली*
*आणी पवित्र हिंदु भुमीवर लागलेला तो डाग पुसला आज तिथे भव्य मंदीर उभे आहे..🛕*
*या श्रीराम मंदीर लढ्यात असंख्य श्रीराम भक्तांनी आपले प्राण दिले आहेत त्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी अभिवादन🙇🏻‍♂️ आणी*
*हिंदुस्थानातल्या सर्व हिंदुना या शौर्य दिनाच्या खुप शुभेच्छा..💐*
*पण लक्षात ठेवा अयोध्या तो झांकी है काशी मथुरा आग्रा दिल्ली अभी बाकी है....⚔️🚩*

।। जय श्रीराम जय श्रीकृष्ण हर हर महादेव ।।🕉️🧡🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*🧡//आजचे_शिवदिन_विशेष*
*————·.·.·—[🧡]—·.·.·————*
*🧡//९ डिसेंबर इ.स.१६८१*
मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली अभेद्य अशा सागरी जलदुर्ग "किल्ले जंजिरा" वर हल्ला केला.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*🧡#//आजचे_शिवदिन_विशेष*
*————·.·.·—[🧡]—·.·.·————*
*🧡#//१० डिसेंबर इ.स.१६६२*
छत्रपती शिवाजी महाराजांनी चौल ते दाभोळ ही किनारपट्टी जिंकली.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*🧡#//आजचे_शिवदिन_विशेष*
*————·.·.·—[🧡]—·.·.·————*
*🧡#//११ डिसेंबर इ.स.१६८३*
छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजेने साष्टी व बारदेश वर एकाच वेळी हल्ले चढवले.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*🧡#//आजचे_शिव_दिनविशेष*
*••─━━━✿[💥]✿━━━─••*
*👑१३_डिसेंबर_इ.स._१६७८🚩*
*_स्वराज्याचे युवराज संभाजी राजे कुरकुंभ येथे (ता. पंढरपूर) दिलेरखानाच्या गोटात सामील झाले! {हा प्रकार म्हणजे एक डावपेचाचा भाग होता.}_*
🏇🏇🏇🏇🏇
*👑१३_डिसेंबर_इ.स._१७२८🚩*
*_बाजीराव पेशव्यांनी उज्जैन जिंकले_*
*~_________~*
*"\_जय_जगदंब_जय_जिजाऊ_/"*
*"\_जय_शिवराय_जय_शंभूराजे_/"*
*~[]⛰️_जय गडकोट_>~*
*!!🔱_हर हर महादेव_!📿!*
*🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻*
*गगनचुंबी गिरीशिखरांवर राज्य करणारा सह्याद्रीपती जेव्हा अथांग सागरावर हुकूमत स्थापन करण्यासाठी ताल ठोकतो तेव्हा निर्माण होते मराठा आरमार!🚩*
* शिवराय असे शक्तीदाता..🙏*
*आयुष्यभर संघर्षाच्या ज्वाला झेलूनही..*🔥
*मेरु पर्वता प्रमाणे अढळ राहिलेले..*
*"राजपुत्र"म्हणजे..... "* *स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज*🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*🧡//आजचे_शिवदिन_विशेष*
*◆ ▬▬▬▬ ❴♥️❵ ▬▬▬▬ ◆*
*🚩१४ डिसेंबर इ.स.१६८२*

*_शहाबुद्दीनखानाचा व मराठा फौजेचा किल्ले लोहगडा येथे सामना...!_*
🏇🏇🏇🏇🏇🏇
*~_______~*
*"\_जय_जगदंब_जय_जिजाऊ_/"*
*"\_जय_शिवराय_जय_शंभूराजे_/"*
*~[]⛰️_जय गडकोट_>~*
*!!🔱_हर हर महादेव_!📿!*
*🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻*
*~•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•~*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_परिपक्वता ही वयावर नाही, तर विचारांवर अवलंबून असते..._*

*#हर_हर_महादेव 🚩*
*किल्ले विसापुर.....🚩*





मुबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी
गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच
दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात
गेल्यावरच नजरेस पडतो. पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा
(बोर) घाटाचे संरक्षण करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला
इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.

विसापूर
इतिहास


मराठे इ. स. १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी
गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे
लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या
चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे
समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. इ. स. १६८२
मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च इ.स.
१८१८ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर
जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या
मराठ्यांना लोहगड रिकामा करायचा हूकुम सोडला अनिच्छेनेच मराठे मागे फिरले
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
विसापूर किल्ला परिसर दृश्य
पायऱ्यांच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन
गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत
पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावरील पठारावर लांबवर पसरलेली
तटबंदी लक्ष वेधून घेते. गडावर एक मोठे जातेही आहे. गडावर प्राचीन काळातील
महादेवाचं मंदिर आहेत. मंदिराच्या समोरच मोठा तलाव आहेत.


मुंबई-पुणे लोहमार्गावर मळवली या छोट्या रेल्वे स्थानकावर उतरावे. येथून भाजे
गावात यावे. भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत.
१) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाडा घेणे आवश्यक ठरते. भाजे
लेण्यांना जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या सोडून एक पायवाट जंगलात
गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही
घरे लागतात. या वाटेने आपण पुन्हा एकदा मोडकळीस आलेल्या पायऱ्यांपाशी
पोहचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे.

२) दुसऱ्या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून
डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.

३) मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्सप्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता
आहे.
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा..._*

*#हर_हर_महादेव 🚩*
*हा महाराष्ट्र सेंटाचा नाही संतांचा आहे 😌🚩🙌🏻*
🔥🔥छत्रपती शिवाजी महाराज प्रश्नमंजुषा

एकूण 30 प्रश्न

👇👇

https://www.marathisahitya.in/2022/12/blog-post.html
2024/10/01 09:24:35
Back to Top
HTML Embed Code: