Telegram Web Link
तुकोबाराय म्हणतात..विठ्ठलाची काय अपेक्षा आहे, हे लक्षात घेऊन पंढरीला जायचे असते. तू तुझ्या अपेक्षा मनात ठेवून पंढरीला जातोस. असे करणे व्यर्थ आहे. निष्कारण पायपीट करणे आहे…🌿😇

राजगड
आयुष्य सावरायला इतकं सामर्थ्यवान शक्तीपीठ तत्पर
असेल तर ढासळण्याची भीती मनी उरतचं नाही...!🙇🏻🚩

ऊर्जा_छत्रपती
असेतुहिमाचल पती,आशिया खंडातील सर्वात बलाढ्य राजवाटीच्या बादशाहाचे, मोगलशाहीला सर्वोच्च वैभवाचे दर्शन घडवणार्या आलमगीर आलमपन्हा अवरंगजेबाच्या राजमुकूटाचे हरण करणारा एकच एक महाबलाढ्य योध्दा : राजश्री शंभुछत्रपती !!

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा
१६ जानेवारी, राजधानी रायगड
निमंत्रक. श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती, राजधानी रायगड
ज्यांच्या शौर्या बद्दल कधी शत्रूलाही संशय आला नाही, ज्यांनी आपल्या बाहुबलावर जबरदस्त शत्रूचा धुव्वा उडवून नऊ वर्षे स्वराज्य जतन केले, अश्या रणबाजी संग्रामसिंहाचा, स्वराज्याचे द्वितीय छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक...

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा १६ जानेवारी | राजधानी रायगड निमंत्रक. श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती

अवघे अवघे या

जय श्रीराम 🧡🚩
शिवराय असे शक्तिदाता..🚩
🚩 ऊर्जामंत्र

_जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही...!_

हर_हर_महादेव 🚩
प्रामाणिकपणे राहुन यश मिळत नाही असे म्हणतात पण प्रामाणिक राहणे हेच मोठे यश आहे.
@suvichar_marathi
🙏🏻
वर्ष कसे हे नवे म्हणावे
दिन उगवतो नशेमध्ये
मद्य प्राशुनी धुवा काढुनी
जाऊनी पडतो घाणी मध्ये

हिंदू बंधुनो कसे तुम्ही ओ
विसरुनी गेला पराक्रमा
पूर्वज आपले गाजवी समरे
निपटूनी लावी आंग्लजना

नववर्ष हे नव उमेदीचे
घेऊनी पालवी येते नवी
हिंदू वर्ष हे गुढी पाडवा
जाणीव ठेव तू नित्य मनी

त्याजुनी सारे आंग्ल विचारा
शिव शंभू नित मनी धरा
बुलंद करुनी हिंदू राष्ट्र हे
विराट हिंदू भूमी करा

देव देश धर्माची अस्मिता
सदैव तुमच्या मनी धरा
सुमधुर साखऱ्या खाऊन
गुढीपाडवा हेच हिंदू नववर्ष साजरे करा 🚩
🚩 *#प्रेरणास्थान*

_*माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तिनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो...!*_

*#हर_हर_महादेव 🚩*
खरे तर अनेक शस्त्र चालले होते या देहावर आजतोवर... या चाळीस दिवसात तर फक्त त्याला उतरताना बघत होतो आम्ही.

आमच्या देहाचा हा अंत आमच्या आत्म्यास अजरामर करण्यासाठीच होता. शेवटी उरणार तरी काय होते आमच्या शिवदौलतीच्या निष्ठेपुढे सर्व नश्वर दौलतीचे भाग हे... परंतु एक होतं आमच्या स्वराज्य निष्ठेसोबत आणखी एक समिधा राहणार होती मैत्रीची.

सर्व मागे वळून पाहिले तेव्हा अनेक आपलेच घात होते पाठीवर आणि आज वर्तमानात जेव्हा छातीवर घाव येत आहे अवरंग्याचे तेव्हा आपले म्हणून फक्त कवीराज कलश आहे.

मैत्रीधर्म ❤️🚩🙇
सरदार_सूर्यराव_काकडे
छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र होत.
शिवरायांनी जानेवारी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली, साल्हेर जिंकून घेण्यासाठीच्या आखणीप्रमाणे एकीकडून सरनौबत प्रतापराव सरदार_सुर्यराव_काकडे तर दुसरीकडून पेशवे यांनी इखलासखान आणि बेलोलखानाचा पाडाव केला आणि साल्हेर जिंकुन घेतला.
साल्हेरच्या युद्धात जय मिळाला , पण आनंदाच्याबरोबर युद्धातील विजय दु:ख घेऊनच येतो.

बखरीतील वर्णन ✍️
शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली ते एकून पातशहा कष्टी झाला ,नि म्हणाला , ‘काय इलाज करावा , लाख लाख घोड्याचे सुभे रवाना केले, ते बुडवले नामोहरम होऊन आले आता कोण पाठवावे, ’ तेव्हा पातशहाने ‘शिवाजी जोवर जिवंत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही’ असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस (साल्हेरला) रवाना केले.

मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले, ‘तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेलोलखानास धारून चालविणे, आण कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले.

’ हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे.
असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे. ’
अशी पत्रे पाठविली.
त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव तर दुसरीकडून पेशवे,
उभयता सालेरीस आले,आणि मोठे युध्द झाले.
सभासद बखरीत याचा उल्लेख् खालील प्रमाणे आढळतो.
‘‘चार प्रहर दिवस युध्द जाहले मोगल, पठाण, रजपूत, तोफांचे, हत्ती, उंट आराबा घालून युध्द जाहले.
युध्द होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की , तीन कोश औरस चौरस ,
आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते.
हत्ती रणास आले.
दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले.
पूर वहिले रक्ताचे चिखल जाहले. त्यामध्ये रुतो लाबले , असा कर्दम जाहला मराठ्यांनी इखलासखान आणि बेलोलखानाचा पाडाव केला. सरदार सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवतांना आपला देह ठेवावा लागला.
ते तोफेचा गोळा लागून पडले.

‘सूर्यराव काही सामान्य योध्दा नव्हे.

महाभारती जैसा कर्ण योध्दा त्याचा प्रतिमेचा, असा शूर पडला.’
आपल्या बालसवंगड्याच्या जाण्याने राजे कष्टी झाले.

हा पराभाव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो

पातशहा असे कष्टी जाले ‘खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीसच दिधली असे वाटते.
आता शिवाजी अगोदर आपणास मृत्यु येईल तर बरे,
आता शिवाजीची चिंता जीवी सोसवत नाही’ असे बोलिले.
🔥
जग ज्या छत्रपतींना सर्वोत्कृष्ट राजा म्हणून मानतं ते उगाच नाही ! एवढ्या आदर्श अन प्रेरणादायी राजा ज्या मातीत जन्माला आला त्या स्वराज्यात आपला जन्म झाला ही गोष्टच किती भाग्याची आहे , त्यामुळे आयुष्यात खचून गेलात कधी तर एकदा छत्रपतींना आठवा , आपला तेजोमयी इतिहास आठवा , संघर्षाच्या मातीत जन्माला आलोय आपण मग पराभवाला घाबरायचं नाही , आयुष्याला प्रेरणा देणारं नाव समोर ठेवायचं अन आपली वाटचाल सुरू ठेवायची 💯

श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान..
आराध्य दैवत 🧡🚩
🙏🚩🧡
आम्ही वेडे ज्यांना आस इतिहासाची

जय श्रीराम 🧡🚩
शिवराय असे शक्तिदाता..🚩
*🚩 #उर्जामंत्र*

_*स्पर्धा कुणाशीही असो फक्त तयारी मोठ्या नियोजनाने आणि मनापासून केली पाहिजे.*_

*#जय_शिवराय 🙏🏻🚩*
✍️
सुरत लूट-समज गैरसमज ✍️
१६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असे शब्द वापरले जातात.
परंतु ती लुट नव्हती ती वसुली होती.
बादशहाची सेना वारंवार स्वराज्यातील जनतेला त्रास देत असे त्यामुळे स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांना मोठे सैन्य उभे करावे लागले.
या सैन्याच्या खर्चाची जबाबदारी महाराजांचीच म्हणजे स्वराज्याची.
मोगलांपासुन स्वराज्याचे संरक्षण करण्याकरता महाराजांनी जो खर्च केला तो वेळोवेळी अश्या प्रकारे जमा झालेल्या पैशातुनच.
ही लुट नव्हती स्वराज्याच्या रक्षणासाठी केलेली वसुली होती.
✍️
महाराजांचे सैनिक सुरतेमध्ये धामधूम करत असताना एक विधवा भयंकर अस्वस्थ झाली होती, ती घाबरली होती तिच्या घरात फक्त तिच्या दोन तरूण मुली होत्या.
शिवाजी महाराजांचे सैनिक माझ्या घरात घुसतिल आणी आमच्या अब्रुचे धिंडवडे काढतील असं तिला वाटत होत.
ती मनातल्या मनांत देवाची प्रार्थना करत होती.
इतक्यात दरवाजा वाजला ती दरवाजा उघडायला तयार नव्हती.
परंतु दरवाजा वाजवणारा दुभाषी शांत स्वरात तिला दरवाजा उघडण्याची विनंती करत होता अभय देण्याची भाषा करत होता.
अश्या वेळेला घाबरतच तिने दरवाजा उघडला.
तो दुभाषी हात जोडून तिच्यापुढे उभा राहिला.
ती आश्चर्यचकित झाली, शिवाजी महाराजांची माणसं शस्त्र घेऊन आता घरात घुसतिल अशी तिला भिती वाटत होती.
पण तो दुभाषी म्हणाला “ आमचे महाराज स्त्रियांना मातेसमान मानतात.
तुमच्या पतिने जिवंत असताना खुप दानधर्म केला आहे.
कोणताही भेदभाव केला नाही याची महाराजांना माहीती आहे त्यामुळे तुम्हाला कोणी त्रास देऊ नये यासाठी महाराजांनी तुम्हाला दोन संरक्षक दिले आहेत.
तुम्ही आता निश्चिंत व्हा. तुम्हाला हा संदेश देण्यासाठीच महाराजांनी मला पाठविले आहे.”
हे ऐकुण तिच्या डोळ्यात पाणी आलं नकळत तिने आकाश्यातल्या बापाला प्रार्थना केली “
या सद्विचारी राजाला तु दिर्घायुष्य दे. !”
( मोहनदास पारेख ) सुरत व्यापारी ✍️

छत्रपती शिवाजी महाराजांसारखा थोर राजा इतिहासांत एकमेव.
त्यांच्यावर समाजाचा प्रचंड विश्वास.
या विधवा स्त्रीच्या अंतःकरणात शिवाजी महाराजांविषयी कोणत्या भावना निर्माण झाल्या असतिल याची तुम्ही कल्पना करा.
अश्या असंख्य माणसांच्या ह्रदयाचे स्वामी होते आपले शिवराय. कारण त्यांचे चारित्र्य शुद्ध होते वैयक्तिक जीवन आणी सार्वजनिक जीवन असा कोणताही फरक त्यांच्या चरित्रात नाही.
परकिय नागरिकांनासुद्धा पुज्य वाटणारे शिवराय आमच्यासाठीतर परमेश्वर स्वरूपच आहेत.
.
.
.
.
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*स्वतःच्या क्षमतांना न ओळखता लढण्या अगोदर हार मानणे म्हणजे मानसिक अपंगत्व.*_

*#दैवत_छत्रपती_शिवशंभु *
छत्रपती शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवत.. महाराष्ट्राला मुघलांच्या गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त करणाऱ्या स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊमॉसाहेब यांच्या ४५६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार मानाचा मुजरा..🙇🏻🌸🚩
🙏🚩
जय जिजाऊ 🙏🚩

33 कोटी देवाचं अस्तित्व ज्यांनी मुघली सत्तेला आव्हान देऊन टिकवल आणि जिथं आम्हांला नतमस्तक व्हावसं वाटतं,
ते पवित्र स्थान म्हणजे जिजाऊ माँसाहेब यांचे पवित्र चरण 🙏🚩
आणि ती पुण्यभुमी म्हणजे मातृतिर्थ सिंदखेडराजा..
आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळा- २०२४
💐 🚩

हिंदवी स्वराज्याचे दोन छत्रपती घडवणार्या त्या राजमातेला अखंड मानाचा मुजरा 🙏🚩

“अखंडलक्ष्मीअलंकृत राजश्री पुण्यश्लोक राजमाता जिजाऊ माँसाहेब”.....🙏🚩

जगात भारी बारा जानेवारी

जिजाऊ जन्मोत्सव सोहळा...🚩
१२ जानेवारी 🚩
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जन्मोत्सव 🙏
छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास जगाला ज्ञात आहे. गेल्या तीनशे वर्षात जगातील प्रमुख योद्ध्यांचे आदर्शस्थान म्हणजे छत्रपती शिवराय. जगाला लोकशाहीप्रधान राज्यव्यवस्था देणारे छत्रपती शिवरायच होते. समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण, सांस्कृतिकीकरण, न्यायव्यवस्था, शिक्षण, भाषा असे एकही क्षेत्र नाही की जेथे छत्रपती शिवरायांच्या कार्याचा ठसा उमटलेला नाही.
जय भवानी जय शिवराय..🙏🚩🚩

.
.
.

|| CHHATRAPATI || 👑🙏🏻🚩
2024/09/29 07:26:12
Back to Top
HTML Embed Code: