Telegram Web Link
जिजाऊ वंदना जिजा माऊली गे तुला वंदितो मी,

जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥

तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,

तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;

नसे दास कोणी नसे राव-स्वामी॥

तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,

तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;

तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥

तुझी सावली सर्व काळी असू दे,

कुठे दुःख कोणास काही नसू दे;

नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥

तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा ,

तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;

घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥

जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ .

थोर मातेस विनम्र अभिवंदन
🚩 *उर्जामंत्र*

_*गुंता झाला की हळुहळु संयमाने सोडवावा, मग तो दोऱ्याचा असो किंवा स्वत:च्या मनातील विचारांचा. संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही.*_

*#हर_हर_महादेव* 🚩
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा, अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.*_

*#जय_शिवराय 🙏🏻🚩*
*🚩 #उर्जामंत्र*

_*संपत्ती आणि स्थिती एखाद्यास तात्पुरते महान बनवते. पण माणुसकी आणि नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवते.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
श्री राम ज्यांचे नाव आहे अयोध्या त्यांचे गाव आहे एक वचनी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनाला आमचा कोटी कोटी प्रणाम 2024 च्या पहिल्या दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏🚩
*🚩 #प्रेरणास्थान*

_*स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर नि:सकोच विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की तो इतकं देणार, की मागायला काहीच उरणार नाही..!*_

*#दैवत_छत्रपती_शिवशंभू 🚩*
_*पराक्रम आणि साहस यांच्या जोडीला नैतिकता आणि मानवतेची जोड असलेला राजा या जगी पुन्हा होणे नाही...!*_

# शिवराय_असे_शक्तिदाता 🚩
_*जेवढी मोठी स्वप्ने असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश सुद्धा तेवढच मोठं मिळत...!*_

*#छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩*
*#छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩*
_*स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, तुमच्या प्रगतीत काहीच फरक पडत नाही, आणि जग तुमचे काहीच वाकडे करू शकत नाही...!!*_

*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा, मग ते कर्म असो किंवा व्यक्ती...!*_

*🚩 #हर_हर_महादेव*
बाकीची राज्यं ही सत्तेसाठी होती पण “ स्वराज्य “हे तत्वांसाठी उभारलं. बाकी काही शाश्वत असो वा नसो, तत्वं नेहमी शाश्वत असतात.🚩
शिवराय असे शक्तिदाता🙏🚩
🔥
छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या पुत्राच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला गेलेले तानाजी मालुसरे,
जिजाऊंच्या तोंडून कोंढाणा किल्ल्याची खंत ऐकतात...
मुलाचं लग्न बाजूला ठेवून भावाला घेऊन,
"आधी लगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं"

असे म्हणत प्राण पणाला लावून कोंढाणा वाढवितात...🔥
उदयभान राठोडच्या मोगलाई पकडीतून किल्ला सोडवतात...

"गड_आला_पण_सिंह_गेला "
साहजिकच कधी कधी वाटतं की, आता कुठे असतील मालुसरेंच्या पुढच्या पिढीतील माणसं...?
तानाजीच्या मुलाचं पुढे काय झालं असेल?
उत्तर आहे...
महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला
"#किल्ले_पारगड !"
रायबाचं लग्न स्वतः महाराजांनी आपल्या हातानी लावून दिलं, त्याला आपल्या गळ्यातली कवड्याची माळ घातली आणि किल्ले पारगडाचं किल्लेदारपद सांभाळण्याची जबाबदारी दिली.
स्वराज्याच्या पार दक्षिण टोकाला आहे म्हणून या किल्ल्याच नाव पारगड पडलं.
गोव्याच्या पोर्तुगीजांवर वाचक ठेवायला म्हणून महाराजांनी हा किल्ला बांधला.
किल्ल्याच्या वास्तुशांतीला महाराज स्वतः हजर होते तेव्हा त्यांनी किल्लेदार आणि तिथे हजर असलेल्या मावळ्यांना स्फूर्तिदायी आज्ञा केली.....
चंद्रसूर्य_जोवर_तळपत_आहेत_तोवर_किल्ला_जागता_ठेवा......
किल्य्याचे पाहिलं सुभेदार रायबाजी मालुसरे आणि त्यांच्या सोबत तिथे आलेल्या शेलारमामांच्या वंशजांनी पुढे अनेक वर्ष हा किल्ला सांभाळला.
रायबाची समाधीही पारगडावरच आहे.
मालुसऱ्यांच्या १० पिढ्या पारगडावर नांदल्या.
तानाजींचा वारसा सांगणारी त्यांची अकरावी पिढी व्यवसायाच्या निमित्ताने बेळगाव जवळील अनगोळ येथे स्थलांतरित झाली.
बाळकृष्ण मालुसरे हे मालुसरे घराण्याचे थेट अकरावे वंशज🙏
त्यांच्या सुनबाई म्हणजेच डॉ_शीतलताई_मालुसरे.
त्यांनी याच विषयावर लिहिलेली रायबा नावाची कादंबरी लवकरच येतं आहे.
अजय देवगण अभिनित "तानाजी"
या चित्रपटाच्या रिसर्च टीम मध्ये शीतलताईंचा समावेश होता.
शीतलताईंचे चिरंजीव रायबा हे थेट तेरावे वंशज ते महाड येथे राहतात.
नुसता नावाचा वारसा नसून त्यांच्याजवळ तानाजी मालुसरे यांची
तलवार आहे
✍️
किल्ले राजगडावर तयारी चालू होती मोहिमेची

कोंढाण्याच्या मोहिमेची....

मालुसरे आले, सोबत होते सुर्याजी आणि शेलार मामा
लेकाच्या लग्नाच निमंत्रण आणलं हुत मालूसरे नी...

राजांना ठाऊक होतं, भेट झाली राजगडावर, निमंत्रण दिले रायबाच्या लग्नाच
तानाजी मालुसरे नी राजांच्या आणि आऊसाहेबांच्या मनातलं ओळखलं हुत ओ...
शेवटी बालपण सोबत गेलं हुत जी..
मित्र नंतर पण स्वराज्य घडवणारा आपला मित्र म्हणजे आपला राजा
आणि आपल्या राजांच्या मनातील ओळखून मोहिमेवर न जाणारे ते मग तानाजीराव कसले ?

राजांनी आडवल, आऊसाहेबांनी थांबवल
तान्हा, लेकाच्या लग्नाचा इचार कर
त्याच जागी कडाडले तानाजी

"आधी लगीन कोंढाण्याचं अन मग माझ्या रायबाचं"

पण थांबानारे ते मालुसरे कसले
विडा घेतला कोंढाण्याचा
हे कोंढाण्याच् फुल आपल्या पायावर वाहू आम्ही राज्
लगोलग मोहिमेची तयारी सुरू करतो आम्ही....
स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजीराजानी तानाजी मालुसरेंना दिली
जेव्हा तानाजीना ही जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते.
त्यांनी ती तयारी अर्धेवट सोडली आणि जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला.

आई भवानी चा आशीर्वाद घेऊन तयारी झाली
ते कोंढाण्याची लढाई जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले..........
मोहीम रात्रीतच पार पडणार होती
निघाले तानाजीराव मोहिमेला......
व्हय कोंढाण्याच्या.......⚔️
पहारा जागता ठेवा ...........⚔️
.
_*सकाळी उगवता तेजस्वी केशरी सूर्य आणि रात्रीचे मधीर चंद्र तारे साक्षी आहेत तुमच्या कार्याचे राजं...*_

*#शिवराय_असे_शक्तीदाता.. 🙏🏻🚩*
_*रस्ता चुकलेल्या व्यक्तीला आयुष्याच्या योग्य वाटेवर आणणार व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज...*_

*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
_*मावळत्या सुर्याकडून काही तरी शिकावे, मावळत असतानाही नव्या सामर्थ्याने जगावे...*_

*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
2024/09/29 05:16:56
Back to Top
HTML Embed Code: