Telegram Web Link
Forwarded from TARGET MPSC (MH)
*📚 #Polity Special(27/10/2018)*📚
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*◆भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया◆*

• दिनांक 26/10/2018 च्या लेखाचा
पुढील भाग.

◆ उद्दिष्टांचा ठराव :-

◆ पंडित नेहरू यांनी १३ डिसेंबर १९४६
रोजी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव
मांडला. २२ जानेवारी १९४७ रोजी हा
ठराव घटना समितीने एकमताने मंजूर
केला. या ठरावाने घटना समितीला
दिशा देण्याचे आणि तिचे तत्त्वज्ञान
स्पष्ट करण्याचे कार्य केले.

● त्यातील काही तरतुदी पुढीलप्रमाणे
आहेत:-

◆ भारत हे एक सार्वभौम, प्रजासत्ताक
गणराज्य असेल.
◆ सत्तेचे उगमस्थान – भारतीय जनता
आहे.
◆ सर्व लोकांना न्याय, स्वातंत्र्य, समता
इ.ची हमी व संरक्षण दिले जाईल.
◆ अल्पसंख्याक, मागास आदिवासी,
वंचित व मागासवर्ग यांच्यासाठी
संरक्षक तरतुदी असतील.
◆ राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाईल.

*◆ राज्यघटना कामकाज समित्या ◆*

◆ घटना समितीने एकूण २२ समित्या
स्थापन केल्या होत्या. त्यातील १२
समित्या या विशेष कामकाजासाठी
होत्या तर १० समित्या या
कार्यपद्धतीशी निगडित होत्या.

◆ विशेष कामकाजासंबंधीच्या काही
महत्त्वाच्या समित्या पुढीलप्रमाणे
होत्या.

◆ मसुदा समिती (अध्यक्ष- डॉ.
बाबासाहेब आंबडेकर)

◆ मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक
समिती (अध्यक्ष- सरदार वल्लभभाई
पटेल)

◆ घटकराज्यांबरोबर बोलणी करणारी
समिती (अध्यक्ष- डॉ. राजेंद्रप्रसाद)

◆ केंद्र राज्यघटना समिती (अध्यक्ष- पं.
नेहरू)

◆ मसुद्याची चिकित्सा करणारी समिती
(अध्यक्ष –आल्लादी कृष्णस्वामी
अय्यर)

*◆भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्टय़े◆*

◆ भारताची राज्यघटना तयार करताना
घटनाकारांनी प्रत्येक निर्णय अत्यंत
काळजीपूर्वक, परिश्रमपूर्वक घेतल्याचे
आपल्याला दिसते. भारतीय
राज्यघटेनवर पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व
व्यवहाराचा प्रभाव पडल्याचे दिसते
आणि स्वातंत्र्यलढय़ातून आकारास
आलेल्या भारतीय परिस्थितीचे
अपत्यदेखील मानले जाते. त्यामुळे
भारतीय राज्यघटनेला विशेष स्वरूप
प्राप्त झालेले आहे. तिची काही ठळक
वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे आहेत-

◆1) लिखित व जगातील सर्वात मोठी
राज्यघटना

◆ जगातील कोणत्याही देशाच्या
राज्यघटनेपेक्षा भारताची राज्यघटना
मोठी आहे. सुरुवातीला राज्यघटनेत
२२ प्रकरणे, ३९५ कलमे आणि ८
परिशिष्टे होती. आज भारतीय
राज्यघटनेत २४ प्रकरणे, ४४८ कलमे
आणि १२ परिशिष्टे आहेत.

◆2) ताठरता व लवचीकता यांचा
समन्वय:-

◆ भारताची राज्यघटना अंशत: ताठर
आणि अंशत: लवचीक आहे.हे
आपल्याला घटनादुरुस्ती प्रक्रियेवरून
समजते, घटनादुरुस्तीची प्रक्रिया ही
सर्वसामान्य बाबीसाठी पुरेशी लवचीक
आणि महत्त्वाच्या बाबीसाठी पुरेशी
ताठर आहे. त्याचा योग्य मेळ भारतीय
राज्यघटनेत घालण्यात आला आहे.

◆3) लोककल्याणकारी राज्य :-

◆ भारतीय राज्यघटनेने
लोककल्याणकारी राज्याचा पुरस्कार
केला आहे. राज्यघटनेतील मार्गदर्शक
धोरणांचा उद्देश व्यक्तीचा सर्वागीण
विकास साध्य करून कल्याणकारी
राज्य निर्माण करणे हा होय. धर्म, जात,
वंश, प्रदेश असा कोणताही भेदभाव
लोककल्याणाच्या बाबतीत न करता
प्रत्येक व्यक्तीचा राजकीय, सामाजिक,
आíथक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास
साध्य करण्याची जबाबदारी शासनाची
आहे.

◆4) मूलभूत हक्क

◆ भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण
तीनमध्ये मूलभूत हक्कांचा विस्ताराने
समावेश केलेला आहे. राज्य घटनेतील
१२ ते ३५ ही कलमे नागरिकांचे मूलभूत
हक्क स्पष्ट करतात. मूलभूत हक्कांचे
स्वरूप न्यायिक झाले आहे.

◆5) संसदीय शासनपद्धती
https://www.tg-me.com/targetmpscmh
◆ भारताने इंग्लंडपासून संसदीय
शासनपद्धतीचा स्वीकार केलेला आहे.
देशाच्या राज्यकारभारात संसद
(राष्ट्रपती+लोकसभा+राज्यसभा) ही
केंद्रस्थानी आहे. संसद ही
शासनपद्धतीची दिशा निश्चित करते.
भारतात पंतप्रधान आपल्या
मंत्रिमंडळासह लोकसभेला जबाबदार
आहे. अधिक माहितीसाठी आमचे
टार्गेट एमपीएससी एमएच चॅनल
जॉईन करा.

◆ राष्ट्रपतींच्या नावे सर्व कारभार चालत
असला तरी राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या
सल्ल्यानुसारच वागावे लागते. या
पद्धतीत पंतप्रधान हे वास्तविक प्रमुख
असतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  21/11/2021  ■
                        वार :-  रविवार 
         
          ■    दिनविशेष : 21 नोव्हेंबर     ■

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                  ■   जागतिक दिवस   ■

             ●  जागतिक टेलीव्हिजन दिन  ●
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■


● १८७७: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.

● १९११: संसदेच्या निवडणुकीत  उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.

● १९४२: राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

● १९५५: संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.

● १९६२: भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.

● १९६२: भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्‍या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.

● १९७१: भारीतय वायुदलाची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धातील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.

● १९७२: दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.
https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                 ■   जन्म/वाढदिवस   ■


● १६९४: फ्रेंच तत्त्वज्ञानी व्हॉल्तेर यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १७७८)

● १८९९: ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्णा महाबत यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८७)

● १९१०: चीनी भाषेतील लेखक छ्यान चोंग्शू यांचा जन्म.

● १९२६: हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेम नाथ यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९२)

● १९२७: नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर २०१३)

● १९८७: भारतीय बुद्धीबळपटू ईशा करवडे यांचा जन्म.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■


● १९०८: देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना अलीपूर कारागृहात फाशी.

● १९६३: प्रसिद्ध विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८९२)

● १९७०: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण (सी. व्ही. रमण) यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८)

● १९९६: भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९२६ – संतोकदास, साहिवाल, पंजाब, पाकिस्तान)

● १९९७: आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.

● २०१५: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फहीम यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९३९)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (21/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 आणि चंद्राभोवती फिरणाऱ्या चांद्रयान २ ची टक्कर टळली

◆ इस्त्रोचे चांद्रयान २ हा उपग्रह ऑगस्ट २०१९ पासून सुमारे १०० किलोमीटर उंचीवरुन चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे.

◆ चांद्रयान २ वर असलेल्या विविध उपकरणांच्या माध्यमातून चंद्राबद्दलची विविध माहिती ही गोळा केली जात आहे.

◆ तर नासाचा Lunar Reconnaissance Orbiter (LRO) हा उपग्रह जून २००९ पासून चंद्राभोवती २० किलोमीटर ते १८०० किलोमीटर अशा लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत चंद्राचा अभ्यास करत आहे.

◆ हे दोन्ही उपग्रह चंद्राच्या उत्तर ध्रुवावरुन जात असतात. मात्र या दोन्ही उपग्रहांची टक्कर होणार होती.

◆ चंद्राभोवती फिरणाऱ्या नासाच्या आणि इस्त्रोच्या या उपग्रहांची टक्कर ही २० ऑक्टोबरला भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ११ वाजुन १५ मिनीटांनी होणार होती. यावेळी या दोन्ही उपग्रहांच्या कक्षेमध्ये १०० मीटरपेक्षा कमी अंतर असणार होते.

◆ या उपग्रहांचा आकार आणि सोलर पॅनेलचा विस्तार बघता ही टक्कर अटळ होती. अर्थात नासा आणि इस्त्रो या अवकाश संस्थांना हा संभाव्य धोका काही दिवस आधीच लक्षात आला. जॉइन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ दोन्ही संस्थांनी चर्चा केल्यावर इस्त्रोने चांद्रयान २ ची कक्षा बदलण्याचा निर्णय घेतला. तेव्हा १८ ऑक्टोबरला म्हणजे संभाव्य टक्कर होण्याच्या दोन दिवस आधीच इस्त्रोने चांद्रयान २ च्या कक्षेत बदल केला आणि चंद्राच्या भोवती उपग्रहांची होणारी टक्कर ही टाळण्यात आली.

◆ पृथ्वीभोवती काही हजार उपग्रह हे फिरत आहेत. तेव्हा उपग्रहांवर सातत्याने नजर ठेवावीच लागते. अनेकदा दोन उपग्रहांमध्ये टक्कर होऊ नयेत म्हणून उपग्रहांच्या कक्षेत बदल केला जातो. मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारे उपग्रहाच्या कक्षेत तेही चंद्राभोवती फिरणाऱ्या उपग्रहाबाबत बदल करण्याची वेळ इस्त्रोवर आली.

◆ चांद्रयान २ हे आजही सुस्थितीत काम करत असून आणखी पाच वर्षे कार्यरत राहील अशी आशा आहे. चांद्रयान २ मोहिमेत चंद्रावर लँडर आणि रोव्हर अलगद उतरवण्यात इस्त्रोला अपयश आलं होतं.

◆ आता चांद्रयान ३ मोहिमेच्या माध्यमातून पुढील दोन वर्षात चंद्रावर लँडर आणि रोव्हर उतरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तेव्हा चांद्रयान ३ च्या मोहिमेत लँडर आणि रोव्हर हे नेमक्या कोणत्या जागी उतरायचे याबाबत छायाचित्रांच्या माध्यमातून चांद्रयान २ हा उपग्रह एक प्रकारे मदत करणार आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (21/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 व्यक्तिवेध : संजीब बॅनर्जी

◆ उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या बदल्या ही तशी नित्याची बाब. विशेषत: मुख्य न्यायाधीशपदी पोहोचल्यानंतर त्या उच्च न्यायालयातून दुसऱ्या राज्यात अथवा थेट सर्वोच्च न्यायालयात बदली होणार, हे ठरलेलेच.

◆ परंतु संजीब बॅनर्जी यांची बदली याला अपवाद ठरली. चेन्नई येथील ‘मद्रास उच्च न्यायालया’च्या मुख्य न्यायाधीशपदी यंदाच्या चार जानेवारीपासून रुजू झालेल्या न्या. बॅनर्जीची बदली आता, शिलाँगस्थित ‘मेघालय उच्च न्यायालया’चे मुख्य न्यायमूर्ती म्हणून झाली आहे.

◆ या बदलीच्या निमित्ताने न्या बॅनर्जी यांच्या धवल कारकीर्दीची, त्यांच्या निर्भीडपणाची आणि त्यांच्या कार्यक्षमतेविषयीची चर्चा अधिक उजळली हे विशेष! ३५० हून अधिक वकिलांनी तर जाहीर पत्र लिहून या बदलीला विरोध केलाच; परंतु ‘कॅम्पेन फॉर ज्युडिशिअल अकाउंटेबिलिटी अ‍ॅण्ड ज्युडिशिअल रिफॉम्र्स’ (सीजेएआर) या संस्थेनेही पत्रक काढून, ही बदली विनाकारण असून तिचा फेरविचार होणे उचित, असे म्हटले.

◆ वकिलांच्या पत्रामध्ये, निर्भीडपणे प्रसंगी सत्ताधाऱ्यांना गैरसोयीचे निर्णय देणारे न्या. बॅनर्जी यांची ही बदली म्हणजे ‘शिक्षा देण्याचा प्रकार’ असल्याची शंका व्यक्त करण्यात आलेली आहे.

◆ १९६१ मध्ये जन्मलेल्या न्या. बॅनर्जी यांचे शालेय शिक्षण दार्जीलिंग येथे, तर उच्चशिक्षण कोलकात्यात झाले आणि तेथील उच्च न्यायालयात १९९० पासून ते स्वतंत्रपणे वकिली करू लागले.

◆ १६ वर्षांत, २००६ मध्ये ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी आले आणि त्यापुढील १५ वर्षांत- २०२१ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही झाले.

◆ न्यायदानातील त्यांची गुणवत्ता ही राज्यघटनेचा आत्मा नेमका जाणणारी आहे, याचे एक उदाहरण तमिळनाडू राज्य मंदिर न्यासाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पदग्रहण करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मंदिरात पूजा केली पाहिजे ही मागणी करणाऱ्या याचिकेवरील ‘पूजा ही बाब व्यक्तिगत, ऐच्छिक’ या निवाडय़ातही दिसले.

◆ ‘करोनाकाळात प्रचार सुरूच राहू दिल्याबद्दल निवडणूक आयोग व उच्चपदस्थांवर हत्येचे गुन्हे का दाखल करू नयेत’ असे म्हणण्याची हिंमत त्यांनी दाखवली होती आणि बदली-आदेश निघाल्यावर महत्त्वाचा खटला न घेण्याचा विनयदेखील त्यांनी पाळला!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (21/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 तिमाही विकास दर ७.९ टक्के ; ‘इक्रा’चा सुधारित अंदाजासह आशावाद

◆ मुंबई : सरकारने भांडवली खर्चात मोठय़ा प्रमाणावर वाढ केल्याचे अर्थव्यवस्थेवर सुपरिणाम दिसण्याची आशा आहे.

◆ परिणामी पतमानांकन संस्था ‘इक्रा’ने भारताच्या आर्थिक विकास दराच्या अंदाजात सुधारणा केली आहे.

◆ आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर ७.९ टक्कय़ांवर जाईल, असा ‘इक्रा’ने सुधारित अंदाज व्यक्त केला आहे.

◆ याआधी जुलै-सप्टेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्था ७.७ टक्के दराने प्रगती करेल, असे तिचे अनुमान होते.

◆ करोना रुग्णसंख्येत घट, लसीकरणाने पकडलेला वेग आणि मोठय़ा प्रमाणावर होत आलेल्या आर्थिक सुधारणांमुळे उद्योगांची चाके वेगाने फिरू लागली आहेत.

◆ वाढलेल्या लसीकरणामुळे सर्वच क्षेत्रातील आत्मविश्वास वाढला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी भांडवली खर्चात केलेली वाढ, वस्तू आणि सेवांच्या निर्यातीमध्ये झालेली वाढ आणि कृषी क्षेत्राकडून देखील मागणीत सतत वाढ होत असल्याने सरलेल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या विस्तारासाठी पूरक वातावरण निर्माण झाले, असे मत ‘इक्रा’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी व्यक्त केले.

◆ चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या परिस्थितीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत परिस्थितीत अधिक सुधारणा झाली असल्याचे निरीक्षण नायर यांनी नोंदविले.

◆ केंद्र सरकारच्या व्याजेतर महसुली खर्चात चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्या तुलनेत पहिल्या तिमाहीत हा खर्च ७.३ टक्क्यांनी आक्रसला होता.

◆ उपलब्ध माहितीनुसार, देशातील २२ राज्य सरकारांनी आर्थिक वर्ष २०२२च्या दुसऱ्या तिमाहीत महसुली खर्च १३.१ टक्कय़ांनी वाढविला आहे.

◆ या तिमाहीत, उद्योग-सेवा आणि कृषी-वनीकरण आणि मासेमारी क्षेत्रातील वाढीचा दर अनुक्रमे ८.५ टक्के, ७.९ टक्के आणि ३ टक्के राहण्याचा आशावादी अंदाज ‘इक्रा’ने वर्तविला आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰 Job Updates (21/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 (BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये 391 जागांसाठी भरती
👉🏻http://bit.ly/MNBOBANK


🟣 (NSRY) नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 173 जागांसाठी भरती
👉🏻http://bit.ly/NavalShipRepairYard


🔵 (AFMS) सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 200 जागांसाठी भरती
👉🏻http://bit.ly/MNAFMS


⭕️ Hall Ticket
» IBPS मार्फत ‘PO/MT’ भरती पूर्व परीक्षा प्रवेशपत्र (CRP- PO/MT-XI)
» ICAI CA प्रवेशपत्र
👉🏻http://bit.ly/MNHallTicket
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Forwarded from TARGET MPSC (MH)
*📚 #Polity Special (28/10/2018)*📚
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*◆भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया◆*

दिनांक 27/10/2018 च्या लेखाचा पुढील भाग.

◆ संघराज्य शासनपद्धती

◆ भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार
केला आहे. संपूर्ण देशासाठी केंद्र
सरकार असून प्रत्येक घटक राज्यांसाठी
स्वतंत्र सरकार आहे. राज्यघटनेच्या
सातव्या परिशिष्टात केंद्र व घटकराज्य
यांच्यातील अधिकार विभागणी केली
आहे. त्यांच्यातील वाद निष्पक्षपणे
सोडविता यावेत, म्हणून स्वतंत्र
न्यायव्यवस्था निर्माण केली आहे. केंद्र
व राज्य सरकारमधील सत्तासंबंध
पाहिल्यावर आपणाला केंद्र सरकार
घटक राज्यापेक्षा प्रबळ झालेले दिसते,
म्हणून काही विचारवंतांच्या मते,
भारताला पूर्ण संघराज्य न म्हणता
आभासात्मक संघराज्य म्हणतात.

◆6) प्रौढ मताधिकार

◆ भारतीय घटनेने भारतीय नागरिकांमध्ये
धर्म, वंश, जात, लिंग असा कोणताही
भेदभाव न करता सर्वाना सार्वत्रिक प्रौढ
मताधिकार दिलेला आहे. सुरुवातीला
२१ वष्रे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक
नागरिकाला हा अधिकार प्राप्त झाला
होता. परंतु १९८९ साली झालेल्या
६१व्या घटनादुरुस्तीने १८ वष्रे पूर्ण
करणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकांना
सरसकट मतदानाचा अधिकार दिलेला
आहे.
https://www.tg-me.com/targetmpscmh
◆7) स्वतंत्र्य न्यायव्यवस्था

◆ भारताच्या राज्यघटनेने स्वतंत्र
न्यायमंडळाचा पुरस्कार केला आहे.
न्यायमंडळावर दडपण येऊ नये, म्हणून
न्यायाधीशाचे निवृत्ती वय, त्याचा
कार्यकाळ घटनेने निश्चित केला आहे.
विविध प्रकारचे वाद मिटविण्यासाठी
कोणत्याही दबावापासून मुक्त असणारी
न्यायव्यवस्था निर्माण केली आहे.
सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष
लोकशाही गणराज्य भारतीय
राज्यघटनेतील उद्देशपत्रिकेनेच राज्याचे
स्वरूप स्पष्ट केले आहे. राज्यातील
अंतिम सत्ता भारतीय लोकांच्या हाती
आहे आणि भारतीय राज्यव्यवस्था
परकीय नियंत्रणापासून मुक्त असल्याचे
उद्देशपत्रिकेतून स्पष्ट होते. तेथेच
समाजवादी व धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख
दिसून येतो. देशातील सर्वोच्च अधिकार
लोकांच्या हाती असल्याने भारत हा
प्रजासत्ताक आहे आणि देशाचे प्रमुख
राष्ट्रपती असून ते विशिष्ट काळासाठी
निवडलेले लोकप्रतिनिधी आहेत.
त्यामुळे भारत हा देश गणराज्य आहे,
असे म्हणता येते.

◆8) एकेरी नागरिकत्व:-

◆ भारत हे संघराज्य असूनही भारतीय
राज्यघटनेने एकेरी नागरिकत्वाचा
स्वीकार केलेला आहे. भारतीय
राज्यघटनेचे हे एक वेगळे वैशिष्टय़
मानले जाते.

◆9) अल्पसंख्याकांना संरक्षण:-

◆ मागासलेल्या जाती, जमाती व
अल्पसंख्याक यांच्या विकासासाठी
राज्यघटनेत काही तरतुदी आहेत.
त्यांच्या विकासाची जबाबदारी राज्याची
आहे. केंद्र व राज्य कायदेमंडळात
अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव
जागा ठेवल्या आहेत. त्याचबरोबर
अल्पसंख्याकांना आपली भाषा, लिपी,
संस्कृती जतन करण्याचा
हक्क राज्यघटनेने दिलेला आहे आणि
अशा हक्कांचे रक्षण करण्याची
जबाबदारी शासनव्यवस्थेवर टाकलेली
आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  24/11/2021  ■
                        वार :-  बुधवार 
         
          ■    दिनविशेष : 24 नोव्हेंबर     ■

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                  ■   जागतिक दिवस   ■

                     ●  उत्क्रांती दिन  ●
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■


● १४३४:  थेम्स नदी पूर्णपणे गोठली.

● १७५०: महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद.

● १८५९: चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द स्पिशिज प्रकाशित केला.

● १८६४: जळगाव नगरपालिकेची स्थापना.

● १९४४: दुसरे महायुद्ध – ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.

● १९६३: जॉन एफ. केनेडी यांचा खून करणाऱ्या ली. हार्वे ऑसवाल्ड याचा डॅलस पोलीस स्थानकात जॅक रुबी ने खून केला.

● १९६९: अपोलो-१२ चंद्रावर उतरले.

● १९७१: डी. बी. कुपर याने चोरलेल्या २ लाख अमेरिकन डॉलर सह नॉर्थवेस्ट ओरीएंट एरलाईन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु कुपारचा अद्याप शोध लागलेला नाही.

● १९७६: तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात ४ ते ५ हजार लोकांचे निधन.

● १९९२: कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर.

● १९९२: वैज्ञानिक संशोधनासाठीचा जी. डी. बिर्ला पुरस्कार हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर.

● १९९२: देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला कवी माधव पुरस्कार जाहीर.

● १९९६: इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर.

● १९९८: समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना प्रदान.

● २०००: भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.
https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                 ■   जन्म/वाढदिवस   ■


● १८०६: रग्बी फुटबॉलचे निर्माते विल्यम वेबल एलिस यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १८७२)

● १८७७: भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) कमिशनर कावसजी जमशेदजी पेटीगरा यांचा जन्म.

● १८९४: इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७८)

● १९१४: ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल २००३)

● १९३७: मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम यांचा जन्म.

● १९४१: भारतीय-इंग्लिश ड्रमर आणि गीतकार पेट बेस्ट यांचा जन्म.

● १९५५: इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथम यांचा जन्म.

● १९६१: बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■


● १६७५: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १६२१)

● १९१६: मॅक्सिम तोफेचे शोधक हिराम मॅक्सिम यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)

● १९४८: मदर्स डे च्या संस्थापिका अॅन्ना जर्व्हिस यांचे निधन. (जन्म: १ मे १८६४)

● १९६३: महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १९००)

● १९६३: राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी ली हार्वे ओस्वाल्ड यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९३९)

● २००३: अभिनेत्री टुनटुन यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९२३)

● २००४: जगप्रसिद्ध लेखक आर्थर हेली यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)

● २०१४: भारतीय राजकारणी मुरली देवरा यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १९३७)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (21/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा ‘लाल सलाम’; पहिल्या पुस्तकाची केली घोषणा

◆ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दंतेवाडामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यावर पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.

◆ स्मृती इराणी यांनी या पुस्तकाला ‘लाल सलाम’ असे नाव दिले आहे. स्मृती इराणी यांनी ट्विटरवर या पुस्तकाची घोषणा केली आहे.

◆ तसचे हे पुस्तक अॅमेझॉनवरून प्री-ऑर्डर केले जाऊ शकते, असं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलंय. स्मृती इराणी यांचे हे पुस्तक वेस्टलँड या प्रकाशन संस्थेने आणले आहे.

◆ स्मृती इराणी यांचे हे पुस्तक एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यापासून प्रेरित आहे. या हल्ल्यात ७६ जवान शहीद झाले होते.

◆ स्मृती इराणी म्हणाल्या की, “ही गोष्ट त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून सुरू होती. मग मी ही कथा कागदावर उतरवण्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष न करता लिहायला घेतली. मला आशा आहे की हे पुस्तक वाचणारे लोक पुस्तकाचा आनंद घेतील.”

◆ लाल सलाम हे पुस्तक विक्रम प्रताप सिंग नावाच्या तरुण अधिकाऱ्याच्या जीवनावर आहे. त्यात विक्रम प्रताप सिंग यांना राजकारण आणि भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या व्यवस्थेचा कसा सामना करावा लागतो हे सांगितले आहे.

◆ प्रकाशनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या पुस्तकाची माहिती देताना, नक्षलवादी आणि माओवादी बंडखोर भागात आव्हानांचा सामना करणाऱ्या अधिकाऱ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली आहे. हे पुस्तक २९ नोव्हेंबरपासून वाचकांना उपलब्ध होणार आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (24/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 घातक डासाला दूर ठेवणाऱ्या रेणूचा शास्त्रज्ञांकडून शोध

◆ पुणे : डेंग्यू, चिकुनगुनिया अशा रोगांसाठी आणि झिका विषाणूचा वाहक असलेल्या एडिस इजिप्ती या डासाच्या प्रौढ मादीला दूर ठेवणाऱ्या परिणामकारक रेणूचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.

◆ राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) शास्त्रज्ञांच्या गटाने या संदर्भातील संशोधन केले असून, त्याचा शोधनिबंध ‘एसीएस ओमेगा’ या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.

◆ करोनाच्या महासाथीच्या काळात देशातील अनेक राज्यांमध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका विषाणूच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे निदर्शनास आले.

◆ करोनाच्या रुग्णांमध्ये आधीच ताण असलेल्या आरोग्य व्यवस्थेवर अधिक ताण निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर जम्मू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन या संस्थेचे संचालक डॉ. डी.एस. रेड्डी यांच्या नेतृत्त्वाखाली एनसीएलच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात एडिस इजिप्ती या डासाच्या प्रौढ मादीला दूर ठेवण्यात परिणामकारक ठरणारे संशोधन शास्त्रज्ञांनी केले.

◆ संशोधकांच्या गटात अक्षय कुलकर्णी, रेम्या रमेश, सफल वालिया, शाहबाझ सय्यद, गणेश गठालकर, सीतारामसिंग बालामकुंडू, मनाली जोशी, अवलोकितेश्वर सेन, डी. श्रीनिवास रेड्डी यांचा समावेश आहे.

◆ डीट स्कॅफोल्डवर आधारित संयुगांच्या संग्रहाची निर्मिती करण्यासाठी या संशोधक गटाने सिलिकॉन स्वीच पद्धतीचा उपयोग केला. संश्लेषित केलेल्या २५ संयुगांतील एका रेणूने अधिक काळ परिणामकारकता दाखवली.

◆ सिलिकॉनच्या समावेशामुळे परिणामकारकतेमध्ये वाढ झाल्याची माहिती एनसीएलकडून देण्यात आली.

★ व्यावसायिकीकरणाचा प्रयत्न

◆ दीर्घकालीन सुरक्षिततेच्या दृष्टीने शोधलेल्या रेणूचा अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. प्रतिबंधक रेणू बाजारात आणण्यासाठी व्यावसायिकीकरणाच्या दृष्टीने काही कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याचे एनसीएलकडून सांगण्यात आले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (24/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 रेझांग ला येथील युद्ध स्मारकाचे नूतनीकरण

◆ नूतनीकरण केलेल्या युद्ध स्मारकाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

◆ नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पूर्व लडाखच्या रेझांग ला येथे नूतनीकरण केलेल्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले. याच ठिकाणी १९६२ मध्ये भारतीय जवानांनी चिनी सैन्याशी शौर्याने मुकाबला केला होता.  

◆ हे युद्ध स्मारक १३ कुमाऊँ रेजिमेंटच्या शूर भारतीय सैनिकांना समर्पित आहे, ज्यांनी रेझांग लाच्या युद्धात चीनचा पराभव करताना आपल्या प्राणांची आहुती दिली.

◆ हे स्मारक म्हणजे भारतीय सैन्याने दाखविलेल्या दृढनिश्चयाचे आणि अतीव धैर्याचे उदाहरण आहे, अशा शब्दांत सिंह यांनी स्मारकाचे वर्णन केले.

◆ ‘केवळ इतिहासाच्या पानांमध्ये अमर नाही, तर आपल्या हृदयातही कयम अमर राहील,’ असेही संरक्षणमंत्री म्हणाले.

◆ ‘१८ हजार फूट उंचीवर लढलेल्या रेझांग लाच्या ऐतिहासिक युद्धाची आजही कल्पना करणे कठीण आहे.

◆ जगातील दहा सर्वात मोठय़ा आणि अतिशय आव्हानात्मक लष्करी संघर्षांपैकी एक रेझांग लाची लढाई मानली जाते.

◆ मेजर शैतान सिंग आणि त्यांचे सहकारी सैनिक ‘शेवटची गोळी आणि शेवटच्या श्वासापर्यंत’ लढले आणि शौर्य आणि बलिदानाचा नवा अध्याय लिहिला’, असे गौरवोद्गार सिंह यांनी काढले.

◆ १९६२ च्या युद्धात लडाखच्या सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना आपण श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे ट्वीट संरक्षणमंत्र्यांनी केले.

◆ रेझांग लाच्या लढाईच्या ५९ व्या वर्धापनदिनानिमित्त युद्ध स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्व लडाख सेक्टरमध्ये असलेले रेझांग ला युद्ध स्मारक पूर्वी छोटे होते.

◆ आता ते खूप मोठे करण्यात आले आहे. लडाखच्या पर्यटन नकाशावरही ते आणले जाईल.

◆ आता सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकही या युद्ध स्मारकाला आणि सीमावर्ती भागाला भेट देऊ शकतील.
भारत आणि चीन यांच्यातील कडाक्याच्या सीमेवर बंदिस्त असताना हे नूतनीकरण केलेले युद्ध स्मारक उघडण्यात आले आहे.

★ दोन्ही बाजूला सैनिक तैनात

◆ मागील वर्षी ५ मे रोजी पॅंगॉन्ग सरोवर भागात झालेल्या हिंसक चकमकीनंतर पूर्व लडाख सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान संघर्ष सुरू झाला आणि दोन्ही बाजूंनी तैनात वाढवण्यात आली. या संवेदनशील क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एसएसी) दोन्ही बाजूला सध्या मोठय़ा प्रमाणात सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (24/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 फुटबॉल समालोचक कपाडिया यांचे निधन

◆ नवी दिल्ली : ‘भारतीय फुटबॉलचा आवाज’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ क्रीडा समालोचक, पत्रकार आणि दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक नोव्ही कपाडिया यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झाल़े ते ६७ वर्षांचे होते.

◆ कपाडिया हे गेली काही वर्षे मज्जाससंस्थेशी संबंधित विकाराने आजारी होते. त्यामुळे गेली दोन वर्षे ते व्हिलचेअर वापरायचे. गेल्या महिन्याभरापासून ते कृत्रिम श्वसनयंत्रणेवर होते.

◆ काही महिन्यांपूर्वी कपाडिया यांच्या निवृत्तिवेतनाच्या समस्येमुळे माजी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना चार लाख रुपयांची मदत केली होती.

◆ कपाडिया यांनी ‘बेअरफूट टू बूट्स, दी मेनी लिव्हज ऑफ इंडियन फुटबॉल’ यांच्यासारख्या फुटबॉलवरील अनेक पुस्तकांचे लेखन केले आह़े २०१४ मध्ये त्यांचे ‘दी फुटबॉल फॅनॅटिक्स इसेन्शियल गाइड बुक’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते.

◆ फुटबॉलशिवाय कपाडिया यांनी आशियाई, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचे समालोचन केले होते. याशिवाय त्यांनी नऊ ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धाचे वृत्तांकन केल़े याशिवाय, एसजीटीबी खालसा महाविद्यालयात कपाडिया हे प्राध्यापक होत़े २००३ ते २०१० या कालखंडात त्यांनी दिल्ली विद्यापीठाचे प्रतिष्ठेचे पदही भूषवले होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Forwarded from TARGET MPSC (MH)
*📚 #Polity Special (29/10/2018)*📚
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*●◆भारतीय राज्यघटनेची निर्मिती◆●*

१.१. १ भारतातील घटनात्मक विकास :
ब्रिटिश राजवटीचा वारसा  

◆ स्वतंत्र भारताची राज्यघटना २६
जानेवारी १९५० पासून अमलात
आली. त्या दिवशी भारताने लोकशाही
प्रजासत्ताक शासनपद्धतीचा स्वीकार
करून एका नव्या युगात प्रवेश केला.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला
स्वतंत्र मिळाले.

◆ भारतीय राज्यघटना म्हणजे केवळ
शासनाची रचना ठरविणाऱ्या नियमांचा
संच नव्हे ही राज्यघटना म्हणजे
लोकशाहीच्या मार्गाने, भारतासारख्या
खंडप्राय आणि जगातील दुसऱ्या
क्रमांकाची मोठी लोकसंख्या
असलेल्या, भाषिक, सांस्कृतिक,
धार्मिक, वांशिक, विविधता असलेल्या
देशात राष्ट्रीय ऐक्य बळकट
करण्याबरोबर सामाजिक व आर्थिक
क्रांती घडवून आणण्याचा केलेला
प्रयत्न आहे. यामुळे ग्रॅनव्हील ऑस्टिन
या अभ्यासकाने तिचे वर्णन [ राष्ट्रीय
आधारशीला ] असे केले आहे.

◆ सतराव्या शतकाच्या प्रारंभी ब्रिटिशांचे
भारतात आगमन झाले. भारतात
व्यापार करण्याच्या उद्देशाने ' ईस्ट
इंडिया कंपनी ' ची स्थापना झाली.
१७५७ च्या प्लासीच्या लढाईत ब्रिटिश
सत्तेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि
पुढच्या शंभर वर्षात संपूर्ण देशावर
ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली.

◆ १७७३ साली रेग्युलेटीग ऍक्ट नावाचा
पहिला कायदा अस्तित्वात आला.
१८५७ च्या उठावानंतर ब्रिटिशाना याची
जाणीव झाली की भारतासारख्या
खन्डप्राय देशात असा एकतंत्री
कारभार चालविणे योग्य ठरणार नाही.
त्यासाठी त्यांनी १८३३ आणि १८६१
च्या कायद्यात प्रांताना काही अधिकार
देण्यात आले.
https://www.tg-me.com/targetmpscmh
◆राष्ट्रीय चळवळीचा उदय◆

◆ भारतीय लोकांमध्ये विशेषतः देशातील
नवसुशिक्षित वर्गामध्ये राष्ट्रीयत्वाची
जाणीव निर्माण झाली. त्याचीच
परिणीती म्हणजे १८८५ साली झालेली
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होय.

◆ १८९२ साली ' इंडियन कौन्सिल ऍक्ट '
अमलात आला, या कायद्याने
विधिमंडळाना जादा अधिकार देण्यात
आले.

◆ विसाव्या शतकात प्रारंभापासून
ब्रिटिशराजवटी विरुद्ध भारतीयांचा
असंतोष वाढत गेला,
काँग्रेसमधील नेमस्त मतवाद मागे पडून
जहाल मतवाद प्रभावी बनू लागला.
याच काळात १९०६ साली मुस्लिम
लीगची स्थापना झाली.

◆ देशातील असंतोष शमविण्याच्या
उद्देशाने १९०९ साली मोर्ले मिंटो
सुधारणा कायदा अमलात आणला
गेला.

◆ १९१४ साली पहिले महायुद्ध झाले
आणि जालियनवाला बाग हत्याकांड,
खिलाफत चळवळ, ह्या घटना याच
काळात घटल्या. या पार्श्वभूमीवर
भारतीयांना काही राजकीय अधिकार
देण्याची निकड निर्माण झाली. त्यातून
सन १९१९ चा मॉन्टेग्यु चेम्सफर्ड
कायदा अमलात आला.

●भारतीय घटनात्मक विकासावर ब्रिटिश राजवटीचा झालेला परिणाम●

◆ १९५० साली  राज्यघटना अमलात
आली, या राज्यघटनेवर ब्रिटिश
राजवटीचे बरेच परिणाम झाले.

◆ प्रादेशिक एकीकरण - ब्रिटिशांनी एक
एक करत ही राज्ये जिंकून घेतली
आणि देशाचे पादेशिक एकीकरण घडून
आणले.

◆ प्रशासकीय एकीकरण - ब्रिटिश सत्ता
भारतात प्रस्थापित झाल्यांनंतर
भारताचे प्रशासकीय एकीकरण घडून
आले.

◆ कायदेमंडळाची निर्मिती - ब्रिटिश
राजवटीत भारतात कायदेमंडळाची
निर्मिती झाली.

◆ संघराज्य व्यवस्थेचा पाया - भारतीय
राज्यघटनेची संघसूची, राज्यसूची,
आणि सामाईक सूची अशा विषयांच्या
याद्या देऊन जी अधिकार विभागणी
केलेली आहे, ती १९३५ च्या
कायद्यावरच आधारलेली आहे.

◆ न्यायव्यवस्था - भारतीय राज्यघटनेने
प्रस्थापित केलेली न्यायव्यवस्था ही
ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या
न्यायव्यवस्थेवरच आधारलेली आहे.

◆ कायद्याची अधिसत्ता - ब्रिटिश
राजवटीपूर्वी भारतात वेगवेगळ्या
राज्यांचे कायदे होते, कायद्याचे
अधिसत्ता हे ब्रिटिश राज्यघटनेचे जसे
मुलतत्व आहे तसेच भारतीय
राज्यघटनेचे ते ठळक असे मुलतत्व
आहे.

◆ संसदीय लोकशाही - भारतात १९१९
साली ब्रिटिशांनी कॉन्सिल ऑफ ऍक्ट
या नावाने केंद्रीय तसेच प्रांतिक
कायदेमंडळात लोकप्रतिनिधींची संख्या
वाढविली आणि कायदेमंडळात
सरकारी प्रतिनिधीपेक्षा संख्या जास्त
बनली.

◆ स्थानिक स्वराज्य संस्था - लॉर्ड मेयो व
लॉर्ड रिपन इत्यादींच्या पुढाकाराने
भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांना
प्रारंभ झाला.

१.१.२ घटनापरिषदेची निर्मिती व
कार्ये उद्याच्या लेखात पाहू..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
#joke_of_the_day

थडीमध्ये दुकानात आईस्क्रीम
मागितल्यावर

बाजूला उभे असणारे लोक,
.
.
.
असे बघतात जसं काही
गांजा मागितला आहे.😜😝😉
---------------------------------------
हेतू:- हसत खेळत अभ्यास..
आपल्याकडील Jokes,Study Material @sudhirt_007 वर पाठवा.
2024/12/23 13:45:21
Back to Top
HTML Embed Code: