Telegram Web Link
🔰चालू घडामोडी (16/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात भारताला जागतिक गुंतवणूकदारांची पसंती

◆ ‘आरईसीएआय’ निर्देशांकात तिसऱ्या स्थानावर झेप

◆ मुंबई : जागतिक हवामान बदल आणि वाढत असलेल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने अक्षय्य ऊर्जानिर्मितीला प्राधान्य दिले असून, या क्षेत्रात खासगी उद्योजकांचा पुढाकारही मोठा आहे. तर हरित ऊर्जेच्या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा पसंतीचा देश म्हणून भारताने स्थान मिळविले आहे.

◆ जागतिक सल्लागार संस्था ‘ईवाय’द्वारे ‘रिन्यूएबल एनर्जी कण्ट्री अट्रॅक्टिव्हनेस इंडेक्स’ (आरईसीएआय) निकषांवर करण्यात क्रमवारीच्या ५८व्या आवृत्तीत जागतिक तुलनेत भारत अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला.

◆ अक्षय्य ऊर्जा गुंतवणुकीच्या आणि उपयोजन संधींच्या आकर्षणावर आधारित जगातील आघाडीच्या ४० देशांना यामध्ये स्थान देण्यात येते.

◆ यामध्ये अमेरिका आणि चीन अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

◆ भारतातील अक्षय्य ऊर्जा बाजाराची स्थिती, सर्वसमावेशक धोरणात्मक निर्णय, गुंतवणूक आणि आत्मनिर्भर भारतसारख्या योजनांमुळे स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात देशाला एका उंचीवर घेऊन जाईल, असे ‘ईवाय’ने अहवालात म्हटले आहे.

◆ भारताने २०२२ पर्यंत १७५ गिगावॉट अक्षय्य ऊर्जा क्षमता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट आखले आहे.

◆ २०३० पर्यंत या उद्दिष्टाची व्याप्ती ४३० गिगावॉटपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे.

◆ त्याचप्रमाणे विद्युत शक्तीवरील वाहनांचा वापर वाढावा, ऊर्जा साठवण मोठय़ा प्रमाणात व्हावी, उत्तम ग्रिड्स तयार व्हावेत आणि इतर आधुनिक ऊर्जा तंत्रज्ञान विकसित व्हावे इत्यादींसाठी धोरणात्मक पावले उचलली जात आहेत.

◆ गेल्या सहा वर्षांत, भारताची अक्षय्य ऊर्जानिर्मिती क्षमता अडीच टक्क्यांनी वाढली आहे. टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ देशाच्या एकूण ऊर्जा क्षमतेपैकी बिगर-जीवाश्म ऊर्जा क्षमता १३६ गिगावॉट म्हणजेच ३६ टक्के इतकी झाली आहे. २०२२ पर्यंत हे प्रमाण २२० गिगावॉटपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. 

★ सहा वर्षांत ४.७ लाख कोटींची गुंतवणूक

◆ गेल्या सहा वर्षांत अक्षय्य ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रात ४.७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.

◆ अलीकडे टाटा मोटर्सच्या विद्युत वाहनांच्या व्यवसायातील ‘टीपीजी’ची गुंतवणूक त्याचप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीज व अदानी समूहाच्या या क्षेत्रातील वाढत्या हालचाली याचेच द्योतक आहेत. देशाच्या या क्षेत्रातील योजनांनुसार, २०३० पर्यंत दरवर्षी एक लाख कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणूक संधी उपलब्ध होऊ शकतात.

◆ अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारताची धोरणे अत्यंत उदार आणि लवचीक आहेत. यात परदेशी कंपन्या एकेकटय़ा वा भारतीय भागीदारांसह संयुक्तपणेही गुंतवणूक करू शकतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  17/10/2021  ■
                        वार :-  रविवार 
         
          ■    दिनविशेष : 17 ऑक्टोबर     ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

◆ १९९८ : आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्‍या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान

◆ १९९६ : अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर

◆ १९९४ : पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना ’डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक’ जाहीर

◆ १९७९ : मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित केले गेले.

◆ १९६६ : बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

◆ १९४३ : बर्मा रेल्वे – रंगून ते बँकॉक हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला.

◆ १९३४ : ’प्रभात’चा ’अमृतमंथन’ हा चित्रपट पुण्याच्या ’प्रभात’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्याच दिवशी या चित्रपटाची हिन्दी आवृत्ती मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाली. हिन्दीत हा चित्रपट २९ आठवडे चालला. हिन्दी चित्रपटाचा रौप्यमहोत्सव होण्याची ही पहिलीच वेळ होती.

◆ १९३३ : अल्बर्ट आइनस्टाइन नाझी जर्मनीतुन पळून अमेरिकेत आले.

◆ १९३१ : माफिया डॉन अल कपोनला आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा झाली.

◆ १९१७ : पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्बहल्ला केला.

◆ १८३१ : मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.
https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

◆ १९७० : अनिल कुंबळे – भारतीय लेग स्पिनर?

◆ १९६५ : अरविंद डिसिल्व्हा – श्रीलंकेचा क्रिकेट क ललित लेखकप्तान

◆ १९५५ : स्मिता पाटील – अभिनेत्री. त्यांचे ’निशांत’, ’मंथन’, ’भूमिका’, ’जैत रे जैत’, ’गमन’, ’चक्र’, ’उंबरठा’ इत्यादी चित्रपट लोकप्रिय झाले. पद्मश्री (१९८५), दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड (मृत्यू: १३ डिसेंबर १९८६ – मुंबई)

◆ १९४७ : सिम्मी गरेवाल – चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका

◆ १९१७ : विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी (मृत्यू: १३ डिसेंबर १९९४)

◆ १८९२ : नारायणराव सोपानराव बोरावके – कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार, पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यांत अनेक संस्था व उद्योग त्यांनी उभे केले. संशोधित फळांच्या उत्पादनास त्यांनी प्रोत्साहन दिले. १९३३ मध्ये त्यांना रावसाहेब तर १९४६ मध्ये त्यांना ‘रावबहादूर‘ हे किताब मिळाले. शेतीच्या आधुनिकीकरणावर त्यांनी भर दिला. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९६८)

◆ १८६९ : ’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – अष्टपैलू व चतुरस्त्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक, बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरू, ’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक (मृत्यू: ८ एप्रिल १९२२)

◆ १८१७ : सर सय्यद अहमद खान – भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते (मृत्यू: २७ मार्च १८९८)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

◆ २००८ : रविन्द्र पिंगे – ललित लेखक (जन्म: १३ मार्च १९२६)

◆ १९९३ : विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक, त्यांचे रामराज्य (१९४३), बैजू बावरा (१९५२), गूंज उठी शहनाई (१९५९), हिमालय की गोद में (१९६५) हे चित्रपट खूप गाजले. ’फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. (जन्म: १२ मे १९०७ – पालिताणा, गुजराथ)

◆ १९०६ : जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली (जन्म: २२ आक्टोबर १८७३)

◆ १८८७ : गुस्ताव्ह किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ मार्च १८२४)

◆ १८८२ : दादोबा पांडुरंग तर्खडकर – इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक, संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करुन व मराठी भाषेच्या रुपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून त्यांनी व्याकरण सिद्ध केले. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही त्यांनी लिहिले. (जन्म: ९ मे १८१४)

◆ १७७२ : अफगणिस्तानचा राज्यकर्ता अहमदशाह दुर्रानी (दुराणी) याचे निधन. अहमदशाहने ’दुर्र-इ-ईरान’ असा आपला किताब जाहीर केल्यापासून अब्दाली टोळ्या ’दुर्रानी’ नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. (जन्म: ? ? ????)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Job Alert.

राज्यातील आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
https://t.co/NG7LiE2oHf?amp=1
========================
भारतीय (उत्तर-मध्य) रेल्वेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या १६६४ जागा
https://t.co/yqDdIkIsaT?amp=1
========================
राज्यातील आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
https://t.co/NG7LiE2oHf?amp=1
=========================
गोवा अग्निशमन-आपत्कालीन सेवा संचालनालयात विविध पदांच्या २६८ जागा
https://t.co/l2wb1groyd?amp=1
=========================
गोवा प्रशासनाच्या वन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७९ जागा
https://t.co/RP9Eew6FcD?amp=1
=========================
गोवा राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ५२ जागा
https://t.co/ExzSq0kopN?amp=1
=========================
मुंबईच्या महाराष्ट्र सागरी मंडळात यांत्रिकी आवेक्षक पदांच्या एकूण ४८ जागा
https://t.co/mzoquNzIaX?amp=1
=========================
अहमदनगर एकात्मिक बाल विकास विभागात विविध पदांच्या एकूण २० जागा
https://t.co/GXePiVAuyc?amp=1
=========================
कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
🔰चालू घडामोडी (17/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 वाराणसी हे सार्वजनिक वाहतूकीसाठी रोपवे सेवा वापरणारे भारतातील पहिले शहर असेल

◆ सार्वजनिक वाहतूकीसाठी रोपवे सेवा छावणी रेल्वे स्टेशन ते चर्च स्क्वेअर या दरम्यान असेल.

◆ बोलिविया व मेक्सिको सिटी नंतर सार्वजनिक वाहतूकीसाठी रोपवे वापरणारा भारत ३रा देश.

◆ ह्या प्रकल्पाचा एकुण खर्च ४०० कोटी पेक्षा अधिक आहे.

◆ हा रोपवे ४.२ किमी लांबीचा आहे

◆ ह्या प्रकल्पाच्या खर्चाची केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये ८०:२० अशी विभागणी होणार.

◆ वाराणसी हे शहर उत्तरप्रदेश ह्या राज्यात आहे, वाराणसी शहर गंगा नदीच्या काठी वसले आहे.

◆ भारताचे १४वे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघाचे खासदार आहेत (२०१४ - १९)

◆ उत्तरप्रदेश हे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य व क्षेत्रफळानुसार चौथे मोठे राज्य आहे.

◆ उत्तरप्रदेश भारतातील सहा राज्यांपैकी एक आहे जेथे विधानपरिषद अस्तित्वात आहे.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ विधानपरिषद असलेले राज्य : बिहार , उ.प्रदेश , तेलंगणा , कर्नाटक , आंध्रप्रदेश , महाराष्ट्र.

◆ योगी आदित्यनाथ हे उत्तरप्रदेशचे २२वे मुख्यमंत्री आहेत. (ते २०१७ पासून या पदावर)

◆ मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते १९९८ ते २०१७ लोकसभा खासदार होते (गोरखपूर) ते गोरखपूर मठाचे महंत आहेत.

◆ योगी आदित्यनाथ यांचे मुळ नाव : अजय मोहन बिश्त.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह 2021:

◆ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत आरोग्य सेवा महासंचालनालय हितधारकांच्या सहभागासह विविध उपक्रमांद्वारे या विषयावर जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह (IWDP) 2021 पाळत आहे

◆“कर्णबधिर समुदायाची उन्नती” ही यावर्षीची संकल्पना आहे.


◆ आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह सर्वप्रथम 1958 मध्ये रोम, इटली येथे पाळण्यात आला. जागतिक कर्णबधिर समुदायाद्वारे दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात तो साजरा केला जातो .

◆ याच महिन्यात जागतिक कर्णबधिर महासंघाची पहिली जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती.

◆ आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह जगभरातील कर्णबधिर समुदायांद्वारे विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📚 * #History Special (17/10/2021)*📚
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆★ *1857 च्या उठावाची पार्श्वभूमी* ★◆
===========================

● ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विस्तारवादी धोरणामुळे जमीनदारांची व सरंजामदारांची वतने खालसा केल्यामूळे व अनेक सत्ताधीशांना आपल्या सत्ता गमवाव्या लागल्यामुळे असंतुष्ट झालेल्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे कंपनी सरकारच्या विरोधात शस्त्र उचलले मध्य व पूर्व हिंदुस्थानातील आदिवासींनी उठाव केला.  

● हिंदुस्थानातील छोटा नागपूर भागातील कोलरी आदिवासींनी 1827 मध्ये तर मुंडा आदिवासींनी 1831 मध्ये उठाव केला.

● पूर्व हिंदुस्थानात उत्तर पूर्व भागातील खासी टेकडयांवरील आदिवासंनी 1829 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला.

● नागा व कुफी बंडखोरांचे उठावही महत्वपूर्ण मानले जातात.

● ओरिसातील खोंडा आदिवासी तसेच बिहारमधील संथाळांचा उठाव हा ब्रिटिशांना हादरा देणारा ठरला.

● महाराष्ट्र्रातील खानदेशातील आदिवासींनी त्रिंबकजी डेंगळे यांच्या प्रोत्साहनाने दुसर्‍या बाजीरावास पेशवे पदावर पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु ब्रिटिशांपूढे त्यांचा निभाव लागला नाही.

● महाराष्ट्र्रात उमाजी नाईक यांनी रामोशंच्या मदतीने ब्रिटिश सत्तेला जबरदस्त आव्हान दिले. नाईकांनी ब्रिटिश धार्जीण्या व्यापारी सावकार संस्थानिक व जमीनदार यांची लूट केली.
शेवटी फंदफितुरीने 1831 मध्ये ते ब्रिटिशांच्या हाती लागले.

● ठाणे जिल्यातील कोळी व आदिवासी लोकांनी मराठी सत्तेच्या पुनरुजिवनासाठी 1839 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात बंड केले.

● 1840 मध्ये सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांनी तर 1841 मध्ये कोल्हापुर भागातील गडकर्‍यांनी ब्रिटिश सत्तेला विरोध केला.

● ब्रिटिशांच्या विरोधात घडून आलेले वरील सर्व उठाव ब्रिटिश सरकारने मोडून काढले.

● वरील सर्व उठाव दडपून टाकण्यात कंपनी सरकारला यश आले असले तरी भारतीयांमधील असंतोष दिवसेंदिवस वाढत गेला.

● 1757-1857 या शंभर वर्षाच्या कालखंडात कंपनी सरकारने आपला प्रचंड साम्राज्यविस्तार केला. कंपनीच्या धोरणामुळे प्रजा संस्थानिक जहांगीरदार जमीनदार असंतुष्ट झाले.

● राजकीय आर्थिक सामाजिक धार्मिक व लष्करी क्षेत्रातील असंतोषामधून 1857 चा उठाव घडून आला.

● इसवी सन 1857 च्या उठावाची सुरवात 10 मे या दिवशी झाली.

● इस्ट इंडिया कंपनीच्या मेरठ येथील सैनिकांनी बंड पुकारले व युरोपियन अधिकार्‍याना ठार मारले. नंतर ते दिल्लीवर चाल करुन गेले.

● त्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला व मोगलांचे प्रतिष्ठेचे नाव लावणार्‍या दुसर्‍या बहादूरशहाच्या नावे भारताचा सम्राट म्हणून द्वाही फिरविली.

● सेवेच्या अधिकाधिक जाचक होत चाललेल्या अटी, धार्मिक बाबींत हस्तक्षेप आणि अधिकार्‍यांचा वर्णीय अहंकार असे त्यांचे स्वरुप होते.

● पण मुळात त्या सर्वामागे ब्रिटिश सत्तेविरुध्दचा असंतोष होता. कारण हे शिपाई झाले तरी भारतीय समाजातलेच होते. ते एकप्रकारे गणवेशातील शेतकरीच होते.

● भारतीय समाजाच्या अन्य घटकांमध्ये ज्या आशा आकांक्षा,निराशा आणि असंतोष होता त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या अंत:करणात पडलेले होते.

● शिपायांचे हे बंड म्हणजे भारतीय अर्धव्यवस्था नष्ट झाली,तिला ब्रिटिश अर्थव्यवस्थेची बटीक बनविण्यात आले आणि देशाची मोठया प्रमाणात आर्थिक पिळवणूक करण्यात आली हे होय.
https://www.tg-me.com/targetmpscmh
● सर्वात वरकडी म्हणजे जमीनमहसूल वाढविण्याच्या वसाहतवादी धोरणामुळे बर्‍याच शेतकर्‍यांना आपल्या जमिनीलाच मुकावे लागले व ती वसुली शेतकरी, व्यापारी आणि सावकारांच्या घशात गेली.

● परंपरागत हस्तव्यवसायही नष्ट झाल्याने लक्षावधी कारागिरांवर बेकारी आणि दारिद्रय ओढवले. शेतकरी व कारागीरांच्या या आर्थिक हाल झाले. तसेच 1770 पर्यंत 12वेळा मोठा व कित्येकदा छोटे दुष्काळ पडले.

● हजारो जमीनदार व पाळेगारांचे शेतीच्या वसुलीवर आणि स्वत:च्या शेतजमिनीवरच नियंत्रण राहिले नाही.

● शेकडो वतनदारांची वतने नष्ट झाली. आपल्या अंतर्गत कारभारात ईस्ट इंडिया कंपनीने हस्तक्षेप केलेला अनेक संस्थानिकांना आवडला नव्हता.

● विद्वान आणि उपासकवर्गाना संस्थानिक, छोटे वतनदार,सरदार आणि जमीनदारांचा जो आश्रय होता, तोच नाहीसा झाल्याने त्यांच्यावर दारिद्रय कोसळले.

● ब्रिटिश सत्ता परकीय होती हेच उठावाचे एक मुख्य कारण होते. या देशात ब्रिटिश सदैव परकेच राहिले.

● या परकीय घुसखोरांच्या हुकुमांपुढे हांजी हांजी करण्याची आपणावर वेळ आली याचा भारतीय जनतेला मोठा अपमान वाटे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
हेतू:- हसत खेळत अभ्यास करणे.
Forwarded from TARGET MPSC (MH)
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🛑 How to search previous Article...?

आपल्या चॅनलवर मागील Notes कशा शोधायच्या..
TARGET MPSC (MH) pinned «🛑 Imp.Notification ★ मित्रांनो विज्ञानच्या काही शॉर्टकट्स Notes आपणांस उपलब्ध करून देत आहोत. 'या' नोट्स खालील लिंक वर उपलब्ध आहेत. हवं तर आपण या पोस्टचा खाली link आहे त्यावर Sample Notes पहा. आपण हवं तर Donwload करा किंवा मोबाईलमध्ये Save करा. 👇 तुम्हाला…»
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  19/10/2021  ■
                        वार :-  मंगळवार 
         
          ■    दिनविशेष : 19 ऑक्टोबर     ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

◆ २००५ : मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.

◆ २००० : पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

◆ १९९४ : रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा ’तानसेन पुरस्कार’ जाहीर.

◆ १९९३ : पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर

◆ १९७० : भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द

◆ १९४४ : दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.

◆ १९३५ : इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.

◆ १८१२ : नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.

◆ १२१६ : इंग्लंडचा राजा जॉन मृत्यूमुखी पडल्यामुळे त्याचा ९ वर्षाचा मुलगा हेन्‍री हा राजेपदी आरुढ झाला.
https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

◆ १९६१ : अजय सिंग देओल ऊर्फ ‘सनी देओल‘ – अभिनेता

◆ १९५४ : प्रिया तेंडुलकर – रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या. ’जन्मलेल्या प्रत्येकासाठी’ या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. (मृत्यू: १९ सप्टेंबर २००२)

◆ १९३६ : शांताराम नांदगावकर – गीतकार (मृत्यू: ११ जुलै २००९)

◆ १९२५ : डॉ. वामन दत्तात्रय तथा ’वा. द.’ वर्तक – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक (मृत्यू: १७ एप्रिल २००१)

◆ १९२० : पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. न्याय, वेदांत व्याकरण आदि शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला. अवघ्या वीस सहकार्‍यांना बरोबर घेऊन त्यांनी ’स्वाध्याय परिवार’ सुरू केला. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. (मृत्यू: २५ आक्टोबर २००३)

◆ १९१० : सुब्रमण्यन चंद्रशेखर – तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ कृष्णविवरांवरील संशोधनासाठी खर्च केला. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९९५)

◆ १९०२ : दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण – कथालेखक. ’किशोरीचे हृदय’, ’विद्या आणि वारुणी’ ही कादंबरी, ’तोड ही माळ’ हे नाटक व अनेक कथासंग्रह त्यांनी लिहीले. (मृत्यू: ३१ मे १९७३ – हैदराबाद, आंध्र प्रदेश)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

◆ १९९५ : बाल कलाकार म्हणून पुढे आलेल्या व नंतर सहाय्यक अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी पावलेल्या सलमा बेग ऊर्फ ’बेबी नाझ’ यांचे निधन. (जन्म: ? ? ????)

◆ १९५० : विष्णू गंगाधर तथा ’दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८८७)

◆ १९३७ : अर्नेस्ट रुदरफोर्ड – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ३० ऑगस्ट १८७१)

◆ १९३४ : विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. १८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून ’उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले. (जन्म: २४ डिसेंबर १८६४)

◆ १२१६ : जॉन – इंग्लंडचा राजा (जन्म: २४ डिसेंबर ११६६)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (19/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी चीनचे अवकाशवीर अवकाश स्थानकात

◆ बीजिंग : चीनचे तीन अवकाशवीर शेनझाऊ १३ यानातून तियानहे या अवकाश स्थानकात गेले आहेत. शनिवारी त्यांनी अवकाशस्थानकात प्रवेश केला.

◆ हे अवकाशवीर सहा महिने स्थानकात राहणार असून चीनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी अवकाश वास्तव्य मोहीम आहे.

◆ जे तीन अवकाशवीर स्थानकात गेले आहेत त्यात झाई झियांग (५५), वँग यापिंग (४१), ये गुआंगफू (४१) यांचा समावेश आहे. वँग ही अवकाश स्थानकात जाणारी पहिली चिनी महिला आहे. 

◆ झाई यांनी उड्डाणापूर्वी सांगितले, की ‘‘अवकाश स्थानकात सहा महिने गुरूत्वाशिवाय राहणे आव्हानात्मक आहे. कारण त्याचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असतो.’’

◆ हे अवकाशवीर अवकाश औषधे व भौतिकशास्त्रातील प्रयोग करणार असून दोन ते तीन स्पेसवॉक करण्याचा त्यांचा विचार आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (19/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 नासाच्या ‘लुसी’ यानाचे यशस्वी प्रक्षेपण, गुरु ग्रहाजवळच्या ‘ट्रोजन’ लघुग्रहांचा अभ्यास करणार

◆ सूर्यमालेचा अभ्यास करण्यासाठी नासाच्या आणखी एका मोहिमेला सुरुवात झाली आहे. सुमारे १५०० किलो वजनाचे आणि ६ मीटर लांबीचे दोन सोलर पॅनल असलेले 'लुसी' (Lucy) हे यान 'एटलास-५' या प्रक्षेपकाने अमेरिकेतील फ्लोरिडा इथल्या तळावरुन यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केले.

◆ हे यान पुढील १२ वर्ष प्रवास करत गुरु ग्रहाजवळ असलेल्या ८ विविध लघुग्रहांजवळून जात त्यांची छायाचित्रे काढणार आहे.

◆ यामधून या लघुग्रहांचा अभ्यास केला जाणार आहे.

★ 'लुसी' नाव का ?

◆ आफ्रिकेतील इथोपिया देशामध्ये १९७४ च्या सुमारास एका मानवी सांगाड्याचे अवशेष सापडले होते.

◆ अभ्यासाअंती हे अवशेष तब्बल ३२ लाख वर्षांपूर्वीचे असल्याचं स्पष्ट झालं. हा सांगाडा महिलेचा असल्याचंही नंतर लक्षात आलं.

◆ तेव्हाच्या एका प्रसिद्ध गाण्यातील एक शब्द वापरत 'लुसी' हे नाव या महिलेच्या सांगड्याला देण्यात आलं.

◆ या अवशेषांमुळे मानवशास्त्र अभ्यासाची दिशा बदलून गेली. तेव्हा हेच नाव नासाने या यानाला दिलं आहे.

◆ हे यान सूर्यमालेबद्दलच्या अभ्यासाची दिशा बदलवेल अशी अपेक्षा आहे.

◆ लघुग्रहांचे दोन मोठे समूह हे गुरु ग्रहांच्या समकक्ष मागे आणि पुढे गुरु ग्रहाबरोबर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात.

◆ या लघुग्रहांना गुरु ग्रहाचे ट्रोजन ( Jupiter Trojan ) म्हणून ओळखलं जातं. हे लघुग्रह सूर्यमालेच्या निर्मितीपासून अस्तित्वात आहेत असा खगोल अभ्यासकांचा कयास आहे.

◆ त्या वेळी मोठ्या ग्रहाची निर्मिती झाली नाही, पण त्याचे अवशेष हे या लघुग्रहांच्या रुपाने बाकी आहेत असा अंदाज आहे. तेव्हा या लघुग्रहांचा अभ्यास हे 'लुसी' यान करणार आहे.

◆ यामुळे सूर्यमालेच्या निर्मितीबद्दल मोठी माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.
या लघुग्रहांची संख्या अडीच लाखापेक्षा जास्त आहे. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ एक किलोमीटर पासून ते १०० किलोमीटर पर्यंत व्यासाचे विविध आकाराचे हे लघुग्रह या Jupiter Trojan मध्ये आहेत. यापैकी ८ मोठ्या लघुग्रहांचा अभ्यास 'लुसी' यान करणार आहे.

◆ या लघुग्रहाच्या पट्टयात पोहचण्याआधी एकदा सूर्याभोवती आणि एकदा पृथ्वीजवळून प्रदक्षिणा घालत लुसी यान मार्गस्थ होणार आहे.

◆ गुरु ग्रहाजवळील लघुग्रहांचा तेही एवढ्या संख्येने अभ्यास करणारी ही जगातील पहिलीच मोहिम असल्याचं नासाने म्हंटलं आहे.  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (19/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 विमान इंजिन दुरुस्तीचे खासगी कंपनीचे देशातील पहिले केंद्र नागपुरात

◆ नागपूर : विमान आणि हेलिकॉप्टरच्या इंजिनच्या दुरुस्ती व देखभालीसाठी नागपुरात ‘इंजिन हॉस्पिटल एमआरओ’ सुरू होत आहे.

◆ त्याची मुहूर्तमेढ रविवारी मिहान-सेझमध्ये रोवण्यात आली.

◆ एखादा खासगी कंपनीचे केवळ इंजिनच्या दुरुस्ती केंद्र नागपुरातील हे केंद्र देशातील पहिले ठरणार आहे.

◆ कल्पना सरोज ग्लोबल एव्हीएशन प्रा.लि.(केएसजीए) च्या नागपुरातील प्रस्तावित ‘इंजिन हॉस्पिटल एमआरओ’चे भूमिपूजन रविवारी झाले.

◆ यासाठी कल्पना सरोज एव्हिएशनने मिहान-सेझमध्ये १ एकर जमीन घेतली आहे.

◆ हे केंद्र मार्च २०२३ पर्यंत सुरू केले जाणार आहे.

◆ देशात सध्या ६०० विमानाचे इंजिन देखभाल-दुरुस्तीसाठी प्रतीक्षा यादीत आहेत. यामुळे या क्षेत्रात मोठा वाव आहे.

◆ या केंद्रात वर्षांला ४० ते ६० इंजिनची देखभाल दुरुस्ती केली जाईल. यासाठी स्थानिक लोकांमधून टेक्निशियन घेतले जातील, असे कॅप्टन विनय बांबोळे म्हणाले.

◆ यासंदर्भात कल्पना सरोज ग्लोबल एव्हीएशन प्रा.लि.च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कल्पना सरोज म्हणाल्या, समाजाचे ऋण फेडण्याची संधी म्हणून आम्ही या प्रकल्पाकडे बघतो.

◆ यातून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि स्थानिकांना लाभ होईल, असा दावा त्यांनी केला.

◆ या केंद्राचा संपूर्ण ढाचा उभा करण्यासाठी सुमारे १९ ते २५ कोटी रुपये लागतील. ही रक्कम कामिनी टय़ुब्स लि.कडून घेण्यात येणार आहे.

◆ या कंपन्याच्या सीएमडी देखील डॉ. कल्पना सरोज आहेत. संपूर्ण कर्जमुक्त आणि नफ्यातील कंपनी आहे.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ कॅप्टन विनय बांबोळे यांनी २०१० पासून या प्रकल्पाचा विचार मांडला होता. प्रारंभी त्यांना नागपुरात एव्हीएशन कॉलेज सुरू करण्याचे ठरवले होते.

◆ परंतु नंतर इंजिन दुरुस्तीचे केंद्र सुरू करून टप्प्याटप्प्याने वैमानिक प्रशिक्षण केंद्र, हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची योजना आहे.

◆ त्यांनी प्रारंभी ३० एकर जमीन घेण्याचा विचार केला होता. परंतु नंतर सुरुवात १ एकर पासून करण्याचा निर्णय घेतला, असेही त्या म्हणाल्या.

◆ विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मिहानला कल्पना सरोज एव्हीएशनच्या माध्यमातून मोठे बळ मिळेल.

◆ यात रोजगार निर्मिती होऊन स्थानिकांना रोजगार मिळेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Job Alert..

भारतीय खाद्य महामंडळ यांच्या आस्थापनेवरील वॉचमन पदांच्या ८६० जागा
https://t.co/wtpIUyyJ7W?amp=1
==========================
संरक्षण संशोधन व विकास संस्थेत (DRDO) विविध पदांच्या एकूण ९० जागा
https://t.co/oWVBE6mmo1?amp=1
==========================
गोवा नियोजन,सांख्यिकी, मूल्यमापन संचालनालयात विविध पदांच्या ६३ जागा
https://t.co/P1dTrKHnaU?amp=1
==========================
राज्यातील आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
https://t.co/NG7LiE2oHf?amp=1
==========================
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सरकारच्या विविध पदांच्या ४८ जागा
https://t.co/KvKTumJmBE?amp=1
==========================
कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
🔰चालू घडामोडी (19/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 राज्यातील पहिली वन्यजीव डीएनए तपासणी प्रयोगशाळा नागपुरात

◆ मृत्यूचे कारण तातडीने समजणार असल्याने गुन्ह्याच्या तपासाला वेग 

◆ नागपूर : महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांसह इतरही वन्यजीवांच्या शिकारीची प्रकरणे उघडकीस येत असताना या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात प्रयोगशाळेअभावी वनखात्याला फारसे यश येत नव्हते.

◆ प्रकरणाचा तपास करताना वन्यप्राण्यांच्या डीएनए चाचणीसाठी महाराष्ट्राला हैदराबाद आणि देहरादून येथील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागत होते.

◆ मात्र, इतर राज्यांवरील वनखात्याचे परावलंबित्व आता संपुष्टात आले असून राज्यातील पहिली वन्यजीव डीएनए तपासणी प्रयोगशाळा नागपुरात उभारण्यात आली आहे.

◆ राज्यातील सहा व्याघ्रप्रकल्पांपैकी पाच व्याघ्रप्रकल्प आणि अनेक अभयारण्य विदर्भात आहेत.

◆ वाघांच्या सर्वाधिक संख्येमुळे शिकारीचे प्रमाणही येथे अधिक आहे. दरम्यान, या प्रयोगशाळेमुळे वन्यजीवांच्या मृत्यूचे कारण तातडीने समोर येणार असून वन्यजीव गुन्ह्याच्या तपासालाही वेग येणार आहे.

◆ अशा प्रकरणात गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी वन्यप्राण्यांची डीएनए चाचणीची भूमिका अतिशय महत्त्वाची असते.

◆ हैदराबाद आणि देहरादून अशा दोनच ठिकाणी या प्रयोगशाळा असल्याने त्याठिकाणी वन्यप्राण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जात होते.

◆ या प्रयोगशाळा केंद्र सरकारच्या अखत्यारितील असल्याने त्यासाठी मोठे शुल्क मोजावे लागत होते.

◆ त्यानंतरही तपासणीसाठी प्रतीक्षा यादीतच राहावे लागत होते आणि अहवाल येण्यासाठी तब्बल एक वर्षाचा कालावधीत लागत होता.

◆ यादरम्यान हे नमुने खराब होण्याची शक्यता होती. शिवाय अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यताही कमीच होती.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ आता या प्रयोगशाळेत शेजारच्या राज्यातील वन्यजीवांचे नमुने देखील तपासता येणार आहेत. 
अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश

◆ २०११ पासून वन्यजीव डीएनए विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत प्रयत्न सुरू होते.

◆ सुरुवातीच्या काळात सिरमच्या वापराने हे विश्लेषण के ले जात होते. यात वन्यप्राण्यांच्या रक्ताची आवश्यकता होती.

◆ वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्याला बंदी घालण्यात आल्याने ही प्रक्रि या बंद करण्यात आली.

◆ त्यानंतर अमरावती विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने विश्लेषण सुरू झाले.

◆ स्वतंत्र प्रयोगशाळेसाठी २०१६ ला तत्त्वत: मान्यता मिळाली. २०१८ ला ही प्रयोगशाळा नागपुरात उभारण्याचे ठरले. गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Forwarded from TARGET MPSC (MH)
📚History Special (10/07/2020)📚
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

★ खिलाफत चळवळ

◆ पहिल्या महायुद्धाच्या शेवटी १९१८–२२ च्या कालखंडात तुर्की साम्राज्याचे तुकडे करून सुलतानाची सत्ता संपुष्टात आणण्याचा विचार विजयी दोस्त राष्ट्रांनी केला त्याविरुद्ध भारतात चळवळ झाली.

◆ खिलाफत म्हणजे खलीफाची धार्मिक व राजकीय सत्ता.

◆ तुर्कस्तानचा सुलतान हा सर्व मुस्लिम जगाचा वरिष्ठ धर्माधिकारी म्हणून अनेक शतके मानला जात होता.

◆ १९१४ साली सुरू झालेल्या पहिल्या जागतिक महायुद्धात तुर्कस्तान दोस्त राष्ट्रांच्या विरुद्ध उभा होता. या युद्धात जर्मनीबरोबर तुर्कस्तानचाही पराभव झाला.

◆ कॉन्स्टँटिनोपल, आशिया मायनर, थ्रेस इ. प्रदेश दोस्तांनी आपले तुर्की साम्राज्य कोसळण्याच्या परिस्थितीत होते. विजयी ब्रिटन व फ्रान्स यांनी खलीफा तुर्की सुलतान याच्या साम्राज्याचे तुकडे पाडून ते आपल्या अखत्यारीखाली घेतले. दोस्त राष्ट्रे खिलाफत बरखास्त करणार अशी स्थिती उत्पन्न झाली.

◆ पहिल्या महायुद्धात मुसलमानांसह सर्व भारतीयांनी भाग घ्यावा, म्हणून भारतीय मुसलमानांना ब्रिटिशांनी त्यांच्या धार्मिक श्रद्धास्थानांचे महत्त्व कायम ठेवले जाईल, असे आश्वासन दिले होते.

◆ परंतु विजयानंतर या गोष्टीचा साहजिकच विसर पडला. तुर्की खिलाफत नष्ट होत आहे आणि ब्रिटिश सत्ताधारी त्यास कारणीभूत होत आहेत, हे पाहून ब्रिटिशांनी खिलाफत सावरावी, नष्ट होऊ देऊ नये, म्हणून भारतातील मुस्लिम समाजाने गांधीजींच्या नेतृत्वाखाली खिलाफत चळवळ सुरू करण्याचा निश्चय केला.

◆ जानेवारीच्या १९ तारखेला डॉ. अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली व्हाइसरॉयना मुसलमानांचे शिष्टमंडळ भेटले. खिलाफतीचे धार्मिक व राजकीय अस्तित्व अबाधित राखणे हा इस्लाम धर्माचा प्राण आहे, असे त्यांनी निवेदन दिले. व्हाइसरॉयनी त्यांना निराशाजनक उत्तर दिले.

◆ महंमद अली एक शिष्टमंडळ घेऊन इंग्लंडला गेले व त्यांनी लॉइड जॉर्ज यांची मुलाखत ता. १७ मार्च १९२० रोजी घेतली. लॉइड जॉर्ज यांनी उत्तरात म्हटले, की जी तत्त्वे ख्रिस्ती धर्मियांना लागू आहेत तीच मुसलमान धर्मियांना आम्ही लागू करू.

◆ तुर्कस्तानला आपली सत्ता जे देश त्याचे नाहीत, त्यांवर चालविता येणार नाही. ह्या उत्तराने शिष्टमंडळ नाराज झाले.

◆ त्यांनी १९ मार्च हा सुतकाचा दिवस पाळला. नंतर काही दिवसांनी सु. १८,००० मुसलमानांनी ब्रिटिश भूमीत आपण राहणार नाही, अशा निश्चयाने हिजरत करण्याचे ठरविले.

◆ ते अफगाणिस्तानात निघाले. पण अफगाणांनी त्यांना आपल्या देशात येण्यास मनाई केली. मुसलमानांना आता गांधींशिवाय आधारच उरला नाही.

◆ त्यांच्या खिलाफत परिषदेत ते जोरदार ठराव व त्याहीपेक्षा जोरदार भाषणे करीत. असहकारितेची चळवळ फोफावत होती. हिंदुमुस्लिम ऐक्याकरिता गांधी धडपडत होते.

◆ त्यांनी असहकारितेच्या चळवळीला खिलाफत चळवळीची जोड दिली. पण हिंदुमुसलमान ऐक्याला दंगलींनी तडेही जात होते.

◆ मलबार, पंजाब, बंगालमध्ये १९२१ व १९२२ मध्ये जातीय दंगे झाले.

◆ मलबारमध्ये मोपलांनी बंड केले. १० नोव्हेंबर १९२२ रोजी लोझॅन येथे दोस्तांची परिषद भरली. दोन महिने चर्चा चालली.

◆ त्याच वेळी मुस्ताफा केमाल अतातुर्कच्या निधर्मी नेतृत्वाखाली अंगोरा सरकारने कॉन्स्टँटिनोपल शहराचा ताबा घेतला व तुर्कस्तानचा सुलतान आपला जीव वाचविण्याकरिता ब्रिटिश जहाजातून माल्टाला गुप्तपणे पळून गेला.

◆ त्याला १९२३ मध्ये पदच्युत करण्यात आले व त्याचाच पुतण्या गादीवर बसला. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ सुलतानाची जागा रद्द झाली व नवी व्यक्ती खलीफा म्हणून आली. तुर्कस्तानमध्ये निधर्मी प्रजासत्ताक राज्य आल्यामुळे खलीफाची जागा १९२४ साली खालसा करण्यात आली. त्यामुळे खिलाफत चळवळ आपोआप विराम पावली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

★ *इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे*

१) १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
२) १८२२ कुळ कायदा
३) १८२९ सतीबंदी कायदा
४) १८३५ वृत्तपत्र कायदा
५) १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६) १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
७) १८५८ राणीचा जाहीरनामा
८) १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
९) १८६० इंडियन पिनल कोड
१०) १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११) १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२) १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३) १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
१४) १८८३ इलबर्ट बिल कायदा
१५) १८८७ कुळ कायदा
१६) १८९२ कौन्सिल अॅक्ट
१७) १८९९ भारतीय चलन कायदा
१८) १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९) १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
२०) १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा
२१) १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
२२) १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३) १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४) १९१९ रौलेक्ट कायदा
२५) १९३५ भारत सरकार कायदा
२६) १९४४ राजाजी योजना
२७) १९४५ वेव्हेल योजना
२८) १९४५ त्रिमंत्री योजना
२९) १९४७ माउंटबॅटन योजना
३०) १९४७ भारतीय स्वातंत्र्याचा कायदा.
2024/12/27 20:50:19
Back to Top
HTML Embed Code: