Telegram Web Link
🔰🔰चालू घडामोडी (18/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ११ महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्यास लष्कराची सहमती

◆ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, लष्कराने शुक्रवारी न्यायालयाच्या निर्णयानुसार ११ महिला अधिकाऱ्यांना १० दिवसांच्या आत स्थायी कमिशन देण्याचे मान्य केले.

◆ पात्र महिला अधिकाऱ्यांना हे कायमस्वरूपी कमिशन (Permeant Commission) म्हणजेच १० दिवसांत मिळेल. यासोबतच जे अधिकारी पात्र अधिकारी आहेत आणि निकष पूर्ण करतात आणि न्यायालयात आले नाहीत, त्यांनाही तीन आठवड्यात कायमस्वरूपी कमिशन मिळणार आहे.

◆ न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने लष्करी अधिकाऱ्यांना ताकीद दिली होती की महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्यास अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालय अवमानाची कारवाई करेल.

◆ सर्वोच्च न्यायालयात ११ अधिकार्‍यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेची सुनावणी करताना लष्कराने निर्देशांचे पालन न केल्याचा आरोप न्यायालयाने केला. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी कोर्टाला सांगितले की, “११ अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, “महिला एसएससी अधिकार्‍यांशी संबंधित सर्व प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी लष्कराच्या योग्य भूमिका घेण्याच्या अधिकाराचे आम्ही कौतुक करतो.

◆ सैन्य हे स्वतःच्या अधिकारात सर्वोच्च असू शकते परंतु देशाचे घटनात्मक न्यायालय आपल्या अधिकारक्षेत्रात सर्वोच्च आहे.”
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (18/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 प्रा. बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर निवड

◆ संयुक्त राष्ट्रे : राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाचे कुलगुरू व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य प्रा. बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर पाच वर्षांसाठी निवड झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या या संस्थेतील निवडणुकीत त्यांना हे यश मिळाले आहे.

◆ संयुक्त राष्ट्रातील राजदूत टी.एस तिरूमूर्ती यांनी प्रा. बिमल पटेल यांचे अभिनंदन केले असून त्यांना या निवडीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

◆ पटेल (वय ५१) यांना १९२ सदस्य देशांपैकी १६३ मते मिळाली. त्यात त्यांनी आशिया- पॅसिफक गटातील चीन, दक्षिण कोरिया व जपान या देशांवर मात केली आहे.

◆ प्रा. बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर निवड झाली असून आमचे या संस्थेतील योगदान व आंतरराष्ट्रीय व्यवस्था राखण्याचे प्रयत्न महत्त्वाचे राहतील असे संयुक्त राष्ट्रातील भारतीय दूतावासाने म्हटले आहे.

◆ चीनच्या दंडेलीविरोधात अप्रत्यक्षपणे भारताने आंतरराष्ट्रीय व्यवस्था राखण्याचा इरादा व्यक्त करून इशारा दिला आहे. ज्या देशांनी भारताला मतदान केले त्यांचे दूतावासाने आभार मानले आहेत.

◆ भारताचे पटेल यांना १६३ मते मिळाली. थायलंडला १६२, जपानला १५४, व्हिएतनामला १४५ मते मिळाली आहेत. चीनला १४२ मतांवर समाधान मानावे लागले. दक्षिण कोरियाला १४०, सायप्रसला १३९ तर मंगोलियाला १२३ मते मिळाली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (18/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 ग्लासगो परिषदेत भारताची मध्यस्थी ; कोळशाच्या मर्यादित वापरावर मतैक्य

◆ लंडन : कोळशासारखी सर्व जीवाश्म इंधने वापरणे बंद करावे, असे ग्लासगो येथील सीओपी २६ हवामान परिषदेच्या जाहीरनाम्यातील आधीच्या मसुद्यात म्हटले होते.

◆ त्यात भारताने यशस्वी हस्तक्षेप करून जीवाश्म इंधनांचा वापर एकदम बंद करण्यापेक्षा हळूहळू कमी करण्याची सूचना केली.

◆ त्याला मान्यता मिळाली असून अखेरच्या क्षणी भारताने केलेल्या सूचनेमुळे जाहीरनाम्यात करण्यात आलेला बदल हे मोठे यश मानले जात आहे.

◆ ग्लासगो हवामान करार हा संयुक्त राष्ट्र हवामान संस्थेचा असा पहिला करार आहे ज्यात कोळशाचा वापर बंद करण्याचा नाही तरी, निदान कमी करण्याचा मुद्दा आहे.

◆ कोळसा व इतर जीवाश्म इंधनांमुळे हरितगृहवायूंचे प्रमाण वाढत असते. कराराचा भाग म्हणून काही देशांनी कार्बन उत्सर्जन ठरावीक प्रमाणात पुढील वर्षांपर्यंत कमी करण्याचे ठरवले आहे.

◆ त्यामुळे औद्योगिक क्रांतीवेळी होते त्यापेक्षा १.५ अंश कमी इतके तापमान ठेवण्यात यश येणार आहे.

◆ सीओपी २६ चे अध्यक्ष आलोक वर्मा यांनी सांगितले, की नवीन करार झाला असून त्याआधी महिनाभर या विषयावर चर्चा झाली. कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर मतैक्य झाले असून कोळशाचा वापर पूर्णपणे बंद करण्यावर मतैक्य झालेले नाही.

◆ त्यामुळे कोळशाचा वापर हळूहळू कमी करण्याचे ठरले आहे. 

◆ कोळशाचा वापर बंद न करण्याच्या भारताच्या सूचनेवर इतर देशांनी टीकेची झोड उठवली.

◆ पर्यावरण मंत्री भूपेंदर यादव यांनी ग्लासगो हवामान परिषदेत असे सांगितले होते, की कोळशाचा वापर कमी करण्याचे आश्वासन विकसनशील देशांकडून अपेक्षित होते, ते आम्ही दिले आहे.

◆ अनुदाने कमी करण्याचेही या देशांनी ठरवले आहे. विकसनशील देशात अजूनही दारिद्रय़ ही समस्या कायम असल्याने जीवाश्म इंधनांचा वापर एकदम बंद करता येणार नाही.

◆ या परिषदेच्या जाहीरनाम्यातील मसुद्यात बदल करण्यास भारताने सुचवले. त्यामुळे कोळशाचा वापर एकदम बंद करता येणार नाही हे आता मान्य करण्यात आले आहे.

◆ भारताची रचनात्मक चर्चेची तयारी
भारतासारख्या व विकसनशील देशांना कोळशाचा वापर बंद करायला सांगणे हे पक्षपातीपणाचे आहे.

◆ कारण त्यामुळे विकासाचा समतोल राहणार नाही असे भारताने म्हटले आहे. पर्यावरण मंत्री यादव यांनी म्हटले आहे, की परिषदेच्या अध्यक्षांनी कोळशाचा वापर एकदम बंद करण्याऐवजी कमी करण्यावर मतैक्य घडवून आणल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत.

◆ कोळशाचा वापर कमी करण्यावर रचनात्मक चर्चा करण्यास आमची तयारी आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (18/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 शिवआख्यान शांतावले.. ; शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश

◆ पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अवघे आयुष्य समर्पित करणारे तपस्वी, प्रखर बुद्धिमत्ता, सूक्ष्म विश्लेषण क्षमता आणि इतिहास लेखनाची विलक्षण प्रतिभा लाभलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे पुण्यात निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. अमोघ आणि ओजस्वी वाणीने शिवरायांचा इतिहास जिवंत करणाऱ्या बाबासाहेबांच्या निधनामुळे शिवआख्यान शांतावले.

◆ दादरा- नगर हवेली मुक्ती संग्रामातील सेनानी, ‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक आणि जगाला हेवा वाटेल अशा ‘शिवसृष्टी’चे संकल्पक अशी ओळख असलेल्या बाबासाहेबांनी वयाच्या १६व्या वर्षांपासून शिवछत्रपतींचा पराक्रम, महाराष्ट्राचा इतिहास आणि येथील उत्तुंग सांस्कृतिक परंपरेवर संशोधनास प्रारंभ केला.

◆ त्यांच्या या ७५ वर्षांच्या ध्यासपर्वातून अनेकोत्तम ग्रंथसंपदा साकार झाली. ती घराघरात विराजमान झाली. त्यांच्या या कार्यातून अनेकांनी प्रेरणा घेतली.   

◆ जन्मतारखेनुसार २९ जुलै रोजी आणि तिथीनुसार नागपंचमीला (१३ ऑगस्ट) बाबासाहेबांनी शंभराव्या वर्षांत पदार्पण केले होते. काही दिवसांपूर्वी कोथरूड येथील घरात पाय घसरून पडल्याने पुरंदरे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करीत होते. मात्र, वयोमान आणि न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. अखेर सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

◆ बाबासाहेबांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सोमवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली.

◆ बाबासाहेबांना त्यांच्या हजारो चाहत्यांनी आणि अनुयायांनी जड अंत:करणाने निरोप दिला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.

◆ बाबासाहेबांच्या पश्चात कन्या, प्रसिद्ध लेखिका-गायिका माधुरी पुरंदरे, पुरंदरे प्रकाशनचे संचालक अमृत पुरंदरे आणि ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’चे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे हे पुत्र, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ बाबासाहेबांनी २९ जुलैला वयाच्या शंभरीत प्रवेश केला होता. नऱ्हे आंबेगाव येथील शिवसृष्टी येथे ज्येष्ठ गायिका आशा भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपचे नेते आशीष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस साजरा झाला होता.

◆ करोना संक्रमणाच्या काळात त्यांच्या प्रकृतीला विश्रांती मिळावी, यासाठी त्यांचे वास्तव्य त्यांचे पुत्र अमृत पुरंदरे यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी होते.

★ शिवचरित्राचा तपस्वी

◆ शिवचरित्र घरोघरी पोहोचावे या ध्येयाने झपाटून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून आणि परिश्रमांतून ‘राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या पाच लाखांहून अधिक प्रती घराघरामध्ये पोहोचल्या आहेत.

◆ अमोघ वक्तृत्व लाभलेल्या बाबासाहेबांनी महाराजांवर १५ हजारांहून अधिक व्याख्याने दिली. बाबासाहेब आणि ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर एकत्र भटकंती करीत.

◆ महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा, मराठा साम्राज्याचा आणि शिवकालीन दस्तावेजांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. तो सर्वांपर्यंत पोहोचवला.  

★ ‘जाणता राजा’ महानाटय़ाचे निर्माते 

◆ छत्रपतींचा इतिहास सांगण्यासाठी बाबासाहेबांनी ‘जाणता राजा’ हे महानाटक लिहिले. त्याचा पहिला प्रयोग १४ एप्रिल १९८४ रोजी झाला होता. गेल्या ३६ वर्षांत महाकाय रंगमंचावर त्याचे १२५० हून अधिक प्रयोग झाले. या नाटकाच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची देणगी दिली. हे नाटक हिंदूी-इंग्रजीसह पाच अन्य भाषांत भाषांतरित केले गेले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Forwarded from TARGET MPSC (MH)
📚 *History Special (25/10/2018)*📚
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

●◆🦋हडप्पाकालीन लोकजीवन🦋◆●

◆ सिंधु आणि रावी नद्यांच्या परीसरात
करण्यात आलेल्या उत्खननात
मिळालेल्या पुराव्याच्या आधारे येथील
लोकजीवनाबाबत खालील माहिती
मिळते.

●दैनंदिन जीवनप्रणाली●

◆ अन्न :- 
येथील लोक आपल्या आहारामध्ये
तांदूळ,गहू, सातू,खजूर,मांस मासे
भाज्या व फळे यांचा वापर करीत
असल्याचे दिसून येते. 

◆ वस्त्र व प्रावरणे :-
येथील उत्खनात मिळालेल्या
पुराव्यावरून या लोकांना कापड
विणण्याची कला अवगत असल्याचे
दिसून येते. स्त्री-पुरुषांच्या पोशाखात
कंबरेपर्यंतचे वस्त्र व उपरण्याचा वापर
करीत असे. 

◆ अलंकार :-
 हे लोक सोने, चांदी, तांबे, रत्ने, शिंपले
कवडया,बिया इत्यादींचा वापर दागिने
तयार करण्याकरिता करीत असे.
यामध्ये बाजूबंद, अंगठ्या, दंडापर्यंत
बांगड्या कमरपट्टा इत्यादी अंलकाराचा
समावेश होता. 

◆ करमणुकीची साधने:-
 हे लोक करमणुकीकरिता, नृत्य, संगीत
व सोंगट्या व फासे यांचा खेळ खेळत.

◆धार्मिक संकल्पना◆

◆ पुजा-अर्चना : हडप्पाकालीन
उत्खननात मिळालेल्या मातृदेवतेची
मूर्ति आणि अग्नीचे अवशेष यावरून
लोक निसर्गपूजक व मातृपूजक होते
स्पष्ट होते. 
https://www.tg-me.com/targetmpscmh
◆ अंत्यविधी : हडप्पा कालीनलोक
मृतदेहांना जाळित असे किंवा शवपेटीत
घालून पुरले जात आसवेत असे या
स्पष्ट होते. त्याचबरोबर मृतदेह पुरतांना
सोबत अन्न, अंलकार व आयुधे सुद्धा
पुरवण्यात येत असे. 

◆उद्योग व व्यवसाय◆

◆ हडप्पाकालीन लोकांचा शेती आणि
व्यापार हे प्रमुख व्यवसाय होते. 

◆ शेती : शेती हा येथील लोकांचा प्रमुख
व्यवसाय होता. ते शेतीमध्ये
गहू, तांदूळ, कापूस, सातू, कडधान्ये
इत्यादी पिकांचे उत्पादन घेत असे. 

◆ भांडी : भांडी तयार करणे आणि
त्यावरच चित्रकला काढणे हा येथील
लोकांचा दूसरा व्यवसाय असल्याचे
दिसून येते. 

◆ कापड : कापूस व लोकरीपासून धागा
तयार करणे आणि कापड तयार करणे
हा येथील लोकांचा एक व्यवसाय
होता. 

◆ व्यापर : हडप्पा येथे तयार होणार्‍या
मालाचे अवशेष सुमेरियन संस्कृतीमध्ये
मिळाल्यामुळे आणि गुजरात मधील
लोथल येथे मिळालेल्या बंदरच्या
अवशेषावरून हे लोक व्यापारामध्ये
प्रविण असल्याचे दिसून येते.हडप्पा
येथील लोकांचा व्यापार जलमार्गाने
इतर देशांशी चालत असल्याचे स्पष्ट
होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  19/11/2021  ■
                        वार :-  शुक्रवार 
         
          ■    दिनविशेष : 19 नोव्हेंबर     ■

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                  ■   जागतिक दिवस   ■

             ●   आंतरराष्ट्रीय पुरूष दिन   ●
               ● महिला उद्योजकता दिन ●
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■


● १९४६: अफगणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

● १९६०: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना.

● १९६९: फूटबॉलपटू पेले यांनी १,००० वा गोल केला.

● १९६९: अपोलो-१२ या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अ‍ॅलन बिल हे चंद्रावर उतरले.

● १९९८: व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे द पोर्ट्रेट ऑफ अ‍ॅन आर्टिस्ट विदाऊट अ बेअर्ड हे चित्र ७.१५ कोटी डॉलर्सना विकले गेले.

● १९९८: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू.

● १९९९: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते ढाक्क्याचे डॉ. मोहम्मद युनूस यांना देण्यात आला.

● २०००: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान..
https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                 ■   जन्म/वाढदिवस   ■


● १७२२: आधुनिक स्टेथॅस्कोपचे जनक लिओपोल्ड अॅव्हेल ग्रुबर यांचा जन्म.

● १८२८: झाशीच्या राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १८५८)

● १८३१: अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर १८८१)

● १८३८: ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक केशव चंद्र सेन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १८८४)

● १८४५: भारतीय-इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक एग्नेस जिबर्ने यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९३९)

● १८७५: प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे १९५०)

● १८७७: व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९४७)

● १८८८: क्यूबाचा बुद्धीबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९४२)

● १८९७: सह्याद्री ग्रंथांचे लेखक व कायदेपंडित स.आ. जोगळेकर यांचा जन्म.

● १९०९: ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक पीटर ड्रकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००५)

● १९१४: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार एकनाथजी रामकृष्ण रानडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८२)

● १९१७: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९८४)

● १९२२: हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९५ – मुंबई)

● १९२८: मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारा सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २०१२)

● १९३८: टर्नर ब्रॉडकास्टिंग सिस्टमचे संस्थापक टेड टर्नर यांचा जन्म.

● १९४२: केल्विन क्लेन इंक चे संस्थापक केल्विन क्लेन यांचा जन्म.

● १९५१: हिंदी चित्रपट अभिनेत्री झीनत अमन यांचा जन्म.

● १९७४: भारतीय अभिनेते आणि गायक अरुण विजय यांचा जन्म.

● १९७५: मिस युनिव्हर्स आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सुष्मिता सेन यांचा जन्म.

● १९७६: ट्विटर चे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांचा जन्म.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■


● १८८३: जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सिमेन्स यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १८२३)

● १९७१: मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक कॅप्टन गो. गं. लिमये यांचे निधन.

● १९७६: कोव्हेन्ट्री कॅथेड्रल चे रचनाकार बॅसिल स्पेन्स  यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०७)

● १९९९: कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रामदास कृष्ण धोंगडे यांचे निधन.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (19/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 अनिता देसाई यांना टाटा लिटरेचर जीवनगौरव

◆ मुंबई : ज्येष्ठ लेखिका अनिता देसाई यांना ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’तर्फे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ कवी आदिल जस्सावाला यांना ‘पोएट लॉरिएट पुरस्कारा’ने सन्मानित केले जाणार आहे. 

◆ साहित्य महोत्सव १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाइन होईल. 

◆ अनिता देसाई यांची पहिली कादंबरी ‘क्राय द पीकॉक’ ही १९६३ साली प्रकाशित झाली होती. त्यांनी ‘रायटर्स वर्कशॉप’ ही प्रकाशन संस्थाही सुरू केली.

◆ त्यांच्या १९८४ साली प्रकाशित झालेल्या ‘इन कस्टडी’ या कादंबरीला बुकर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. ‘मॅसॅच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थे’त त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केले.

◆ १९९९ साली बुकर नामांकनांच्या अंतिम यादीत स्थान मिळवलेल्या ‘फास्टींग फीस्टींग’ या कादंबरीमुळे अनिता देसाई यांची लोकप्रियता वाढली.

◆ आदिल जस्सावाला यांचे ‘लॅण्ड्स एण्ड’ आणि ‘मिसिंग पर्सन’ हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ मुंबईचा साहित्य महोत्सव अशी ओळख असणारा ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’ हा कार्यक्रम गुरूवारपासून सुरू होत आहे. यात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय असे १४०पेक्षाही अधिक वक्ते सहभागी होणार आहेत.

◆ चर्चासत्रे, कार्यशाळा, सादरीकरणे, व्याख्याने, इत्यादींचा या महोत्सवात समावेश आहे. 

◆ अखेरच्या दिवशी हेमंत दिवटे, कल्पना दुधाळ, मन्या जोशी, प्रज्ञा दया पवार, प्रफुल्ल शिलेदार हे मराठी कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. या महोत्सवासंबंधी अधिक माहिती  https://tatalitlive.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (19/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 भारताची संरक्षण व्यवस्था आणखी मजबूत होणार, रशियाकडून हवाई संरक्षण S-400 प्रणालीच्या पुरवठ्याला सुरुवात

◆ हवाई संरक्षण देणाऱ्या S-400 प्रणालीच्या पुरवठ्यास रशियाकडून अखेर सुरुवात झाली आहे. २०१८ मध्ये रशियाशी S-400 प्रणाली ही ५ अब्ज डॉलर्सला विकत घेण्याबाबतचा करार झाला होता.

◆ S-400 च्या एकुण सहा बटालिन उभारण्यात येणार आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येत आहेत.

◆ हा दौरा होण्यापूर्वी S-400 प्रणालीच्या पुरवठ्याला सुरुवात झाली आहे हे विशेष. डिसेंबर अखेरपर्यंत पहिल्या बटालिनमधील काही यंत्रणा कार्यन्वित झालेली असेल.

◆ एकुण सहा बटालियन्स या पुढील दिड ते दोन वर्षात पुर्णपणे कार्यान्वयित झालेल्या असतील.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ S-400 प्रणाली ही का महत्त्वाची ?
४०० किलोमीटर परिघात ध्वनीच्या १४ पट या प्रचंड वेगाने येणारे कोणतेही लक्ष्य भेदण्याची या प्रणालीची क्षमता आहे.

◆ म्हणजेच कुठल्याही क्षेपणास्त्राला पाडणे S-400 मुळे शक्य होणार आहे. तसंच या प्रणलाीद्वारे लढाऊ विमान, ड्रोन यांना भेदणे सहज शक्य होणार आहे.

◆ राजधानी दिल्ली, मुंबई सारखी शहरे किंवा देशातील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांच्या संरक्षणासाठी S-400 प्रणााली तैनात केली जाऊ शकते. एवढंच नाही तर युद्धप्रसंगी किंवा युद्धजन्य प्रसंगी ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

◆ विशेषतः चीनबरोबर २०१८ पासून सीमा संघर्ष चिघळला असतांना S-400 सारखी हवाई संरक्षण देणारी यंत्रणा दाखल होत आहे ही अत्यंत जमेची बाजू ठरणार आहे.

◆ शक्तीशाली रडार यंत्रणा, विशेष संगणक प्रणाली आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे अशा या प्रणालीचा पसारा आहे.

◆ ४०० किलोमीटरच्या परिघातील लक्ष्य शोधणे आणि प्रणालीद्वारे आदेश देत जमिनीवरुन हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागणे हे अवघ्या काही सेकंदात केलं जातं.

◆ या प्रणालीमुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत मोलाची भर पडणार आहे.

◆ विशेष म्हणजे चीनकडे हीच S-400 प्रणाली २०१५ मध्ये दाखल झाली होती. तर बेलारुस, टर्की, सौदी अरेबिया देशांकडे ही प्रणाली दाखल होण्याबाबत चर्चा सुरु आहे. तर इराण, दक्षिण कोरीया, कतार, इजिप्त हे देश रशियाची ही प्रणाली घेण्यासाठी उत्सुक आहे.

◆ भारताने २०१८ ला S-400 प्रणालीबाबत जेव्हा रशियाशी करार केला तेव्हा अमेरिकेने या कराराला तीव्र विरोध केला होता, काही निर्बंध टाकण्याची धमकी दिली होती.

◆ तरीही अमेरिकेच्या धमकीला भिक न घालता रशिया आणि भारताने हा करार केला होता.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (19/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 व्यक्तिवेध : डॉ. तेजिंदर पाल सिंग

◆ भारतात विशेषकरून महाराष्ट्र व इतर काही राज्यांत कापूस हे शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. बीटी कॉटनवरून वाद झाले असले तरी त्यानंतर कापसाचे उत्पादन काही प्रमाणात वाढल्याचे दिसून आले होते.

◆ शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणाऱ्या या पिकाबाबत जगातील काही मोजक्या संशोधकांनी काम केले आहे. त्यातील एक म्हणजे डॉ. तेजिंदर पाल सिंग.

◆ त्यांच्या नेतृत्वाखाली पंजाब कृषी विद्यापीठात पदव्युत्तर पातळीवर कापसावरील संशोधन गेली तीन दशके चालू होते. डॉ. सिंग यांचे नुकतेच निधन झाल्याने कापूस संशोधन क्षेत्राला पर्यायाने कृषी क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

◆ डॉ. सिंग यांनी डॉ. एल. एस नेगी, एस. एन. सिक्का व ए. बी. जोशी यांच्यासमवेत भारतीय कृषी संशोधन संस्थेत कापसावर काम केले होते. त्यात त्यांना अमेरिकेचे डॉ. एस.जी स्टीफन्स यांचेही सहकार्य होते.

◆ पंजाब विद्यापीठातील कापूस संशोधन विभागात डॉ. सिंग हे प्रमुख होते. त्यांनी भारताच्या एकात्मिक कापूस उत्पादन प्रकल्पात मोलाची भूमिका पार पाडली होती. वनस्पतींचे अंकुरण या विभागात काम करताना त्यांनी कापसाचे उत्पादन नेमके कसे होते, त्यातील टप्पे समजून घेतले होते.

◆ त्यानंतर डॉ. सिंग व त्यांच्या चमूने कमी काळात जास्त उत्पादन देणाऱ्या कापसाच्या प्रजातीही शोधून काढल्या होत्या. कापूस संशोधन नकाशात त्यामुळेच पंजाबला महत्त्वाचे स्थान मिळाले होते.

◆ देशातील कापूस उत्पादकात व वैज्ञानिकात त्यांचे नाव आदराने घेतले जात असे. त्यांना एकूण नऊ पुरस्कार मिळाले होते त्यात डॉ. जी. एस. खुश पुरस्काराचा समावेश होता.

◆ पंजाबच्या राज्यपालांनी त्यांचा सन्मान ‘लीडर ऑफ सव्‍‌र्हे टीम’ म्हणून १९८४ मध्ये केला होता. पंजाब कृषी विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय मंडळाने त्यांच्या नेतृत्वाखालील चमूचा सन्मान केला होता कारण त्यांनी त्या वेळी एलएच ९०० ही कापसाची नवी प्रजाती शोधून काढली होती.

◆ डॉ. सिंग यांनी वेगवेगळय़ा राज्यातील कापूस उत्पादक संघटनांना मोलाचे सल्ले दिले. तेजिंदर यांनी तयार केलेल्या एलएच ९०० या कापसाच्या प्रजातीची लागवड भटिंडा जिल्ह्यात माजी आयएएस अधिकारी अमरजित सिंग संधू यांनी केली होती. तेथे या कापसाच्या चाचण्या पहिल्यांदा झाल्या होत्या.

◆ तेजिंदर यांचा जन्म २८ जून १९३५ रोजी लुधियानातील भैनी दारेसा खेडय़ात झाला. नंतर त्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर पंजाब कृषी विद्यापीठात १९६९ पासून काम सुरू केले होते. त्या वेळी ते सहायक कापूस संशोधक होते.

◆ विशेष म्हणजे पंजाब कृषी विद्यापीठात काम करताना ते वनस्पती संशोधन विभागाचे अधिष्ठाता होते. त्यांना नागपूर येथील कापूस संशोधन व विकास संस्थेने पुरस्कार देऊन गौरवले होते. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (19/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘  ‘फिच’कडून देशाचे पतमानांकन ‘जैसे थे’

◆ नवी दिल्ली : जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्ज’ भारताचे सार्वभौम पतमानांकन नकारात्मक दृष्टिकोनासह ‘बीबीबी – (उणे)’ पातळीवर मंगळवारी कायम राखले.

◆ प्रचंड मोठे सार्वजनिक कर्ज, कमजोर वित्तीय क्षेत्र, अडखळलेल्या स्थितीत असलेल्या काही संरचनात्मक सुधारणा हे नकारात्मक घटक असले तरी, बाह्य़ धक्क्य़ांना पचवू शकणारे उमदी विदेशी चलन गंगाजळी ही जमेची बाब असून, त्यामुळे मध्यम अवधीत अर्थव्यवस्थेच्या वाढीला असणारे धोके निवळतील, असा तिचा सकारात्मक सूरही आहे.

◆ पतमानांकन आहे त्या पातळीवर कायम राखले जाणे हे अर्थव्यवस्थेतील दीर्घावधीसाठी अनिश्चिततेचा दृष्टिकोनालाच दर्शविणारे आहे.

◆ तथापि, कोविड-१९ साथीच्या परिस्थितीतून ज्या तीव्र गतीने देशाच्या अर्थव्यवस्थेने सावरून डोके वर काढले आहे आणि वित्तीय क्षेत्रावरील हलका होत असलेला ताण पाहता, अर्थ-दृष्टिकोनाबाबत मध्यम कालावधीतील जोखीम निवळत जाईल, असाही फिचचा कयास आहे.

◆ विद्यमान, मार्च २०२२ अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षांसाठी फिचने ८.७ टक्क्यांचा वाढीचा, तर त्यानंतर आर्थिक वर्षांसाठी (२०२२-२३) १० टक्क्य़ांच्या वाढीचा आश्वासक अंदाज व्यक्त केला आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Forwarded from TARGET MPSC (MH) via @like
📚 #Polity Special (26/10/2018)*📚
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*◆भारतीय राज्यघटनेची निर्मितीप्रक्रिया◆*

◆ भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया
विसाव्या शतकात अभ्यासपूर्ण
राजकीय तात्त्विक मांडणी करणारा
पाश्चात्त्य विचारवंत म्हणजे जॉन रॉल्स.
या लेखात आपण जॉन रॉल्स या
समकालीन विचारवंताने मांडलेल्या
विचारांचा आढावा घेणार आहोत.

◆ त्रिमंत्री योजनेतील तरतुदीनुसार ३८९
सभासदांची एक घटना समिती निर्माण
झाली. या घटना समितीमध्ये पुढील
तीन प्रकारचे प्रतिनिधी होते :

◆ ब्रिटिश प्रांताचे- २९२, मुख्य
कमिशनरच्या प्रांताचे- ४३,
संस्थानिकांचे- ९३.
जुलै १९४६ मध्ये घटना समितीच्या
सभासदांची निवडणूक झाली.

◆ २५ जुलै १९४६ ला या निवडणुकीचा
निकाल जाहीर झाला. एकूण जागा-
२९६ इतक्या होत्या. त्यापकी काँग्रेस
पक्षाला- २१२, मुस्लीम लीगला – ७३
आणि इतर पक्षांना ११ जागा
मिळाल्या.

◆ संस्थानासाठी असलेल्या ९३ जागांसाठी
निवडणुका झाल्या नाहीत. त्यांचे
प्रतिनिधी नियुक्त झाले.
https://www.tg-me.com/targetmpscmh
◆ मुस्लीम लीगने घटना समितीवर
बहिष्कार टाकला. घटना समितीवर पं.
नेहरू, डॉ. राजेंदप्रसाद, वल्लभभाई
पटेल, डॉ. राधाकृष्णन, मौलाना
आझाद, एम. गोपालस्वामी अय्यंगार,
कृष्णस्वामी अय्यंगार, टी. टी.
कृष्णम्माचारी, के. एम. मुन्शी, पंडित
गोविंद वल्लभ पंत, जे. बी. कृपालानी,
बी. जी. खेर, सी. राजगोपालचारी, बॅ.
जयकर या व्यक्ती आल्या. घटना
समितीत बहुसंख्य सदस्य हे काँग्रेस
पक्षाचे होते. तरीही शेडय़ुल्ड कास्ट
फेडरेशनचे नेते डॉ. बाबासाहेब
आंबेडकर, मुस्लीम लीगचे नेते महंमद
सादुल्ला, हिंदू महासभेचे नेते
श्यामाप्रसाद मुखर्जी तसेच सरोजिनी
नायडू, विजयालक्ष्मी पंडित, बेगम
रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता
आणि रेणूका रे या प्रथितयश महिला
सभासदांचा घटना समितीत समावेश
होता.

◆ ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे
पहिले अधिवेशन दिल्ली येथील
संविधान सभागृहात (सध्याचा सेंट्रल
हॉल) सुरू झाले. ते २३ डिसेंबर १९४६
पर्यंत चालले. पहिल्या अधिवेशनाच्या
अध्यक्षस्थानी पहिले दोन दिवस डॉ.
सच्चिदानंद सिन्हा होते. ११ डिसेंबर
१९४६ नंतर डॉ. राजेंद्रप्रसाद हे
घटनासमितीचे अध्यक्ष झाले.

■ मसुदा समिती ■

◆ २९ ऑगस्ट १९४७ साली घटनेची
मसुदा समिती (Drafting
Committee) निर्माण झाली. डॉ.
बाबासाहेबाची मसुदा समितीच्या
अध्यक्षपदी निवड झाली. या
समितीवरच राज्यघटना लिहिण्याची
जबाबदारी टाकली होती. मसुदा
समितीचे सदस्य म्हणून अलादी
कृष्णस्वामी अय्यर, डॉ. कन्हैयालाल
मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगर, मोहंमद
सादुल्ला, टी. टी. कृष्णम्माचारी (डी.पी.
खैतान यांच्या मृत्युनंतर नियुक्ती), एन.
माधव राऊ (बी. एल. मित्तर यांनी
आरोग्याच्या कारणाने राजीनामा
दिल्यानंतर नियुक्ती) यांनी काम केले.
राज्यघटना निर्मिती करणे ही या
समितीची महत्त्वाची जबाबदारी होती.

◆ २१ फेब्रुवारी १९४८ साली मसुदा
समितीने भारतीय राज्यघटनेचा
अधिकृत मसुदा घटनासमितीला सुपूर्द
केला. त्यानंतर घटना समितीत त्यावर
सविस्तर चर्चा केली. मसुदा समितीने
तयार केलेल्या मसुद्यांवर त्यानंतर एक
अहवाल प्रसिद्ध केला. घटना मसुद्यावर
११४ दिवस विचारविनिमय केला. डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या
संमतीचा ठराव मांडला. तो ठराव मंजूर
झाल्याचे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी
घोषित करण्यात आले. त्या दिवशी
घटना समितीचे अध्यक्ष डॉ.
राजेंद्रप्रसाद यांची त्यावर स्वाक्षरी
झाली. राज्यघटनेच्या अंतिम मसुद्याची
एकूण तीन वाचने झाली.

◆ प्रथम वाचन
( ४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर १९४८)
◆ दुसरे वाचन
(१५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर १९४९)
◆ तिसरे वाचन
(१४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर १९४९)
◆ भारतीय राज्यघटनेतील एकूण
सदस्यांपकी त्या दिवशी उपस्थित
असणाऱ्या २८४ सदस्यांनी स्वाक्षऱ्या
केल्या. त्यानंतर दोन महिन्यांनी
म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी
राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू
झाली आणि भारत हे राष्ट्र प्रजासत्ताक
गणराज्य झाले. आजही २६ जानेवारी
हा दिवस संपूर्ण देशभर भारतीय
प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला
जातो.

◆ घटना समितीच्या बैठका ◆

◆ घटना समितीच्या एकूण ११ बैठका
झाल्या. २४ जानेवारी १९५० रोजी
घटना समितीची शेवटची बठक झाली.
सर्व सभासदांनी त्या वेळी भारताच्या
राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या.

उर्वरित भाग उद्याच्या लेखात पाहूयात..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  20/11/2021  ■
                        वार :-  शनिवार 
         
          ■    दिनविशेष : 20 नोव्हेंबर     ■

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                  ■   जागतिक दिवस   ■

                ●  आंतरराष्ट्रीय बाल दिन  ●
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

● १७८९: न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले.

● १८७७: थाॅमस अल्वा एडिसन यांनो ग्रामोफोन चा शोध लावला.

● १९१७: युक्रेन प्रजासत्ताक बनले.

● १९४५: न्युरेम्बर्ग ट्रायल्स – दुसर्‍या महायुद्धातील गुन्ह्यांसाठी २४ जणांवर खटला सुरू झाला.

● १९५९: युनायटेड नेशन्सने बालहक्कांच्या घोषणापत्राची दखल घेतली.

● १९८५: मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० प्रकाशीत झाले.

● १९९४: भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली.

● १९९७: अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.

● १९९८: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.

● १९९९: अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्ट पुरस्कार लता जोशी यांना जाहीर.

● १९९९: आर. जी. जोशी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर.

● २००८: अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्स निर्देशांक १९९७ पासुनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                 ■   जन्म/वाढदिवस   ■

● १६०२: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ ऑट्टो फोन ग्वेरिक यांचा जन्म.

● १७५०: म्हैसूर चा राजा शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान यांचा जन्म. (मृत्यू: ४ मे १७९९)

● १८५४: कवी, निबंधकार व नाटकाकर मोरो गणेश लोंढे यांचा जन्म.

● १८८९: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५३)

● १८९२: इंसुलिन चे सह्संशोधक जेम्स कॉलिप यांचा जन्म. (मृत्यू:  १९ जून १९६५)

● १९०५: संसदपटू, अर्थतज्ञ, घटनापंडित मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९९८)

● १९१०: डच भौतिकशास्त्र विलेम जेकब व्हान स्टाॅकम यांचा जन्म.

● १९२४: फ्रेंच गणितज्ञ बेनुवा मँडेलब्रॉट यांचा जन्म.

● १९२७: न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म.

● १९३९: साहित्यिक वसंत पोतदार यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल २००३ – नाशिक)

● १९४१: उर्दू लेखिका हसीना मोईन यांचा जन्म.

● १९६३: इंग्लिश गणितज्ञ तिमोथी गॉवर्स यांचा जन्म.

● १९६९: अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांचा जन्म.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

● १८५९: स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १७७९)

● १९०८: बंगालमधील सुप्रसिद्ध क्रांतिकारक कन्हय्यालाल दत्त यांना फाशी.

● १९१०: रशियन साहित्यिक लिओ टॉलस्टॉय यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १८२८)

● १९५४: सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाइड व्हर्नन सेसेना यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८७९)

● १९७०: ख्यातनाम मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचे निधन. (जन्म: १४ जुलै १८८४)

● १९७३: पत्रकार व समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १८८५)

● १९८४: लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९११)

● १९८९: किरण घराण्याच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचे निधन. (जन्म: १९ मे १९०५ – बडोदा)

● १९९७: स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे स्वीय सहाय्यक शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.

● १९९८: संस्कृतच्या विविध शास्त्रांतील पंडित, प्रख्यात मीमांसक दत्तात्रेयशास्त्री तांबे गुरूजी यांचे निधन.

● १९९९: तमाशा कलावंत (सोंगाड्या) दत्ता महाडिक पुणेकर यांचे निधन.

● २००३: सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचे पहिले राष्ट्राध्यक्ष डेव्हिड डेको यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १९३०)

● २००७: रोडेशिया देशाचे पहिले पंतप्रधान इयान स्मिथ यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९१९)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (20/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत १३ टक्क्यांनी घट

◆ नवी दिल्ली : अमेरिकेत करोना विषाणूचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने तेथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.

◆ २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांत, मागील वर्षांच्या तुलनेत १३ टक्के कमी भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी अमेरिकेत गेले.

◆ इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशनच्या सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

◆ अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी विद्यार्थी संख्या कमी होण्यासाठी करोना महासाथीला जबाबदार धरले आहे.

◆ अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या चीनमधील आहे. ओपन डोर्स संस्थेच्या २०२१ च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

◆ नवी दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थी संख्येशी संबंधित संस्थांचे हे अहवाल सोमवारी माध्यमांसमोर प्रसिद्ध केले. ते म्हणाले की, केवळ या वर्षीच्या उन्हाळ्यात ६२ हजारांहून अधिक जणांना विद्यार्थी व्हिसा जारी करण्यात आला आहे.

◆ जारी केलेल्या व्हिसाची ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. व्हिसा जारी केलेल्यांपेक्षा कमी विद्यार्थी भारतातून अमेरिकेत गेले. यावरून असे दिसून येते की भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेण्यास उत्सुक आहेत परंतु करोना उद्रेकामुळे ते संकोच करतात.

◆ अमेरिकेच्या दूतावासातील सांस्कृतिक आणि शिक्षण सल्लागार अँथनी मिरांडा यांच्या मते, यावरून विद्यार्थ्यांचा अमेरिकेमधील अभ्यासाकडे सकारात्मक दृष्टिकोन दिसून येते. ते म्हणाले, करोनाचा परिणाम जगभरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, प्रवासावर झाला आहे.
याचा फटका अमेरिकेलाही बसला आहे. त्यामुळे जगातील देशांतून अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.

★ करोना साथीचा परिणाम

* २०२०-२१ या वर्षांत अमेरिकेत जाणाऱ्या एकूण भारतीयांच्या संख्येत १३ टक्के घट झाली आहे.

* अमेरिकेत पोहोचलेल्या एकूण परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी घट झाली आहे.

* अमेरिकेत शिकणाऱ्या एकूण परदेशी विद्यार्थ्यांची संख्या ९ लाख १४ हजारांपेक्षा जास्त आहे हे उल्लेखनीय. यापैकी भारतीय विद्यार्थी सुमारे २० टक्के (एक लाख ६७ हजार ५८२) आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (20/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘  ‘एमपीएससी’तील अपुऱ्या सदस्यसंख्येचा उमेदवारांच्या मुलाखतींना फटका

◆ तातडीने सदस्य नियुक्ती न झाल्यास २३ हजार मुलाखतींना विलंब 

◆ पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (एमपीएससी) अपुऱ्या सदस्यसंख्येचा उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेला फटका बसत आहे.

◆ सध्या आयोगात प्रभारी अध्यक्षांसह तीनच सदस्य कार्यरत असून, शासनाने आयोगातील उर्वरित रिक्त पदांवर सदस्यांची तातडीने नियुक्ती न केल्यास सुमारे २३ हजार मुलाखतींना विलंब होणार असल्याचे चित्र आहे.

◆ स्पर्धा परीक्षा प्रक्रिया रखडल्याने निराश झालेल्या स्वप्नील लोणकर या पुण्यातील तरुणाने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती.

◆ त्यानंतर राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने आयोगातील सदस्यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते. त्या वेळी आयोगात केवळ दयानंद मेश्राम हे एकमेव सदस्य कार्यरत होते.

◆ पवार यांच्या घोषणेनंतर तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र मेश्राम यांचा कार्यकाळ संपल्याने आता पुन्हा आयोगात तीनच सदस्य बाकी आहेत.

◆ सध्या आयोगाकडून २०१९च्या जाहिरातीतील पोलिस उपनिरीक्षक आणि स्थापत्य अभियांत्रिकी या पदांसाठीच्या ४ हजार ९०० उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत.

◆ त्याशिवाय राज्यसेवा २०२०सह विविध परीक्षांतील वेगवेगळय़ा पदांसाठीच्या सुमारे १८ हजार मुलाखती येत्या काळात होणार आहेत. 

◆ या पार्श्वभूमीवर, सध्या आयोगात कार्यरत असलेल्या तीन सदस्यांनाच २३ हजार मुलाखती घ्याव्या लागल्यास मुलाखतींची प्रक्रिया जवळपास दोन वर्षे सुरू राहील.

◆ त्यामुळे पदभरती प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यासाठी शासनाने तातडीने आयोगातील उर्वरित रिक्त पदांवर सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

◆ आयोगात सर्व सहा सदस्य असण्याची मागणी २०१८पासून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्षच केले आहे.

◆ गेल्या तीन वर्षांत कायमच आयोगातील सदस्यसंख्या दोन ते तीनच ठेवण्यात आली आहे. आयोगासारख्या घटनात्मक संस्थेकडे राज्य शासन लक्ष देत नाही. आयोग पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याचा फटका उमेदवारांच्या मुलाखतींना, पर्यायाने एकूण निकाल प्रक्रियेवरही होत आहे.

◆ आयोगातील रिक्त पदांवर सदस्यांची तातड़ीने नियुक्ती करण्याबाबतची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰 Geography Special (20/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 भारतातील प्रमुख आदिवासी जमाती

जमात राज्य

अबोर अरुणाचल प्रदेश
आपातनी अरुणाचल प्रदेश
आओ नागाल्यांड
अंगामी नागाल्यांड
कोल छत्तीसगढ
कोटा तामिळनाडू
मुंडा झारखंड
कोलाम आंध्र प्रदेश
छुतीया आसाम
चेंचू आंध्र प्रदेश
गारो मेघालय, आसाम, नागाल्यांड
बैगा छत्तीसगढ,झारखंड
भिल्ल राजस्थान, छत्तीसगढ
बदगा निलगिरी पर्वत तामिळनाडू
भोट हिमाचल प्रदेश
लेपचा सिक्कीम
वारली महाराष्ट्र
चकमा त्रिपुरा
गड्डी हिमाचल प्रदेश
जयंती मेघालय
बोदो आसाम
खासी आसाम, मेघालय, नागाल्यांड
गोंड महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
लुशिया त्रिपुरा
मोपला केरळ
भुतिया उत्तरांचल
जारवा छोटे अंदमान
कुकी मणिपूर
कुरुख झारखंड, ओरीसा
अका,मिश्मी, अरुणाचल प्रदेश
डाफला अरुणाचल प्रदेश
कोरबा छत्तीसगड, महारष्ट्र
हो छोटा नागपूर
मुरीया बस्तर छोटा नागपूर
संथाल वीरभूम,झारखंड
गुज्जर हिमाचल प्रदेश
खोंड ओरिसा
मिकिर आसाम
उरली केरळ
मीना राजस्थान
ओरेओन पश्चिम बंगाल, झारखंड
तोडा निलगिरी पर्वत तामिळनाडू
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰🔰चालू घडामोडी (20/11/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 Anti Satellite test : रशियाने केली उपग्रहाचा वेध घेणारी क्षेपणास्त्र चाचणी, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक होतं दोन तास रेड अलर्टवर

◆ एकेकाळी अमेरिकेशी टक्कर देणारा सोव्हिएत रशिया आता पुन्हा एकदा नवी उभारी घेण्याची प्रयत्न करत आहे. विविध माध्यमातून आपले अस्तित्व जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, संरक्षण क्षेत्रात आपली ताकद वाढवत आहे.

◆ याचाच एक भाग म्हणून रशियाने सोमवारी उपग्रहाचा वेध घेणारी उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करत जगात चर्चेत रहाण्याचा प्रयत्न केला आहे.

◆ सुमारे ३५० किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेला Kosmos-1408 या कृत्रिम उपग्रहाचा जमिनीवरुन क्षेपणास्त्र डागत रशियाने यशस्वीरित्या वेध घेतला.

◆ सुमारे एक टन वजनाचा Kosmos-1408 हा हेरगिरी उपग्रह १९८२ ला प्रक्षेपित करण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी या उपग्रहाचा कार्यकाल संपला होता.

◆ उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी म्हणजे ठराविक कालावधीनंतर करण्यात येणाऱ्या चाचणीचा एक भाग असल्याचं रशियाकडून सांगण्यात येत आहे.

◆ या चाचणीवर अमेरिकेने सडकून टीका केली आहे. ‘बेजवाबदार’ अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

◆ रशियाच्या या उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे ३५० किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर सुमारे १५०० तुकडे ( satellite debris ) तयार झाले असून ते आता पृथ्वीभोवती वेगाने प्रदक्षिणा घालत आहेत. यामुळे भविष्यातील उपग्रह प्रक्षेपण मोहिमांना धोका निर्माण होऊ शकतो अशी भिती अमेरिकेने व्यक्त केली आहे.

◆ तर अमेरिकेची मुख्य अवकाश संशोधन संस्था ‘नासा’नेही स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या चाचणीमुळे ४०२ किलोमीटर उंचीवरुन दर ९० मिनिटांनी पृथ्वीप्रदक्षिणा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला धोका उत्पन्न झाला होता.

◆ सध्या या अवकाश स्थानकात अमेरिकेचे चार,एक जर्मनीचा आणि दोन रशियाचे असे एकुण ७ अंतराळवीर आहेत. या चाचणीमुळे अवकाश स्थानकासाठी आणीबाणी जाहिर करत सर्व अंतराळवीरांवर अवकाश स्थानकात एका सुरक्षित ठिकाणी दोन तास आसरा घेण्याची वेळ आली.

◆ चाचणीमुळे तयार झालेल्या तुकड्यांच्या स्थानाचा आढावा घेण्यात आल्यानंतर दोन तासांनी अवकाश स्थानकातील काम पुर्ववत सुरु करण्यात आले. अशा चाचणीमुळे स्वतःच्याच देशाच्या अंतराळवीरांना अडचणीत आणल्याबद्दल नासाने आश्चर्य व्यक्त केलं, संपुर्ण अवकाश स्थानकाला धोका निर्माण केल्याबद्द्ल नाराजी व्यक्त केली आहे.

◆ सध्याच्या काळात उपग्रह भेदी क्षेपणास्त्र हे एक प्रमुख अस्त्र समजलं जातं, ऐन युद्धाच्या काळात हेरगिरी करणाऱ्या उपग्रहाचा वेध घेण्याच्या क्षमतेमुळे युद्धाचे पारडं फिरवलं जाऊ शकतं. रशिया, अमेरिका, चीन आणि भारत या फक्त चार देशांकडेच ही क्षमता आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
2024/12/24 14:06:30
Back to Top
HTML Embed Code: