Telegram Web Link
🔰चालू घडामोडी (24/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 ऑस्करसाठी दोन भारतीय चित्रपटांना नामांकन, पण नेमकी कशी असते ऑस्करची प्रक्रिया?

◆ दरवर्षी ज्युरी ऑस्कर पुरस्कारासाठी अनेक चित्रपटांची निवड करते.

◆ दरवर्षी ज्युरी ऑस्कर पुरस्कारासाठी अनेक चित्रपटांची निवड करते.

◆ पुढील वर्षी २७ मार्च २०२२ रोजी ९४ वे अकादमी पुरस्कारा(Academy Awards)चे आयोजन करण्यात येणार आहे.

◆ दरवर्षी भारतीय चित्रपटातील अनेक चित्रपट ऑस्कर(Oscar)साठी नामांकित केले जातात.

◆ भारतातून ऑस्कर प्रवेशासाठी चित्रपट निवड प्रक्रिया सोमवारी कोलकत्ता येथे सुरू झाली.

◆ शाजी एन करण यांच्या अध्यक्षतेखाली फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या १५ सदस्यीय ज्यूरीने अकादमी पुरस्कारांमध्ये भारताच्या प्रवेशासाठी १४ चित्रपटांची निवड केली.

◆ यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा ‘शेरनी’ (Sherni) आणि अभिनेता विक्की कौशल याचे ‘सरदार उधम’ (Sardar Udham) असे अनुक्रमे या चित्रपटांची पुढील वर्षीच्या ऑस्करसाठी निवड झाली आहे.

◆ या दोन्ही चित्रपटांची ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ‘फिचर फिल्म’ श्रेणीसाठी निवड झाली आहे.

★ ऑस्कर पुरस्कारची स्थापना

◆ ऑस्कर पुरस्कार अर्थात अकॅडमी पुरस्कार आहे. हे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स ॲंड सायन्स या चलचित्र अकादमीमार्फत दिले जाणारे वार्षिक पुरस्कार आहेत.

◆ चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ मेट्रो-गोल्डिन-मेयर स्टुडिओचे लुईस बी. मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स ॲंड सायन्स अकादमीची स्थापना केली, तसेच ऑस्कर पुरस्कारांचीही सुरुवात केली.

★ ऑस्करची निवडप्रक्रिया असते तरी कशी?

◆ ‘द अकॅडमी’चे जगभरात जवळपास ६३०० सदस्य आहेत. त्यात भारताचे ५०च्या आसपास सदस्य आहेत.

◆ यामध्ये अर्ध्याहून जास्त सदस्यांची मतं मिळाली म्हणजे सर्वोत्कृष्ट सिनेमाचा ऑस्कर पुरस्कार मिळतो.

◆ ही मतं मिळवण्याची प्रक्रियाही तितकीच रंजक असते. इथल्या प्रत्येक सदस्यापर्यंत आपला चित्रपट पोहोचवावा लागतो.

◆ त्यासाठी एक एजंट नेमावा लागतो. त्यानंतर चित्रपटाबरोबरच जागतिक मुल्य असावी लागतात. हा सर्व फिल्म मॅनेजमेन्ट तसेच चित्रपट व्यवस्थापनाचा भाग आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (24/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘  ‘ऑस्कर’साठी भारताकडून ‘कूळंगल’

◆ तमिळ दिग्दर्शक विनोथराज यांचा पहिलाच चित्रपट

◆ मुंबई : ९४ व्या अकादमी पुरस्कारासाठी ‘कूळंगल’ हा तमिळ चित्रपट भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

◆ जवळपास १४ हिंदी, मराठी, मल्याळम, तमिळ, गुजराती चित्रपटांमधून दिग्दर्शक शाजी करूण यांच्या नेतृत्वाखालील समितीने ‘कूळंगल’ची निवड केली आहे.

◆ ‘कूळंगल’ हा दिग्दर्शक पीएस विनोथराज यांचा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाने याआधीच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून नाव कमावले आहे.

◆ ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने ऑस्कर पुरस्कारांसाठी १४ चित्रपटांची यादी केली होती. यात हिंदीतील विद्या बालनची भूमिका असलेला ‘शेरनी’, शूजित सिरकार दिग्दर्शित ‘सरदार उधम’ यांच्यासह सिध्दार्थ मल्होत्राची मुख्य भूमिका असलेला ‘शेरशहा’, फरहान अख्तरचा ‘तूफान’ आणि पंकज त्रिपाठींचा ‘कागझ’ हे चित्रपटही स्पर्धेत होते.

◆ मराठीतील ‘आता वेळ आली’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘गोदावरी’ हे तीन चित्रपट स्पर्धेत होते. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ ‘सरदार उधम’ला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे आणि अमित मसूरकर दिग्दर्शित ‘शेरनी’च्या वेगळेपणामुळे या दोन चित्रपटांपैकी एकाची निवड केली जाईल, अशी चर्चा होती.

◆ मात्र ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’चे सचिव सुप्रन सेन आणि शाजी करूण यांनी शनिवारी ‘कूळंगल’ या चित्रपटाची अधिकृत प्रवेशिका म्हणून घोषणा केली.

★ पिता-पुत्राचे भावबंध

◆ ‘कूळंगल’ची कथा ही दारूच्या नशेत बुडालेला बाप आणि मुलगा यांच्या नातेसंबंधाभोवती फिरते. नवऱ्याच्या व्यसनाला कंटाळून माहेरी निघून गेलेल्या आपल्या आईला परत आणण्यासाठी मुलाने आणि वडिलांनी केलेला प्रवास अशी या चित्रपटाची सर्वसाधारण कथा असून दिग्दर्शक विनोथराज यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनेवरून कथा प्रेरित असल्याचे सांगण्यात येते.

◆ ‘कूळंगल’ हा चित्रपट यावर्षाच्या सुरूवातीलाच नेदरलँड येथे आयोजित केलेल्या रॉटरलँडच्या ५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला होता.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (24/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 मूळ उत्तरपत्रिकेची छायाप्रत, गुण एमपीएससीकडून संकेतस्थळावर

◆ पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० साठी उपस्थित सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकांची स्कॅन छायाप्रत, निकालासाठी गृहित धरलेले गुण आणि प्रवर्गांसाठीचे पात्रता गुण संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

◆ त्यामुळे उमेदवारांना त्यांचे गुण पाहण्यासाठी उपलब्ध होणार असून, आयोगाने पहिल्यांदाच अशा प्रकारे मूळ उत्तरपत्रिकांची प्रत उपलब्ध करून दिली आहे.

◆ एमपीएससीने परिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. उमेदवारांना मूळ उत्तरपत्रिकांची स्कॅन छायाप्रत पाहण्यासाठी संकेतस्थळावरील ऑनलाइन फॅसिलिटीजमध्ये जाऊन व्ह्यू मार्कशीट हा पयार्य निवडावा लागेल.

◆ त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी लागेल. परीक्षेच्या अर्जात नमूद केलेला मोबाइल क्रमांक त्या मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी भरून लॉगीन केल्यावर गुणपत्रक आणि स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध होईल.

◆ या कार्यपद्धतीनुसार गुणपत्रक आणि स्कॅन उत्तरपत्रिका मिळण्यात अडचण येत असल्यास १८००१२३४२७५, ७३०३८२१८२२ या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

◆ तसेच ही सुविधा १० नोव्हेंबरपर्यंत खुली राहणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ एमपीएससीचा हा निर्णय उमेदवारस्नेही आणि अधिक पारदर्शकतेकडे घेऊन जाणारा असल्याची प्रतिक्रिया उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

◆ २००३ पासून एमपीएससीकडून उमेदवारांना उत्तरतालिका देण्यास सुरुवात झाली. २००७ पासून उत्तरपत्रिकेची कार्बनकॉपी देण्यात येऊ लागली. त्यावेळी तो निर्णय घेणारा एमपीएससी हा देशातील पहिला लोकसेवा आयोग होता.

◆ आता तंत्रज्ञान अधिक विकसित झाल्याने उमेदवारांची मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन छायाप्रत आणि उमेदवारांचे गुण, प्रवर्गनिहाय पात्रता गुण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. देशात पहिल्यांदाच एमपीएससीकडून उमेदवारांना त्यांची मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन छायाप्रत देण्यात येत आहे.

◆ याद्वारे एमपीएससीच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यास मदत होईल.          – सुनील अवताडे,
सहसचिव, एमपीएससी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📚History Special (10/07/2020)📚
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

★ लखनौ करार

■ लखनौ अधिवेशन (1916) जहाल–मावळ एकत्र येण्याची कारणे

◆ जुने वाद आता अर्थहीन झाले होते.

◆ जहाल- मवाळाना जाणवले कि आपल्या फुटीमुळे राष्ट्रीय चळवळीचे नुकसान होत आहे.

◆ टिळक व बेझंटचे दोन्ही गटाच्या (जहाल-मवाळ) एकतेसाठी अथक प्रयत्न.

◆ गोपाल कृष्ण गोखले व फिरोजशहा मेहता याचे निधन.

★ लखनौ अधिवेशन (1916) –मुस्लिम लीग व कॉंग्रेस एकत्र येण्याची कारणे

◆ १९१२-१३ च्या बाल्कन युद्धात ब्रिटनने तुर्कीला साहाय्य करण्यास दिलेला नाकार.

◆ १९११- बंगालची फाळणी रद्द केली.

◆ अलिगढ विद्यापीठ स्थापन करण्यास मदत करण्यास सरकारचा नकार.

◆ मुस्लिम लीगच्या तरुणांचे हळूहळू राष्ट्रवादी राजकारणाकडे प्रेरित होणे.

◆ दुसर्या महायुद्धादरम्यान सरकारचे दमनकारी धोरण.

★ लखनौ करारातील तरतुदी

◆ कॉंग्रेसच्या स्वराज्याच्या मागणीस लीगचा पाठींबा

◆ मुस्लिमांसाठी वेगळ्या मतदार संघास कॉंग्रेसचा पाठींबा

◆ प्रांतिक विधानसभेत निर्वाचित भारतीय सदस्यांपैकी एक निश्चित भाग मुस्लिमांसाठी राखीव ( पंजाब-५०%, बंगाल-४०%, मुंबईसहित शिंध-३३%, संयुक्त प्रांत-३०%, बिहार-२५%, मद्रास-१५%) केंद्रीय विधीमंडळात भारतीय सदस्याच्या १/९ भाग मुस्लिमांसाठी राखीव

◆ कोणत्याही सभेत कोणताही प्रस्ताव कोणत्याही सांप्रदाइक हिताच्या विरुद्ध असेल अनी ३/४ सदस्य त्याविरोधात असतील तर तो पास होणार नाही.

◆ लखनौ करारानंतर कॉंग्रेस व मुस्लिम लीगने सरकारला आपल्या संयुक्त मागण्या सादर केल्या.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ सरकारने भारताला उत्तरदायी शासन देण्याची लवकर घोषणा करावी

◆ प्रांतिक विधान सभांत निर्वाचित भारतीय सदस्यांची संख्या वाढवावी आणि त्यांच्या अधिकारात वाढ करावी.

◆ व्हाइसरॉयच्या कार्यकारणीतील निम्मे सदस्य भारतीय असावेत

★ लखनौ करारातील नकारात्मक बाजू

◆ तरतुदींमध्ये दूरदर्शीपणाचा अभाव

◆ मुस्लिमांसाठी वेगळ्या मतदारसंघाला कॉंग्रेसची संमती-

◆  द्विराष्ट्र सिद्धांताचे बीज

◆ नेत्यांमध्ये जरी एकता झाली तरी हिंदू मुस्लिम जनतेत एकता प्रस्थापित करण्यास कोणतीही प्रेरणा नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  25/10/2021  ■
                        वार :- सोमवार 
         
          ■    दिनविशेष : 25 ऑक्टोबर     ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

◆ २००९ : बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.

◆ १९९९ : दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ’बूकर पारितोषिक’ दुसर्‍यांदा मिळाले.

◆ १९९४ : ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

◆ १९६२ : युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

◆ १९५१ : स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशातील चिन्नी येथे पहिले मतदान झाले. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या निवडणूकांचा शेवटचा टप्पा पार पडला. या निवडणुकीत ४५.७% मतदान झाले.
https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

◆ १९४५ : अपर्णा सेन – अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका

◆ १९३७ : डॉ. अशोक रानडे – संगीत समीक्षक (मृत्यू: ३० जुलै २०११)

◆ १८८१ : पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार (मृत्यू: ८ एप्रिल १९७३)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

◆ २०१२ : जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (जन्म: ३ मार्च १९५५)

◆ २००९ : चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (जन्म: १४ जानेवारी १९२३)

◆ २००३ : पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. न्याय, वेदांत व्याकरण आदिशास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला. अवघ्या वीस सहकार्‍यांना बरोबर घेऊन त्यांनी ’स्वाध्याय परिवार’ सुरू केला. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. (जन्म: १९ आक्टोबर १९२०)

◆ १९८० : अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार (जन्म: ८ मार्च १९२१)

◆ १९५५ : पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, ’पायोजी मैने रामरतन धन पायो’, ’ठुमक चलत रामचंद्र’, ’चलो मन गंगा जमुनातीर’ ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. ’सुध मुद्रा, सुध बानी’ हे गायकासंबंधी सांगितलेले कलागुण त्यांच्यात प्रकर्षाने दिसत असत. गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे ते वडील होत. (जन्म: २८ मे १९२१)

◆ १६४७ : इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक (जन्म: १५ आक्टोबर १६०८)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🛑 1200 रु मिळावा.
Fully Trusted, Account open करा व Refer करा आणि मिळवा 1200 रुपये लगेच. ऑफर फक्त 1 नोव्हेंबर पर्यंत. Account open करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Help:- 9730150303

Sign up now with my link to open your account: https://bv7np.app.goo.gl/bmNm
🛑 Job Updates
=========================
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकार यांच्या विविध पदांच्या ६४ जागा
https://t.co/nauVrHM8Nb?amp=1
=========================
केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये विविध वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६० जागा
https://t.co/JYT5MAr1Yl?amp=1
=========================
पुणेच्या ससून सर्वोपचार रुग्णालयात विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ६० जागा
https://t.co/ggzPJKwgT4?amp=1
=========================
गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा
https://t.co/JEh5akRUsW?amp=1
=========================
लोकसभा सचिवालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा
https://t.co/4JCkDyj4Sf?amp=1
========================
मुंबई येथील कृषि विज्ञान केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ९ जागा
https://t.co/8VzoQSBhKO?amp=1
========================
पुणे येथील कृषी विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा
https://t.co/52TzbQOEG4?amp=1
=========================
राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा
https://t.co/cHW1Ce6cab?amp=1
=========================
कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
📚History Special (03/07/2020)*📚
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

★ राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने ★

1) 1885- मुंबई - व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी
◆ या अधिवेशनात 72 प्रतिनिधी   उपस्थित होते.

2) 1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी 
◆ पहिले पारसी अध्यक्ष.

3) 1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी 
◆ पहिले मुस्लीम अध्यक्ष

4) 1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल 
◆ पहिले ब्रिटीश अध्यक्ष

5) 1889-  मुंबई-  सर विल्यम वेडनबर्ग 
◆ दुसरे ब्रिटीश अध्यक्ष

7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू

11) 1895  -पुणे  -सुरेंद्रनाथ बॅनर्जी 
◆ ICS परीक्षा भारतात घेतली.

12) 1896  -कलकत्ता-  महमद रहिमतुल्ला सयानी
◆ या अधिवेशनात वंदे मातरम हे गीत टागोरांनी गायले.

16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर 
◆ पहिले मराठी अध्यक्ष

22) 1906  -कलकत्ता  -दादाभाई नौरोजी 
◆ स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच चतुसुत्रीचा स्विकार केला.

23) 1907 - सुरत  - रासबिहारी घोष 
◆ मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट

26) 1911 - कलकत्ता - बिशण नारायण धर 
◆ जण-गण-मन टागोरांनी गायले.

31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार
◆ ऐक्य -करार/लखनौ करार

32) 1917 - कलकत्ता  - अ‍ॅनी बेझंट 
◆ पहिल्या महिला अध्यक्ष

35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य
◆ काँग्रेसच्या घटनेत बदल

39) 1924 -  बेळगाव - महात्मा गांधी 
◆ बापू एकदाच अध्यक्ष. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

40) 1925 - कानपूर - सरोजिनी नायडू 
◆ पहिली भारतीय महिला अध्यक्षा

43) 1926 - कलकत्ता - मोतीलाल नेहरू

◆ वसाहतीची मागणी,पहिले युवक अधिवेशन

44) 1929  - लाहोर - जवाहरलाल नेहरू
◆ पूर्ण स्वराज्याची मागणी

50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू 
◆ ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन

51) 1938 - हरिपूरा - सुभाषचंद्र बोस 
◆बापूंनी प्रचार करूनही पटट्भी सितारामय्याचा पराभव

52) 1939 - त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद  मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट

53) 1940 - रामगड  - अब्दुल कलाम आझाद
◆ सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण  अध्यक्ष

61) 1955 - आवडी - यू.एन.ढेबर 
◆ समाजवादाचा ठराव मांडला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. 📚 *Today In History* 📚 .
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  26/10/2021  ■
                        वार :-  मंगळवार 
         
          ■    दिनविशेष : 26 ऑक्टोबर     ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

◆ १९९९ : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे ’स्वर्णजयंती फेलोशिप’ जाहीर

◆ १९९४ : जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.

◆ १९६२ : दी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मास्टर दत्ताराम दिग्दर्शित ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.

◆ १९०५ : नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

◆ १९७४ : रवीना टंडन – अभिनेत्री

◆ १९४७ : हिलरी क्लिंटन – अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री

◆ १९३७ : हृदयनाथ मंगेशकर – संगीतकार व गायक

◆ १९१९ : मोहम्मद रझा पेहलवी – शाह ऑफ इराण (मृत्यू: २७ जुलै १९८०)

◆ १९१६ : फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ८ जानेवारी १९९६)

◆ १९०० : इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (मृत्यू: ७ मार्च १९९३)

◆ १८९१ : वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (मृत्यू: २७ आक्टोबर १९६४)

◆ १२७० : संत नामदेव (मृत्यू: ३ जुलै १३५०)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

◆ १९९१ : अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक, हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग (जन्म: १४ नोव्हेंबर १९१९)

◆ १९७९ : चंदूलाल नगीनदास वकील – अर्थशास्त्रज्ञ, देशातील पहिल्या अर्थशास्त्र विभागाची त्यांनी मुंबई विद्यापीठात सुरुवात केली. (जन्म: ? ? ????)

◆ १९३० : डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: १५ मार्च १८६०)

◆ १९०९ : इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (जन्म: १६ आक्टोबर १८४१)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (26/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 साहित्य संमेलनाच्या तारीख, स्थळात बदल ; स्वागताध्यक्षांच्या शिक्षण संस्थेत ३ ते ५ डिसेंबरला आयोजन

◆ नाशिक : येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारीख व स्थळात बदल झाला असून आता हे संमेलन ३ ते ५ डिसेंबर या दरम्यान आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीत होणार आहे.

◆ याबाबतची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या मार्चमध्ये गोखले शिक्षण संस्थेच्या आवारात हे संमेलन होणार होते.

◆ करोनाचा प्रार्दुभाव वाढल्याने ते स्थगित करण्यात आले. जिल्ह्यासह राज्यात करोना नियंत्रणात येत असल्याने संमेलन घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या.

◆ याबाबत लोकहितवादी मंडळाने साहित्य महामंडळ व संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी चर्चा करत संमेलनाच्या तारखा निश्चित केल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

◆ तारखांबाबत साहित्य महामंडळाशी वाद नसल्याचा दावा जातेगावकर यांनी केला. नोव्हेंबरमध्ये संमेलन घेण्यासाठी महामंडळ आग्रही होते.

◆ मात्र संमेलनाध्यक्षांची प्रकृती तसेच तयारीसाठी मिळणारा वेळ पाहता डिसेंबरवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे ते म्हणाले.

◆ संमेलनस्थळात बदल करण्यात आला असून आता हे संमेलन स्वागताध्यक्ष भुजबळ यांच्या शिक्षण संस्थेत होणार आहे. करोना र्निबध लक्षात घेऊन संमेलन, विविध कार्यक्रम बंदिस्त सभागृहांत व्हावे यादृष्टीने पर्याय शोधण्यात आले.

◆ आधीच्या स्थळी वाहनतळाची अडचण होती. शहरामधील वाहतुकीला अडचण न होता व संमेलनात आटोपशीरपणा यावा, सर्व पाहुण्यांची निवासाची व्यवस्था एकाच ठिकाणी व्हावी तसेच ग्रंथ प्रदर्शन, विविध कला प्रदर्शने, वाहनतळ सुविधा, येणे-जाणे सुकर होईल याचा विचार करून भुजबळ नॉलेज सिटी परिसर संमेलन स्थळ म्हणून निश्चित करण्यात आल्याचे संयोजकांनी म्हटले आहे.

३ डिसेंबर :

सकाळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून ग्रंथ िदडी. संमेलनस्थळी िदडी पोहोचल्यावर सकाळी ११ वाजता ध्वजारोहण. त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच संमेलनाचे उद्घाटन. निमंत्रित कवींचे संमेलन रात्री.

४ डिसेंबर : 

सकाळच्या सत्रात ज्येष्ठ प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार आणि प्रकट मुलाखत आणि ज्येष्ठ लेखक व नाटककार मनोहर शहाणे यांचा गौरव. सकाळी ११ वाजता दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते बाल साहित्य मेळाव्याचे उद्घाटन
 
स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक यावर परिचर्चा. तसेच कथाकथन आणि करोनानंतरचे अर्थकारण आणि मराठी साहित्य व्यवहार, मराठी नाटक एक पाऊल पुढे दोन पावले मागे, शेतकऱ्यांची दु:स्थिती, ऑनलाइन वाचन- वाङ्मय विकासाला तारक की मारक, साहित्यनिर्मितीच्या कार्यशाळा गरज की थोतांड आदी कार्यक्रम होतील.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (26/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 मुलांसाठी हानिकारक संदेश रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियात कायदा

◆ कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात मुलांना लक्ष्य करणाऱ्या ऑनलाइन जाहिरातींना आळा घालण्यासाठी यापुढे फेसबुकसारख्या समाजमाध्यमांना त्यांची सेवा १६ वर्षांखालील मुलांना उपलब्ध करून देण्याआधी या मुलांच्या पालकांची संमती घेणे आवश्यक ठरणार आहे.

◆ तशा कायद्याचा मसुदा सोमवारी ऑस्ट्रेलिया सरकारने जाहीर केला.

◆ या अटीची पूर्तता न केल्यास संबंधित कंपनीस १० दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

◆ या महत्त्वपूर्ण विधेयकामुळे नागरिकांना ऑनलाइन माध्यमांत संरक्षण मिळणार असूून व्यक्तिगततेचे कायदे डिजिटल युगाशी सुसंगत केले जात असल्याचे ऑस्ट्रेलिया सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.

◆ ऑस्ट्रेलियात सेवा पुरविणाऱ्या समाजमाध्यम व्यासपीठांना या बंधनकारक संहितेनुसार त्यांच्या वापरकर्त्यांची वयोमानानुसार नोंद ठेवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी लागेल. अशी नोंद ठेवणे समाजमाध्यम सेवा, डाटा ब्रोकर आणि अन्य मोठय़ा ऑनलाइन व्यासपीठांसाठी अनिवार्य असणार आहे.

◆ याशिवाय या सेवा पुरवठादारांना वापरकर्त्यां मुलांच्या वैयक्तिक माहितीचा वापर हा मुख्यत: या मुलांच्या हितासाठीच केला जाईल, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ फेसबुकचे उत्पादन व्यवस्थापक फ्रान्सिस ह्य़ुगेन यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते की, ज्या ज्या वेळी जनहित आणि कंपनीचे हित यापैकी एकाची निवड करण्याची वेळ येईल, त्या वेळी आम्ही कंपनीच्या हिताला प्राधान्य देऊ. त्या पार्श्वभूमीवर कायद्याच्या या मसुद्याकडे पाहिले जात आहे.

◆ ऑस्ट्रेलियातील या नव्या कायद्यामुळे मुलांचे समाजमाध्यम कंपन्यांपासून संरक्षण करणे शक्य होणार आहे. तशा प्रयत्नांच्या बाबतीत जागतिक स्तरावर हे विधेयक अग्रणी ठरणार आहे.  – डेव्हिड कोलमन, पंतप्रधानांचे सहायक मंत्री (मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंधक विभाग)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (26/10/2021)🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 जाणून घ्या; ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये कोणते नवीन शब्द जोडले गेले?

◆ डिक्शनरीमध्ये नवीन शब्द जोडले जात असताना ही वर्षातील टाय आहे. द इंडिपेंडंट मधील एका अहवालात असे म्हटले आहे की सध्याची परिस्थिती आणि त्यात येऊ घातलेले संकट हे निवडलेल्या शब्दांमध्ये सामील झाले आहेत.

◆ ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये “हवामान आपत्ती” (climate catastrophe) , “निव्वळ शून्य” (net zero) आणि “इको-चिंता” (eco-anxiety) सारखे शब्द जोडले गेले आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

◆ अवाहालानुसार “ग्लोबल हीटिंग”(global heating) हा देखील शब्द जोडला गेला आहे.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ या व्यतिरिक्त “हवामान संकट” (climate crisis) , “हवामान संप” (climate strike) आणि “हवामान न्याय” (climate justice”) हे शब्द जोडले गेले आहेत.

◆ अहवाल पुढे सांगतो, हे शब्द, हवामान बदलाभोवती नवीन भाषा शोधण्यासाठी समर्पित आहे. हे शब्द कॉप २६ , २०२१ युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्सच्या आधी लॉंच करण्यात आले आहे, पुढील महिन्यात ग्लासगो येथे जागतिक नेत्यांची बैठक होणार आहे”.

◆ “जागतिक नेते हवामान बदलाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी एकत्र येत आहेत, तेव्हा हवामान आणि टिकाऊपणाबद्दल बोलले जाईल , आता आणि भूतकाळात आपण वापरत असलेल्या भाषेचा सखोल अभ्यासही होईल, ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचे विज्ञान संपादक ट्रिश स्टीवर्ट यांना एका निवेदनात म्हटले आहे.

◆ “आता आपल्यावर असलेली अत्यावश्यकतेची खरी जाणीव आपल्या भाषेत दिसून येते. पुढे काय घडते हे अनेक घटकांवर अवलंबून असते परंतु, एका गोष्टीची आपण खात्री बाळगू शकतो की आपली भाषा विकसित होत राहील आणि कथा सांगितली जाईल.”
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔰चालू घडामोडी (26/10/2021)🔰🔰
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🔘 व्यक्तिवेध : मिनू मुमताज

◆ हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार होऊन गेले, जे त्यांच्या नावापेक्षा चेहऱ्याने अधिक ओळखले जातात.

◆ अलीकडेच दिवंगत झालेली मीनू मुमताज हे याचे एक उदाहरण. प्रसिद्ध हास्य अभिनेता महमूद यांची ती बहीण. नायिका म्हणून तिची ओळख नसली, तरीही ज्यांनी तिला अनेक चित्रपटांमध्ये नृत्य करत गाताना पाहिले आहे, ते तिला विसरू शकत नाहीत एवढी ओळख तिने नक्कीच मिळवली होती.

◆ मीनूचे खरे नाव मलिकुन्निसा अली. १९४०च्या दशकातील चरित्र अभिनेते मुमताज अलींची ती मुलगी. तिला चार भाऊ व चार बहिणी.

◆ वडिलांचा ‘मुमताज अली नाइट्स’ नावाचा डान्स ग्रूप होता. पुढे त्यांचे दारूचे व्यसन विकोपास गेल्याने कुटुंबावर हलाखीचे दिवस आले.

◆ मीनूला आधी त्यांच्या स्टेज शोमध्ये व नंतर चित्रपटांमध्ये काम करावे लागले. तिला ‘मीनू’ हे नाव मेहमूदची मेहुणी मीना कुमारी हिने दिले. मीनू सुंदर नव्हती, पण नृत्यकलेच्या शिदोरीवर तिने चित्रपटसृष्टीतील स्थान पक्के केले.

◆ १९५५ सालचा ‘सखी हातिम’ हा मीनूचा पहिला चित्रपट. मात्र पुढच्याच वर्षी आलेल्या गुरुदत्तचा ‘सीआयडी’, त्यातील मीनूवर चित्रित झालेल्या ‘बूझ मेरा क्या नाम रे’ या गाण्यासह सुपरहिट ठरला.

◆ यानंतर अनेक चित्रपटांतील भूमिका मीनूकडे चालून आल्या. ‘दिल की कहानी रंग लायी है’ (चौदहवी का चाँद) आणि ‘साकिया आज मुझे नींद नहीं आएगी’ (साहिब बीबी और गुलाम) ही गाणी तिनेच गाजवली.

◆ ‘ब्लॅक कॅट’ चित्रपटात ती बलराज साहनीची नायिका होती. विनोदी अभिनेते जॉनी वॉकर यांच्यासह मीनूची पडद्यावर जोडी जमली व या दोघांनी अनेक चित्रपटांत काम केले.

◆ १९५८ सालच्या ‘हावडा ब्रिज’ चित्रपटात मीनूचे प्रणयदृश्य मेहमूदसह होते.. सख्ख्या भावंडांचे हे प्रकार पडद्यावर पाहून लोक भडकले. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ ‘इन्सान जाग उठा’मधील ‘जानू जानू रे काहे छलके है तोरा कंगना’ हे गाणे मीनू व मधुबालामुळे आणि ‘नया दौर’मधले ‘रेशमी सलवार कुडता जाली का’ मीनू व कुमकुम या नर्तकींच्या जोडीमुळे लक्षात राहिले.

◆ १९६३ साली निर्माते- दिग्दर्शक सय्यद अली अकबर यांच्याशी मीनूचा धडाक्यात विवाह झाला. चित्रपटसृष्टीला अलविदा करून ती कॅनडात स्थायिक झाली.

◆ तिथे ब्रेन टय़ूमरमुळे तिची दृष्टी व स्मृती यांवर परिणाम झाला, पण शस्त्रक्रियेनंतर ती बरी झाली आणि ८९ वर्षे सुखाने जगली.

◆ हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाची साक्षीदार असलेली ही तारका २३ ऑक्टोबर रोजी कॅनडात काळाच्या पडद्याआड गेली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Forwarded from TARGET MPSC (MH) via @like
#Joke_of_the_day 😂

एका बोबड्या मुलीचं लग्न जमत नसतं.
शेवटी मोठ्या मुश्किलीने तिला बघायच्या वेळी
गप्प बसायला लावून तिचं लग्न ठरवतात.

लग्नात हार घालते वेळी तिला नवऱ्या मुलाच्या टोपीवर किडा बसलेला दिसतो.
तो पाहून ती ओरडते

" तिडा तिडा "

त्या आवाजाला घाबरुन नवरा अजून जोरात
ओरडतो . . .

" तुताय तुताय "....

नवरा मुलगा MPSC चा माजी विद्यार्थी होता..😂😇😘
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
---------------------------------------------------
हेतू:- हसत खेळत अभ्यास√.
तुम्ही हसा, इतरांना हसवा.
आपल्याकडील Jokes/Study Material @Sudhirt_007 वर पाठवा.
Forwarded from TARGET MPSC (MH)
📚 *History Special (04/07/2020)*📚
Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

★ अंधार कोठडीची घटना

◆ कलकत्ता (विद्यमान कोलकाता) येथील फोर्ट विल्यम किल्ल्यातील कैद्यांना ठेवण्याची एक खोली.

◆ १७५६ मधील एका घटनेमुळे ती अंधारकोठडी म्हणून इतिहासात महत्त्व पावली.

◆ सिराजउद्दोला बंगालचा नबाब असताना बंगालचा इंग्रज गव्हर्नर ड्रेक याने नबाबाच्या शत्रूंना आश्रय दिला.

◆ इंग्रजांनी नबाबाची परवानगी न घेता कलकत्त्यात तटबंदी बांधण्याचे काम सुरू केले.

◆ नबाबाने हरकत घेऊनही ड्रेकने बांधकाम थांबविले नाही. त्या वेळी नबाबाने फोर्ट विल्यमवर हल्ला करून इंग्रजांकडून किल्ला घेतला.

◆ गव्हर्नर ड्रेक बायकामुलांसह पळाला. सिराजउद्दोला याने सेनाधिकारी हालविले व आणखी १४५ इंग्रजांना किल्ल्याच्या पूर्व दरवाज्याच्या दक्षिणेस तीस मी. अंतरावर असलेल्या ५·५ × ४·२५ × ३ घ.मी. च्या खोलीत डांबले.

◆ खोली कोंदट होती व तीत हवा येण्यास दोनच लहान झरोके होते. अशा ह्या कोठडीत १४५ माणसे दहा तास होती. त्यांपैकी १२३ गुदमरून मृत्यूमुखी पडली.

◆ काही इतिहासकार अंधारकोठडीची कथा कपोलकल्पित समजतात, तर काहींच्या मते ती मुळात सत्यच आहे; फक्त अतिरंजित करून वर्णिली गेली आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://www.tg-me.com/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
2024/12/27 20:04:53
Back to Top
HTML Embed Code: