Telegram Web Link
शिवकाळात छत्रपती शिवरायांची निष्ठावंतांची फौज...🚩

● निष्ठा व निष्ठावंत दोन प्रकारचे असतात :
एक आपल्या नेतृत्वावर कोणताही वैयक्तिक स्वार्थ अथवा अपेक्षेविना पूर्णपणे विश्वास ठेवणारे अढळ निष्ठावंत. व दुसरे आपले काम व्हावे या भावनेने काम होईपर्यंत नेतृत्वावर विश्वास ठेवणारे हंगामी निष्ठावंत..

छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली, तेव्हा हजारो मावळे शिवरायांच्या नेतृत्वाखाली सज्ज झाले. त्यातील कोणाच्याही मनात ना जहागिरीची लालसा होती, ना इनामांचा लोभ ! होता तो फक्त नेतृत्वावर ठाम विश्वास ! आपले महाराज जे काही करताहेत ते आपल्या भल्यासाठीच आहे, या एकाच भावनेने मावळ्यांनी महाराजांच्या चरणी आपल्या निष्ठा अर्पण केल्या होत्या. महाराजांच्या कोणत्याही निर्णयावर कोणत्याही मावळ्याने शंका घेतली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्यबळ त्याकाळी मोजकेच होते, मात्र त्यातील हरएक सैनिकाची निष्ठा राजगडाच्या अभेद्य बुरुजांसम अढळ होती. महाराजांविरुद्ध लढणारेही बहुतांश स्वकीयच होते मात्र मोजक्या निष्ठावंतांच्या जोरावरच शिवराय महाराजांनी स्वराज्य उभारले. आपण स्वतंत्र व उज्ज्वल भविष्यासाठी लढत आहोत तेच आपल्या विरुद्ध शस्त्रे घेऊन उभे आहेत म्हणून महाराज कधी डगमगले नाहीत.. "मानसिक धैर्य काय असते हे शिवरायांकडून शिकावे व स्वामीनिष्ठा काय असते हे महाराजांच्या मावळ्यांकडून शिकावे......"

――――――――――――
🎨 @_chanakya___ 👌🏼♥️🔥
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शेतीविषयक धोरण...🌱

_"शेतकरी सुखी,रयत सुखी तर राजा सुखी" हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते.
स्वराज्याच्या हिताचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेतील समाजव्यवस्थेची जाण होती, तितकेच शेतीबद्दल भान होते.
शेतीचे चित्र बदलले पाहिजे,याबाबत ते आग्रही होते.
महाराज जमतेम ५० वर्षे जगले.त्या जगलेपणात त्यांनी स्वतःचे विश्व तर निर्माण केले होतेच शिवाय इतिहासासमोर एक नवा आदर्श निर्माण केला होता.

भारत हा शेतीप्रधान देश समजला जातो.
सध्या शेतीतील प्रश्न भयावह स्वरूपाचे बनले आहेत. काही प्रश्नांचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणातून सापडतात.
त्यांचे ग्रामीण समाज व शेतीबाबतचे विचार आजही फारसे समोर आले नाहीत,हे आमचे दुर्दैव.
१६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव जाणते राजे होते की त्यांच्या रयतेतील प्रजा सुखी होती, आनंदी होती.

शेती हे रयतेचे मुख्य बलस्थान होते.
संपूर्ण प्रजेचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे याची महाराजांना जाणीव होती. शेती हे केवळ उपजिविकेचे साधन नसून,रयतेच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे.
"शेती पिकले तर रयत सुखी,रयत सुखी तर राजा सुखी'.
हे सूत्र महाराजांना समजले होते.
त्यामुळे महाराजांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन रयतेला मजबूती देणारा होता.

महाराजांचे गुरुवर्य संत तुकाराम महाराज अभंगात म्हणतात, "मढे झाकूनिया करती पेरणी".
त्या काळात शेतीला किती महत्त्व होते, हे लक्षात येते.
रयतेच्या रक्षणासाठी घरातला एक मावळा जर कामी आला तर त्याचे मढे झाकून काळ्या आईची ओटी भरली पाहिजे,अशी पध्दत होती.

पेरणीचे कामे आटोपल्यावर संरक्षणासाठी सज्ज होत.
त्याकाळी नांगरणी,कुळवणी व नुसत्या शेणखतावर शेती पिकत असे.
कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी हे अस्मानी संकट रयतेवर कोसळत असत.
त्यामुळे महाराजांनी कधीच सारा वसुल केला नाही.
प्रजेची, शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सावकार,व व्यापाऱ्यांना त्यांनी समज दिला होता, याची माहिती काही ऐतिहासिक पत्रांतून मिळते...

राजा सह्याद्रीचा ⚔️ 🚩
राजा शेतकऱ्यांचा 🎋
राजा कष्टकरी कुणब्यांचा 🌱
4 था श्रावणी सोमवार गोकुळाष्टमी
युध्दकाळापेक्षा शांततेच्या काळातच शिवरायांची आम्हाला जास्त भिती वाटायची ⚔️🔥
-- शत्रू / गनिम
_ढोल ताशे घुमत आहेत कानात_
_शहारे अंगावरती काटा येत आहे,_
_विघ्ने दूर करण्यासाठी विघ्नहर्ता लवकरच_
_माझा बाप्पा येत आहे 🙇🏻‍♂️🚩_
गणपती बाप्पा मोरया
“बैलपोळा” निम्मित सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा💚💐!!
_*जरी पडतील मस्त खिंडारे तटबुरुजाला तरी तो माना टाकणार नाही. जरी चि-यातली चुनखडी गेली तरी भक्कमपणा संपणार नाही.*_

*#राजधानी*
_*काळ ओसरुन जातो, पण आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा मागे ठेऊनचं...!*_

*#शिवजन्मभूमी*
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
संकट कितीही मोठ असुद्या त्याला समोर जाण्याची जिद्द असली पाहिजे.

समोरचा किती पाण्यात आहे व आपल्या पेक्षा किती हुशार आहे हे समजते.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
देश, देव, धर्म, जात यांच्या साठी रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत लढू
🚩💐🙏🏻 बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय शिवराय 🙏🏻💐🚩
लोक म्हणतात बाईच्या डोक्यावर पदर असावा त्याआधी तुमच्या डोळ्यात आदर असावा; नाही का ?
कोदंडाचा तू टणत्कार हो..!!
रणभेरीची तू ललकार हो...!

बहार हो तू प्रलय हो
तू विकृती वरचा प्रहार हो...!!

सुर्याला ही भिडवूनी डोळे
जाणिवांचा कैवार हो...!!

वज्रमूठ हो वज्रदेह हो
काळाच्या छातीवरची पहार हो...!!

हो सुदर्शन हो कौमुदी तू
तव गगनातली सौदामिनी हो...!!

नंदक हो तू खड्ग हो तू
शिवसर्जाच्या तलवारीतली हो तू
भवानी हो....!! 💪

सचिनराव ✒️
सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात भीषण तांडव करणाऱ्या रुद्र पावसाला झेलीत, त्याच्या माथ्यावर गडकोटांचे घरटे बांधून त्यावर राहायचं ! तहहयात मोह आणि वैयक्तिक सुखदुःखे बाजूला ठेऊन राज्यासाठी पडेल तो त्याग करायचा. रात्रंदिवस घोड्यावरली मांड सैल होऊ द्यायची नाही रयतेच्या रक्षणासाठी सज्ज रहायचे. शस्त्र हाती घ्यावे तूच आणि आईच्या मायेने जवळ ही घ्यावे तूच. रयतेसाठी सोसावे, पण किती सोसावे ह्याला कुठले माप नाही. हा माथा तुझ्याच मोजड्यांची माती कपाळावर मिरवेल, हीच गुरुदक्षिणा देऊ शकतो मायबापा 🙇🏻‍♂️🚩
महाराज 🙌
2024/09/28 22:23:28
Back to Top
HTML Embed Code: