Telegram Web Link
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*आयुष्यात काही करुन दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य असं काहीच नसतं.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*आयुष्यात चुका होतचं असतात फक्त त्या चुका आयुष्यात पुन्हा करू नका तर त्या सुधरवण्याचा प्रयत्न करा.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
संघर्ष नाही केला तर जीवनाचा उपयोग काय?
संघर्ष करायला सुरुवात करून तर बघा छोटा छोटा विजय मिळवा. छोटे छोटे target ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्या. तुम्हाला आपला विजय लाख मोलाचा वाटेल.
शिवरायांनी जे समाजात स्वराज्य निर्माण करून दाखवलं ते स्वतः च्या जीवनात प्रस्थापित करायचं प्रयत्न करा.
जय शिवराय 🙏🚩
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*प्रत्येक वेळी दुसऱ्यांचं अनुकरण करत बसण्यापेक्षा स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
राष्ट्र स्वरूप भगवंत आम्हास ठावा जो एकमेव आमच्या उरी प्राण ठावा सर्वस्व अर्पण करू त्यजू पंच प्राण हिदंवी स्वराज्य करण्या शिवबा समान जय शिवराय जय महाराष्ट्र जय सह्यादी 💐🌹🚩🙏 :
शत्रू असंख्य उठले अति नीच करु शिवबा कधी न कचले करण्या प्रहार ते धैर्य साहस लढाऊ बाणा द अंब खडग वधन्या यवना धमाना 💐🌹🚩🙏 जगदंब जगदंब जगदंब :
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*जोपर्यंत वय लहान आहे, तोपर्यंत शिकून घ्या नंतर वय वाढलं की जबाबदारी वाढत असतात.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
_*हा रयतेचा आसरा अन् स्वराज्याचा पसारा कुठूनही बघा अंगात स्फुरण चढल्याशिवाय राहत नाही.*_

*#मायबाप🙏🚩*
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आता शिवरायाची गरज आहे .पण ते शक्य होणार नाही माहित आहे .पण आता या छत्रपती शासनाची खऱ्या अर्थाने अत्यंत गरज आहे पण दुःख या गोष्टीच आहे की सगळीकड दलाल आहे चमडी चोर ब्लॅक मिलर भरले आहे..💯🔥🙏🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
_छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक महान आणि आदर्श राजे होते. त्यांनी आपल्या लोकांसाठी अथक परिश्रम करून आपले नाव भारतीय इतिहासात तसेच लोकांच्या मनात कायमचे अजरामर केले आणि ते पुढे हजारो वर्षे तसेच कायम राहील...🙏_
दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज🚩
〰️〰️〰️〰️〰️〰️©〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा टीझर रिलीज! संपूर्ण भारत 'छत्रपती संभाजी महाराजांच्या' ऐतिहासिक भूमिकेच्या कुतुहलात!

विकी कौशलच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'छावा'चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे आणि तो खरोखरच फटाक्यात फटाक्या देणारा आहे! ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची ऐतिहासिक भूमिका साकारतोय, आणि त्याचा पहिला लूक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

टीझरमध्ये विकीचा रुद्रावतार पाहून प्रेक्षकांना थरकाप बसला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना 'शेर' आणि त्यांच्या मुलाला 'छावा' म्हणताच, विकीच्या दमदार अभिनयाने आणि 'हर हर महादेव'च्या गजरात लढाईचे दृश्य सादर करण्यात आले आहे. हा टीझर पाहून कुणालाही अंगावर काटा येईल असेच आहे. विकीने आपल्या सोशल मीडिया खात्यावर या टीझरची माहिती देत ‘छावा’चा टीझर पाहण्याचे आवाहन केले आहे.

'छावा' चित्रपटात विकीने एक ऐतिहासिक भूमिका साकारली असून, या चित्रपटात अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि विकीच्या चाहत्यांसह प्रेक्षकांचा उत्साह आत्तापासूनच शिखरावर आहे.

याशिवाय, चित्रपटातील मुख्य भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना महाराणी येसूबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. एकाच वेळी दोन राजकीय टीकास्त्रांची झलकही टीझरमध्ये आहे, ज्यामुळे या चित्रपटाच्या रिलीझसाठी सगळीकडे उत्सुकता आहे. 'छावा' ६ डिसेंबर रोजी तुमच्या शहरात येणार आहे, त्यामुळे या ऐतिहासिक अनुभवाची संधी गमावू नका!
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आया बहिणीच्या सुरक्षेची हमी फक्त एक व्यक्ती देऊ शकत होती...ती म्हणजे...युगप्रवर्तक युगपुरुष श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज..!!!🚩⚔️🚩

छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
परोपकाराची या राशी,
उदंड घडते जयाशी !
तयाची गुणवत्त्वाशी तुलना कैसि !!

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, गुणवंत, वरदवंत, जाणता राजा!!

जय शिवराय 🙏🚩
🚩महाराजांच्या काळात कोणी महिलांच्या अब्रुवर हात टाकला तर डावा हात आणि उजवा पाय कापण्यात येत होता... त्याला चौरंगा म्हणत...

आरोपींची अशी अवस्था बघून कोणाची हिंमत होत नव्हती...

सध्या कायदे न्यायालयीन प्रक्रिया याबद्दल भिती राहिली नाहीये.....

म्हणून अशी विकृती वाढत गेली आहॆ....

कालपासून आपल्या मुलींना स्वसंरक्षण शिकवा वगैरे वर पोस्ट वाचतोय पण लहानग्या वर्षांच्या मुलींचं अश्या नराधमांसमोर काय चालणार ??

मुळात समोरचा व्यक्ती काहीतरी चुकीचं करतोय इतकी समज तरी त्या चिमुरड्यामध्ये असते का ?

नेहमी अश्या काही गोष्टीं झाल्या की समाज उद्विग्न होतो आंदोलनं होतात आणि कालांतराने पुन्हा सगळं शांत होतं...

पण जो पर्यंत कायदे कडक होत नाही तोपर्यंत असे प्रकार थांबतील असं वाटत नाही....

कारावास वगैरे नाही सरळ फाशीची शिक्षा हवी कोणाची हिंमत होणार नाही बलात्कार करण्याची...
शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांची सैन्यव्यवस्था, सैन्यरचना कशी होती ते पाहू :

गनिमी काव्याबद्दल मी नवीन सांगायला नकोच. शिवाजी महाराजांनी ही नीती पाठीशी सह्याद्री असल्यामुळे अंगीकारली होती. तसेही मराठ्यांचे बळ तेव्हा एवढे नव्हते की मैदानी युध्द करुन ती जिंकावीत व प्रदेश काबीज करावा. शिवाजी महाराजांनी सैन्याची तत्कालीन पद्धतच अंगीकारली होती पण त्यांची बारीक नजर सैन्यावर राही..

सर्व सैन्यास डोईस मंदील, अंगास सकलादी, हाती सोन्याची वा रुप्याची कडी, हुद्याप्रमाणे तलवारीस सोन्या/ रुप्याचे म्यान, कानास कुड्यांची एक जोड अशी हुजुरातीची (म्हणजे खासे महाराजांसोबत जी फौज चाले अशी) फौज तयार केली. त्या फौजेत शंभर लोक, साठ लोक, तीस लोक अशी पथके होती. काही जणांकडे बंदुकी, काही विटेकरी, भालकरी, धारकरी अशी विभागणी केली गेली. पागेत शिलेदार होते, हर घोड्यास एक बारगीर, पंचवीस बारगीरांवर एक हवालदार, पाच हवालदारांवर एक जुमला. जुमलेदारास ५०० होनांचा तनखा. दहा जुमल्यास एक हजारी आणि पाच हजारास एक पंच हजारी व पाच पंचहजार्‍यांवर एक सरनौबत अशी फौजेची रचना होती..

(मुगली सैन्य या विरुद्ध- सोबत जनानखाना, कलावंतिणी, जवाहीर असे सर्व बाळगीत. युध्द हरण्यास हे सर्व कारणीभूत होई कारण पटापट हालचाल करता येत नसे. पुढे मराठ्यांनी हे सर्व बाळगायला सुरुवात केली. पानपतावरच्या मराठ्यांच्या पराभवास हे बाजरबुणगे व जनानखानाच कारण ठरले.) तसेच परमुलुखांत पोर, बायका धरण्यास मनाई होती. मर्द लोक सापडले तर धरावे, गाय धरू नये, बैल धरावा, ब्राम्हणांस उपद्रव देऊ नये तसेच खंडणी केलेल्या जागी ओळख म्हणून ब्राम्हण घेऊ नये असे नियम होते.. (सभासद बखर).

सरनौबत, मुजुमदार यांची तैनात वराता अथवा हूडीने देत. लष्करास गाव मोकासा देण्याची पध्दत बंद केली. सर्व व्यवहार रोखीने होत. मोकासे दिल्याने रयतेस त्रास होतो, धारा नीट वसूल होत नाही म्हणून ती पद्धतच बंद केली. लढाईत जखमी झालेल्यांना जखमेप्रमाणे नेमणूक मिळे, मेलेल्यांना तैनात देण्यात येई..
छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ मे १६७१ चे एक पत्र :
.
"चिपळूणी सैन्याचा मुक्काम होता. याकरिता दाभोळच्या सुभ्यास पावसाळाकारणे पागेस सामा, दाणा व वरकड केला होता तो कितेक खर्च होउन गेला. त्याकरिता कारकुनाकडुन व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास तुम्ही मनास वातेल ऐसा दाणा, रतीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंद करुन चाराल नाहीसे झाले म्हनजे मग काही पडत्या पावसाळ्यात मिळणार नाही, उपास पडतील. घोडी मरावयास लागतील. म्हणजे घोडी तुम्हीच मारली ऐसे होईल व मुलुखास तजबीज देऊ लागाल. ऐशास लोक जातील, कोण्ही कुणव्याचे दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करु लागले म्हण्जे जे कुणबी घर धरुन जीव मात्र घेउन राहिले आहेत, तेही जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्यास ऐसे होईल की मोगल मुलकांत आले त्याहूनही अधिक तुम्ही..! ऐसा तळतळाट होईल. तेव्हा रयतेची व घोडियांची बदनामी तुम्हावरी येईल. हे तुम्ही बरे जाणून सिपाही हो अगर पावलोक हो, बहुत यादी धरोन वर्तणूक करणे. कोणी पागेस अगर मुलखात गावोगांव राहिले असाल त्याणी रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही. साहेबी खजिन्यातुन वाटनिया पदरी घातलीया आहेती ज्याला जे पाहीजे ते विकत आणावे. कोणावरी जुलुम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही व पागेस सामा केला आहे. तो पावसाळा पुरला पाहिजे. ऐसे तजविजेने दाणा, रतीब कारकून देत जातील तेणेप्रमनेच घेत जावे, की उपास न पडता रोज्बरोज खायला सापडेल आणि होत होत घोडी तबाना होत ऐसे करणे. धुंदी करुन खासदार कोठीत कोठारात शिरुन लूटाया गरज नाही. खण धरुन राहिले असतील व राहतील. कोणी आगट्ये करतील, कोणी भलते जागा चुली रंधनाला करतील, कोणी तंबाखुला अग्नी घेतील, गवत पडले आहे. असे मनात न आणता म्हणजे अविसाच दग होईल. ऐका खणास आगी लागली, म्हणजे सारे खण जळून जातील; हे तो अवघीयास कळते; या करणे बरी ताकीद करुन खासे असाल ते हमेसा फिरुन जावून रंधनेकरिता आगट्या जाळिता अगर रात्री दिवा घरात असेल, अविस्ताच उदिंर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. खण, गवत वाचेल ते करणे; म्हणजे पावसाळा घोडी वाचतील. जितके खासे खासे, जुमलेदार, हवालदार, कारकून आहे, तितके हा रोखा तपशिले ऐकने आणि हुशार राहणे. येणेप्रमाने वर्तणूक करिता ज्यापासून अंतर पडेल त्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल, त्यास मराठियांची तो इज्जत वाचवणार नाही, मग रोजगार कैसा.."
वरील पत्रावरून दिसून येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचे किती बारीक लक्ष सैन्यावर होते. अगदी उंदीर रात्री वात पळवून नेईल इतके व्यवधान ते बाळगायला सांगत. प्रजेच्या व लष्कराच्या सांभाळाची तळमळच या पत्रातून दिसून येते..
.
――――――――――――
🎨 @rambdeshmukh 👌🏼♥️🔥
महाराष्ट्राला निसर्गतःच भरभरून लाभलेले सह्याद्रीचे हे सौंदर्य...!
ऊन पावसाच्या पाठशिवणीच्या खेळात कायम साथीला असलेला, पावसाळ्या हवेत अनुभवणे असा हिरव्या गालिच्छा मध्ये हा गड सोनकी तेरड्याच्या रानफुलांच्यात सजलेला, मराठे शाहीचं वैभव म्हणजेच किल्ले “राजधानी रायगड”...🚩

या किल्ल्यावर आज अवशेष रूपात असलेल्या वास्तुरचनांचा अभ्यास केला म्हणजे त्या काळातील वास्तु वैभवाची कल्पना येते, ती हेमाडपंती पद्धतीने बांधलेले महादेवाचे मंदिर म्हणजेच “सह्याद्रीचा जगदीश्वर”...

चारी बाजूंनी डोंगररागांपासून तुटलेल्या, अत्यंत दुर्गम, दर्या अन देशापासून समांतर असलेल्या या किल्ल्यावर राजांनी एवढे भव्य दिव्य विश्व निर्माण केले की, शेवटी मराठी अस्मिता ही येथूनच सुरु होते...! इथूनच मिळते बळ जगण्याचे, उमेद कर्तुत्वाची आणि ताकद निश्चयाची.. एवढे थोरले विश्व निर्माण करणारा हाच तो खरा सह्याद्रीचा जगदीश्वर...🙏🏼🚩

✍🏽 @sachinpokharkar_


📷 रुपेश वनारसे 👌🏼♥️🔥
2024/09/29 10:28:31
Back to Top
HTML Embed Code: