Telegram Web Link
✍️
शिवराजाभिषेक भाग_४ ✍️

आणि सदर भरली...
जिजाऊ मासाहेब सदरेवर उपस्थित होत्या , राणीवसा आणि सोयराबाई राणीसाहेबांच्या सोबत राजाराम महाराज बसलेले... राणीवसा सोबत येसूबाई राणीसाहेब उपस्थित होत्या...

शिवराय स्थानापन्न झाले...
आणि पुढे गागाभट्ट आपल्या स्थानावर बसले होते....

मोरोपंत उभे राहिले आणि म्हणाले...

" महाराज !!! वेदनारायण श्री गागाभट्ट येथे येण्याचे हेतू सांगण्यास इच्छुक आहे...."

महाराज म्हणाले...
" भाग्य आमचे...!!!"

गागाभट्ट उभे राहिले आणि म्हणाले...
" महाराज !! स्वराज्य ये रायगड , ये सह्याद्री हमे बहोत भाया .....
ऐसा लगता है की शिवसेवक बनकर यही रहे !!!"

महाराज म्हणाले....
" धन्यवाद....आचार्य.!!! "

गागाभट्ट म्हणाले...

" पण महाराज.... आम्ही एका हेतूने इथे आलो आहोत....!!! या पुण्यभूमी वर परकियांनी आक्रमण केले , आपली धर्म , संस्कृती , ही भुमी लुटली, खंडित केली...
आणि तेच परकीय आपल्या वर राज्यकर्ते बनून... अत्याचार करतात !! अलाऊद्दिन खिलजी ने आक्रमण केले आणि देवगिरी ची राजकुमारी उचलुन नेली.... कोणी काय केले ???
काहीच नाही महाराज !!! ,
पण त्या आक्रमण नंतर कोणी हिंदू राज्य स्थिर झालेच नाही ,

कित्येक........
कित्येक हिंदू राज्यकर्तांनी यवनांची मांडलीक स्विकारली पण , आपण "श्री शिवाजी शहाजी भोसले....
" भर दरबारात औरंगजेब च्या मुघल तख्ताची खिल्लत उधडली , सप्तकोटीश्वर सारखे यवनांनी पाडलेल्या मंदिरांचे पुनः निर्माण केले , लक्ष लक्ष अश्वदळ , पायदळ , आपण गजपती आहात पण पण महाराज आपण अजूनही राजे नाही...

का महाराज का ??? "

अवघा दरबार गागाभट्टा़च्या शब्दांनी भरून आले होते... जिजाऊ मासाहेबांच्या ह्रदयाची धडधड वाढली होती... शिवरायांच्या अंगावर शहारे उभे राहिले होते...

गागाभट्ट बोलत होते...

" महाराज , राक्षसासारखा अफझलखान चे कोथळा काढला आपण , खुद्द औरंगजेब चा मामा शाहिस्तेखानची बोटं कापली , तोरणावरुन स्वराज्याचे तोरण बांधून आज आपण कित्येक गडांचे गडपती आहात , फक्त भूमीवर च नाही तर जलदुर्ग , आरमार बांधून आपण समुद्रावर सुद्धा वर्चस्व प्रस्थापित केले...,

ज्या औरंगजेब च्या मगरमिठीतुन खुद्द दिल्ली चा बादशहा शहाजहान सुटू शकला नाही , त्याच्या हातावर तुरी देत आपण परतले.... महाराज आपण नरसिंह आहात पण आपण हिंदुपदपातशाह व्हावे हिच आमची इच्छा...."

....क्रमशः
C
✍🏻अक्षय चंदेल ( लेख अधिकृत)
@akshay_chandel_21
.
.
.
.
शिवराज्याभिषेक_सोहळा
२०२४
लवकरच........✍️🚩
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*कठीण परिस्थिती माणसाला मजबूत बनवते; म्हणूनच तर अडचणीच्या काळात आपल्या मार्गाने ठामपणे चालत रहायचे, यश नक्कीच मिळते.*_

*#हर_हर_महादेव 🙏🏻🚩*
🙏"सार्वभौम सत्तेचे छत्र धारूनी, स्थापिली हिंदूपत पातशाही, म्लेंच्छ निर्दाळूनी कातळी तख्तावर बैसले, श्री राजा शिवछत्रपती"🙏🏻🚩♥️

🧡हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा,६ जून( तारखेनुसार)💐👏♥️
🙏"उत्सव सार्वभौमत्वाचा,राष्ट्र, स्वराज्य आणि स्वाभिमानाची धगधगती ज्वाला उरी बाळगुन लोककल्याणकारी राज्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावलेल्या तमाम रयतेचा स्वप्नपूर्तीदिन श्री शिवराज्याभिषेक सोहळा"🙏🏻🚩💐🍃

🚩🧡हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनभिषेक उत्सव श्री शिवराज्याभिषेक सोहळा,६ जून (तारखेनुसार)🌏🧡
*🚩 #प्रेरणास्थान*

_*पराभव हा आयुष्याचा भाग आहे... पण पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी आहे.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*परिस्थितीच्या विरोधात जाऊन घेतलेले काही निर्णय परिस्थिती बदलवण्याचं सामर्थ्य ठेवतात.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
इस्लामी आक्रमकांनी उध्वस्त केलेल्या देशभरातील अनेक हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार करून हिंदूंचा स्वाभिमान जपणाऱ्या धर्माभिमानी, हिंदू संस्कृतीचा जीर्णोद्धारकर्त्या, थोर शिवभक्त, प्रजेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रशासका पैकी एक उत्कृष्ट महिला प्रशासक ...

पुण्यश्लोक राजमाता अहिल्या बाई होळकर यांच्या जयंती दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन ..! 💐
स्वराज्याची रणरागिणी, रयतेची पालनहार, साधी राहणी अन् लोककल्याणकारी विचारसरणी हे ब्रीद ठेवून आपल्या बुद्धीने आणि बाणेदारपणे तब्बल ३० वर्ष राज्यकारभार करीत समर्थपणे शासन यंत्रणा राबवित क्रांतिकारक कार्य करणार्‍या महाराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भारतातील असंख्य मंदिरांचा जीर्णोद्धार करून हिंदूंचे धार्मिक अधिष्ठान बळकट करणाऱ्या तर दुसरीकडे आपल्या राज्यात सती प्रथा, अस्पृश्यता, हुंडा पद्धती सारख्या अनिष्ट रूढी परंपरांना बंदी करत अंतर जातीय विवाहांना प्रोत्साहन देत सामाजिक सुधाराचा पाया रचणाऱ्या भारतीय इतिहासातील उत्तम प्रशासक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.💐🙏✨️💛🌸
रायगडाच्या नाही तर तमाम रयतेच्या काळजाच्या सिंहासनावर हा राजा आरुढ झाला आहे..🙌👑🚩
शिवराज्याभिषेक सोहळा (तारखेनुसार) ६ जून
*🚩 #प्रेरणास्थान*

_*आयुष्यात काही जागा या औषधा सारख्या असतात.*_

*#शिवराय_असे_शक्तिदाता.. 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका, प्रत्येक दिवस एक नवीन संधी देत असतो.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
शिवछत्रपतींचा राज्याभिषेकाची वार्ता दिल्ली दरबारात पोहोचली त्यावेळी औरंगजेब मनोमन खिन्न झाला त्याच्या मनाची दशा कशी झाली, याचे फार सुंदर वर्णन मल्हार रामराव चिटणीस या बखरकाराने केले आहे तो लिहीतो...,
“राज्याभिषेक होवून तख्त केले हे वर्तमान समजले ते पातशहा बहुत खफा होऊन दिलगीर झाले आणि (म्हणाले) ‘खुदाने वर देवून आम्हास बाराशे वर्षे पाताशहात दिली ती मर्यादा अवकाश असता दुसरे तख्त पृथ्वीवर हिंदूंचे जाले...! हे तख्त मोडाव्याचे कठीण गोस्त आहे सुलतान रुकंदिन याचे कुलात उत्पन्न होवून आपले कारकिर्दीत हे गोष्ट घडली व्यर्थ उत्पन्न झालो..शिवाजी महाराजांनी रानाजीचे (उदयपूरचा राणा) कुळी उत्पन्न होवून पुन्हा छत्र सिंहासन तख्त केले ते धन्य झाले’ (असे) म्हणोन तीन दिवसांपर्यंत बाहेर आले नाहीत.. मक्केस निघून जावे.. म्हणून जनाण्यात राहिले” मल्हार रामरावाने तत्कालीन राजनैतिक भाव अचूकपणे जाणला आहे...”

शिवराज्याभिषेक दिन म्हणजे मराठ्यांना, त्यांच्या राज्याला, स्वातंत्र्य व सार्वभौमत्वा देणारा दिवस होय.. सव्वातीनशे वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेचे स्मरण आपण दरवर्षी रायगडावर येवून करत असतो लोकशाही भारतात आपले राष्ट्र सार्वभौम राहावे यासाठी आपण सतत जागरूक असतो त्याकामी रायगडावरील हा शिवराज्याभिषेक महोत्सव सतत प्रेरणा देत राहील...

इतिहासकार : डॉ.जयसिंगराव पवार.
――――――――――――
३५०वा_शिवराज्याभिषेक_सोहळा 🚩
आनंदोत्सव_स्वराज्याचा
६जून_राजधानी_रायगड
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
चार पातशाह्या मुसंड्या मारून वर येत असताना एका जहागीरदाराचा मुलगा त्यांच्या छाताडावर भाले रोवून "छत्रपती" जाहला, ही गोष्ट साधी सोपी नव्हे...🚩🚩

आतुरता शिवराज्याभिषेक सोहळ्याची.
6 जून, 2024.

शिवराज्याभिषेक_सोहळा
किल्ले_रायगड मराठा छत्रपती_शिवाजी_महाराज
जेव्हा पासुन इतिहास कळायला लागला
तेव्हा पासुन एकाच व्यक्तीच आकर्षण वाटू लागलं... ते म्हणजे आमचं राज
*छत्रपती शिवाजी महाराज🙇🏻‍♂️🙏🏻🚩
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, त्याचे मोल कधी विसरु नका.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
ज्यांच कर्तुत्व सूर्यासारखं तेजस्वी. रयतेवरची माया चंद्रा सारखी शितल आणि ज्यांचा पराक्रम महासागरा येवढा मोठा, अशा जाणत्या राजाला लक्ष लक्ष प्रणाम..
जय शिवराय 🚩🚩🚩
*🚩 #उर्जामंत्र*

_*येणाऱ्या प्रत्येक संकटावर धाडसाने मात करून यशस्वी जीवन जगणे यालाच आयुष्य म्हणतात...!!!*_

*#जय_शिवराय 🙏🏻🚩*
यतो धर्मस्ततो जयः |
"जिथे धर्म आहे, तेथे विजय आहे".
"धर्माच्या पाठीशी उभ्या राहिल्याचा विजय निश्चित आहे".

.
जय श्रीराम 🧡🚩
शिवराय असे शक्तिदाता..🚩
2024/06/25 23:42:45
Back to Top
HTML Embed Code: