Telegram Web Link
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*तुमची क्षमता ही मर्यादित असली पाहिजे नाही तर लोकं तयारच असतात फायदा घ्यायला...!*_

*🚩 #हर_हर_महादेव*
🚩खेळूनी कृष्णनिती, रचिली रामराज्याची रास ! संघर्ष करुन शत्रुशी, स्थापिले हिंदवी स्वराज्य ! कर्तुत्वाने स्वत:च्या घडविला महाराष्ट्राचा नवा इतिहास शुर असे ते राजे, छत्रपती शिवाजी महाराज🚩

शिवराय_असे_शक्तीदाता 🙏🏻🚩
_*सूर्याला शोधावं लागत नाही त्याचा प्रकाशच त्याच्या अस्तित्वाची साक्ष देत असतो...!!*_

*#ऊर्जा_छत्रपती..🚩*
*🚩 #प्रेरणास्थान...*

_*जो येणाऱ्या अडचणीत न थांबता, न खचता आपल्या यशाची संघर्षमय वाटचाल करतो तोच आयुष्यात एक वेळ नक्की यशस्वी होतो.*_

*🚩 #अखंड ऊर्जास्रोत छत्रपती शिवाजी महाराज*

*🚩 #दैवत_छत्रपती_शिवशंभू*
महाराजांनी ३५ वर्ष जो अविरत संघर्ष केला तो फक्त राजा होण्याचा नव्हता तर रयतेला परकीय सत्तेच्या गुलामीतून मुक्त करणे, गोरगरीब लोकांना त्यांचा हक्क देणे, रयतेच्या जीवनात स्थैर्य व शांतता आणणे आणि एत्तदेशीय राज्य स्थापन करणे हाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य लढ्याचा हाच खरा उद्देश होता. असा लोककल्याणकारी राजा या जगी पुन्हा होने नाही.
छत्रपती शिवाजी महाराज की जय 💯👑
❤️
ll मराठी ll
गडकोटात वसते , पानाफुलांत बहरते
शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन भूमीत धडधडते 'मराठी'

#लाभले_आम्हास_भाग्य_बोलतो_मराठी
.
.
मराठी_राजभाषा_गौरव_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा🚩
मराठी अस्मितेचा मानबिंदू.🚩
छत्रपती शिवाजी महाराज.🚩
आमचा श्वास मराठी.🚩
आमचा ध्यास मराठी.🚩
आमचा इतिहास मराठी.🚩
आमचं सर्वस्व माय मराठी..🚩❤️

_२७ फेब्रुवारी प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचा दिवस म्हणजेच, 'मराठी भाषा गौरव दिन'_
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*स्वतःला सुंदर बनवायचं असेल तर आपले गुण, कर्म आणि स्वभाव चांगले ठेवा...!*_

*🚩 #हर_हर_महादेव*
_*महाराज तुम्ही इतके श्रेष्ठ आहात की खूप मोह वाटतो तुमचा... तुमचे आचार-विचार, तुमची विचार करण्याची क्षमता एवढी मोठी होती की तुम्हाला जाऊन साडे तीनशे वर्षे झाले तरीही तुमच्या विचारांनी तुम्ही आमच्यात जिवंत आहात.. अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा.*_

*#जागर_शिवकिर्तीचा..🙏🏻🚩*
🚩 ऊर्जामंत्र

🚩आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा, मग ते कर्म असो किंवा व्यक्ती...!🚩

🚩 हर_हर_महादेव
🚩 बोलविता धनी कोन 🚩
काही गद्दार म्हणतात जरांगे पाटलांचा बोलविता धनी कोण आहे...? त्यांना मी सांगतोय जरांगे पाटलाचा बोलविता धनी कोण आहे...
*१) घरामध्ये लग्नाला आलेली मुलगी आणि तिच्या लग्नासाठी घरात पैसा नाही त्या विवंचनेत अखंड बुडालेला गरीब बाप हा जरांगे पाटलाचा बोलविता धनी आहे...
*२) मुलाला भरपूर मार्क पडून सुद्धा नोकरी मिळत नाही मुलाचा उदास चेहरा पाहून उदास झालेला गरीब बाप हा जरांगे पाटलाचा बोलविता धनी आहे...
*३) शेतात रात्रंदिवस कष्ट करून,
सावकाराकडून कर्ज काढून,पोटाला पीळा देवुन दुपटीनं भाव वाढलेलं खत ओतुन, निसर्गाच्या कोपातुन वाचलेलं ,अनेक संकटातुन पिकवलेले कांदा,सोयाबीन किंवा कपाशी सारखं पीक सरकारच्या नाकर्तेपणामुळे योग्य भाव मिळाला नाही म्हणुन कर्जबाजारी झालेल्या,विषारी औषध पिऊन आत्महत्या केलेल्या , शेतकऱ्याची विधवा बायको ही जरांगे पाटलाची बोलविता धनी आहे...
बांधवांनो आज जर जरांगे पाटलां सारख्या प्रामाणीक माणसाची साथ दिली नाही तर पुंन्हा दुसरे जरांगे समाजाची बाजु मांडन्या करीता पुढे येनार नाही.
एका प्रामानिक मानसाची साथ द्या.
🙏एक मराठा कोटी मराठा...🙏🚩*
🙌🙇🚩
चंद्रकांत मांढरे आणि सूर्यकांत मांढरे 🙇

त्यांनी सांगितलेली एक आठवण....
पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजी या भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटाचं शुटिंग सुरु होतं.
घोड्यावरुन छत्रपती श्री. शिवाजी महाराज दौडत येतात आणि ऐन कड्याच्या टोकावर ते घोडे दोन पाय वर करुन थांबते असा तो सीन होता.
घोडे नेहमीचे सवयीचे होते.
चंद्रकांतांनाही घोड्यावर बसण्याची चांगली सवय होती. दोन-तीन वेळा शॉट रिटेक झाला तरी भालजींचे समाधान होत नव्हते.
घोडा जोरात दौडत येत होता.
बरोबर ऐन कड्यावर थांबत होता. पण माझ्या चेहऱ्यावर जे भाव हवे होते, ते काही भालजींना मिळत नव्हते.
माझ्याही मनात एक सूक्ष्म भिती तरळत होती न जाणो घोडे थांबले नाही तर ?
मी आणि घोडा दोघेही कड्यावरुन खाली ! नेमकी तीच भावना माझ्या चेहऱ्यावर शॉटच्या वेळी येत होती.
भालजींच्या ते लक्षात आलं ते बसल्या जागीच ओरडले, 'चंद्रकांत , घाबरु नकोस ;

"मेलास तरी छत्रपती शिवाजी म्हणून मरशील.'"

मी त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात होतो.
त्या शब्दांनी काय जादू झाली, कुणास ठाऊक. पण पूढच्याच टेकला शॉट ओके झाला.

होय हीच जादू आहे छत्रपती शिवराय या नावात 🙇🙌🚩

मला सर्वार्थाने भावलेले हे दोनच बंधुराज.... ज्यांनी आमच्या छत्रपती शिवरायांच्या भूमिकेला यथायोग्य न्याय दिला... सूर्यकांत मांढरे आणि चंद्रकांत मांढरे 🙇

आजतगयात त्यांच्या नंतर हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका, ते आचरणात आणणे,
ते हावभाव, चालण्यातील ती स्थिरता, बोलण्यातील दमदार पणा, भेदक नजर
हे कदाचित कोणाला आत्मसात करणे शक्य झाले नाही, आजही जुने चित्रपट पाहताना साक्षात छत्रपती महाराज समोर असण्याचा भास होतो 🙏🏻

_______
_______
🚩फ़िक्र ना कर नादान, ए सिवा का अखाड़ा है...!!_जिसने एकही दम में यहां अफझल को उखाड़ा है...!!_🚩
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*योग्य वेळ कधीच येत नाही, तर स्वतःवर विश्वास ठेऊन स्वतः योग्य वेळ निर्माण करावी लागते...!!*_

*#दैवत_छत्रपती_शिवशंभु 🚩*
*🚩 #प्रेरणास्थान*

_*माणसाच्या जन्माला येऊन ही दैवत्व कसे प्राप्त होते याचे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.*_

*🚩 #हर_हर_महादेव*
🚩
|| अवरंग्या विचारे स्वतःशीच कैसा हा शिवबाचा बाळ ||
|| तसूभरही न मागे हटे डोळ्यातूनी पाखडी जाळ ||

|| मृत्यूलाही लाजवील तो असा मृत्यूंजय होता ||
|| काळही सरला मागे असा तो निर्भय होता ||

|| हा सारा निधर्मी खेळ पाहुनी ढगा-आड दडली चंद्रकोर ||
|| सह्यमाता म्हणे कसा पोरका झाला माझा पोर ||

|| रक्ताचा थेंब गळता साखळदंड थरकला ||
|| यवनी रावणाच्या दरबारातं रौद्र-मारुती गरजला ||

|| कुणास नाही बधलो अजुनी, मृत्यूलाही कवटाळीन मी ||
|| चितेतल्या ठिणागीतुनही वणवा होऊन, अवघा यवन जाळीन मी ||

|| जाता-जाता वदलं, माझं शांभुराजं...||
|| अखेर रानकुत्र्यांनी, फाडला वनराजं...||

――――――――――――――
#११मार्च_तुळापूर #शंभूराजे_बलिदानदिन
――――――――――――――
_*शहाजीराजे जिथे थांबले तिथून शिवाजी महाराजांचा प्रवास सुरु होतो हे ऐतिहासिक सत्य समजावून घेतले तरच शिवरायांच्या कार्याचे यथार्थ आकलन होईल.*_

*#जयसिंगराव_पवार.*

*#छत्रपती_शिवाजी_महाराज_स्मृतिग्रंथ.🚩*
2024/09/29 12:22:05
Back to Top
HTML Embed Code: