Telegram Web Link
_*महाराज तुम्ही इतके श्रेष्ठ आहात की खूप मोह वाटतो तुमचा. तुमचे आचार - विचार, तुमची विचार करण्याची क्षमता एवढी मोठी होती की तुम्हाला जाऊन साडे तीनशे वर्षे झाले तरीही तुमच्या विचारांनी तुम्ही आमच्यात जिवंत असल्यासारखे वाटता. अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा.*_

*#जागर_शिवकिर्तीचा..🚩*
🚩
शतकांच्या पठाणी जुलुमजबरदस्ती मुळे निकृष्टावस्थेत गेलेल्या समाजाला उचल देऊन स्वराज्याची घटना सर्व शक्तिमान केली. अत्यंत महत्वाची क्रांती इथल्या समाजात घडवून आणली आणि शेवटी सामर्थ्यशाली परकीय राजवटीला महाराष्ट्राने नामोहरम करुन शतकानुशतके भारतीय जनतेच्या मनावर अधिराज्य केलं याची ठिणगी प्रज्वलित करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवराय...

――――――――――――――――
शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात..🚩
१९ फेब्रुवारी.
घरोघरी_शिवजयंती.👑🧡🚩
" तुझ्या अस्तित्वाला गरज नाही शब्दाने सजवण्याची,
छ्त्रपती शिवाजी महाराज नावच पुरे आहे माज करण्यासाठी...".
🚩🚩🚩
🚩
लष्कराची कार्यक्षमता टिकविण्यासाठी शिस्तीची गरज असते.
या शिस्तीच्या अभावामुळेच इस्लामी सत्तांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांपुढे निष्प्रभ ठरले.
सैन्याच्या शिस्तीकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी काही खास नियम केले होते.
त्यांची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी ते करीत असत. या नियमांचे उल्लंघन करणारा मग तो कोणीही असो शिक्षेतून सुटका नव्हता.
या छत्रपती शिवाजी महाराजांच्या करड्या नियमांमुळे शिस्त राहिली व ते प्रभावी ठरले हे समकालीन साधनांवरून दिसून येतेच.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी शिस्तीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजेच हे पत्र होय.

सदर पत्रातील सर्व शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडचे आहेत.
हे पत्र छत्रपती महाराजांनी सांगितले आणि बाळाजी आवजीने लिहिले. त्यामुळे या पत्राची भाषा कारकुनी नसून साहेबी आहे. स्वराज्याच्या शिपाई लोकांनी अमुक रितीने का वागावे आणि अमुक रितीने का वागू नये ह्याची फोड छत्रपती शिवाजी महाराजांनी शिपायांस करून दाखविली आहे.
सदर पत्र केवळ आज्ञापत्र नाही.
पत्रात जरब दाखविली आहे.
पत्रात छत्रपती शिवाजी महाराज चिपळूण जवळ पागेचा तळ पडला असता अधिकारी आणि सैन्याने कसे वागावे यासंबंधी १९ मे १६७३ रोजी लिहिलेल्या पत्रात महाराज सांगतात :

“त्यास तुम्हीं मनास माने ऐसा दाणा, रातीब, गवत मागाल.
असेल तोवरी धुंदी करून चाराल. नाहीसे जाले म्हणजे मग काही पडत्या पावसात मिळणार नाही. उपास पडतील. घोडी मरावयास लागतील. म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल,
व विलातीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील, कोण्ही कुणब्याचेथील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले, ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत तेहि जाऊ लागतील.
कितेक दिवस उपाशी मरायला लागतील म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकांत आले त्याहुन हि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल!
तेव्हा रयतिची व घोड्यांची सारी बदनामी तुम्हावर येईल.
हे तुम्ही बरे जाणून, शिपाई हो अगर पावखलख हो, बहुत यादी करून वर्तणूक करणे.”

संदर्भ - वि.का.राजवाडे, मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८, लेखांक २८

या पत्रावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील शिस्त,‌ राज्यप्रमुखाचा अधिकारी आणि सैन्यावर असलेला जरब आणि रयतेप्रती असलेली आपुलकी या गोष्टींची प्रचिती येते.

@_atharv_d_ फोटो साभार 😍
महामेरु तुम्ही निश्चयाचे
रन धुरंधर झालात चक्रवर्ति
गुण अंगी जाणता राज्याचे
कीर्तीवंत असे राजाछ्त्रपती..!🚩
शिवराय असे शक्तीदाता..!🙏
_*अहद तंजावर ते तहद पेशावर अवघा मुलूख आपला ही उद्गोषणा करुन हिंदूस्थानातील रयतेच्या मनात प्रखर राष्ट्रवाद निर्माण करणाऱ्या, व शेकडो वर्षे बेलगाम सत्ता उपभोगणाऱ्या जुलमी सत्ताधिशांच्या पोलादी साखळदंडाचा विनाश घडवत भूमीपुत्रांच्या मनामनात स्वांतंत्र्याची उर्मी निर्माण करुन, “सार्वभौम हिंदवी स्वराज्य" स्थापन करणाऱ्या, महान युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा!*_

*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
_*भूतकाळात, वर्तमानात आणि भविष्यात लहान मुलापासुन ते वयस्कर व्यक्तींच्या तोंडी अभिमानाने घेतले जाणारे नाव म्हणजे छत्रपती शिवराय...*_
महाराष्ट्राला, मराठी मातीला अस्तित्वाचा साज बहाल करणारा कालखंड. शिवकाल असे नुस्ते शब्द जरी कानावर पडले, तरी अंगावर रोमांच उभे राहतात. मनाचं वारू थेट शिवकालात जाऊन थडकतं. मग शिवरायांच्या जन्मापासून ते त्यांनी परकियांशी दिलेले लढे, त्यांना मावळ्यांची मिळालेली साथ आणि त्यातून उभं राहिलेलं स्वराज्य... नजरेसमोर सारं काही लख्ख उभं राहतं. अन् त्या स्वराज्याच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेले दिसतात छत्रपती शिवाजीमहाराज नि नकळत ओठांवर शब्द येतात
निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी।।
छत्रपती शिवाजी महाराज कि जय..!
🧡💫
तयारीला लागा आपला सण येतोय 🚩
अखंड हिंदूंचा सण येतोय✌️🔥
शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात💯
आतुरता शिवजयंतीची 🚩
शिवजन्मोस्तव सोहळा २०२३ लवकरच..
जगात भारी १९ फेब्रुवारी 🧡🚩
जय श्रीराम 🧡🚩
शिवराय असे शक्तिदाता..🚩
*🚩 #प्रेरणास्थान*

_*खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं कारण जे खऱ्या मार्गावर चाललात ते कायम रुबाबात राहतात...*_

*#हर_हर_महादेव 🚩*
_*प्रभू श्रीरामांनी राज्यकारभार कसा चालवला, रयतेचे राज्य कसे निर्माण केले. याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला तर छत्रपती शिवरायांनी याच आदर्शावर पुढे चालून रयतेच्या स्वराज्याची निर्मिती केली.*_

*#जय_श्रीराम 🧡🚩*

*#शिवराय_असे_शक्तिदाता..🚩*
_"हिंदुस्तानच्या इतिहासातील फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी चरित्र माझ्या अंत:करणात मध्यान्हीच्या तळपत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान होवून राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांइतकेच उज्वल चरित्र दुसऱ्या कुणाचे मला दिसले नाही सद्य स्थितीत या महापुरुषाच्या वीरगाथेचा आदर्शच आम्हाला मार्गदर्शक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आदर्शच अखिल हिंदुस्थानासमोर ठेवला पाहिजे"
 
✍🏻 - नेताजी सुभाषचंद्र बोस
*🚩 #उर्जामंत्र*

_*नियोजन आणि नेतृत्व श्रेष्ठ असेल तर, हजारो तलवारीचं युध्द एका वाघ नखावर सुद्धा जिंकता येतं...*_

*🚩 #हर_हर_महादेव*
_*छत्रपती शिवराय म्हणजे मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदानच. महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यान पिढ्या पुढं आहे एखाद्या झंझावाताप्रमाणे म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात, मनात, हृदयात वसतात.*_

*#शिवराय_असे_शक्तीदाता 🚩*
_*राम राज्यानंतर जर लोकांना कोणत राज्य यावं असं वाटतं असेल तर ते म्हणजे स्वराज्य.*_
_*सह्याद्रीतील गडकोटांना मुर्त स्वरूप देऊन मुठभर मावळ्यांच्या साथीने, चारीही पातशाहींशी लढताना गडकोटांचा ढालीसारखा वापर करून हर हर महादेवचा जयघोष करत शञुवर तुटून पडून तर कधी गनिमी कावा या युद्धतंञाचा वापर करून स्वराज्याचे सुराज्य प्रस्थापित करणारे छत्रपती शिवराय.*_

*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
महाराज तुम्ही इतके श्रेष्ठ आहात की खूप मोह वाटतो तुमचा... तुमचे आचार-विचार, तुमची विचार करण्याची क्षमता एवढी मोठी होती की तुम्हाला जाऊन साडे तीनशे वर्षे झाले तरीही तुमच्या विचारांनी तुम्ही आमच्यात जिवंत आहात.. अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा.

जागर_शिवकिर्तीचा..🙏🏻🚩
या जागेपेक्षा अधिक महत्त्व अजून कुठे !!
"हाच आपला महादेव आणि हेच आपलं कैलाश!"
दुर्गदुर्गेश्वर 👑🚩
_घरावर तुळशी पात्र ठेऊन,अखंड स्वराज्यास घर मानून,जे रयातेसाठी अविश्रांत लढले व अकाली ही जबाबदारी शिवसूतांवर सोपवून परलोकास सामावले आणि इहीलोकी आदर्श रुपी, स्फुर्तिरुपी उरले,अशा शिवछत्रपतीं समोर साक्षात भास्कर नतमस्तक होतो त्यात नवल काय_

फोटो - विश्रामगड(पट्टा किल्ला)
हीच पंढरी मजला, हेचि आम्हास काशी... लाल मातीमध्ये तीर्थ आमचे... सह्याद्रीच्या देवापाशी...!.🙏🏻🚩
दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज🚩
2024/09/28 23:32:51
Back to Top
HTML Embed Code: