Telegram Web Link
✍️
सुरत लूट-समज गैरसमज ✍️
१६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असे शब्द वापरले जातात.
परंतु ती लुट नव्हती ती वसुली होती.
बादशहाची सेना वारंवार स्वराज्यातील जनतेला त्रास देत असे त्यामुळे स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांना मोठे सैन्य उभे करावे लागले.
या सैन्याच्या खर्चाची जबाबदारी महाराजांचीच म्हणजे स्वराज्याची.
मोगलांपासुन स्वराज्याचे संरक्षण करण्याकरता महाराजांनी जो खर्च केला तो वेळोवेळी अश्या प्रकारे जमा झालेल्या पैशातुनच.
ही लुट नव्हती स्वराज्याच्या रक्षणासाठी केलेली वसुली होती.
✍️
महाराजांचे सैनिक सुरतेमध्ये धामधूम करत असताना एक विधवा भयंकर अस्वस्थ झाली होती, ती घाबरली होती तिच्या घरात फक्त तिच्या दोन तरूण मुली होत्या.
शिवाजी महाराजांचे सैनिक माझ्या घरात घुसतिल आणी आमच्या अब्रुचे धिंडवडे काढतील असं तिला वाटत होत.
ती मनातल्या मनांत देवाची प्रार्थना करत होती.
इतक्यात दरवाजा वाजला ती दरवाजा उघडायला तयार नव्हती.
परंतु दरवाजा वाजवणारा दुभाषी शांत स्वरात तिला दरवाजा उघडण्याची विनंती करत होता अभय देण्याची भाषा करत होता.
अश्या वेळेला घाबरतच तिने दरवाजा उघडला.
तो दुभाषी हात जोडून तिच्यापुढे उभा राहिला.
ती आश्चर्यचकित झाली, शिवाजी महाराजांची माणसं शस्त्र घेऊन आता घरात घुसतिल अशी तिला भिती वाटत होती.
पण तो दुभाषी म्हणाला “ आमचे महाराज स्त्रियांना मातेसमान मानतात.
तुमच्या पतिने जिवंत असताना खुप दानधर्म केला आहे.
कोणताही भेदभाव केला नाही याची महाराजांना माहीती आहे त्यामुळे तुम्हाला कोणी त्रास देऊ नये यासाठी महाराजांनी तुम्हाला दोन संरक्षक दिले आहेत.
तुम्ही आता निश्चिंत व्हा. तुम्हाला हा संदेश देण्यासाठीच महाराजांनी मला पाठविले आहे.”
हे ऐकुण तिच्या डोळ्यात पाणी आलं नकळत तिने आकाश्यातल्या बापाला प्रार्थना केली “
या सद्विचारी राजाला तु दिर्घायुष्य दे. !”
( मोहनदास पारेख ) सुरत व्यापारी ✍️

छत्रपती शिवाजी👑 महाराजांसारखा थोर राजा इतिहासांत एकमेव.
त्यांच्यावर समाजाचा प्रचंड विश्वास.
या विधवा स्त्रीच्या अंतःकरणात शिवाजी महाराजांविषयी कोणत्या भावना निर्माण झाल्या असतिल याची तुम्ही कल्पना करा.
अश्या असंख्य माणसांच्या ह्रदयाचे स्वामी होते आपले शिवराय. कारण त्यांचे चारित्र्य शुद्ध होते वैयक्तिक जीवन आणी सार्वजनिक जीवन असा कोणताही फरक त्यांच्या चरित्रात नाही.
परकिय नागरिकांनासुद्धा पुज्य वाटणारे शिवराय आमच्यासाठीतर परमेश्वर स्वरूपच आहेत.
.
.
.
.
_भवतः कारणात् एव वयं हिन्दुरूपेण जीवामः.._
_अतः भवतः स्थानं भवतः अस्ति न तु अन्यस्य.._
दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज🚩
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
_उंचा ये पहाड है शेर की ये दहाड है चमत्कार की खोज है वो शेर_शिवराज_है 🙏🚩_
दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज🚩
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
_युक्ती,शक्ती,साहस,धाडस,जिद्द,संयम,धैर्य,नेतॄत्व,कौशल्य,ईच्छाशक्ती,स्वराज्य साठी मरण्याची तयारी आणि आऊसाहेबांचा आशीर्वाद यांचा संगम म्हणजे_
छत्रपती शिवाजी महाराज🚩


शिवराय_असे_शक्तीदाता🚩
_इतिहासातील सुवर्ण पर्व ते, छत्रपतींच्या शौर्याचे_
_न्यायी उदार रयतेचा राजा, प्रतीक अचाट धैर्याचे_
_सूर्य तारेही स्तिमित होती,_ _पाहूनी त्याच्या तेजाला_
_अन महाराष्ट्राचा पहिला मुजरा…„_
"छत्रपती शिवाजी महाराजांना"🚩
शिवराय_असे_शक्तिदाता...🚩
_सह्याद्रीच्या उरात खदखदणारा ज्वालामुखी,_
_लाखात एक असा लाख मोलाचा राजा म्हणजे_
_छत्रपती शिवाजी महाराज..🚩_
_छत्रपती सूत्र विश्वाचे..🚩_
दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज🚩
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
✍️
छत्रपति_शिवाजी_महाराज 🚩
व्यक्तिरेखा जितकी शोधावी तितकी वेगळी भासत राहते.
साडे तीनशे वर्ष होऊन हि या राजाबद्दलची चिकित्सा कमी न होता वाढतच चाललेली आहे.
शोधाव तर काय ?
जगात जितका वारा आहे तितका शिवछत्रपती यांचा पराक्रम होऊन गेलेला आहे.
त्यात शोधेल तितका सापडेल असा इतिहास आहे.
महाराजांची ते हयात असताना आणि नसताना अशा दोन्ही काळात त्यांची चित्रे काढण्यात आली.
जी काही तंजावर शैलीत आणि मुघल शैलीत काढण्यात आली.
त्या आधी जरी हुबेहूब चित्रे काढण्याची कला जन्म घेऊन दीडशे वर्ष आधी आली असली तरी ती कला भारतात आत्ता अलीकडे दहा एक वर्ष आधी समृद्ध झाली आहे.
लिओनार्डो द विन्सी, मायकल अन्जेलो सारख्या चित्रकारांनी महाराज जन्माच्या आधी दीडशे वर्ष आधी चित्रकला समृद्ध केली.
पण महाराजांची चित्रे काढताना मात्र ती द्विमितीय काढण्यात आली.
मीर महंमदने काढलेलं शिवाजीराजांचं अश्वारूढ चित्र प्रसिद्ध आहे.
बाहेरच्या देशात असलेल महाराजांचं एका
बाजूला चेहरा असलेल चित्र भारत सरकार मान्य आहे.
त्यावरून एक अंदाज माहित आहे कि,
शिवरायांची उंची ५.५ फुट इतकीच आहे.
महाराज जिरेटोप घालत.
गळ्यात कवड्याची माळ.
हातात सोन्याचे कंडे.
अंगात अंगरखा.
पायजमा.
राजेशाही पायात मोजडी.
कमरेच्या पट्ट्यात खोचलेली कट्यार आणि बाजूला अडकवलेली तलवार.
कपाळाला लावलेली फिकटशी चंद्रकोर.
नाक अगदी सरळ.
म्हणजे कपाळातून बाहेर येऊन थेट ओठांच्या वर थांबलेलं.
मिशी अगदी तिरकस आणि त्याला धनुष्यबाणासारखा पीळ, हनुवटीला टोकदार
दाढी आणि भले मोठे पण अगदी रेखीव गोलाकार कल्ले.
शांत गंभीर डोळे आणि एका स्त्री सारखे कोरीव भुवया,
तेही त्रिकोणी.
अशी काहीशी महाराजांची प्रतिमा त्यांची चित्र बघून डोळ्यांसमोर येते.

पण काही तेव्हाच्या लोकांनी महाराजांचे वर्णने लिहून ठेवले आहेत.
जगातलं महाराजांचं पाहिलं चरित्र हे मराठी नाहीतर पोर्तुगीज भाषेत १६९५ ला म्हणजे महाराजांच्या महापरिनिर्वाणानंतर पंधरा वर्षांनी प्रसिद्ध झाल.
कोस्मी द गार्द हा त्या चरित्राचा लेखक होता.
त्याने स्वतः महाराजांना बघितलेलं होत.
छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या मोहिमेला असताना त्याने महाराजांना अगदी निरखून बघितलेलं होत.
त्यातली त्याची एक नोंद आहे कि,
शिवाजीराजे सुरतेत असताना पायी फिरत.......✍️

@akashkashid111 कला साभार ❤️

✍️
महाराज विचारमग्न होत सईबाई राणीसाहेबांच्या दालनाच्या दिशेने येऊ लागले....
तेच...मागुन एका सौम्य आवाजाने हाक मारली....

" आबासाहेब....."
आलेली हाक होती ती.... लहानग्या शंभुराजेंची...

"आबासाहेब आबासाहेब...." म्हणत शंभूराजे आले आणि शिवरायांच्या छातीशी बिलगले....आपल्या कडेत शंभुराजेंना उचलून शिवरायांनी शंभुच्या गालावर आपले ओठ टेकवले... आणि शंभुराजेंच्या डोक्यावर हात फिरवत धाराऊंकडे बघून म्हणाले..

" राणीसाहेब आता कश्या आहेत ??"

" आता ठिक हाय राणीसाहेब....आपलीच वाट पहात आहे जी....महाराज....!!" धाराऊ आपल्या मावळी भाषेत बोलल्या....

शिवरायांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले....आणि..." ठिक !!! " म्हणत महाराज सई बाईंच्या दालनाकडे निघाले.....

दालनाचे कवाड हळूच खोलत राजेंनी दालनात प्रवेश केला... दालनात सावल्यांचा अंधार पडला होता.. आणि पुढे आपल्या सावळ्या मुद्रेत , चेहऱ्यावर पावित्र्य , डोक्यावर असलेल्या पदराला संभाळत, आपल्या हाता श्री बाळकृष्णाची मुर्ती साफ करत सईबाई राणीसाहेब आपल्या मंचावर बसल्या होत्या !!

" सई....."

शिवरायांच्या आवाजाने राणीसाहेब भानावर आल्या...

" महाराज... आपण..!! "

आपल्या पदराला संभाळत राणीसाहेब पुढे आल्या..

शिवरायांच्या पायास स्पर्श करायला झुकणारच की , राजेंनी त्यांना उठते केले... आणि काळजी ने म्हणाले..

" नाही... सई दम लागेल... !! स्वतः ची काळजी घेत चला..!!".

सईबाईंचा चेहरा थोडा उजडला...चेहऱ्यावर स्मित उमटवत राणीसाहेब म्हणाल्या...

" महाराज !! आपण आहात ना , आमची काळजी घ्यायला...".

राजेंनी आपला हात काळजीपूर्वक राणीसाहेबांच्या डोक्यावरुन फिरवला...आणि महाराज म्हणाले...

" सई !! खानाचं अवाढव्य संकट स्वराज्यावर आले आहे !! आणि शंभुराजें भविष्यातील राजे आहेत , त्यांना जपण्यासाठी तुम्ही स्वतः ला जपा... कदाचित या संकटात आम्ही !! "

राजेंचे वाक्य पूर्ण होण्याअगोदर सईबाईंचा हात राजेंच्या ओठावर टेकला... डोळे भरून आले.... ओठ थरथरले , शब्द बाहेर पडले...

" नाही महाराज !! आपल्या पुढे म्रुत्यु स सामोरे जाण्यासाठी आम्ही स्वतः उभे राहू...शिवा अगोदर अग्निकुंडात सती जाते महाराज !!!!
पुन्हा ऐसें अनर्थ काही न बोलणे... आई भवानी थोर आहे..ती जपेल सर्व..."

खानाच्या संकटाला झेलण्यासाठी राजे प्रतापगडावर निघाले पण इकडे सतीने यज्ञकुंडात प्रवेश केला....

चंदनाच्या चितेवर सई गेल्या स्वराज्यास पोरके करुन स्वर्गी जगदंबेस शिवप्रतापाचे मागणं मागायला...क्रमशः

✍🏻अक्षय चंदेल ( लेख अधिकृत) @akshay_chandel_21
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*रडून मिळालेल्या सहानुभूती पेक्षा लढून मिळवलेल्या जखमा प्रिय वाटू लागल्या की माणूस आतूर होतो समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला मातीत मिळवण्यासाठी...!*_

*🚩 #हर_हर_महादेव*
🚩⚔️
महाराष्ट्राच्या इतिहासातले ज्वलंत क्रांतीपर्व,
आशिया खंडातील सर्वात मोठ्या असणार्या मोंगलशाहीविरुध्द,
असेतूहिमाचलपती दिल्लींद्र औरंगजेबाविरूध्द,
क्रूर, कपटी अशा जंजिरेकर सिद्दीविरुध्द, महाधूर्त गोवेकर पोर्तुगीजांविरुध्द, म्हैसूरकरांविरुध्द आणि राजद्रोही घरभेद्यांविरुध्द यशस्वी झुंज देणार्या रणमार्तंड योध्द्याचा धगधगता आयुष्यपट म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे.

एखाद्या पर्वताप्रमाणे महान असलेल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेऊन तब्बल ९ वर्षे स्वातंत्र्यासाठी निकराची पंजेफाड केली आणि औरंगजेबाला ह्याच दख्खनेत आपल्या कबरीसाठी जमिन शोधावयास भाग पाडण्याचे धैर्य मराठ्यांना दिले
तोच सामर्थ्यशाली महाबलाढ्य नेता म्हणजे
छत्रपती_संभाजीराजे 🚩

——————————————————————

Concept Art :- @shiv_sketchmaker_
स्त्री कोणत्याही रुपात समोर आली तरी तिला आई जगदंबा स्वरूप मानून तिच्याकडे पाहावे अशी आमच्या आऊसाहेब आणि आबासाहेबांची शिकवण.
छत्रपती शिवाजी महाराज..🚩
शिवराय_असे_शक्तिदाता🚩
शिवराय आपल्यातच आहे,
थोडंतरी जाणवता आलं पाहिजे !
सर्वात श्रेष्ठ इतिहास आपलाच आहे
थोडा तरी जपता आला पाहिजे !
🚩
म्लेंच्छक्षयदिक्षीता 🚩
प्रतापगडचा रणसंग्राम अफजल खान वध

देव,देश,धर्म यांच्याप्रति स्वतःची जबाबदारी विसरलेला समाज आणि पाश्चात्य संस्कृतीच्या विळख्यात अडकून स्वत्व, स्वाभिमान केव्हाच मागे सोडलेला समाज देशावर येणाऱ्या भयानक संकटासमोर कसा टिकेल?
म्हणूनच साऱ्या समाजाला एक मनाने जोडू, जनमानसात असलेले भेदाभेद नष्ट करू वज्रासमान कणखर संयमी असा श्री छत्रपती शिवराय रुपी प्रतापगडच्या रणसंग्रामापर्यंतचा इतिहास चित्ररूपामध्ये जिवंत करून घडलेले प्रसंग तो थरार आपल्या समोर मांडत आहे.
कला व इतिहास प्रेमींसाठीसाठी सर्वांकरिता सादर करीत आहे, म्लेंच्छक्षयदिक्षिता प्रतापगडचा रणसंग्राम...
आणि माझी ही कला शिवछत्रपतींच्या चरणी समर्पित. छ्त्रपती शिवाजी महाराज की जय.............🚩

१० नोव्हेंबर १६५९
⛰️
लवकरच........प्रतापदिन 🚩
⚔️
जय_भवानी🔥
जय_शिवराय🚩
⚔️
⚔️
"अफझलखानाचा 'लॉस' हा जीवघेणा 'लॉस' नाही.

पण त्याच्या उलट विचार करा-
छत्रपती शिवाजी महाराजांचे काही बरे वाईट झाले असते तर आज मराठीत मी तुमच्यासमोर हा इतिहास सांगायला उभा राहिलो नसतो.
तुम्ही माझ्यासमोर ऐकावयाला राहिला नसता.
मराठे आणि महाराष्ट्र यांची खरी अस्मिता जर खऱ्या अर्थाने जागृत झाली तर ती याच प्रसंगाने 🙌

महाराजांना आपल्या बळाची जाणीव झाली,
आत्मविश्वास शंभर पटींनी दुणावला, उंच झाला.
'मी गगनाला गवसणी घालू शकेन' अशा प्रकारची जिद्द महाराजांमध्ये निर्माण व्हायला ही एकमेव गोष्ट घडलेली आहे.
त्यामुळे अफझलखानाचा वध ही मराठ्यांच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरलेली आहे.
⚔️
न्यायाचा अन्यायावर,
धर्माचा अधर्मावर,
देवाचा असुरावर,
स्वकीयांचा परकीय जुलमांवर,
युक्तीचा ताकदीवर,
आणि
शिवरायांचा अफझुल्यावर विजय म्हणजेच " शिवप्रताप दिन "
अफजलखानाचा मृत्यू ही मराठ्यांच्या इतिहासासाठी एक आवश्यक बाबच होती."
-सेतुमाधवराव पगडी
शिवचरित्र-एक अभ्यास ✍️
१० नोव्हेंबर १६५९
⛰️
लवकरच........#प्रतापदिन 🚩
⚔️
जय_भवानी🔥
जय_शिवराय🚩
⚔️
🚩
बखरकार सांगतात, अफझलखान मारला गेला हि बातमी चौथ्या दिवशी विजापुरास कळली, ती ऐकताच आदिलशहा ताक्तावरून उठून खेद करू लागला…

बडी बेगम अल्ला !! अल्ला !! खुदा ! खुदा ! करून रडत अंग पलंगावर पडली.

पुढे तिने तीन दिवस पाणीही ग्रहण केले नाही.

इकडे जीजाउंना इतका आनंद झाला कि त्यांना तो त्रैलोक्यात मावेना.
शिवाजी राजांचा दरारा इतका वाढला कि, चारी दिशांच्या शत्रूंना नीट झोप लागेना.
प्रतापगडाच्या पराक्रमानंतर राजांच्या विजयाचा घोडा चौकुर उधळला आणि यशवंत राजा, कीर्तिवंत राजा म्हणून लोकप्रिय झाला.
.
.
.
१०_नोव्हेंबर_१६५९
.
.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*आज १० नोव्हेंबर...*

अर्थात सह्याद्रीने आपल्या कातळी छातीवर वाघनखांनी कोरुन ठेवलेला दिवस✍🏾🚩
🦁 शिवप्रताप दिन 🦁

तुमच्याच वाघनख्यांना सापडले राजे,
त्या अफजुल्याच्या आतडीचे माप..,
हाच जन्म काय, पुढची अनेक जन्मे,
जगाला ओरडून सांगेन माझ्या
छत्रपती शिवाजी राजांचा शिवप्रताप!

शिवप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा..!🙏🏽🙏🏽🚩🚩

छत्रपती शिवाजी महाराज 🚩 🙏🚩 जय शिवराय🚩 जय शंभुराजे🚩
2024/09/29 09:22:43
Back to Top
HTML Embed Code: