Telegram Web Link
छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व म्हणजे अनेक सदगुणांचा समुच्चय होय. स्वातंत्र्याची उत्कट आकांक्षा, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कोणतीही जोखीम पत्करण्याची तयारी, शत्रूला निधड्या छातीने भिडण्याचे धैर्य, युद्ध जिंकण्याकरिता प्रभावी डावपेच आखण्यासाठी आवश्यक असलेली कुशाग्र बुद्धीमत्ता, रणांगणात स्वत: आघाडीवर राहण्याची तत्परता, विलक्षण युद्धकौशल्य, साथीदारांविषयी अपार आत्मीयता, प्रजेविषयी वात्सल्य, यश मिळवून देणारी निर्णयक्षमता, समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांच्या भल्याची चिंता, अधिकार्यांना शिस्त लावण्यासाठी आवश्यक ती कठोरता, धार्मिक सहिष्णुता आणि या सर्वांचे अधिष्ठान म्हणून विशुद्ध शील अशा अनेक वैशिष्ठ्यांनी मोहरलेले त्यांचे चरित्र हा भारतीय लोकांच्या दृष्टीने युगानुयुगांसाठी लाभलेला प्रेरणास्त्रोत आहे.
डॉ. आ.ह. साळुंखे.
----------------------
"हिंदुस्तानच्या इतिहासातील फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी चरित्र माझ्या अंत:करणात मध्यान्हीच्या तळपत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान होवून राहिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांइतकेच उज्वल चरित्र दुसऱ्या कुणाचे मला दिसले नाही
सद्य स्थितीत या महापुरुषाच्या वीरगाथेचा आदर्शच आम्हाला मार्गदर्शक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आदर्शच अखिल हिंदुस्थानासमोर ठेवला पाहिजे"
 
- नेताजी सुभाषचंद्र बोस
Forwarded from Marathisahitya.in
आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांचे विचार एकदा नक्की वाचा.
👇👇👇👇👇👇

https://www.marathisahitya.in/2022/02/mahatma-gandhi-quotes-in-marathi.html
_जग जिंकण्याचे सामर्थ्य बाळगणारा ६५ वर्षीय मुगल सम्राट औरंगजेब जेव्हा मराठ्यांच्या बावीस वर्षांच्या नवख्या राजासमोर हतबल होतो तेव्हा संभाजीराजेंच्या अफाट आत्मबलाचा अंदाज येतो...🚩_
छत्रपती शंभूराजे..🙏
_पराक्रमाची परिसीमा आणि धाडसाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे..._
छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩
शिवराय असे शक्तीदाता..🙏
_उगाच कुतूहलाने करोडो नजरा त्यांच्याकडे बघत नाहीत, त्याचं कौतुक स्वतः सह्याद्री करतो.._

सर्वस्व_छत्रपती..🚩
शिवराय असे शक्तीदाता..🙏
_स्वसंरक्षणाचा खात्रीचा मार्ग शत्रूवर चढाई करण्यातच असतो, हे लष्करी व राजनैतिक तत्व महाराजांनी अमलांत आणले याचा परिणाम राजांच्या समकालीन लोकांतही उमटलेला दिसला शीख, सतनामी, अशा धर्मपंथांची बंडे झाली, राजपूत, आहोम व कन्नड लोकांनी स्वराज्यरक्षणासाठी समशेरी सरसावल्या, मोगली राज्यातील छत्रसालासारख्या सरदारांत स्वातंत्र्यलालसा निर्माण झाली. हे महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचे फलीतच म्हणायला हवे..🚩_

प्रेरणा छत्रपती
शिवराय असे शक्तीदाता..🙏
_छत्रपती शिवाजी महाराजांची बुद्धीमत्ता....._

_धुर,आग,प्रकाश,आवाज यांचा संदेश वहनासाठी उपयोग तोही १६ व्या शतकात महाराजांनी केला हीच तर माहिती टेक्नीकल क्षेत्रातील पहिली क्रांती या देशात करुन वेगवान संदेश वहनाची महती जगाला दाखवुन दिली..._

_शिवराज्यभिषेकाची माहीती काही मिनीटात सर्व गडांवर पोहचवण्यासाठी ‘पांढऱ्या धुराचा उपयोग’ स्वराज्यावरील संकटाची बातमी लगेच आजुबाजुच्या किल्ल्यांना देण्यासाठी ‘काळ्या धुराचा उपयोग’ तानाजींना कोंढाणा लढवताना ती बातमी लगेच कळावी म्हणून ‘गंजी’ पेटवुन इशारा देण्याची सूचना हा प्रकाशाचा उपयोग आणि घोडखिंडीत लढणाऱ्या तीनशे मावळ्यांना आपन पोहचल्याची बातमी कळवण्यासाठी तोफांच्या आवाजाचा पर्यायाने, ध्वनीचा उपयोग करणारा हा आपला राजा मँनेजमेंटचा Initiative याच तत्वाचा नाहीतर अख्या व्यवस्थापन क्षेत्राचा ‘गुरु’ आहे...._

_असेतुहिमाचल पती,आशिया खंडातील सर्वात बलाढ्य राजवाटीच्या बादशाहाचे, मोगलशाहीला सर्वोच्च वैभवाचे दर्शन घडवणार्या आलमगीर आलमपन्हा अवरंगजेबाच्या राजमुकूटाचे हरण करणारा एकच एक महाबलाढ्य योध्दा : राजश्री शंभुछत्रपती !!_
_इतिहास साक्षी आहे महाराजाच्या तलवारीच्या धारेला लागलेला रक्ताचा प्रत्येक थेंब हा रयतेच्या कल्याणासाठी होता, म्हणून माझा शिवबा राजा लाखात एक होता..🚩_
शिवराय असे शक्तीदाता..🙏
_*संघर्षाच्या मातीत जन्माला आलोय आपण मग पराभवाला घाबरायचं नाही, आयुष्याला प्रेरणा देणारं नाव समोर ठेवायचं अन् आपली वाटचाल सुरू ठेवायची.*_

*🚩 #शिवराय_असे_शक्तीदाता*
जगाची उलथापालथ झाली, हिमालयाच्या जागी समुद्र झाला, सह्याद्रीच्या सर्व दऱ्या - पठार झाल्या, अन शिखरे भुईसपाट झाली, सारे किल्ले जमीनदोस्त झाले, इथली मानवसंस्कृती संपुष्टात आली

मग...इथल्या संस्कृतीचा शोध घेतला जाईल

तेव्हा, छत्रपती_शिवाजी_महाराज हा श्वास इथल्या मातीच्या पोटात घुमताना ऐकू येईल..🚩

निरंकुश
शिवराय असे शक्तीदाता..🙏
संकट कितीही मोठं असू द्या
त्याला उभं फाडायचं... 🚩

शिवराय असे शक्तीदाता..🙏
टाप नाय झाली कोणाची, त्या नजरेला नजर द्यायची हिम्मत नाय केली, कुणी आडवं जायची.
ताकत नव्हती कोणाची, सर्जाला हरवायची.तो अजिंक्य होता, अजिंक्य राहिला..🔥
• धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज • 🚩
युक्तीने शक्तीवर विजय कसा मिळवता येतो संयमाने असंयमावर कशी मात करता येऊ शकते शस्त्राने होणाऱ्या वारा पेक्षा घातक असा शत्रूच्या मानसिकतेवर केलेला प्रहार किती दूरगामी असतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या शिवप्रतापाने सोदाहरण सिद्ध केले.....!

जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩
――――――――――――
चित्रकार : @dhananjaylavhe 👌🏼♥️🔥
🚩🔥छाताडाला टकरून फुटल्यात हजारो शिळा तेव्हाच लागला या चंद्रकोर चा मस्तकी भगवा टिळा.....😇🙃🥰 जय शिवराय 🚩.
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला,
दहा दिशांच्या ह्रुदया मधुनी अरुणोदय झाला.

शिवप्रभूंची नजर उठे आन् उठे मुलुख सारा,
दिशा दिशा भेदित चालल्या खड्गांच्या धारा...

महाराज
शिवाजी महाराजांनी काळाची पावले ओळखली होती. काळाच्या पुढे जाणारे ते एक द्रष्टे युगप्रवर्तक होते. म्हणूनच इंग्रजांनी महाराजांचे वर्णन "The greatest diplomatist of the eastern parts" म्हणजेच पूर्वेकडील देशांतील सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी असे आपल्या आपल्या कागदपत्रात वर्णन केले आहे..!!🔥

शिवाजीलोक🇮🇳🚩
जगाची उलथापालथ झाली, हिमालयाच्या जागी समुद्र झाला, सह्याद्रीच्या सर्व दऱ्या - पठार झाल्या, अन शिखरे भुईसपाट झाली, सारे किल्ले जमीनदोस्त झाले, इथली मानवसंस्कृती संपुष्टात आली

मग...इथल्या संस्कृतीचा शोध घेतला जाईल

तेव्हा, छत्रपती_शिवाजी_महाराज हा श्वास इथल्या मातीच्या पोटात घुमताना ऐकू येईल..🚩

निरंकुश
शिवराय असे शक्तीदाता..🙏
इतिहासाने अनुभवलेल्या सर्वात मोठ्या राज्यक्रांतिचे महानायक युगप्रवर्तक “छत्रपती शिवाजी महाराज”...🙏
शिवराय असे शक्तीदाता...🚩
2024/09/29 13:21:45
Back to Top
HTML Embed Code: