Telegram Web Link
🚩
शिवरायांच्या आरमारासंबंधी एक कवी म्हणतो -
देशी भार्गव क्षेत्र सागर तिरी नाना स्थळे योजिनी, बंदी दुर्ग अनेक डोंगर शिरी बेटे बाले पाहुनी
||जहाजेआरमार भरजलधि दुष्टांसी शिक्षा करी, बारा मावळ देश पर्वत दरी बांधोनि किल्ले गिरी II

🚩
मराठा_आरमार_दिन
२४ ऑक्टोबर १६५७
मध्ययुगीन कालखंडात कोकण किनारपट्टीवर आरमार दलाची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे अगदी २७ व्या वर्षी आरमार स्थापून एक नवे सागरी राज्यच उभे केले होते .
🚩
भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते.
शिवरायांच्या पूर्वीही हजारो वर्षांपासून आपल्याकडे आरमार होते मात्र त्यानंतर काही कारणांमुळे भारतात आरमाराचा वापर पूर्णपणे बंद झाला.
एवढेच काय तर समुद्र उल्लंघायला देखील बंदी करण्यात आली. याचा फायदा पोर्तुगीज-इंग्रज-डच-फ्रेंच-सिद्दी यांनी उठविला आणि आपल्याला अनेक वर्षे गुलामगिरीत काढावी लागली.
त्यावेळचे बलाढ्य सम्राट मोगल-आदिलशाह-निजामशहा-कुतुबशाह इ. यांनीदेखील प्रबळ असे लढाऊ आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही.
मात्र शिवाजी महाराजांनी कोकणाचा मुलुख ताब्यात आल्यानंतर तेथील समुद्र पाहून, सिद्दी व युरोपियनांच्या उचापती पाहून लढाऊ आरमार उभे केले.
एवढेच नाही तर अत्यंत कमी कालावधीत उत्तमोत्तम सागरी किल्ले बांधले. धार्मिक चालीरीती झुगारून देऊन आपल्या मावळ्यांना बलाढ्य युरोपियनांविरुद्ध लढण्याची नवी प्रेरणा दिली.
आणि... आणि मग पुढच्या पिढीने आपल्या समुद्रावरील युरोपियनांची सत्ता खिळखिळी करून टाकली.
पोर्तुगीज तर स्वतःला हिंद महासागराचे मालकच समजत.
समुद्रामध्ये बाहेर पडणाऱ्या कोणत्याही जहाजांना मग ते बलाढ्य मोगलांचे असले तरी त्यांना पोर्तुगीजांकडून कार्ताझ (परवाने) विकत घ्यावे लागत.
मोगलांची हि स्थिती तर आपली काय ?
त्यावेळच्या सागरी किनारपट्टीवरील बलाढ्य शाह्यांपुढे मराठयांची नव्याने उदयास आलेली सत्ता अगदीच छोटी होती.
मात्र शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी आरमाराची गरज ओळखली.
🚩
"सह्यादीचा राजा आज समिनदरावर स्वार झाला”.
“जमिन पण गेली आता समुद्र पण जाणार "
-पोर्तुगीज.
🚩
मराठा_आरमार_दिन
२४ ऑक्टोबर १६५७
मध्ययुगीन कालखंडात कोकण किनारपट्टीवर आरमार दलाची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे अगदी २७ व्या वर्षी आरमार स्थापून एक नवे सागरी राज्यच उभे केले होते .
🚩
अमात्यांच्या म्हणण्यानुसार ,
" छत्रपती शिवाजी महाराजांच्या मते नौदल हे मराठा राज्याचे एक स्वतंत्र अंग आहे ". एक इंग्रज काय म्हणतो पाहू , " तो स्वतः खलाशी नव्हता म्हणून बरे ,
नाही तर त्याने जमिनीचा पृष्ठभाग साफ करून टाकला, त्याप्रमाणे समुद्रही साफ करून टाकला असता ". 🚩
मराठा_आरमार_दिन.
.
.
.
.
.
Maratha_Navy_Day
Father_of_Indian_Navy
Chatrapati_Shivaji_Maharaj
जलं_यस्य_बलं_तस्य.
२४ऑक्टोबर
मराठा_आरमार_दिन.

रणांगणात उभ्या असलेल्या रणमर्दाची ताकद छाताडात असलेल्या स्वाभिमानावर असते
आणि जोवर स्वाभिमान जागा आहे,
तोवरच तो आपल्या लढण्याच्या
धर्माला जागतो...!

शंभूराजे 🚩
अगदी काही दिवसांवर रोशनाईचा सण दिवाळी आलेली आहे.रस्तावर ठिकठिकाणी दिवे विकणारे लोक बसलेले आहेत.हे स्वाभिमानी लोकं कष्ट करून जगतात.अतिशय मेहनतीने मातीला आकार देऊन एक एक दिवा बनवतात आणि आपली दिवाळी रोशन करतात. अगोदरच त्यांच्या वस्तूची किंमत मेहनतीच्या मानाने कमीच असते त्यात आपणही अगदी त्यांचा जीव जाई पर्यंत मोल भाव करून त्यांच्या कष्टाची बोली लावतो.वर्षात एक वेळेस एखादं दोन डझन दिवे घेण्यात काहीच नुकसान नाही.आपण जेंव्हा मोठं मोठ्या दुकानात अथवा मॉल मध्ये जातो तेंव्हा सर्व काही चढ्या भावाने MRP वर घेतो आणि कसलीही तक्रार न करता बिल देऊन निघुन जातो.कष्टकऱ्यांच्या वस्तूला जर 5-10 रुपये जास्त दिले तर आपल्याला भले काही फरक पडणार नाही परंतु त्या गरिबाच्या लेकरांना भरपूर फरक पडेल.ह्या दिवाळीला मदत म्हणून का होईना त्यांनी मागेल त्या किमतीत वस्तू घ्या आणि त्यांच्या लेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा आपसूक आपली दिवाळी त्यांच्या दिव्यांनी उजळून तर जाईलच सोबत भरभरून आनंद पण देईल.आपल्या हस्ते थोडं सत्कार्य झाल्याची पावती देखील नक्कीच मिळेल.
एक उदाहरण म्हणून ह्या फोटोतील व्यक्ती अपंगत्वाचा फायदा घेऊन भीक मागण्यापेक्षा कष्ट करून जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय.असे अनेक व्यक्ती रोज आपल्याला कुठे न कुठे आढळतात.पेन,कंगवे, काटा पिन अश्या छोट्या छोट्या वस्तू विकून ते आपली उपजीविका भागवत असतात.ते श्रीमंत होण्यासाठी नाहीतर स्वाभिमानाने जगण्यासाठी अपंगत्व विसरून मेहनत करत असतात.कधीतरी गरज नसताना त्यांच्या कडून वस्तू विकत घ्यावी हे पण पुण्य प्राप्त करून देते.

🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏
_गुलामी मधून मुक्त होऊन जिवाचा भंडारा करुन रयतेच्या स्वाभिमान व अस्मितेचे रक्षण करणारा एकमेव राजा,ज्या काळात देव-देवळे देखील सुरक्षीत नव्हती तेव्हा देवाला देखील संरक्षण देणाऱ्या मर्द मावळ्यांची फौज उभारणारा महाप्रतापी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !!_

राजा स्वराज्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचा , राजा शत्रूशी दोन हात करणाऱ्या मरहट्टा फौजेचा ,राजा हिंदूंचा, राजा रयतेचा, राजा बहुजनांचा 🚩
जाणताराजा 🚩
lस्वीकार हाच जीवनाचा पहिला मंत्र आहे...!

वास्तव समोर आहे ते स्वीकार करण्याची मानसिकता ठेऊन त्याला सामोरे जा त्यावर उपाय शोधा परंतू अनेकजण वास्तविकता स्वीकारत नाहीत आणि केवळ छे छे हे कसं होईल ! हे कसं झालं ! हे होऊच शकत नाही अशा शब्दात स्वतःच समजूत काढून सत्य मात्र नाकारत राहतात आणि एकदिवस अतिशय बिकट परिस्थितीत अडकतात आणि तेव्हा त्यांना ते वास्तव जगू देत नाही त्यामुळे जे झालं आहे ते स्वीकार करा तेव्हा त्यापुढे काय करायचं याचे धागे दोरे हाती लागतात💯
वासुबारस, ज्याला "गोवत्स द्वादशी" असेही म्हणतात, हा सण भारतीय संस्कृतीत महत्त्वपूर्ण आहे आणि विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वसुबारस दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात करणारा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी गाई आणि वासराचे पूजन केले जाते आणि त्यांचे पावित्र्य मानले जाते.

वासुबारसचे महत्व


1. गोमातेचे पूजन: वासुबारस दिवशी गाईचे पूजन केले जाते कारण गायीला माता मानले जाते. गायीच्या उपकारांमुळे ती हिंदू संस्कृतीत पवित्र मानली गेली आहे.

2. गोकुळातील स्मरण: वासुबारस हा सण भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या काळाची आठवण करून देतो. गोकुळातील गाई आणि वासरांचे संरक्षण आणि पालन श्रीकृष्णाने केल्याची कहाणी या दिवसाशी जोडलेली आहे.

3. पर्यावरणीय संतुलन: गायीला भारतात पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते, कारण ती शेती आणि दुध उत्पादनामध्ये खूप उपयुक्त आहे. त्यामुळे गाईचे पूजन करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

4. कुटुंबातील समृद्धी: वासुबारसच्या पूजेनंतर समृद्धीचे प्रतीक म्हणून कुटुंबातील आनंद आणि धनसंपदा वाढवण्याची कामना केली जाते.

5. परंपरा आणि संस्कृतीचे जतन: हा सण साजरा करणे हे आपल्या पारंपरिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे संरक्षण करण्याचे एक साधन आहे, जेणेकरून पुढील पिढ्यांना त्याचे महत्त्व समजावे.

वासुबारस साजरी करण्याची पद्धत

- गाईला सजवणे: गाई आणि वासराला विशेषरित्या सजवले जाते, फुलांच्या माळा आणि रंगांनी त्यांना सजवले जाते.
- *पूजन विधी*: गाईला स्नान घालून तिच्या शिंगांना रंग लावले जातात आणि तिला विशेष खाऊ दिला जातो.
- आरती आणि प्रार्थना: गाईची आरती केली जाते आणि तिच्या कल्याणाची प्रार्थना केली जाते.
- गोड पदार्थ बनवणे: या दिवशी विशेष गोड पदार्थ तयार करून प्रसाद म्हणून वितरण केला जातो.

वासुबारसचा सण आपल्या संस्कृतीतील एक आदर्श उदाहरण आहे ज्यामध्ये गाईच्या प्रति आदर व्यक्त करून पर्यावरण आणि पशु संरक्षणाचा संदेश दिला जातो.
सणासुदीला गडावर असण्यासाठी पण भाग्य लागतंय..
त्यामुळेच नेहमीप्रमाणे दिवाळीचा पहिला दिवा राजमाता जिजाऊंच्या चरणी...
दिवाळीचा पहिला दिवा अखिल हिंदुस्थानचे भाग्यविधाते असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या चरणी..
दिवाळीचा पहिला दिवा जगदीश्वराच्या चरणी...❤️

कर्तव्य
रायगड
शिवछत्रपतींनी स्वराज्याचा विस्तार करताना भौगोलिक रचनेचे भान ठेवून स्वराज्याकरिता प्राणाची बाजी लावणाऱ्या मराठा सेनानींची मालिकाच विकसित केली. त्यामुळेच स्वातंत्र्य लढ्यात बलाढ्य शत्रूसमोर स्वराज्य टिकून राहिले. याचे कारण म्हणजे “सेनापती धनाजी जाधव”...🙏🚩

मराठेशाहीतील उत्कृष्ट संघटक व व्यवस्थापक होता. त्याच्या संघटन व व्यवस्थापन कौशल्याची वैशिष्ट्ये यात आहे की कधी पराजय पदरी येत असताना जनतेचा त्याचेवरील विश्वास कधीच कमी झाला नाही. कधी त्यांच्याविरुद्ध त्याच्या सैनिकांनी बंडखोरी केली नाही. उलट सैन्यात तो प्रिय असल्याचेच मोगल इतिहासकारांचे मत आहे. जनता व सैनिक मोठ्या विश्वासाने त्याच्या सोबत व पाठीशी खंबीरपणे राहिली. मोगलांविरुद्ध आपणास निश्चित यश मिळेल ही त्यांनाही खात्री असावी. कारण अपयश आल्यास सर्वांचाच विनाश होता. त्याविरुद्ध खंबीरपणे लढण्याचा निर्धार धनाजी जाधव, त्याचे सैनिक, जनता व छत्रपतीनी केला होता. त्यात अखेर मराठे विजयी ठरले...

पण वरील सदगुणांबरोबरच त्याच्या व्यक्तिमत्त्वात काही दोष होते. मुख्यतः धनाजीस युद्ध कार्याशिवाय इतर कामात रस वाटत नसे. तसे पाहिले तर सेनापती धनाजी जाधव हे त्यांच्यात एक व्यंगच होते...!
――――――――――――――
: @rambdeshmukh
इतिहास फक्त शुरांचा असतो,
भ्याड कधीच इतिहास घडवत नाही...!

स्फूर्तिस्थान
छत्रपती शिवाजी महाराज🔥
सागरी दुर्गबांधणीत जंजिरेकर सिद्दीच्या उरावर छत्रपती शिवरायांनी “पद्मदुर्ग उर्फ कांसा किल्ला” बांधला....🚩

शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले...,
‘राजे म्हणतात.., या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल..ताकीद असे...’

सागरी दुर्गबांधणीतही काही किल्ल्यांचे तटबंदीच्या बाहेर ओबड-धोबड़ दगडांच्या राशी आढळतात भरतीच्या लाटा सोडाच पण साध होडक सुद्धा तटबंदीशी लगट करू शकत नाही शिवाय त्या धारधार दगडांवर कोणी पाय ठेवायची हिम्मत सुद्धा करणार नाही.. दुर्गबांधणी मध्ये त्यांनी निरनिराळे प्रयोग यशस्वी केले व त्यासाठी बारीक सारीक गोष्टींवर तपशीलवार विचार ही केले होते एक दुर्गविज्ञान त्यांनी आपल्या समोर मांडून ठेवले आहे...

किल्ल्यांच्या संरक्षण व्यवस्थेतले महत्त्वाचे घटक म्हणजे तटबंदी आणि बुरूज आणि त्या पद्मदुर्गावरील पाकळी बुरुजाची दुर्गरचना वैशिष्ट्य :

बुरुजाच्या पाकळ्यांच्या बाहेर आलेल्या भागाचा उपयोग शत्रूवर जास्तीत जास्त कोनांमधून मारा करण्यासाठी केलेला आहे कल्पकतेने बनवलेला हा बुरूज पाहाताना बनवणाऱ्यांची सौंदर्य दृष्टी दिसून येते..किल्ल्यावर लांबलचक पसरलेली तटबंदी आणि भव्य बुरूज आहे किल्ल्यासाठी लागणाऱ्या दगडाची गरज भागून किल्ल्यावर पाण्याचे साठे तयार होत हा दगड काढण्यासाठी त्याला आकार देण्यासाठी छिन्नी हातोड्याचा वापर केला जातो त्याच बरोबर दगड सरळ निघावा यासाठी एक पुरातन पद्धत वापरली जाते यात जो दगड फोडायचा आहे त्यावर एका सरळ रेषेत त्रिकोणी खाचा केल्या जातात त्या खाचांमध्ये लाकडाची पाचर घट्ट बसेल अशा प्रकारे मारली जाते या लाकडावर रोज पाणी ओतले जाते यामुळे लाकूड फुगून त्याच्या जोरामुळे कातळातून दगड वेगळा होतो अनेक लेण्यांच्या ठिकाणी किल्ल्यांवर अशा प्रकारचे खाचा असलेले दगड पाहायला मिळतात...

――――――――――――
📷 @gadwat_official 👌🏼♥️🔥
.
.
मराठा_आरमार जलदुर्ग_पद्मदुर्ग
गडकिल्ले_महाराष्ट्राचे
छत्रपती_शिवाजी_महाराज
छत्रपती_संभाजी_महाराज
मराठा_साम्राज्य आरमार इतिहासकर्ते_मराठे
#dronephotography #droneoftheday
#maharashtratourism
#kokandiaries #bhatkanti
#photography #gadwat_official
किल्ले जंजिरा हा जलदुर्ग सर्वाना माहीत आहे पण त्याचा समोर जाऊन त्याहून आत समुद्रात छत्रपतींनी एक जलदुर्ग बांधला तो म्हणजे पद्मदुर्ग तो अनेकांना आजही माहीत नाही तेव्हा खंत वाटते. जंजिरा हा अभेद्य अफाट आहेच तो समुद्राने इतका सुरक्षित आहे की, त्याला जिंकताना नाकी नऊ येतात हे मावळ्यांना उमगले होते. शिवाय जंजिरा जिकण्यासाठी अनेक युक्त्या लढवूनही जंजिरा काही हाती येत नव्हता तेव्हा महाराजांनी फार पुढची युक्ती लावून असा विचार केला की हा जो सिद्धी आहे तो जंजिरा वर राजा आहे परंतू त्याला जगण्यासाठी बाहेरच्या लोकांची मालाची आवश्यकता आहेच तो किती काळ स्वावलंबी राहील फार फार तर गडावर अन्नसाठा आहे तोपर्यंत तर मग आपण त्याचा हा सगळा व्यापारच बंद करूयात यासाठी महाराजांनी समुद्रकिनारी सामराजगड नावाच्या गडाची उभारणी केली आसपासचा किनारपट्टी वरील मुलुख आपल्या ताब्यात घेतला. सिद्धीला कळून चुकले की महाराज आपली कोंडी करत आहेत त्याने काही सैनिक पाठवून हा सामराजगड वर हल्ला केला पण स्वराज्याचे राजे छत्रपतींचे शूर मावळे सिद्धीला जमिनीवर कसले आवरतील त्यांनी गनिमाना वेळोवेळी चोख हल्ल्याने उत्तर दिले आता मात्र सिद्धी ने उलट डोकं चालवत आपण आता जमिनीवर व्यापार करू शकत नसलो तरी समुद्री मार्गाने तर करू शकतो हे ध्यानात घेऊन तो समुद्री मार्गे आपल्या गरजा आवश्यक वस्तू महाराजांचे इतर शत्रू असतील त्यांचा सैन्याशी हातमिळवणी करून तो समुद्री मार्गे आधार घेऊ लागला ही बाब शिवाजी महाराजांच्या लक्षात येताच एक दिवस महाराजांनी सागराची अधिक माहिती काढत जंजिरा च्या पुढे समुद्रात एक कासवाच्या आकाराचे बेट / खडक आहे हे ध्यानात घेतले आणि तिथे निर्माण केला पद्मदुर्ग ! मी स्वतः पद्मदुर्ग पाहिला तेव्हा मला तो दुर्गविज्ञानाचा आविष्कारच वाटला. असा हा पद्मदुर्ग बांधून सिद्धीची समुद्रातूनही व्यापार बंद करून कोंडी करण्याचा डाव छत्रपतींनी बनवला पण दुर्दैवाने पुढे महाराजांचे निधन झाले शिवाय एका सिद्धीपेक्षा ढीग खान आणि यवन स्वराज्यावर सतत स्वाऱ्या करत होते त्यामुळे छत्रपतींना जंजिराकडे फार लक्ष देता आले नाही आणि अखंड स्वराज्याचा विस्तार पाहता त्याकडे प्राधान्य देणे साहजिकच होते त्यामुळे जंजिरा हा स्वराज्यात येता येता राहिला. लेखाचा थोडक्यात उद्देश छत्रपतींनी पद्मदुर्ग बांधला त्यामागे राजांचे काय धोरण होते आणि एखादा गड जिंकण्यासाठी राजे जंजिऱ्याच्या नाकावर टिच्चून त्याही पुढे जाऊन त्या भयाण सागरात पद्मदुर्ग बांधतात हीच गोष्ट त्या सिद्धी साठी घाम फोडणारी होती.

-- आदेश म्हस्के ✒️
दिव्याचं देवपण तो जळत असेपर्यंत असतं. त्याला बाह्य शत्रुंपासून सुरक्षित ठेवण्याचं काम असतं त्या काचेचं'. एका संरक्षका प्रमाणे ती काच ह्या 'तेज' यज्ञात आपलं काम सलोखीने करत असते.

अगदी त्याचप्रमाणे स्वतःचं घरदार सोडून राष्ट्रासाठी रक्ताचा अभिषेक करणारे तेव्हाचे मावळे असोत किंवा आत्ताचे सैनिक आपलं काम चोख बजावत आहेत 🫡

कंदिलाच्या काचेप्रमाणे त्या दिव्याचं देवपण तेवत ठेवत आहेत. आजवर राष्ट्रहितासाठी रयतसाठी तेजाच्या अग्निकुंडात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या तमाम वीरांना दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा 😇🔥🎉
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
लक्ष्मीची होईल कृपा एवढी, सगळीकडे होईल नाव दिवसरात्र व्यापारात वाढेल तुमचं काम सर्व इच्छा होवो पूर्ण, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!😍
2024/11/05 04:24:28
Back to Top
HTML Embed Code: